The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थोर शास्त्रज्ञ एडिसनला बालपणी लोक मंदबुद्धी म्हणून हाक मारायचे

by द पोस्टमन टीम
10 February 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


थॉमस अल्वा एडिसन हे नाव आपल्याला माहिती आहे. त्याने बल्बचा शोध लावला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, एडिसनचे बालपण कसे गेले? एडिसनची बालपणी त्याच्या शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती. इतकेच नाही एक अशी घटना देखील घडली होती ज्यामुळे ते बहिरे झाले होते, चला आज आपण एडिसनच्या रंजक आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकूया..

एडिसनचा जन्म अमेरिकेच्या ओहियो राज्यात १८४७ साली झाला. त्याचे आयुष्य साधारण नव्हते. तो वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बोलू शकत नव्हता, यामुळे त्याचे आई-वडिल कायमच काळजीत रहायचे. काही दिवसांनी तो बोलू लागल्याने त्याच्या आईवडिलांची समस्या सुटली असे त्यांना वाटले. पण यानंतर एडिसनला गंभीर आजाराने ग्रासले ज्यामुळे त्याला बहिरेपण आले. त्याच्या हालचालींवर देखील याचा परिणाम झाला, लोक त्याला वेडा म्हणू लागले.

एकदा त्याने पक्षांना किडे खाताना बघितले. त्याला वाटले की किडे खाल्ल्यामुळेच पक्षी उडतात. मग, त्याने किडे गोळा केले, ते एकत्र करून त्यांचा रस तयार केला. इतकेच नाही तर, हा रस त्याच्या एका मित्राला प्यायला दिला. त्याला वाटले की हे प्यायल्यावर आपला मित्र उडू लागेल.

पण असे काही झाले नाही.

एकदा अंड्यातून पिल्ले बाहेर काढण्यासाठी तो स्वतः त्यावर जाऊन बसला. अशा विचित्र प्रयोगांमुळे आणि वागणुकीमुळे लोक त्याला मंदबुद्धी म्हणू लागले.



आईच्या प्रयत्नामुळे एडिसनला शाळेत प्रवेश मिळाला. पण तीन महिनेही त्याचा त्याठिकाणी निभाव लागला नाही. यामुळे त्याला शाळेतून काढण्यात आले. खरंतर यात एडिसनची काही चूक नव्हती. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला शाळेतून काढण्यात आले होते, त्याच्या आईकडे शाळेची फी भरण्याचे देखील पैसे नव्हते. ज्यावेळी एडिसन घरी येऊन आपल्या आईला सांगू लागला की, फी न भरल्यामुळे त्याला शाळेतून काढण्यात आले. त्यावेळी त्याच्या आईने त्याला जवळ घेतले आणि म्हणाल्या की थोडे दिवस थांब, आपण तुला युनिफॉर्म पण घेऊ आणि तुझ्या शाळेची फी देखील भरू, पण सध्या घरची परिस्थिती बेताची असल्याने आपण काहीच करू शकत नाही.

एडिसन त्याच्या आईला म्हणाला, “आता तिथे परत जाण्यात अर्थ नाही कारण त्यांनी माझी कायमची हकालपट्टी केली आहे.” यावर एडिसनची आई त्याला म्हणाली, “ठीक आहे, असं असेल तर मी तुला शिकवेन आणि त्याच्या आईनेच एडिसनला शिक्षण दिले”. आईच्या मार्गदर्शनाच्या बळावर एडिसनने अनेक परीक्षा दिल्या व त्या सर्वांमध्ये यश मिळवले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

एडिसनला बालपणापासून अभ्याक्रमातील पुस्तके वगळता इतर पुस्तके वाचण्याची आवड होती. यातूनच तो अनेक विज्ञानाशी निगडित पुस्तके वाचायचा. त्याने स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली होती. यासाठी त्याने जवळचे सर्व पैसे खर्च केले होते. हे सर्व त्याने १० वर्षाच्या वयात केले होते.

त्याला संशोधन करण्याची प्रचंड आवड होती. सर्व पैसे संपल्यावर तो रेल्वेत पेपर विक्री करून पैसे जमवू लागला. या पैशातून त्याने प्रयोगाचे सामान विकत घेतले.

एक दिवस तो असाच ट्रेनमध्ये पेपर विकत होता आणि तेव्हा त्याला दिसले की एक मुलगा ट्रेनमधून खाली पडतोय. एडिसन लगेचच त्याच्याकडे धावला आणि त्याने त्या मुलाचा जीव वाचवला. एडिसनच्या धाडसाने प्रभावित झालेल्या त्या मुलाच्या पित्याने आभार मानत त्याला तो काय व्यवसाय करतो अशी विचारणा केली. तेव्हा त्याने आपण पेपरविक्री करतो असे सांगितले. हे ऐकल्यावर त्या मुलाचे वडिल त्याला म्हणाले की, “मी तुला एक टेलिग्राम मशीन घेऊन देतो व तिचा वापर करणे शिकवतो”. एडिसनने लगेचच आपला होकार कळवला. टेलिग्राम मशीनमुळे एडिसन चांगले पैसे कमावू लागला. त्याला स्टेशनवर नोकरी मिळाली. इथे तो सकाळी काम करायचा आणि रात्री आपले प्रयोग करत बसायचा.

एडिसनने अनेक शोध लावले. अनेक वस्तूंची निर्मिती केली. पण विजेचा दिवा हा त्याचा प्रमुख शोध. हा प्रयोग करताना त्याला एक दोन नव्हे तर, तब्बल १० हजार वेळा अपयश आले होते. पण त्याने खचून न जाता बल्बचा शोध लावलाच.

ज्यावेळी एडिसनला १० हजार वेळा प्रयोग करून तो असफल ठरल्यावर निराश झाला नाही का? असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मी निराश का होऊ? मी असफल झालोच नव्हतो, उलट मी बल्ब तयार करण्याच्या १० हजार चुकीच्या पद्धतींचा शोध घेतला होता. त्याचे हे उत्तर ऐकून प्रश्न विचारणारा देखील चकित झाला होता.

पॉवर युटिलिटीज, इलेक्ट्रिक मोटर, मोशन साउंड रेकॉर्डर अशा अनेक शोधांचा जनक म्हणजे एडिसन. त्याच्या शोधांमुळे तो जगभरात प्रसिद्ध झाला होता. त्याने त्याच्या प्रयोगादरम्यान टेली कम्युनिकेशनचा वापर केला होता. त्याने स्टॉक स्टिकर, इलेक्ट्रिक कारची बॅटरी, व्होट रेकॉर्डर मशीन, इलेक्ट्रिक पॉवर रेकॉर्डर हे देखील त्याचे काही प्रमुख शोध आहेत. ८४ वर्षाच्या आयुष्यात एडिसनने १०९३ शोध लावून त्याचे पेटंट स्वतःच्या नावावर केले होते.

एडिसनच्या बालपणी हा मुलगा तंत्रज्ञान क्षेत्रात एवढी मोठी क्रांती आणेल याचा विचार तरी कोणी केला असेल का?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

एका रात्रीत आयुष्य पालटले आणि अट्टल गुन्हेगार बनला वर्ल्ड फेमस मॉडेल !

Next Post

गुगलच्या महत्त्वाकांक्षी ‘गुगल प्लस’ची निर्मिती या मुंबईकर तंत्रज्ञाने केली होती..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

गुगलच्या महत्त्वाकांक्षी 'गुगल प्लस'ची निर्मिती या मुंबईकर तंत्रज्ञाने केली होती..!

काश्मीरमधील 'बॅड' द*हश*तवाद्यांना या 'गुड' द*हश*तवादी संघटनेने संपवले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.