The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी, तुम्ही, आपण सर्व जिवंत आहोत ते या माणसामुळे

by द पोस्टमन टीम
13 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘बटरफ्लाय इफेक्ट’.

बटरफ्लाय इफेक्ट ही संकल्पना भौतिकशास्त्रात अतिशय प्रसिध्द आहे. या संकल्पनेनुसार फुलपाखराच्या पंख फडकावण्याच्या एका छोट्याशा कृतीने जगात त्सुनामी निर्माण होऊ शकते, ज्वालामुखीचे उद्रेक होऊ शकतात. थोडक्यात आत्ता क्षुल्लक वाटणारी एखादी घटना पुढे जाऊन मोठा परिणाम घडवून आणू शकते. असंच काहीसं आपल्या स्वत:च्या जिवंत असण्यामागेही असावं, भूतकाळात जास्त महत्त्व नसलेलं परंतु वर्तमानकाळाच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेलं.

आज आपण अशाच एका घटनेची आणि त्या घटनेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एका व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत.

घटनेचा कालावधी आहे इ.स. १९६२. क्यूबन क्षेपणास्त्रीय संकट अमेरिकेवर कोसळले होते. त्याच वेळी एक रशियन पाणबुडी कॅरिबियन समुद्रात अमेरिकन नौदलाच्या नजरेस पडली. त्यावेळी अमेरिकन राष्ट्रपती कॅनेडींनी क्यूबावर अनेक निर्बंध घातले होते. कोणतीही सागरी वाहतूक त्यावेळी निर्बंधित होती.



ही रशियन पाणबुडी समुद्रात लपून अमेरिकन नौदल पाणबुडीच्या शोधात पाण्यात ह*ल्ले करत होती. पण या पाणबुडीमधे आ*ण्विक क्षेपणास्त्रे होती याची पुसटशीही कल्पना अमेरीकेच्या नौदलास नव्हती. 

आ*ण्विक ह*ल्ला करण्याची तयारी ‘व्हॅलेंटाईन सेव्हित्स्की’ नावाच्या कमांडरने केली होती. त्याने आ*ण्विक क्षेपणास्त्र ह*ल्ल्यासाठी तयार करण्याचे आदेश दिले. त्याच्या दुसऱ्या कमांडरनेही या आदेशास दुजोरा दिला. अकरा अमेरिकन नौका त्यावेळी या आ*ण्विक ह*ल्ल्याच्या निशाण्यावर होत्या. या आ*ण्विक क्षेपणास्त्रात हिरोशिमावर टाकलेल्या अ*णुबॉं*बएवढी शक्ती होती.

हळूहळू तणाव वाढत होता. पाणबुडीत तापमान १०० अंशांच्याही पुढे गेले होते. एसीने काम करायचे केव्हाच बंद केले होते. पाणबुडी वर काढण्याशिवाय दुसरा पर्याय कॅप्टनला दिसत नव्हता. इथेच आपला शेवट होणार असे सगळ्यांना वाटत होते. अमेरिकन नौदल सतत ह*ल्ले करत होतेच. ग्रे*नेडपेक्षाही जास्त क्षमतेचे बॉ*म्ब पाणबुडीच्या वेगवेगळ्या भागांवर फेकले जात होते. अशा वेळी सोव्हिएत पाणबुडीच्या कॅप्टनने यु*ध्द सुरू झाले असल्याचा अंदाज लावला आणि आता हे आ*ण्विक क्षेपणास्त्र सोडल्याशिवाय काहीही पर्याय नाही असे सांगितले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

यावेळी जर सेव्हित्स्कीने हा आ*ण्विक ह*ल्ला केला असता तर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून आ*ण्विक ह*ल्लाच केला असता. याने मोठ्या यु*द्धाची, पर्यायाने वि*ध्वंसाची सुरुवात केली असती, असे तज्ज्ञ आजही सांगतात. असे काही झाले नाही त्याचे कारण होते एक समजदार, शांत स्वभाव असलेल्या व्यक्तीमुळे.

या व्यक्तीचे नाव होते – वासीली अलेक्झांड्रोविच आर्खिपोव.

त्यावेळी आर्खिपोवचे वय होते ३४. दिसायला आकर्षक असलेला आर्खिपोव सेव्हित्स्कीच्या समांतर हुद्द्यावर काम करत होता. कॅरिबियन समुद्रात उतरलेल्या ३ पाणबुड्यांपैकी एकाचा कमांडर असलेला आर्खिपोव अगदी शांत होता. या दुर्घटनेला थांबवण्यात त्याचे योगदान आता काळाच्या ओघात विसरले गेले असले तरीही तो या घटनेच्या केंद्रस्थानी होता असे त्याचे काही सहकारी आणि त्याची पत्नी सांगते.

सेव्हित्स्कीशी बोलून आर्खिपोवने आ*ण्विक क्षेपणास्त्रांचा ह*ल्ला करण्याचा त्याचा निर्णय बदलला असे त्यावेळी तिथं असलेल्या बाकीच्या लोकांचे मत होते. हे त्याने कसे केले याबद्दलची अगदी बारीक माहिती कोणाला माहीत नसली तरीही कमांडर असलेल्या आर्खिपोवने हा ह*ल्ला थांबवला असे सगळे जण सांगतात.

रशियन सदस्यांना समुद्राच्या वरती नेमकं काय चालू आहे हे कळत नव्हतं. खरं तर त्यांना सरळ क्युबाला जाण्याचे आदेश होते, परंतु मध्येच त्यांना थांबून कॅरिबियन समुद्रात वाट बघण्यास सांगितले गेले. त्यावेळी रशियाने बेटांवर पाणबुड्यांद्वारे क्षेपणास्त्रे आणल्याची बातमी रेडिओ स्टेशन्सवर झळकली, त्याच वेळी क्यूबाने अमेरिकेचे गुप्तचर जहाज उडवून लावल्याची बातमी आली. जेव्हा अमेरिकन नौदलाला पाणबुड्या दिसल्या तेव्हा सेव्हित्स्कीने त्यांना खोल पाण्यात घेऊन जाण्याचे आदेश दिले.

पण त्यांची संपर्क यंत्रणा बिनकामी झाली आणि त्यांचा रशियन यंत्रणेशी काहीही संपर्क झाला नाही आणि म्हणूनच यु*द्धाची सुरुवात झाली असावी असा अंदाज बांधून त्यांनी आपल्याकडे असणारी आ*ण्विक क्षेपणास्त्रे सज्ज केली.

यावेळी तीन कमांडरमध्ये किती वेळ आणि काय चर्चा झाली हे नक्की माहित नाही. सेव्हित्स्कीच्या मते ह*ल्ला करणे गरजेचे होते. त्याच वेळी अमेरिकन राष्ट्रपती कॅनेडीसुध्दा संभ्रमात होते.

अमेरिकेने पाणबुडीच्या शोधासाठी केलेले ह*ल्ले यु*द्धासाठी आहेत असा गैरसमज रशियन करुन घेतील ही त्यांची भिती सेव्हित्स्कीच्या रुपात खरी ठरत होती.

त्याच वेळी उच्चस्तरीय रशियन यंत्रणेला याची काहीच कल्पना नव्हती. पाणबुडीत असलेल्या सैनिकांचे हाल होत होते. वाढलेल्या तापमानाने तर काहींना चक्कर यायला लागली होती. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाणही वाढले होते. इलेक्ट्रिक लाईटचे साठेही संपत चालले होते. परिस्थिती अतिशय बिकट आणि जीवघेणी झाली होती.

अशावेळी आर्खिपोव आणि कॅप्टन यांच्यादरम्यान चर्चा झाली. बिकट वातावरणात झालेली ही चर्चा मोठा अनर्थ टाळण्यासाठी गरजेची होतीच. वातावरण अवघड असुनही आर्खिपोवने आपला संयम राखला. हा युद्धकालीन हमला नसुन केवळ चेतावणी आहे हे त्याने कॅप्टनला समजावून सांगितले.

आर्खिपोवचे ऐकून कॅप्टनने सज्ज केलेल्या आ*ण्विक क्षेपणास्त्रं पुन्हा बंद केले आणि समुद्राच्या पृष्ठभागावर पाणबुडी आणली. पाणबुडी दिसताच अमेरिकेने पुढे येऊन चौकशी केली. पाणबुडी तपासली न गेल्याने तिच्यात आ*ण्विक क्षेपणास्त्र होते याचा सुगावा अमेरिकेला लागला नाही. रशियन्सनी पाणबुडी क्युबाला न नेता पुन्हा उत्तरेकडे आपला मोर्चा वळवला आणि रशियाला पोहचले.

मागे वळून पाहिले तर एवढा मोठा अनर्थ टळला त्याचं कारण होतं आर्खिपोव. संयम आणि कणखरता या दोन्ही गुणांचा वापर करून त्याने कॅप्टनचे मतपरिवर्तन घडवून आणले. आर्खिपोवच्या या कृत्याने पुढे जाऊन सगळ्या जगाला त्रासदायक ठरू शकणाऱ्या मोठ्या वि*ध्वंसापासून हे जग वाचले. म्हणूनच आज मोकळा श्वास घेत असलेले आपण आणि आपल्या आसपासचे बरेच जण यांच्या अस्तित्वाचं मोठं श्रेय प्रमाणात आर्खिपोवला दिलं जातं.

या ऐतिहासिक घटनेत त्याचे असलेले योगदान बघून कोणीही ही बाब नाकारणार नाही हे नक्कीच..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कलारीपायत्तू – भारताने जगाला दिलेली सगळ्यात जुनी मार्शल आर्ट

Next Post

नोबेल पुरस्कार सुरु होण्याला वर्तमानपत्रात चुकून आलेली बातमी कारणीभूत आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

नोबेल पुरस्कार सुरु होण्याला वर्तमानपत्रात चुकून आलेली बातमी कारणीभूत आहे

चार वर्षं लागली पण ही बाई अमेरिकेतून रशियातल्या तिच्या घरी चालत गेली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.