The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या हेराने पाठवलेल्या संदेशाकडे रशियाने दुर्लक्ष केलं आणि जर्मन सैन्य थेट मॉस्कोत पोचलं

by द पोस्टमन टीम
10 September 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हेराचा संदेश केराच्या टोपलीत, दुर्लक्षामुळे …

कुठल्याही देशाच्या सुरक्षेसाठी त्या देशाचं गुप्तहेर खातं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. देशातल्या अंतर्गत हालचाली, शत्रू राष्ट्रांच्या योजना हाणून पाडण्याचं जोखमीचं काम या खात्यातली लोकं जीवावर उदार होऊन पार पाडत असतात. प्राचीन काळापासून कार्यरत हे खातं आजही आपलं महत्त्व अबाधित ठेवून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खास गुप्तहेर बहिर्जी नाईक आपल्याला ठाऊक असेलच. स्वराज्यावरील आक्र*मण थोपवण्यास, स्वराज्याच्या वाढीसाठी आखलेल्या अनेक योजनांमध्ये बहिर्जींची भूमिका महत्त्वाची होती. शत्रूच्या गोटात घुसून शिजत असलेल्या कटाची माहिती काढणारा आणखी एक गुप्तहेर इतिहासात प्रसिद्ध आहे. रिचर्ड सोर्जे, असं या रशियन गुप्तहेराचं नाव.

जर्मनीचा ॲडॉल्फ हि*टल*र सोव्हिएत रशियावर आक्र*मण करणार असल्याची गुप्त माहिती देणारा हाच तो रिचर्ड सोर्जे. रिचर्डनं वेळेत गुप्त माहिती दिल्यानंतरही रशियानं जर्मन सैन्या*कडून कसा सपाटून मार खाल्ला त्याचीही एक कहाणी आहे. रशियावरील ह*ल्ल्याची गुप्त सांकेतिक तार सोर्जेनं मोठ्या शिताफीनं रशियाला पाठवली होती. मात्र या तारेवर ‘संशयास्पद’ असा शेरा मारून सोव्हिएत रशियाचा नेता जोसेफ स्टॅलिनने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम संपूर्ण रशियाला भोगावा लागला. महत्त्वाकांक्षा, धूर्तपणा, मुत्सद्देगिरी आणि पक्का राजकारणी असलेला स्टॅलिन हि*टल*रच्या गोड बोलांना भुलला आणि जर्मन फौजा थेट राजधानी मॉस्कोच्या वेशीवर धडकल्या. ही घटना ‘ऑपरेशन बार्बरोझा’ नावानं इतिहासात प्रसिद्ध आहे.

ब्रिटिश पत्रकार ओवेन मॅथ्यूज यांच्या ‘ॲन इम्पेकेबल स्पाय: रिजर्ड सोर्जे: स्टॅलिन मास्टर एजंट’ या पुस्तकात या थराराचं वर्णन करण्यात आलं आहे. या पुस्तकात रिचर्ड सोर्जेचा विलक्षण जीवनवृत्तांत  मांडण्यात आला आहे. रिचर्डचा जन्म आजच्या अझरबैजानमधील बाकू शहरात ८ ऑक्टोबर १८९५ रोजी झाला. त्याचे वडील जर्मन तर आई रशियन होती. १९१४ साली जेव्हा पहिलं महायु*द्ध पेटलं तेव्हा सोर्जे जर्मन लष्करात कार्यरत होता.



१९१७ साली लेनिनने रशियात साम्यवादी क्रांती घडवली. जगभरातील असंख्य तरुण मार्क्सवादी तत्त्वज्ञानाकडे ओढले गेले. याला सोर्जेदेखील अपवाद नव्हता. पहिलं महायु*द्ध संपल्यानंतर सोर्जे बर्लिनमध्ये परतला आणि त्यानं त्याचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानं पदार्थ विज्ञानात डॉक्टरेट मिळवली. कम्युनिस्ट विचारधारेनं भारलेला सोर्जे पुढे ‘कम्युनिस्ट इंटरनॅशनल’ उर्फ ‘कॉमिन्टर्न’ या संस्थेचा सदस्य बनला. या संस्थेच्या कामानिमित्त तो अनेक देशांमध्ये फिरला. विविध देशांमधील मोठ्या आसामींना भेटून साम्यवादी विचारांचा प्रचार, प्रसार तो करू लागला. जर्मन वार्ताहर हे त्याचं बाह्यरुप होतं.  त्या आडून तो सोव्हिएत रशियाला महत्त्वाची माहिती पुरवत राहिला.

हि*टल*रच्या ना*झी पक्षाच्या अंतर्वर्तुळात प्रवेश हे रिचर्ड सोर्जेच्या कारकिर्दीतलं महत्त्वाचं यश मानलं जातं. लेनिननंतर सोव्हिएत रशियाचा सर्वेसर्वा झालेल्या जोसेफ स्टॅलिनला बलाढ्य जर्मनीपेक्षा चिमुकल्या जपानची भीती सतावत होती. सप्टेंबर १९३१ मध्ये जपानी फौजांनी चीनच्या ‘मंचुरिया’ भागावर ताबा मिळवला. यामुळे जपान रशियावर समुद्राप्रमाणेच भूमीवरुनही थेट आक्र*मण करु शकत होता.

जेमतेम आरमार असलेल्या रशियाच्या तुलनेत जपानचं आरमार अद्ययावत आणि बळकट होतं. जपानच्या खेळीची माहिती काढण्यासाठी सोर्जेची नेमणुक जपान मोहिमेवर करण्यात आली. या मोहिमेसाठी त्याचं कोडनेम होतं ‘रॅमसे’. पत्रकाराचं कव्हर घेऊन जपानमध्ये दाखल झालेला सोर्जे गुप्तहेरांचं जाळं विणू लागला. त्याच्या लेखांमुळे जपानच्या राजकीय वर्तुळात तो लोकप्रियही झाला होता. जपानमधल्या ‘युजिन ऑट’ या जर्मन उच्चाधिकाऱ्याला त्यानं आपल्या जाळ्यात ओढलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्याच्याकडून मिळालेली गुप्त माहिती त्यानं अनेकदा रशियाला पाठवली होती. जपानमधील वास्तव्यात जपान रशियावर ह*ल्ला करणार नसल्याचं सोर्जेला समजलं. मात्र, त्याचवेळी जर्मनीचा धोका रशियावर घोंघावत असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. ही माहिती रशियाला पाठवूनही स्टॅलिनच्या दुर्लक्षामुळे व्हायचा तो अनर्थ झालाच.

या घटनेनंतर जर्मनी आणि जपान दोघांच्याही गुप्तचर यंत्रणांना सोर्जेवर संशय बळावला. त्याला टोकियोमध्ये अटक होऊन त्याच्यावर खटला चालला. ७ नोव्हेंबर १९४४ रोजी सोर्जेला फासावर लटकवण्यात आलं. सोर्जेच्या मोहिमांवर आजवर अनेक चित्रपट, सीरीज, पुस्तकं लिहिण्यात आली आहेत.

साम्यवादी तत्त्वज्ञानावरील त्याची निष्ठा आणि बांधिलकी सोर्जेला त्याच्या अनेक मोहिमांमध्ये कामी आली. पण त्याचबरोबर मदिरेनेही त्याचं हेरगिरीचं जाळ विणण्यात मदत केली. अनेक दारुंच्या मैफिली भरवून अनेक खात्यांमधील माणसं त्यानं आपल्याकडे ओढली. सोर्जेनं अनेक देशांमध्ये याच पद्धतीनं त्याचं नेटवर्क उभं केलं.

रिचर्ड सोर्जे प्रमाणेच इस्रायलचा हेर एली कोहेनचे कारनामे देखील हेरांच्या इतिहासात आपलं महत्त्व राखून आहेत. आपल्या कामगिरीनं कोहेननं सीरिया या शत्रू राष्ट्राला सळो की पळो करुन सोडलं होतं. जेम्स बॉन्ड हे फिल्मी कॅरेक्टर यांच्यासारख्याच शूरवीर गुप्तहेरांपासून प्रेरित होऊन बनवण्यात आलंय.

हेरगिरीत भारतीय हेरांनी देखील आपलं नाव गाजवलं आहे. रविंद्र कौशिक उर्फ ब्लॅक टायगर, मोहनलाल भास्कर, काश्मीर सिंग अशी अनेक नावं भारतीय हेरांच्या यादीत जोडली गेली आणि पुढे प्रसिद्धीसही आली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील पाकिस्तानात हेराची भूमिका वठवली होती. भारताची रॉ, इस्राइलची मोसाद, रशियाची केजीबी, अमेरिकेची सीआयएसारख्या एजन्सीच्या हेरांचं जाळं जगभर पसरलं आहे.

हेरगिरी क्षेत्रात काम करणाऱ्यांना बुद्धिमत्तेसोबतच विविध देशांचा इतिहास, तिथली भाषा, संस्कृती, विचारधारा यांवर सखोल अभ्यास करण्याची गरज असते. कारण या माहितीच्या आधारावर भूमिका वठवताना झालेली चूक थेट त्यांच्या जीवावर बेतू शकते. आपली कारकिर्द यशस्वीपणे पार पाडून स्वगृही जिवंत परतणं, हे हेराच्या आयुष्यातलं मोठं आव्हान असतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गणेशोत्सव आणि मंगेशकर भावंडांच्या गणपती विशेष गाण्यांचं अतूट नातं आहे

Next Post

पराभूत होऊनही स्पार्टाकस अन्यायाविरुद्धच्या बंडाचं प्रतीक म्हणून अजरामर झाला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पराभूत होऊनही स्पार्टाकस अन्यायाविरुद्धच्या बंडाचं प्रतीक म्हणून अजरामर झाला

गांधीजी म्हणाले फिरोजसारखे ७ कार्यकर्ते मिळाले तर आठवड्यात भारताला स्वातंत्र्य मिळवून देईल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.