The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आंद्रे द जायंट’च्या तशा अवाढव्य शरीरामागे एक मोठी शोकांतिका होती

by Heramb
26 January 2026
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवामध्ये उपजतच काही गुण असतात. त्यांपैकीच एक म्हणजे स्पर्धात्मक गुण. याच गुणाबरोबर मानवामध्ये एक अवगुणही असतो, तो म्हणजे, हिं*साचाराचा अवगुण. याच गुण-अवगुणांच्या जोडीवर आधारित एक स्पर्धा ऐतिहासिक रोममध्ये होत असत. या स्पर्धेत ग्लॅडिएटर्स यो*द्धे आपली यु*द्धकौशल्ये आणि शस्त्रकौशल्ये दाखवत असत. या कुस्तीसमान क्रीडास्पर्धा अनेकदा स्पर्धात्मकतेचा कळस गाठून एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जात असत. कुस्तीच्या जगात प्रसिद्धी, पैसा आणि तत्सम सर्व गोष्टी आहेत.

तथापि, कुस्ती आपले मनोरंजन करण्यात कधीही अपयशी ठरत नाही ही वस्तुस्थिती आहे. याच स्पर्धांचे आधुनिक स्वरूप म्हणजे पूर्वीचे डब्लू.डब्लू. एफ. किंवा डब्लू.डब्लू.इ. कालांतराने या स्पर्धा ‘स्क्रिप्टेड’ असल्याचे समोर आले. तरी डब्लू.डब्लू.इ.मध्ये ड्वेन जॉन्सन, जॉन सीनासारखे ताकदवान प्लेयर्स येऊन आपली कौशल्ये दाखवतात. अशाच अनेक भव्य प्लेयर्समध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे आंद्रे रेनेचे! आंद्रे रेनेची ही कथा कुस्ती-उद्योगातील सर्वांत प्रसिद्ध कथांपैकी एक आहे, आंद्रे द जायंट म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या आंद्रे रेने रौसिमॉफबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा विशेष प्रयत्न..

आंद्रेचा जन्म १९ मे १९४६ रोजी कुलोमियर्स, सेन-एट-मार्ने येथे बल्गेरियन नागरिकत्व असलेले वडील आणि पॉलिश नागरिकत्व असलेल्या आईच्या पोटी झाला. जन्माच्या वेळी त्याचे वजन तब्बल ६ किलो होते आणि लहान वयातच त्याने आपल्या विशालतेची लक्षणे दाखवायला सुरुवात केली. वय वर्षे १२ असतानाच त्याची उंची ६ फूट ३ इंच इतकी होती.

१४ वय पूर्ण होईपर्यंत त्याने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो आपल्या वडिलांबरोबर शेतात काम करू लागला. त्याच्या विलक्षण आकार आणि सामर्थ्यामुळे तो तीन पुरुष करतील इतके काम एकाच वेळी करू लागला, असे वर्णन काही कथा करतात. कालांतराने तो लाकूडकाम शिकण्यास गेला आणि एका कारखान्यात काम केले.



पण शेतकाम किंवा लाकूडकामामध्ये त्याला समाधान मिळत नव्हते. यापेक्षाही या जगात आणखी काही आहे असे त्याला सतत वाटत असे. म्हणूनच तो अठराव्या वर्षीच पॅरिसला गेला. त्याने दिवसाच्या वेळेत मूव्हर म्हणून काम केले आणि रात्रीच्या वेळेत कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. १९६६ साली तो फ्रँक व्हॅलॉइसला भेटला, त्याने आंद्रेची क्षमता ओळखली आणि आंद्रेला व्यवसाय व्यवस्थापक आणि सल्लागार म्हणून नेमले. फ्रँकच्या प्रशिक्षणाखाली आंद्रेने युरोप आणि आफ्रिकेत स्वतःचे नाव कमवायला सुरुवात केली.

आंद्रेने १९७० साली आंतरराष्ट्रीय कुस्तीत पदार्पण केले आणि त्याने जपानमध्ये “मॉन्स्टर रौसिमॉफ” म्हणून लढण्यास सुरुवात केली. कुस्ती स्पर्धेत प्रवेश करताच तो एक टॅग टीम चॅम्पियन बनला. ॲक्रोमेगाली या रोगाचा त्रास आहे हे त्याला जपानमध्येच कळले. पिट्यूटरी ग्रंथीच्या वाढीच्या संप्रेरकाच्या अति-उत्पादनामुळे ॲक्रोमेगाली होते. पिट्यूटरी ग्रंथीचे अति-उत्पादन एका निरुपद्रवी ट्यूमरमुळे होते. असाच रोग फ्रेंच अँजेलला देखील झाला होता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

याचाच परिणाम अवाढव्यतेमध्ये होतो आणि आयुष्याच्या वाढत्या वर्षांत ट्यूमरवर उपचार न केल्यास त्या ट्युमरचे रूपांतर ॲक्रोमेगालीमध्ये होते. या आजाराची सुरुवातीची लक्षणे म्हणजे शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत हात आणि पाय असामान्य पद्धतीने वाढणे, सांधेदुखी, डोकेदुखी, त्वचा जाड होणे आणि दृष्टीसंबंधी समस्या निर्माण होणे अशी असतात.

ॲक्रोमेगालीमुळे स्लीप एपनिया, टाइप-2 मधुमेह आणि तत्सम गंभीर आरोग्य प्रकरणांमध्ये उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्याचे आयुष्य गुंतागुंत आणि संकटांनी परिपूर्ण असेल हे आंद्रेला माहित होते. म्हणूनच त्याला एक निरोगी माणूस म्हणून जगण्याची इच्छा होती. यामुळेच त्याने स्वत:ला आपल्या कामात गुंतवले, त्याचे आरोग्य बिघडण्याआधी स्टार बनण्याचा त्याने निर्धार केला.

आंद्रे कॅनडाला गेला आणि मॉन्ट्रियल फोरममध्ये कुस्तीसाठी परफॉर्मन्सेस सादर करण्यास सुरुवात केली. तो अल्पावधीतच यशस्वी झाला आणि त्याच्या आकाराची नाविन्यता संपूर्ण कॅनडामधील प्रेक्षकांना आकर्षित करू लागली. पण तो सातत्याने एकाच व्यासपीठावर काम करत असल्यामुळे त्याचे लोकांबरोबर हितसंबंध कमी होऊ लागले.

आंद्रेला पराभूत करण्यासाठी विरोधक शोधणे देखील आता कठीण झाले होते. म्हणूनच आंद्रेचे व्यवस्थापक डब्लू.डब्लू.एफच्या व्यवस्थापकांशी बोलले. डब्लू.डब्लू.एफच्या व्यवस्थापकांनी त्याला स्पर्धक म्हणून सामील करून घेण्याचे ठरवले. आता तो आता एक ‘मॉन्स्टर’ म्हणून ओळखला जात होता. तो शारीरिक गतीने मंद आणि आळशी होता, तरीही त्याच्या मोठ्या आकार आणि सामर्थ्यामुळे त्याला पराभूत करणे अशक्यच होते.

अशाप्रकारे, आंद्रे-द-जायंट हे नाव त्याला मिळाले आणि आंद्रेने जगाचा दौरा केला, वेगवेगळ्या ठिकाणी त्याने शक्तीप्रदर्शन केले. आंद्रेची १९७३ पासून १९८६ पर्यंत डब्लू.डब्लू.एफमध्ये विजयी घोडदौड सुरूच होती. त्याने जगभरातील कुस्तीपटूंना सर्व प्रकारच्या स्वरुपात आव्हान दिले आणि प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे म्हणजे त्याचे रोजचेच काम होऊन बसले होते. त्याने बॉक्सर चक वेपनरविरुद्धची लढत जिंकली. ही लढाई मात्र ‘अन्सक्रिप्टेड’ होती तसेच एक जंगली उन्माद आणि शक्तीचे भव्य प्रदर्शन होते. आंद्रेने प्रतिस्पर्ध्याला रिंगमधून बाहेर फेकून लढा जिंकला.

“द जायंट ऑफ रेसलिंग” या शीर्षकासाठी त्याने विविध दिग्गजांशी लढा दिला. मंगोलियातील ‘मॉन्स्टर’ किलर खान याच्याशी त्याचे दीर्घकालीन भांडण होते. आंद्रेने त्याला जगभरातील अनेक स्पर्धांमध्ये अनेक वेळा पराभूत केले. एका वेळेस तर ‘मॉन्स्टर’ खानवर आंद्रेचा घोटा तोडण्याचा तथाकथित आरोपही झाला होता. प्रत्यक्षात मात्र आंद्रेचा घोटा सकाळी मॅचच्या आधीच काही कारणाने तुटला होता, पण मॅचनंतर त्याला वेदना जाणवल्या. पण आंद्रेने याचा लवकरच बदला घेतला, त्याने खानला इतक्या वाईट रीतीने पराभूत केले की त्याला स्ट्रेचरवर घेऊन जावे लागले.

आंद्रेच्या प्रतिष्ठेला आव्हान देणारा पुढील स्पर्धक बिग जॉन स्टड होता. त्याने स्टडलासुद्धा अनेक वेळा पराभूत केले आणि “द जायंट ऑफ रेसलिंग” हे त्याचे शीर्षक कायम ठेवले. तो सातत्याने कुस्ती करत राहिला, पण त्याची तब्येत बिघडू लागल्याने त्याचे सामने कमी झाले. यानंतर तो अभिनयाकडे वळला. त्याची सर्वांत प्रसिद्ध भूमिका “द प्रिन्सेस ब्राइड”मधील ‘फेझिक’ ही आहे. तो “द सिक्स मिलियन डॉलर मॅन”मध्ये बिगफूट देखील खेळला आणि त्याने “आय लाईक टू हर्ट पीपल”मध्ये स्वतःची भूमिका केली.

१९९३ साली हृदयविकारामुळे आंद्रे-द-जायंटचे पॅरिसमध्ये निधन झाले. तो त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी फ्रान्सला गेला होता आणि काही काळ आपल्या आईबरोबर घालवावा म्हणून तो तेथेच थांबला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याने आपल्याकडे असलेले सर्व काही आपली मुलगी रॉबिकडे सोपवले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

साहित्यावर जसा विल्यम शेक्सपियरचा प्रभाव आहे तसाच मायकेलेंजेलोचा कलेवर आहे

Next Post

२८ वर्ष पोलिसांना न उलगडलेलं कोडं, १५ वर्षांच्या पोराने ‘गो प्रो’ कॅमेऱ्याच्या मदतीने सोडवलंय

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

२८ वर्ष पोलिसांना न उलगडलेलं कोडं, १५ वर्षांच्या पोराने 'गो प्रो' कॅमेऱ्याच्या मदतीने सोडवलंय

समुद्राच्या तळाशी तब्बल तीन दिवस जिवंत राहून जगण्याच्या जिद्दीने तो परत आला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.