The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समुद्राच्या तळाशी तब्बल तीन दिवस जिवंत राहून जगण्याच्या जिद्दीने तो परत आला

by Heramb
23 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“आपण आपल्या जीवनात चमत्काराची आशा करू शकता किंवा आपले जीवन हाच एक चमत्कार आहे हे आपल्याला कधीतरी समजेल!” रॉबर्ट ब्रेउल्टच्या या वाक्याची प्रचिती आपल्याला अनेकदा विविध कथांच्या माध्यमातून येत असते.

सहसा, सकाळी लवकर उठणे कंटाळवाणे वाटते. आपण तंद्रीत असतो आणि आळसामुळे सकाळचा सूर्यप्रकाश टाळतो. पण हॅरिसन ओडजेग्बा ओकेनेच्या बाबतीत असे नव्हते. २६ मे २०१३ रोजी, पहाटे लवकर उठून बाथरूमच्या दिशेने जाणाऱ्या नायजेरियन कूक हॅरिसन ओकेनेचा जीव वाचला.

हॅरिसन समुद्रात बुडणाऱ्या बोटीतून एकटाच वाचला. त्यादिवशी पहाटे ५ वाजण्याच्या आधी, नायजेरियाच्या किनाऱ्यापासून वीस मैल दूर असलेल्या गिनीच्या खाडीतील ‘शेवरॉन प्लॅटफॉर्म’वर समुद्रात मिळणाऱ्या नैसर्गिक तेलाचा टँकर स्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना जास्कॉन – ४ नावाची टगबोट अटलांटिक महासागरात बुडाली.

दिवसभर केलेल्या कामामुळे दमलेले हॅरिसन आणि त्यांचे सहकारी रात्री केबिनमध्ये थोडी विश्रांती घेण्यासाठी गेले. सुरक्षेसाठी त्यांनी बाहेरून दरवाजे बंद केले. नेहमीप्रमाणे, हॅरिसन ओकेन सकाळी लवकर उठून आपल्या सहकाऱ्यांसाठी नाश्त्याची सोय करायचा. नाश्ता तयार करण्यापूर्वी, तो केबिनच्या आत असलेल्या बाथरूममध्ये गेला आणि दरवाजा बंद केला.

त्याच क्षणी, एक प्रचंड मोठी आणि अक्राळविक्राळ लाट त्या बोटीला धडकली आणि बोट बुडू लागली. ओकेने बाथरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि लाटेचे पाणी प्रचंड वेगाने आत आले. दुर्दैवाने, त्याला बाहेर पडणे अशक्य होऊन बसले.



हॅरिसनला क्रू मेम्बर्सकडेही जाता येईना आणि पाण्याच्या प्रचंड वेगामुळे इमर्जन्सी एक्सिटही शोधता येईना. आपले काही सहकारी बुडाल्याचे त्याने पहिले. हे भयानक दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. काही क्षणातच पाण्याच्या प्रवाहाबरोबर हॅरिसन आधी हॉलवेमध्ये आणि नंतर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये वाहून आला. यासगळ्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. तसेच अशा प्रसंगी प्रसंगावधान राखणे महत्त्वाचे असते, पण तसे न होता त्याच्या मनात भलतंच काहीतरी सुरु होतं. यावेळी तो जगण्याची धडपड करीत होता.

त्याच्या प्रयत्नातील विशेष गोष्ट म्हणजे ‘त्याची जगण्याची इच्छा’. या इच्छाशक्तीने शरीरावर असंख्य जखमा आणि मानसिक अस्वस्थतेला सामोरं जात असतानाही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. बुडत असलेल्या बोटीतील पाण्याचा स्तर सतत वाढत असताना, हॅरीसनने उलटलेल्या वॉशबेसिनची मदत घेतली आणि तो बुडणाऱ्या बोटीच्या वर राहण्याचा प्रयत्न करीत होता. यामुळे तो बुडणाऱ्या बोटीपासून थोड्या उंचीवर राहिला तसेच त्याला श्वास घेण्यासही मदत झाली. असं असलं तरी हा क्षणिक उपाय होता. त्याला तातडीच्या मदतीची गरज होती.

वाढत्या वेळेसोबतच परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली होती. प्रचंड लाटांमुळे त्यांची बोट समुद्रात ९८ फूट खोलीवर बुडाली, अखेरीस ही बोट समुद्राच्या तळाशी उलटली, यात ११ क्रू मेम्बर्सचा मृत्यू झाला. पण चमत्कार म्हणजे हॅरिसन अजूनही जिवंत होता. बोट उलटल्याची बातमी कळताच बचावकार्य सुरु करण्यात आले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

बचाव पथकाच्या डायव्हिंग क्रूला लवकरच दुर्घटनाग्रस्त, समुद्रात बुडालेल्या बोटीचे स्थान सापडले आणि दुर्घटनाग्रस्त बोटीवरील कोणत्या सदस्याला वाचवता येईल का हे तपासण्यासाठी ते बुडालेल्या बोटीजवळ आले.

जेव्हा हॅरिसनने त्यांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. पण ‘डायव्हिंग क्रू’मधील कोणत्याही सदस्याने तो आवाज ऐकला नाही. बचावकर्ते खोल डायव्हिंगसाठी प्रशिक्षित नसल्यामुळे आणि बुडालेल्या बोटीवरील क्रू मेम्बर्स जिवंत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याने बचाव मोहीम रद्द करण्यात आली.

त्या वेळी, ओकेन अजूनही उरल्यासुरल्या बाथरुममध्ये ‘थिन एअर पॉकेट’मधून श्वास घेत अडकून पडला होता. एक दिवस घालवल्यानंतर, शेवटी त्याने दरवाजा सोडण्याची आणि टगबोटमधील अंधारातून इंजिनिअरच्या ऑफिसमध्ये जाण्याची इच्छाशक्ती दाखवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऑफिसची उंची १.२ मीटर होती, म्हणेजच त्या ठिकाणी त्याला जिवंत राहण्यापुरती हवा मिळणार होती. पाण्याखालील थंडी वाढत असतानाही हॅरिसन जगण्यासाठी धडपडत होता. कसाबसा तो त्या उरल्यासुरल्या इंजिनिअरच्या ऑफिसमध्ये पोहोचला.

मजल्याच्या तळाशी, त्याने गादी आणि तत्सम साहित्यांसह एक प्लॅटफॉर्म तयार केला, जेणेकरून त्याचे डोके पाण्यापेक्षा वर राहत होते. तो सर्वांत कमी जीवनरक्षक उपकरणांच्या मदतीने जगत होता. अतिशय थंड वातावरणामुळे आणि पाण्याची प्रचंड खोली तसेच दबावामुळे त्याच्या मनात निराशा, दु: ख आणि एकाकीपणाच्या भावना एकाटून आल्या. यावेळी त्याला सतत त्याच्या कुटुंबाची आठवण येत होती. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी तो देवाची प्रार्थना करत होता.

अखेर या प्रार्थना फलित झाल्या. ज्याठिकाणी टगबोट बुडाली त्याठिकाणीच डाइव्ह स्पोर्टींग जहाज आले होते. जॅस्कॉन – ४ च्या मूळ कंपनीने बेपत्ता क्रू मेंबर्सचे मृतदेह शोधण्यासाठी ‘डीसीएन ग्लोबल’ या सबसी सर्व्हिसेस कंपनीच्या डायव्हिंग टीम सदस्यांना नियुक्त केले होते. हे मिशन सगळ्यात अवघड असल्याचा निष्कर्ष डायव्हिंग सदस्य आणि टीमच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी काढला होता.

तरीही, धैर्य आणि दृढनिश्चयाने, टीम बुडलेल्या बोटीच्या आत पोहचण्यात यशस्वी झाली. बुडालेली बोट पूर्णतः उ*द्ध्वस्त झाली होती. अतिशय कष्टाने, डायव्हर्सना चार क्रू सदस्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले. कोणीतरी प्रतिसाद देऊ शकेल या विचाराने त्यांनी बोटीवर थाप मारली. आता आपले हे शेवटचे क्षण असा विचार करत असलेल्या हॅरिसनने हा आवाज ऐकला. त्यानेही जवळच्याच दरवाजावर हातोडा मारून त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही त्याच्या नशिबाने साथ दिली नाही.

थोड्याच वेळात एका डायव्हरने एका निश्चल हाताला मृतदेहाचा हात समजून स्पर्श केला. पण डायव्हरचा हात घट्ट पकडला गेल्याने तो घाबरला. हा हात दुसऱ्या कोणाचाही अथवा कुठल्याही मृतदेहाचा नव्हता तर तब्बल ७२ तास जिवंत राहिलेल्या हॅरिसन ओकेनचा होता. डायव्हर्सच्या आश्चर्याला पारावार उरलाच नाही.

इतक्या कठीण परिस्थितीतही एखादा मनुष्य कसा जिवंत राहू शकतो, याबद्दल त्यांना अप्रूप वाटत होते. या कठीण परिस्थितीतून सुटका होऊनही त्याची तब्येत बरी नव्हती. त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता शिवाय इतका वेळ ऑक्सिजन अभावी राहिल्याने तो बेशुद्ध झाला होता. 

डायव्हर्स ज्या समस्येला “बेंड्स” म्हणतात, त्याही समस्येचा सामना हॅरीसनला करावा लागला. यामुळे हृदयविकाराचा झटका, पॅरालिसिस किंवा मृत्यूचीही शक्यता निर्माण होते. डायव्हर्सच्या लाईफ सेविंग टीमच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी शेवटी हॅरिसनला जीवनदान दिले.

पाण्यात झालेल्या या भयावह अग्निपरीक्षेचा अनुभव घेतल्यानंतर मात्र तो आपल्या गावी परतला आणि जवळून मृत्यू पाहूनही वाचल्याने तो स्वतःला भाग्यवान समजू लागला. या अग्निपरीक्षेतून ‘वाचण्याचा’ तो क्षण म्हणजेच ‘चमत्कार’ असे त्याचे मत आहे. त्याच्या याच अनुभवावर व्हर्जिनिया हॅन्गन यांचे ‘हॅरिसन ओकेन: सिक्सटी अवर्स अंडर वॉटर’ हे पुस्तकही आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

२८ वर्ष पोलिसांना न उलगडलेलं कोडं, १५ वर्षांच्या पोराने ‘गो प्रो’ कॅमेऱ्याच्या मदतीने सोडवलंय

Next Post

जपानवर अणु*बॉ*म्ब टाकणाऱ्या विमानाच्या पायलटला त्या गोष्टीचा कधीच पश्चाताप झाला नाही

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

28 September 2024
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

26 September 2024
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

30 September 2024
Next Post

जपानवर अणु*बॉ*म्ब टाकणाऱ्या विमानाच्या पायलटला त्या गोष्टीचा कधीच पश्चाताप झाला नाही

जगातल्या विविध देशात असलेल्या या 'विचित्र टॅक्सेस'बद्दल वाचून तुम्हीही हैराण व्हाल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.