The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या गावाच्या कुंभकर्णी झोपेच्या आजाराचा शास्त्रज्ञांना अखेर उलगडा झालाय

by द पोस्टमन टीम
28 July 2025
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


रामायणातील ‘कुंभकर्ण’ आपल्या सर्वांना माहितच आहे. तो वर्षातील फक्त सहा महिने जागा असे, उर्वरित सहा महिने तो गाढ झोपेत असायचा. त्याच्या या सवयीमुळं आपल्याकडे एक वाक्प्रचार देखील रूढ झाला. अनेक घरांमध्ये सकाळी-सकाळी हा वाक्प्रचार ऐकायला मिळतो. ‘अरे कुंभकर्णासारखे काय झोपले आहात? उठा आता’, असं एखादी आई जोरात ओरडताना ऐकायला मिळतंच. एखाद्याला सारखी खूप झोप येत असेल किंवा झोपेत कितीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती उठत नसेल तर, हा वाक्प्रचार वापरला जातो. एखादी व्यक्ती जर खरंच सहा-सहा महिने झोपू लागली तर..? नक्कीच ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे.

पण, कझाकिस्तानमध्ये एक गाव आहे. या गावातील एखाद-दुसरी व्यक्ती नाही तर अर्ध्यापेक्षा जास्त लोकं कुंभकर्णासारखे झोपत असल्याचा प्रकार समोर आला होता.

अगदीचं सहा महिने नाही मात्र, जवळपास ६-६ दिवस हे लोक झोपेच्या अधिन होत. कलाची असं या गावाचं नाव असून आता तर त्याला ‘स्लिपिंग व्हिलेज’ म्हणूनच ओळखलं जातं.

उत्तर कझाकिस्तानमधील आसिल जिल्ह्यात कलाची हे छोटसं गाव वसलेलं आहे. २०१४ मध्ये गावाची लोकसंख्या ६८० होती. जवळजवळ दोन वर्ष झोपेच्या एका विचित्र समस्येने त्रस्त होते. या समस्येमुळं लोक अचानक झोपी जात. झोपेतून उठल्यानंतर त्यांना काही आठवतही नसे. गावातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या या विचित्र प्रकारानं ग्रस्त झाली होती. प्रशासनानं तत्काळ या मागच्या कारणांचा शोध सुरू केला होता. तोपर्यंत कलाची गावातील नागरिकांची अवस्था पाहता. स्थलांतर करण्यासाठी शेजारच्या अनेक गावांनी त्यांना परवानगी दिली होती.

गावातील लहान मुले आणि प्रौढ व्यक्ती या झोपच्या अधीन झाले होते. स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार २०१२ ते २०१५ याकाळात १६० नागरिकांना अशा प्रकारचा त्रास झाला. दीर्घकालीन झोपेतून उठल्यानंतर लहान मुलांना अंथरुणात साप, पंखांचे घोडे, फुलपाखरे अशा गोष्टी असल्याचे भास होत असत तर, प्रौढांना संभोग करण्याची तीव्र इच्छा होतं असल्याचं निदर्शनास आलं होतं.



एकदा काही गावकऱ्यांनी एका गरीब व्यक्तीला गावातील सरकारी दवाखान्यात दाखल केलं होतं. तो व्यक्ती अर्धवट झोपेत होता आणि त्याची विजार पूर्णपणे ओली झालेली होती. ती अर्धवट शुद्धीत असलेली व्यक्ती संभोग करण्यासाठी याचना करत असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं.

२०१२ मध्ये पहिल्यांदा कलाची गावातील एका व्यक्तीला झोपची ही विचित्र समस्या जाणवली होती. ती व्यक्ती दुचाकीवर प्रवास करत असताना तिला डोळ्यांवर झोप जाणवत होती. तिनं तोंडावर पाणी मारण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली तर तो तिथेच झोपी गेला.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

त्यानंतर हळूहळू गावात असे प्रकार वाढताना दिसू लागले. शासन आणि प्रशासनानं तत्काळ याठिकाणी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स पाठवले. मात्र, या ‘स्लिपिंग सिकनेस’मुळं ते देखील गोंधळात पडले होते. त्यांनी गावातील लोकांची रक्ततपासणी केली. त्यानंतर पाणी, माती आणि हवेच्या देखील शेकडो चाचण्या करण्यात आल्या होत्या. 

२०१४ मध्ये कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुल्तान नजारबायेव यांनी कलाची गावातील समस्येत वैयक्तिक लक्ष घातलं होतं. तर, पंतप्रधान करीम मासीमोव्ह यांनी संशोधनाचं संयोजन करण्यासाठी एक कमिशन देखील स्थापन केलं होतं. वर्षाच्या अखेरीस जगभरातील सुमारे २० हजार प्रयोगशाळांनी गावात येऊन हवा, माती, पाणी, अन्न, प्राणी, बांधकाम साहित्य आणि रहिवाशांवर विविध चाचण्या केल्या होत्या.

जेव्हा शास्त्रज्ञ झोपेच्या आजाराचे शास्त्रीय धागेदोरे शोधण्यात व्यस्त होते. त्यावेळी गावकरी आणि शेजारील गावांमधील लोक देखील आपापले तर्क लावत होते. गावाजवळील डोंगरात असलेली सोव्हिएत काळातील युरेनियमची खाण, या सर्व समस्येच्या मागे असल्याचा अंदाज अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केला होता. जरी ही खाण आता बंद असली तरी त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळेचं गावकऱ्यांची ही अवस्था आहे. मात्र, प्रशासनानं याचं खंडन केलं होतं.

कलाची गावाजवळ सोव्हिएत काळातील ‘Krasnogorskiy’ नावाची खाण आहे. त्या ठिकाणावरून सोव्हिएत युरेनिअमचं उत्खनन करत असे. अणूउर्जा निर्मितीसाठी त्याचा उपयोग केला जाई. मात्र, ही खाण १९९० पासून बंद आहे असून त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम सुरू नाही. कलाची गावाप्रमाणं इतर देखील गावं खाणीच्या जवळ आहेत. त्याठिकाणी अशी कुठलीही समस्या समोर आली नाही. त्यावेळी खाणीत काम करणारे अनेक लोक अद्याप हयात आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही झोपेचा आजार जडलेला नाही, असा दावा प्रशासनाचा होता.

शेवटी २०१५ मध्ये, कलाची गावातील लोकांच्या झोपेचं रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. विषारी कार्बन मोनॉक्साइडच्या जास्त पातळीमुळे झोपेची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं.

कलाचीमध्ये करण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोकार्बनची पातळी सामान्य ठिकाणांपेक्षा १० पटीनं जास्त होती. हे प्रमाण युरेनिअमच्या खाणीमुळेचं वाढली होती, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. त्यानंतर याबाबत कझाकिस्तान सरकारनं एक अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केलं होतं. 

जानेवारी २०१६ मध्ये रेडिएशन सिक्युरिटीसाठी असलेल्या राष्ट्रीय अणु केंद्राचे संचालक सर्जी लुकाशेन्को यांनी देखील कबूल केलं की, कलाची गावामध्ये कार्बन मोनोऑक्साइडची पातळी दहापट जास्त होती. यामुळे हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आणि त्यांना अतिझोपेची समस्या सुरू झाली.

या सर्व प्रकारानंतर कलाची गावातील अनेक नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं. प्रशासनानं देखील काही सुरक्षेच्या उपाययोजना करता येतील का? याबाबत कार्यवाही सुरू केली. या विचित्र समस्येमुळं कलाची गाव मात्र, झोपेचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘पे-पाल’ने या माणसाच्या अकाउंटवर चुकून ९२ क्वाड्रिलिअन डॉलर्स टाकले होते..!

Next Post

कॅल्क्युलेटर्समुळे आपले पाढे, पावकी, निमकी, दिडकी पाठ करायचे कष्ट वाचत आहेत

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

कॅल्क्युलेटर्समुळे आपले पाढे, पावकी, निमकी, दिडकी पाठ करायचे कष्ट वाचत आहेत

कुख्यात गुंड 'अल कपोन'मुळे दुधाच्या पॅकेटवर एक्स्पायरी डेट छापायला सुरु झाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.