The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहे मानवी इतिहासातील सर्वात जुन्या खेळांची यादी..! यातला तुम्हाला आवडलेला खेळ कुठला..?

by द पोस्टमन टीम
21 October 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


शरीर आणि मन दोन्हीच्या आरोग्यासाठी मैदानी खेळाला प्राधान्य दिले जाते. क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी, असे कितीतरी मैदानी खेळ तुम्हीही खेळले असतीलच. पण, या मैदानी खेळांचा, त्यातील नियमांचा शोध माणसाला कधी लागला असेल? भटका माणूस स्थिर झाला, शेती करू लागला, नगरे वसवू लागला, यातूनच मोठमोठी साम्राज्ये उदयास आली, हे तर आपल्याला माहिती आहे. पण, या सगळ्या प्रवासात तो या मैदानी खेळांकडे कधी वळला असेल?

आज खेळले जाणारे कितीतरी खेळ प्राचीन काळीही अस्तित्वात होते. फक्त त्याचे स्वरूप काहीसे वेगळे होते एवढेच! एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही क्रीडा संस्कृती हास्तांतरीत होत असताना त्यात कालानुरूप काही बदल होत गेले. ऑलिम्पिक सामन्यांची परंपरा सुरु झाल्यानंतर खेळाला आणखीनच महत्व प्राप्त झाले.

परंतु फार फार वर्षांपूर्वी कोणते खेळ खेळले जात होते? काळाच्या ओघात त्यातील कोणते खेळ नाहीसे झाले? कोणत्या खेळांचे स्वरूप बदलले? कोणते खेळ आजही टिकून आहेत याची माहिती घेणे निश्चितच मनोरंजक ठरेल.

१) युलामा

मानवी इतिहासातील हा सर्वात जुना खेळ मानला जातो. युलामा/उलामा हा एका बॉलसोबत खेळला जाणारा खेळ होता.



सुमारे ३५०० वर्षापासून हा खेळ अमेरिकेत खेळला जात होता. ऑलम्पिक स्पर्धांच्याही आधी हा खेळ अस्तित्वात होता. इतका तो जुना खेळ आहे.

संपूर्ण ताकदीनिशी खेळला जाणारा हा खेळ यातील क्रू*रतेमुळे जास्त भायानक वाटतो.

या खेळात विजयी ठरणाऱ्या खेळाडूचा जंगी सत्कार होई. सगळीकडे त्याला मेजवानीसाठी आमंत्रण दिले जात होते. मात्र या खेळात पराभूत होणाऱ्या व्यक्तीला शिक्षा दिली जात असे. तीही साधीसुधी शिक्षा नव्हे तर मृत्युदंडाची शिक्षा. यातील अशा भयानक क्रू*रतेमुळेच हा खेळ बंद झाला असावा.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

२) पोलो

पोलो या खेळात दोन संघ असतात. प्रत्येक संघात चार खेळाडू असतात. हा खेळ घोड्यावर बसून खेळला जातो. पोलो हा खेळही खूप प्राचीन खेळ आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वी फारस देशात हा खेळ खेळला जात होता. पूर्वीच्या काळी श्रीमंत लोक आणि राजेरजवाड्यांकडे पोलो खेळणारे भरपूर खेळाडू असत. राजाच्या मनोरंजनासाठी या खेळाच्या स्पर्धा भरवल्या जात. या स्पर्धेत एकावेळी १०० खेळाडू सहभागी होत असत. इतक्या मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचे आयोजन केले जाई.

फरासनंतर हा खेळ अरब देशांत पोहोचला. त्यानंतर तिबेट, चीन, जपान असे करत करत आज जवळपास सगळ्या देशात हा खेळ खेळला जातो.

प्राचीन भारतातही अशा पद्धतीचा खेळ खेळला जात होता. गिलगीट, चित्राल आणि मणिपूर राज्यात हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जात असे. मुस्लीम सम्राटही या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करत. कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू पोलो खेळतानाच झाल्याचे म्हटले जाते.

मणिपूरमधील चहाच्या मळ्याचे मालक आणि ब्रिटीश रेजिमेंटमधील सैनिकही हा खेळ खेळत असत. आजच्या पोलोची सुरुवात या रेजिमेंटमधील सैनिकांनीच १८६० च्या सुमारास केली होती.

३) टेंट पेगिंग

टेंट पेगिंग हाही एक अतिशय जुना खेळ आहे. राजा सिकंदरच्या काळातही हा खेळ खेळला जात होता. त्याही आधी सुमारे २५०० वर्षांपूर्वीपासून हा खेळ खेळला जात असल्याचे पुरावे सापडतात.

पूर्वी यु*द्धात घोडेस्वारांना जमिनीवर पडलेल्या शत्रूला मारता यावे म्हणून त्यांना याप्रकारचे तंत्र शिकवले जात असे. पुढे याच तंत्राचा वापर करून हा खेळ खेळला जाऊ लागला. इसवीसन पूर्व चौथ्या शतकापासून हा खेळ आशिया आणि युरोप खंडातून नंतर हा खेळ संपूर्ण जगभरात पोहोचला.

मध्ययुगीन भारतातही यु*द्धात हत्तीस्वार सैनिकापासून घोडेस्वारांचा बचाव करण्यासाठी हे तंत्र वापरले जात असे. आज हा खेळ खेळताना घोडेस्वाराला जमिनीवरील पडलेली वस्तू उचलायची असते. ऑलम्पिकनेही १९८२ साली याला अधिकृत खेळाचा दर्जा दिला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये हा खेळ विशेष लोकप्रिय आहे.

आज महिलांचे संघही हा खेळ खेळताना दिसतात.

४) बुद्धिबळ

बुद्धिबळाची सुरुवात कधी झाली याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. काही जणांच्या मते याचा उगम चीनमध्ये झाला तर काहींच्या मते हा युनानी खेळ आहे. तर काहींच्या मते रावणाची पत्नी मंदोदरीने या खेळाचा शोध लावला होता.

रावण यु*द्धावरून परतल्यावर त्याचे मनोरंजन करण्यासाठी मंदोदरी हा खेळ त्याच्यासोबत खेळत असे.

भारतात गुप्त काळात हा खेळ विशेष प्रचलित होता.

पूर्वी या खेळात फक्त हत्ती, घोडा, राजा आणि सैनिक असायचे. नंतर हा खेळ इराण मागोमाग इतर अरब देशांत पोहोचला तेंव्हा त्यात वजीर आणि उंटही सामील झाले. अशा प्रकारे काळासोबत बदल होत होत आजचा बुद्धीबळाचा पट तयार झाला.

५) साप-शीडी

साप शीडी आज घरोघरी खेळला जातो. लहान मुलांना तर या खेळाची खूपच गंमत वाटते. परंतु हा खेळ किती जुना आहे तुम्हाला माहिती आहे का? सुमारे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या खेळाचा शोध लावल्याचे मानले जाते. मात्र काहींच्या मते इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून हा खेळ अस्तित्वात आहे.

६) हॉकी

आज हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. पण, हा खेळ प्राचीन ग्रीसमध्ये उदयास आला असावा असे मानले जाते. हातात गोलाकार शेंडा असलेली दांडी आणि बॉल सोबत खेळणारे खेळाडू चित्रातून दाखवण्यात आले आहेत. परंतु याची सुरुवात नेमकी कधी झाली याची अचूक माहिती मिळत नाही.

हॉकी हा  खूप जुना, म्हणजे सुमारे ४००० वर्षापासून खेळला जाणारा खेळ आहे. इथिओपिया आणि इजीप्तमध्ये इसवी सन हजार वर्षापूर्वीही हा खेळ अस्तित्वात असल्याचे काही पुरावे सापडतात.

इसवी सन पूर्ण ६०० पर्यंत या खेळाला ‘शीन्टी’ म्हणून ओळखले जात असे. इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा याने १३६३ साली पहिल्यांदा या खेळासाठी हॉकी हा शब्द वापरला आणि तेंव्हापासून हा खेळ हॉकी नावानेच प्रचलित आहे. ब्रिटीश साम्राज्य विस्तारासोबत हा खेळ त्यांच्या वसाहत देशांमध्येही पोहोचला.

अनेक शतकांपूर्वी हे खेळ जितके प्रसिद्ध होते तितकेच आजही प्रसिद्ध आहेत. अशाच एखाद्या खेळाबद्दल आणि त्याच्या उगमाबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याबद्दल या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

Next Post

शून्य फक्त गणितातच नाही तर भारतीय संस्कृतीतसुद्धा महत्त्वाचा आहे..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

शून्य फक्त गणितातच नाही तर भारतीय संस्कृतीतसुद्धा महत्त्वाचा आहे..!

हुतात्मा अब्दुल हमीद यांचं भूत अजूनही पाकिस्तानी सैन्याला सतावत असेल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.