The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावागढच्या महाकाली मंदिरातील रहस्यमय दगडाचं कोडं अखेर शास्त्रज्ञांना सुटलंय

by द पोस्टमन टीम
4 December 2024
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


निसर्गातील काही घटना आपल्याला आजही अचंबित करतात. ज्या घटनांचा अर्थ आपल्याला लागत नाही त्याला आपण दैवी चमत्कार म्हणतो, अशा अज्ञात घटनांचा संबंध अज्ञात शक्तीशी लावून त्याचा बाजार भरवला जातो. हे सगळं काही आता आपल्यासाठी नवीन नाहीत.

भारतातसुद्धा अनेक तीर्थस्थळे आहेत जिथे अशा कितीतरी आश्चर्यकारक आणि रहस्यमय गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही जर गुजरातच्या पावागढमधील महाकाली मंदिराला कधी भेट दिली असेल तर या ठिकाणी असलेल्या विशिष्ट प्रकारचे ध्वनी निर्माण करणारे दगड पाहायला मिळतील. महाकाली मातेच्या भक्तांच्या मते हा एक दैवी चमत्कार आहे. महाकाली मंदिराच्या परिसरातील या दगडांवर एखादी धातूची वस्तू आपटल्यास त्यातून जे ध्वनी निघतात ते दर्शवणारा एक व्हिडीओदेखील सोशल मिडीयावरून व्हायरल झाला होता.

सामान्य लोकांना ही घटना म्हणजे एक दैवी चमत्कार आहे असे वाटणे साहजिक आहे. कारण, त्यांना निसर्गातील प्रत्येक घटकांमध्ये काही अनोन्यसंबंध असतो हे माहित नसते किंवा ते जाणवत नाही.

पण, पावागढच्या उंच डोंगरावर असणाऱ्या या मंदिराच्या आसपास आढळणाऱ्या दगडातून असा विशिष्ट आवाज येण्यामागचे कारण काय? ही उत्सुकता तर शास्त्रज्ञांनाही स्वस्थ बसू देत नव्हती. कारण, आपण सामान्यत: जे दगड पाहतो त्या प्रकारच्या दगडातून असे स्वर उमटत नाहीत. मग या दगडातच अशी काय वैशिष्ट्ये आहेत याचा शोध घेण्याच्या निश्चय केला तेव्हा कुठे यामागचे खरे कारण स्पष्ट झाले.



शास्त्रज्ञांनी या दगडाचा आणि त्यातून निघणाऱ्या आवाजाचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी त्या दगडातील रासायनिक घटकांचा अभ्यास केला. या दगडामध्ये जी रासायनिक प्रक्रिया घडते त्यामुळे या दगडातून असे विशिष्ट स्वर निघतात असे निष्कर्ष या अभ्यासातून समोर आले.

महाकाली मंदिराच्या परिसरातील हे जे मोठमोठे दगड आहेत त्यामध्ये अल्क्लींचे प्रमाण जास्त आहे. या दगडामधील अल्कलींमुळेच या दगडातून असे ध्वनी निघतात.

अल्कलीचे प्रमाण जास्त असल्याने या दगडांमध्ये लोहाचे प्रमाणही जास्त आहे. म्हणून जेव्हा एखाद्या धातूच्या वस्तूने या दगडांवर आघात केला जातो तेव्हा त्यातून किणकीणारा ध्वनी निर्माण होतो. आजपर्यंत या दगडांच्या बाबतीत खोलवर अभ्यास झाला नव्हता. त्यांचे रासायनिक रूप काय आहे हे स्पष्ट झाले नव्हते. म्हणूनच याकडे एक चमत्कार म्हणून पाहिले जात होते.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

आता, असे सूर किंवा ध्वनी ज्यातून निघतात असे दगड फक्त या महाकाली मंदिराच्या परिसरातच आहेत असे नाही. भारतात इतरही बऱ्याच ठिकाणी हे असे दगड पाहायला मिळतात. यातील एक उदाहरण म्हणजे छत्तीसगड येथील ठीनठीनी दगड. या दगडाचे नावच किती अजब आहे बघा. तितकेच अजब रहस्य  या दगडातही दडलेले आहे. हे दगडही जेव्हा एकमेकांवर आपटले जातात तेव्हा दोन भांडी एकमेकांवर आटपल्यावर जसा आवाज येईल तसा आवाज या दगडांतून येतो. आजवर या दगडांचा आवाजही एक रहस्य होते. पण यांचा अभ्यास केल्यानंतरही हे स्पष्ट झाले आहे, यातही धातूचा अंश जास्त आहे.

छत्तीसगड असो की पावागढ हे दगड आज पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. इथल्या परिसरात राहणाऱ्या कित्येक लोकांना यामागील कार्यकारणभाव माहीत नाही.

महाकाली मातेचे मंदिर अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भाविकांच्या मते हे एक जागृत देवस्थान आहे.

जो कोणी आपल्या तक्रारी घेऊन या मंदिरात जाईल त्याला त्याच्या समस्यांवर नक्कीच उपाय सापडतो आणि ती समस्या भेडसावत नाही अशी मान्यता आहे. म्हणूनच दूरदुरून मातेच्या दर्शनासाठी लोक येतात.

विशेष बाब म्हणजे हिंदू देवतेच्या या मंदिरात अनेक मुस्लीमही मातेच्या दर्शनासाठी येतात. इथे येणाऱ्या भाविकांमधे हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला जात नाही. दोन्ही धर्मातील लोक इथे भक्तिभावाने येतात आणि मातेचे दर्शन घेतात.

या मंदिरात महाकाली मातेची दक्षिणमुखी मूर्ती आढळून येते. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील हलोल तालुक्यापासून ७ किमी अंतरावर एक पर्वत आहे. त्या पर्वताच्या टोकावर हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून १५२५ फुट उंचावर बांधण्यात आलेले आहे. कालिका मातेच्या या मंदिराला शक्तीपीठ मानले जाते.

रामायण काळात महामुनी विश्वामित्र यांनी इथे तपश्चर्या करून काली मातेला प्रसन्न करून घेतले म्हणून आज तिथे तिचे मंदिर पाहायला मिळते, अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.

समुद्रसपाटीपासून याची उंची जास्त असल्याने इथली हवा अतिशय थंड आहे. चारी बाजूंनी खोल दरी असल्याने पूर्वी या मंदिरापर्यंत पोहोचणे तितकेसे सोपे नव्हते आता मात्र मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. रोप-वेची देखील सुविधा उपलब्ध केलेली आहे.

हे देवस्थान जागृत देवस्थान असून शक्तीपीठ असल्याचे मानले जाते त्यामुळे या मंदिराला खूप महत्त्व आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्या धाडसाच्या बळावर या गुलामाने असंख्य गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलं होतं

Next Post

आपल्या मालकाची दहा वर्षे वाट पाहणारा हा आहे जगातला सगळ्यात इमानदार कुत्रा

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

आपल्या मालकाची दहा वर्षे वाट पाहणारा हा आहे जगातला सगळ्यात इमानदार कुत्रा

हातपाय नसलेला 'निक' जगभरातील लोकांना मोटिवेट करतोय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.