The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कलारीपायत्तू – भारताने जगाला दिलेली सगळ्यात जुनी मार्शल आर्ट

by द पोस्टमन टीम
13 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारत म्हणजे अनेक संस्कृतींचा मेळा आहे. भारतातील कित्येक वेगवेगळे नृत्यप्रकार, चित्रकला, संगीत आदी कलाप्रकारांनी जगभरात आपले स्थान निर्माण केलंय. बऱ्याच भारतीय कला अशाही आहेत ज्या जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत आणि फक्त एखाद्या राज्यापुरत्या मर्यादित राहिल्या.

काही कलांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचा मिश्रण होऊन त्याची एक ‘इंडो- वेस्टर्न’ स्टाईल तयार झाली आहे! अशीच एक कला आणि युद्ध कौशल्य म्हणजेच ‘कलारीपायत्तू’.

कलारीपायत्तू एक उत्तम युद्धनीती असून तिला आजवर ओळख मिळू शकलेली नाही. जगातील सर्वात प्राचीन मार्शल आर्ट म्हणून ‘कलारीपायत्तू’ ओळखली जाते. दक्षिण भारतात केरळमधे कलारीपायत्तूचा उगम झाला. ती जगभरातल्या प्राचीन युद्धकला पैकी एक आहे.

कलारीपायत्तू दोन शब्दांपासून बनलेला आहे. पहिला ‘कलारी’ आणि दुसरा ‘पायत्तू’. या शब्दाचा अर्थ ‘शाळा’ किंवा ‘व्यायामशाळा’ असा होतो आणि पायात्तू या शब्दाचा अर्थ यु*द्ध करणे असा होतो.

कलारीपायत्तू नेमकी काय असेल याचा अंदाज आपल्याला या शब्दांच्या अर्थ वरूनच येतो.



कलारीपायत्तू शिकण्यासाठी बरीच वर्ष लागतात. या कलेकडे एक जीवनशैली म्हणून पाहिले जाते. ही कला शिकणारा एक कुशल यो*द्धा तर बनतोच शिवाय तो आरोग्यचिकित्सा करणे देखील शिकतो.

कलारीपायत्तू ही ‘कलारी’मध्ये खेळली जाते. कलारी म्हणजेच या खेळाचा आखाडा. या आखाड्याच्या एका बाजूला चौथरा रचलेला असतो. आजूबाजूला गरजेची शस्त्रे एका विशिष्ट पद्धतीने मांडून ठेवलेली असतात व त्यांच्या भोवती दिवे तेवत असतात. हा चौथरा म्हणजे यो*द्ध्यांचे देवस्थान मानले जाते.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

कलारीपायत्तूचे प्रशिक्षण वयाच्या सातव्या वर्षापासून असे दिले जाते. या वयात माणसाच्या शरीर लवचिक असते व तेव्हा शिकण्याची क्षमता देखील जास्त असते. अर्थात, हा खेळ या विशिष्ट वयातच शिकवा असे मुळीच नाही. चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला कोणत्याही वयात कलारीपायत्तूचे धडे गिरवता येतात.

कलारीचे प्रशिक्षण प्रामुख्याने तीन वर्गात विभागणी जाते. ते म्हणजे ‘मिथारी’, ’कोल्थारी’ ,’अंक्थारी’ .

त्यापैकी मिथारी या प्रकारात सर्वप्रथम शरीर मजबूत करण्यावर लक्ष दिले जाते. शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून मजबूत बनवली जाते. एक उत्तम यो*द्धा तयार होण्यासाठी शारिरीक कसरत अतिशय महत्त्वाचे असते. समोर येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला अंगावर घेण्याची ताकद त्यातून मिळते.

कोल्थारी हा त्याच्या पुढचा टप्पा असतो. एकदा की शरीराला कसरतींची सवय झाली की त्या खेळाडूला त्यानंतर वेगवेगळ्या शस्त्रांची ओळख करून देण्यात येते. कोल्ल्थारी प्रकारात प्रामुख्याने लाकडी शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

त्यांच्या सहाय्याने लढायला शिकवले जाते. कोणत्याही यो*द्ध्याला सुरुवातीला धारदार शस्त्राने लढणे योग्य ठरत नाही, कारण हे यो*द्धे शिकाऊ असतात. धारदार शस्त्रानमुळे इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरुवातीला लाकडी ह*त्यारे दिली जातात. एकदा यो*द्धा लाकडी शस्त्रे चालवण्यात पुरेसा पारंगत झाला की पुढचा प्रकार येतो तो म्हणजे अंक्थारी.

या टप्प्यात यो*द्ध्याला भाला, ढाल, तलवार यांसारखी ह*त्यारे दिली जातात.

लढता-लढता अनेक वेळा ह*त्यार खाली पडते पण असं म्हणतात की कलरी यो*द्ध्यांना बिना शस्त्राचे कसे लढावे याचेही खास प्रशिक्षण दिले जाते.

कलरीचा शेवटचा टप्पा म्हणजेच ‘मर्मा’. या प्रशिक्षणाचा उद्देश वेगळाच असतो. मानवी शरीरातील १०७ ऊर्जा केंद्रांना जाणून त्यांना सक्रिय करण्यासाठी या टप्प्यात शिकवले जाते. यांचा वापर शरीरातील ऊर्जाप्रवाह सुधारण्यासाठी केला जातो.

कलारीपायत्तू एक खूप प्राचीन यु*द्धकला आहे. त्यामुळेच तिच्या निर्मितीविषयी खूप कथा सांगितल्या जातात. त्यातीलच एक प्रचलित कथा म्हणजे अगस्त्य मुनींची कथा.

असे म्हणतात, अगस्त्य मुनी यांची अंगकाठी अतिशय बारीक होती. जंगलात फिरत असताना बऱ्याचदा जंगली जनावरांची सामना करावा लागत असे. त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अगस्त्य मुनी यांनी ही यु*द्ध कला विकसित केली. नंतर काही दिवसांनी त्याचा वापर यु*द्धात देखील करण्यात आला.

ही कला कुठून का आली असेना पण गेल्या कित्येक वर्षांपासून लोक याचे धडे घेताना दिसतायत. आजही बरेच सेलिब्रिटी कलारीपायत्तू या विख्यात मार्शल आर्टचे धडे गिरवताना दिसतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कोर्ट – न्याय मिळण्यासाठी सामान्यांना करावी लागणारी कसरत दाखवणारा चित्रपट

Next Post

मी, तुम्ही, आपण सर्व जिवंत आहोत ते या माणसामुळे

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

मी, तुम्ही, आपण सर्व जिवंत आहोत ते या माणसामुळे

नोबेल पुरस्कार सुरु होण्याला वर्तमानपत्रात चुकून आलेली बातमी कारणीभूत आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.