The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या आहेत जगातील १० सर्वांत महागड्या कार्स!

by Heramb
21 October 2023
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


औद्योगिक क्रांतीनंतर जगामध्ये अर्थकारण मोठ्या प्रमाणात वाढले. अर्थशास्त्राच्या याच डोलाऱ्यावर राष्ट्र, संस्कृती, शासनव्यवस्था, नागरिकांचे रहाणीमान आणि अनेक गोष्टी अवलंबून असतात. औद्योगिक क्रांतीमुळे जगभरात अनेक प्रकारच्या नव्या व्यापारांना चालना मिळाली. जे व्यापार आधीपासूनच अर्थव्यवस्थेत होते, त्यांची लक्षणीय वाढ याच औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून झाली.

अनेक उद्योगांमध्ये उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. याच काळात टेलिफोनसारखे अनेक वैज्ञानिक शोध लागत गेले आणि मानवी जीवनाने एक नवी गती घेतली. मानवाने विश्वातील सर्वच क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली. मग यांमध्ये दळणवळणाचं क्षेत्र तरी कसं मागे राहील! टांगे आणि बग्गीची जागा नव्या मोटारींनी घेतली.

इसवी सन १८६० पासून पाश्चिमात्य बाजारपेठांमध्ये मोटारी येण्यास सुरुवात झाली होती. कालांतराने ही ऐषारामाची आणि काही ठिकाणी गरजेची असलेली वस्तू श्रीमंतीची निदर्शक ठरली. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच कारमध्येही अनेक बदल झाले. काही कार्स अतिशय आरामदायी, प्रशस्त असतात तर काही ‘रेसिंग कार्स’ असतात. आजमितीस जगातील सर्वांत महागड्या १० कार्स कोणत्या आहेत हे जाणून घेण्याची सफर करूया! कदाचित त्या कार्स तुमच्या बजेटमध्येही असतील..

 

१०. अस्पार्क आऊल (इलेक्ट्रीक): 

जपानी बनावटीची ही सुपरकार खरंतर जगातील दहावी सर्वांत महागडी सुपरकार नाही, पण जगातील सर्वांत महागडी इलेक्ट्रीक कार आहे. याबरोबरच ही जगातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रीक कार असून फक्त दोन सेकंदांच्या आत या गाडीचा वेग ० मीटर पर आवर वरून ६० मीटर पर आवर होतो.



आणखी एक विशेष बाब म्हणजे ही कार सर्वांत लहान इलेक्ट्रीक कार असून तिची उंची केवळ ३९ इंच आहे. ज्यामुळे ही कार प्रचंड स्पीडने धावू शकते. त्यामुळे अस्पार्क आऊल क्रमांक १ ची इलेक्ट्रीक कार ठरते. या कारचे ५० मॉडेल्स तयार केले जाणार आहेत.

सध्या या कारची किंमत सुमारे ३.३ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) २७ कोटी ४६ लाख ९० हजार ८४५ रुपये इतकी आहे.

अस्पार्क आऊल

 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

९. कोएनिग्सेग सीसीएक्सआर ट्रेव्हिटा:

लिमिटेड एडिशन असणारी सीसीएक्सआर ट्रेव्हिटाची फक्त दोन मॉडेल्स उपलब्ध होते. ९ सेकंदांच्या आत या कारचा वेग ० मीटर पर आवर पासून १२४ मीटर पर आवर पर्यंत मजल मारू शकतो. स्वीडनमध्ये तयार केलेल्या या कारचे वजन १ टन अर्थात १००० किलोपेक्षाही अधिक आहे. असं असलं तरी फरारी, ॲस्टन मार्टिन किंवा लॅम्बोर्गिनी या कारच्या ब्रँड्सच्या तुलनेने या कारचे वजन कमी आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे ४.८ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) ३९ कोटी ९५ लाख ५० हजार ३२० रुपये इतकी आहे.

कोएनिग्सेग सीसीएक्सआर ट्रेव्हिटा

 

८. बुगाटी डिवो:

बुगाटी डिवोचे सर्व स्पेसिफिकेशन्स बुगाटी चिरॉनप्रमाणेच असून नाविन्यपूर्ण फ्रंट डिझाईन हे डिवोचे वैशिष्ट्य आहे. ही कार फक्त ३ सेकंदांच्या आत ० मीटर पर आवर पासून ६२ मीटर पर आवरपर्यंत स्पीड घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड सुमारे ३८० किलोमीटर पर आवर इतका आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे ५.७ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) ४७ कोटी ४४ लाख २३ हजार ५८४ रुपये इतकी आहे.

 

बुगाटी डिवो

 

७.मर्सिडीज-मेबॅक एक्सेलेरो:

मर्सिडीजने मेबॅकच्या धर्तीवर एक्सेलेरो तयार केली असून या कारमध्ये मेबॅकचेच ट्विन-टर्बो व्ही-१२ इंजिन बसवण्यात आले. हे इंजिन ६९० हॉर्सपॉवर (५१० किलोवॅट) आणि ७५२ पौंड-फूट (१०२० न्यूटन-मीटर) टॉर्क तयार करते. एक्सेलेरोचा टॉप स्पीड २१८ मैल प्रति तास (३५० किलोमीटर प्रति तास) आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे ८ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) ६६ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे.

मर्सिडीज मेबॅक एक्सेलरो

 

६. लँबोर्गिनी वेनेनो:

लँबोर्गिनीने ॲव्हेंटाडोरच्या ६.५-लिटर व्ही-१२ ची अधिक शक्तिशाली पुनरावृत्ती तयार केली आहे. ही पुनरावृत्ती आता ७४० हॉर्सपॉवर (५५२ किलोवॅट) आणि ५०९ पौंड-फूटचा (६०९ न्यूटन-मीटर) टॉर्क तयार करते, यामुळे या कारची क्षमता ताशी ६० मैल वेग इतकी झाली आहे. ही कार फक्त २.९ सेकंदात ताशी ९६ किलोमीटर इतका वेग पकडून प्रवास करू शकते.

सध्या या कारची किंमत सुमारे ८.३ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) ६९ कोटी ९ लाख ९६ हजार ८५८ रुपये इतकी आहे.

लँबोर्गिनी वेनेनो

५. बुगाटी सॅनेटोडियेसी:

बुगाटी अजून एक अत्यंत दुर्मिळ, महागडे मॉडेल जगाला दाखवत आहे. २०२१ साली तयार झालेली ही कार बुगाटी इबी-११०चाच आधुनिक ‘थ्रोबॅक’ आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे या निमित्ताने २०२१ साली, बुगाटीने ११०वी वर्षपूर्ती साजरी केली. या कारचा टॉप  स्पीडही बुगाटी चिरॉन इतकाच अर्थात ३८० किलोमीटर पर आवर इतका आहे. १६०० हॉर्सपॉवरचे इंजिन असलेल्या या कारचे डिझाईन देखील वाखाणण्याजोगे आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे ९.१ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) ७५ कोटी ७४ लाख ९९ हजार रुपये इतकी आहे.

बुगाटी सॅनेटोडियेसी

 

४. रोल्स रॉयस स्वेपटेल:

कंपनीच्या दाव्यानुसार स्वेपटेल म्हणजे हौटे क्युअरची (haute couture) ऑटोमोटिव्ह इक्विव्हॅलेंट आहे. हौटे क्युअर म्हणजेच विशेष कस्टम-फिटेड हाय एन्ड फॅशनची निर्मिती. हा शब्द फॅशन इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम फॅशनसाठी वापरला जातो. या कारच्या निर्मितीची प्रेरणा रोल्स रॉयसच्याच फँटम कूपवरून घेण्यात आली आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे १३.२ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) १०९ कोटी ९० लाख ७६ हजार रुपये इतकी आहे.

रोल्स रॉयस स्वेपटेल

३. पगानी झोन्डा एचपी बारकेट्टा

या कारचे फक्त तीन मॉडेल्स तयार केले जाणार असून या कारचे सगळे स्पेसिफिकेशन्स अजून तरी समोर आले नाहीत. मात्र ही कार डिझाईनमध्ये प्रचंड अग्रगण्य आणि अत्याधुनिक असल्याचे दिसून येईल. या कारसाठी मर्सिडीज बेंझ v12 हे इंजिन वापरण्यात आले आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे १७.९ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) १४९ कोटी रुपये इतकी आहे.

पगानी झोन्डा एचपी बारकेट्टा

२. बुगाटी ला व्हॉईचर नोयर:

जीन बुगाटीच्या वैयक्तिक प्रकार ’57 एससी अटलांटिक’ची आधुनिक व्याख्या, ‘ला व्हॉईचर नोयर’ क्वॉड-टर्बो ८-लिटर डब्ल्यू-१६ इंजिन वापरते. हे इंजिन तब्बल १४७९ हॉर्सपॉवर (११०२ किलोवॅट) आणि ११८० पाउंड-फूट (१६०० न्यूटन-मीटर) टॉर्क तयार करते. सहा एक्झॉस्ट टिप्स, नव्या प्रकारची चाके, ब्रँडचे नाव असणारे प्रचंड लाइट-अप बॅज यांमुळे ही कार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणून सिद्ध होते. या कारचा प्राईज टॅगसुद्धा असाच अवाढव्य आहे.

सध्या या कारची किंमत सुमारे १८.१ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) १५० कोटी रुपये इतकी आहे.

बुगाटी ला व्हॉईचर नोयर

 

 

१. रोल्स रॉयस बोटटेल:

बोट टेलमध्ये एक अद्वितीय टू-टोन एक्सटेरियर, कस्टम हाय-एंड फिनिश आणि अगदी शॅम्पेन फ्रिज आणि बिल्ट-इन सन-अम्ब्रेलासह “होस्टिंग सूट” आहे.

जरी रोल्स-रॉयस यांसारख्या एकमेव कार्ससाठी अधिकृतपणे किंमत जाहीर करत नसली तरी, सध्या बोट-टेलची किंमत सुमारे २६ मिलियन डॉलर्स अर्थात आजच्या तारखेला (२१ ऑक्टो. २०२३) २०० कोटी ३६ लाख ८२ हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. 

रोल्स रॉयस बोटटेल

अधिकृतपणे, जगातील सर्वात महागडी कार ‘बुगाटी ला व्हॉईचर नोयर’ असून या कारची कारची किंमत सुमारे १८.७ मिलियन डॉलर्स अर्थात १४० कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये इतकी आहे. भविष्यात आणखीही महागड्या आणि अत्याधुनिक कार्स येत राहतील, पण त्या कार्सच्या निर्मितीमध्ये याच कंपन्यांचं मोठं वर्चस्व असेल यात शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इतिहासातील सर्वात शक्तिशाली यो*द्धे असलेले रोमन ग्लॅडिएटर्स शुद्ध शाकाहारी होते!

Next Post

त्यादिवशी उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

त्यादिवशी उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती..!

दाऊद इब्राहिममुळे भारताने 'शारजाह'मध्ये क्रिकेट खेळणं बंद केलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.