The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दोन मुलांनी एलियन्सनी त्यांचं अपहरण केल्याचा दावा केला होता, नार्को टेस्टही दिली..!

by द पोस्टमन टीम
30 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


केल्विन पार्कर. अशी सामान्य व्यक्ती जिच्या बाबतीत एक असामान्य घटना घडली आणि त्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं. त्याच्या कहाणीवर कोणी विश्वास ठेवला तर कोणी म्हणालं की तो हे सगळं रचून सांगतोय. मात्र ४५ वर्षांनंतर त्यानं घडलेल्या घटनेवर पुस्तक लिहून ते प्रकाशित केलं आहे.

असं काय घडलं होतं पार्करच्या आयुष्यात?

पृथ्वीवरच्या माणसांसाठी एक नेहमीच कुतुहलाचा असा प्रश्न आहे, या ब्रह्मांडात जीवसृष्टी असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की अजून कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे? या कल्पनेवर संशोधक, वैज्ञानिक अनेक वर्षांपासून काम करत आहेतच शिवाय हा कथा, कादंबर्‍या आणि चित्रपटांचाही आवडता विषय आहे. एलियन अर्थात परग्रहवासी आहेत असं ठामपणे सांगणारा आणि ते दिसल्याचा दावा करणाराही एक वर्ग आहे.

युएफ़ओ दिसल्याचे अनेक दाखले, वृत्त अनेक वर्षांपासून आपण वाचत ऐकत आलो आहोत. ज्याप्रमाणे पृथ्वीवरचा माणूस परग्रहवाशांच्या अस्तित्वाबाबत संशोधन करत आहे तसेच हे परग्रहवासी पृथ्वीवरच्या माणसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात असं मानणार्‍यांचाही एक मोठा वर्ग आहे.

याविषयीच्या बातम्या काही नवीन नाहीत मात्र केल्विन पार्कर ही व्यक्ती ४५ वर्षांनंतर एका घटनेचा गौप्यस्फोट करून चर्चेत आली आणि ही बातमी होती त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका अजब घटनेची. एक अशी घटना जी त्याच्या कुटुंबीयांपासूनही त्यानं लपवून ठेवली होती.

शेवटी या घटनेमुळे जेव्हा त्याची प्रकृती ढासळू लागली त्यानं आपल्या आयुष्यात घडलेल्या या घटनेला शब्दबध्द करुन पुस्तकरुपानं जागासमोर आणण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या या घटनेबाबत अखेरीस त्यानं मौन सोडलं असून कोणाचा विश्वास बसो अथवा न बसो त्यानं प्रामाणिकपणानं जे घडलं ते सांगायचा प्रयत्न केला आहे.



ही घटना आहे १९७३ सालातली. त्यावेळेस केल्विन पार्कर हा १९ वर्षांचा उत्साही तरूण होता. त्याला स्वत:चं हक्काचं घर बांधायचं होतं आणि कुटुंबासोबत आयुष्य आनंदात घालवायचं होतं. एखाद्या सामान्य तरूणाचं जे स्वप्न असतं तेच केल्विनचं होतं. पास्कोगोला येथे फ़िशिंग ट्रीपवर जाईपर्यंतही त्याचं आयुष्य इतर चारचौघांसारखंच सामान्य होतं.

मग मासेमारीला गेलेल्या केल्विनला आकाशातून एक अत्यंत प्रकाशमान अशी गोष्ट येताना दिसली. कुतुहलापोटी तो याकडे बघत होता. पण हेच कुतुहल पुढे नाट्यमय वळण घेणार आहे हे त्याच्या गावीही नव्हतं. ही चमकदार गोष्ट, ज्याला त्यानं “बिन” असं उल्लेखलं आहे, तिचा प्रकाश इतका प्रखर होता की त्याचे डोळे दिपून क्षणभरासाठी दृष्टी गेल्याचा भास झाला असं केल्विन सांगतो. जेव्हा त्याची दृष्टी या प्रकाशावर स्थिरावली आणि त्याला दिसू लागलं तेंव्हा समोर जे दिसलं ते वास्तव की स्वप्न की भास हेच त्याला कळेना.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

समोरून तीन जाड आकृती त्याच्याकडे येताना त्याला दिसल्या. हे प्राणी विचित्रच दिसत होते. 

गेली ४५ वर्षं त्यानं ही विचित्र घटना सर्वांपासून लपवून ठेवली होती. जग काय म्हणेल? या विचित्र घटनेनं आपण विनाकारणच चर्चेचा विषय बनू आणि यातून काहीच निष्पन्न झालं नाही तर आपलं हसं होईल या भितीपायी त्यानं या घटनेची कधीच वाच्यता केली नाही. मात्र आता त्याचं वय झालं, हार्ट अटॅक आणि दोन ओपन हार्ट सर्जरीनंतर त्यानं जगासमोर ही घटना सांगण्याचा निर्णय घेतला.

त्या रात्री घडलेली ती घटना त्याचं आयुष्य कसं बदलवून टाकणारी होती हे त्यानं पुस्तक रुपानं जगासमोर आणण्याचं ठरवलं मात्र तो अपेक्षेनुसार चर्चेचा विषय बनला. 

काय होती ती घटना?

पार्कर आणि त्याचा फ़िशिंगबडी असणारा ४२ वर्षीय चार्लस हिक्सन फ़िशिंगसाठी नेहमीप्रमाणेच त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेले होते. अचानकच निळा प्रकाश आला आणि तलावाच्या बाजूनं काही विचित्र असे प्राणी आले. साधारण चार साडेसार फ़ुट उंचीचे आणि जाड असे ते प्राणी होते.

एखाद्या फुटबॉलसारखी दिसणारी गोष्ट हवेत तरंगत होती आणि नंतर त्यातून राखाडी रंगाचे सुरकुतलेली त्वचा असणारे, मान नसणारे असे विचित्र प्राणी केल्विनच्या दिशेने येऊ लागले. 

मात्र ते केल्विनकडे येत असताना केल्विननं बघितलं की त्यांच्या हालचाली या एखाद्या यंत्रासारख्या होत्या. त्या मानवी हालचालींप्रमाणे नैसर्गिक आणि सहज नव्हत्या. केल्विन आणि चार्ली उठून पळायच्या तयारीत असतानाच हे प्राणी झपाट्यानं त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांच्यातल्या दोघांनी चार्लीला पकडलं तर एकानं केल्विनला पकडलं. त्यानंतर केल्विनला आणि चार्लीला त्यांनी एका स्पेसक्राफ़्टमधे नेण्यात आलं. त्याठिकाणी एक चाचणी खोली होती तिथे अजून एक जाडजूड बोजड प्राणी आला त्यानं केल्विनला तपासणी टेबलवर झोपवलं.

केल्विन काहीही हालचाल करू शकत नव्हता. मात्र त्याची शुध्द गेली नव्हती त्यामुळे त्यानं आजूबाजूचं निरिक्षण चालू ठेवलं. मुळात जे काही घडत आहे खरोखरच घडत असून ते स्वप्न नाही यावरच विश्वास ठेवणं त्याला कठीण जात होतं. छतातून काही पत्त्यांसारख्या गोष्टी आल्या आणि त्या त्याच्या डोक्याच्या आजूबाजूनं फ़ोटो काढत पुन्हा छतात गेल्या असं केल्विन सांगतो.

यानंतर काही विचित्र आवाज ऐकू आले आणि त्याला आजूबाजूला एका बाईची आकृती दिसू लागली. पण ही आकृतीही बाकीच्या विचित्र प्राण्यांसारखीच होती आणि एखाद्या यंत्रमानवासारखी तिची हालचाल होती. मात्र तिची बोटं आपल्या बोटांसारखीच भासत होती. त्यांचा स्पर्श यांत्रिक नव्हता. तिनं केल्विनच्या गळ्याभोवतीनं तिच्या हाताचा पंजा फ़िरवला. जसजसा तिच्या पंजा मानेकडून चेहर्‍याकडे सरकला आणि नाकापर्यंत आला, केल्विनला गुदमरायला झालं. त्याला श्वास घेता येईना.

आता केल्विन घाबरून हालचाल करू लागला तेव्हा तिनं टेलिपथीनं त्याला सांगितलं की घाबरू नको, आम्ही तुला काहीही इजा नाही करणार. यानंतर काय घडलं हे केल्विनला आठवत नाही मात्र त्याला इतकं आठवतं की या प्राण्यांनी त्याला आणि हिक्स्नला पुन्हा किनार्‍यावर आणून टाकलं. भिती आणि थंडीनं हे दोघेही अक्षरश: गोठले होते.

पार्करनं घडलेली घटना कोणालाही सांगायला नको असं हिक्सनला सांगितलं मात्र हिक्सनचं म्हणणं होतं की उलट आपण हे सगळं कोणाच्यातरी कानावर घालायला हवंय.

त्याने कंट्री शेरिफ़च्या ऑफ़िसमध्ये फ़ोन लावला आणि त्यानं सांगितलं की माझं युएफ़ओनी अपहरण केलं होतं. यावर शेरीफ़ जोरजोरात हसले होते. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसणं कठीणच होतं!

त्या रात्री शेरीफ़कडे दोनच पर्याय होते. एकतर हे दोघे थापा मारत आहेत असं मानून हा विषय सोडून देणं आणि दुसरा पर्याय म्हणजे खरंच असं काही घडलं आहे का याची पडताळणी करणं. शेरीफ़नं तपासणी खोलीत माईक लपवला आणि या दोघांचं संभाषण चोरून रेकॉर्ड केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोघेही खोटं बोलत नव्हते. यांची लायडिटेक्टरनंही तपासणी करण्यात आली आणि त्यातही हेच सिद्ध झालं.

अर्थातच या घटनेची चर्चा झाली. मात्र तरिही केल्विन आणि हिक्सननं विस्तारानं यावर बोलणं टाळलं. केल्विननं या घटनेची वाच्यता नको म्हणून अनेक नोकर्‍या आणि शहरं बदलली. मात्र आज इतक्या वर्षांनंतर त्यानं सगळी कहाणी “पास्कगॉला- द क्लोजेस्ट एन्काउंटर, माय स्टोरी” या पुस्तकाच्या रुपानं जगासमोर आणली आहे. पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? या प्रश्नाची उकल करण्याच्या कामी या अनुभवाची मोलाची मदत होणार आहे हे नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

“भाकरी नसेल तर केक खा” असं क्वीन मेरी कधीच बोलली नव्हती..!

Next Post

या सेनापतीने मौर्य साम्राज्य संपवून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं होतं..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या सेनापतीने मौर्य साम्राज्य संपवून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं होतं..!

फ्रान्समध्ये झालेल्या एका कोर्ट मार्शलमुळे इज्राइलच्या निर्मितीची सुरुवात झाली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.