The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी वर्ल्डकप सेमी फायनलिस्ट असलेल्या केनियन क्रिकेट टीमची आजची अवस्था मन सुन्न करणारी आहे

by द पोस्टमन टीम
10 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘There is a silver lining in everything, including your broken dreams’, या इंग्रजी कोटला साजेसं एक उदाहरण मी काही दिवसांपूर्वी शोधत होते. दिवसभर मी विचार केला पण मला काही योग्य उदाहरण मिळालं नाही. सायंकाळच्या वेळी मी नेहमीप्रमाणं घराजवळ असणाऱ्या ग्राऊंडवर जाऊन बसले. तिथे दोन मुलं टी ट्वेंटी वर्ल्डकपबद्दल चर्चा करत-करत ग्राऊंडला फेऱ्या मारत होते. त्यांच्या बोलण्यात त्यांनी दोन-तीनवेळा केनियाचा उल्लेख केला अन् इकडे ‘मेरे दिमाग की बत्ती जली’! मी ज्या कोटसाठी उदाहरण शोधत ते मला मिळालं होतं. ते उदाहरण म्हणजे ‘केनियन क्रिकेट’! आता तुम्ही म्हणाल त्या कोटचा आणि केनियन क्रिकेटचा काय संबंध? डोक्यावर जास्त ताण देऊ नका. दोन्हींचा संबंध समजून सांगण्यासाठी मी आहे ना. चला तर मग जाणून घेऊया केनियन क्रिकेटबद्दल…

२००३ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित झालेला आठवा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आठवतो? नक्कीच आठवत असेल. १९८३ नंतर भारतीय संघानं दुसऱ्यांदा फायलनमध्ये धडक मारली होती. मात्र, फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दिग्गजांचा भरणा असलेल्या भारतीय संघाचं दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावण्याचं स्वप्न भंगलं होतं.

फायनलची ती मॅच वगळता त्या वर्ल्डकपमध्ये आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट घडली होती. त्या टूर्नामेंटमध्ये एक असा संघ होता जो रातोरात चर्चेत आला होता. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना या संघानं थेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. हा छुपारुस्तम संघ होता केनियाचा.

हाय क्वालिटी बॉलिंग-बॅटिंग आणि क्लासिक फिल्डिंगच्या बळावर केनियनं संघानं संपूर्ण जगाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडलं होतं. एकूणच २००३चा क्रिकेट वर्ल्डकप हे केनियन क्रिकेटला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न होतं. कारण, ती त्यांची पहिली आणि शेवटची वेळ, जेव्हा त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला होता. कधीकाळी सेमीफायनलिस्ट असलेला केनियन संघ आता अतिशय वाईट अवस्थेत आहे. 

सध्याच्या घडीला आपल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या केनियन क्रिकेटला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या प्रभावाखाली आल्यानंतर १८८० च्या दशकात केनियामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली होती. डिसेंबर १८९९ मध्ये तिथे पहिला महत्त्वाचा सामना झाला. या सामन्यात ‘ईस्ट आफ्रिकन प्रोटेक्टोरेट’नं मोंबासा येथे ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ संघाशी दोन हात केले होते.



त्यानंतर १९१४ मध्ये केनियन क्रिकेट संघानं आपला पहिला क्रिकेट दौरा केला. केनियन संघानं युगांडाला भेट दिली होती आणि यजमानांचा पाच गडी राखून पराभव केला होता. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ईस्ट आफ्रिका क्रिकेट टीम’नं, केनिया, टांझानिया आणि युगांडाचं एकत्र प्रतिनिधित्व केलं. १९५८ मध्ये त्यांचा नॉन-युरोपियन दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध पहिला सामना झाला होता. १९८१ मध्ये आयसीसीनं केनियाचा असोसिएट मेंबर म्हणून स्वीकार केला आणि त्यानंतर केनियन क्रिकेटची वेगात प्रगती झाली.

केनिया अधिकृतपणे असोसिएट मेंबर झाल्यामुळं त्यांच्या संघाला आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर केनियानं १९९६ मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळवला होता. १९९६ ते २०११ दरम्यान झालेल्या सर्व वर्ल्डकप स्पर्धांसाठी ते पात्र ठरले होते. शिवाय त्यांनी २००७ च्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये देखील प्रवेश मिळवला होता. त्यासाठी त्यांनी पात्रता फेरी यशस्वीपणे पार केली होती.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

२००३ चा वर्ल्डकप हा केनियन क्रिकेटचा सर्वोत्तम काळ म्हणून ओळखला जातो. श्रीलंका आणि झिम्बाब्वेसारख्या प्रस्थापितांचा पराभव करून त्यांनी सेमीफायनल गाठली होती. अशी कामगिरी करणारा तो एकमेव असोसिएट मेंबर ठरला होता. एवढंच नाही तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या को-होस्टची देखील भूमिका निभावली होती. आयसीसीच्या एका स्पर्धेमुळं केनियन खेळाडू रातोरात सुपरस्टार झाले होते. वर्ल्डकपमधील त्यांच्या जादुई यशानंतर केनियन क्रिकेटला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर केनियाला झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत चौरंगी मालिका खेळण्यासाठी युएईमध्ये निमंत्रित करण्यात आलं. मात्र, त्याठिकाणी ते आपले चारही सामने हरले आणि रिकाम्या हाताने मायदेशी परतले. त्यानंतर त्यांनी अनेक लहान-मोठ्या स्पर्धांमध्ये तग धरण्याचा प्रयत्न केला.

खेळ आणि राजकारण या दोन गोष्टी एकमेकांपासून जितक्या दूर राहतील तितकं चांगलं, असं म्हटलं जातं. त्यामध्ये तथ्य देखील आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव केनियन क्रिकेटनं आणि तेथील क्रिकेटप्रेमींना घेतला आहे. केनियन क्रिकेटमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र, एक क्षण असा आला जेव्हा क्रिकेटमध्ये राजकारणाचा हस्तक्षेप झाला अन् शतकभरापूर्वी उभा राहिलेला केनियन क्रिकेटचा डोलारा ढासळू लागला. देशात प्रचलित असलेल्या राजकीय आणि आर्थिक समस्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर केनियन क्रिकेटची घसरण होत गेली. २०१४ मध्ये आयसीसी वर्ल्डकप क्वॉलिफायर राउंडमध्ये सुपर सिक्सच्या एकदम तळावर राहिल्यानंतर तर केनियन खेळाडू आणि चाहत्यांचा ‘टोटल हार्टब्रेक’ झाला. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टिकवता न आल्यानं आता तेथील क्रिकेट चाहत्यांना देखील क्रिकेटमध्ये रस राहिला नसल्याचं चित्र सध्या केनियामध्ये आहे. राजकारण, भ्रष्टाचार यामुळं क्रिकेट केनिया या प्रशासकीय मंडळाला देखील मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली. मंडळावर कर्जाचा बोजा इतका आहे की देशांतर्गत स्पर्धांमध्ये गुंतवणूक करताना देखील त्यांची दमछाक होत आहे.

क्रिकेटमधील प्रत्येक संघाने अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे परंतु केनियासारखी अवस्था कुणाचीही झालेली नाही. केनिया क्रिकेट संघ आणि केनियामधील क्रिकेटला त्यांचा गमावलेला दर्जा परत मिळवण्यासाठी आता शेकडो मैलांचा प्रवास करावा लागेल. अगदी स्थानिक पातळीपासून देशातील क्रिकेटची पुनर्रचना करावी लागेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

स्क्विड गेमच्या लेखकाने पटकथा घेऊन १२ वर्षे निर्मात्यांच्या पायऱ्या झिजवल्या होत्या

Next Post

हि*टल*रला हवं असलेलं ‘एअरक्राफ्ट कॅरियर’ त्याला शेवटपर्यंत मिळालं नाही

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

हि*टल*रला हवं असलेलं 'एअरक्राफ्ट कॅरियर' त्याला शेवटपर्यंत मिळालं नाही

या कलियुगातल्या भीमाने व्हॉईसरॉयची फुल्ल स्पीडमधली गाडी साखळीने थांबवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.