The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

by द पोस्टमन टीम
25 February 2025
in मनोरंजन, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


९० च्या दशकात मुंबईत फक्त दोनच नावांची चर्चा होती. एक दाऊद इब्राहिम आणि दुसरे अरुण गवळी. दोन्ही वेगवेगळ्या गॅंग चालवायचे. दोघांच्या गॅंगमध्ये नेहमी झटपट होत असायची. यात कधी दाऊदचे लोक मारले जायचे तर कधी अरुण गवळीचे. अशाच एका गॅंगवॉ*रमध्ये इस्माईल पारकरचा मृत्यू झाला.

इस्माईल दाऊदच्या बहिणीचा नवरा होता. अरुणने आपल्या भावाचा बदल घेण्यासाठी इस्माईलचा खू*न केला होता. इस्माईलच्या मृत्यूनंतर झालेल्या बॉ*म्बस्फो*टाने मुंबई हादरली आणि दाऊदला मुंबई सोडून पळ काढावा लागला. इस्माईलच्या मृत्युमुळे दाऊदच्या गँगमध्ये त्यावेळी जी पोकळी निर्माण झाली, ती भरण्याचे काम हसीना पारकरने केले. दाऊद मुंबई सोडून गेल्यानंतर हसीनाने दाऊदचे मुंबईतील सगळे कामकाज सांभाळायला सुरुवात केली. तिच्या भयाने मुंबई थरथर कापू लागली.

हसीना आणि दाऊद दोघेही सख्खे भाऊ-बहीण असले तरी दाऊदच्या गुन्हेगारी जगताशी हसीनाचा काहीही संबंध नव्हता. मुंबईतील बॉ*म्बस्फो*ट व इस्माईल पारकरच्या मृत्यूअगोदर कोणाला तिचे नाव देखील माहिती नव्हती. परंतु इस्माईलच्या मृत्यूनंतर हसीना पूर्णच बदलली.

१९९३ च्या बॉ*म्बस्फो*टाने भारताला हादरवून सोडले होते. एरवी पैशांच्या मागे धावणारा दाऊद या घटनेमुळे पहिल्यांदा द*हश*तवादाकडे वळला होता. यावेळी संपूर्ण मुंबई शहर त्याच्या निशाण्यावर होते. टायगर मेननच्या बरोबरीनेच दाऊदचा या बॉ*म्बस्फो*टात हात आहे, हे सत्य बाहेर आले त्यावेळी पोलीस दाऊदच्या विरोधात अग्रेसिव्ह भूमिका घेऊ लागले होते. पोलिसांच्या भयाने दाऊद मुंबई सोडून पळाला.

दाऊदच्या पाठीमागे त्याचा अंडरवर्ल्डचा धंदा चालवू शकेल, अशा चेहऱ्याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी हसीना शिवाय दुसरा कुठला समर्थ दावेदार त्याला सापडत नव्हता. हसीना आधीच तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पेटून उठली होती. आणि हसीना पारकरची अंडरवर्ल्डमध्ये एंट्री झाली.



हसीनाने कारभार सांभाळायला सुरुवात केली आणि तिने अंडरवर्ल्डला हादरवून सोडले होते. सुरुवातीच्या काळात खंडणी आणि अपहरण यांसारखे काम करणाऱ्या हसीनाने हवाला रॅकेट, बॉलिवूडमध्ये चित्रपटांवर पैसे लावणे आणि मर्ड*रची सुपारी घेणे असे काम करायला सुरुवात केली.

गुन्हेगारी विश्वात हसीनाची गॅंग हातपाय पसरत होती. अनेक मोठमोठ्या बिल्डर्सने तिच्यासाठी पायघड्या घालायला सुरुवात केली. हसीनाच्या ताकदीचा दाऊदला फायदा झाला. तो आता फक्त मुंबईचा डॉन उरला नव्हता, तो जागतिक स्तरावरील मोस्ट वॉन्टेड अपराधी बनला होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

ज्यावेळी हसीनाने गुन्हेगारी विश्वात आपले वर्चस्व सिद्ध केले त्यानंतर तिला स्वतःचा एका सुरक्षित एरिया असण्याची गरज जाणवू लागली. मुंबईच्या नागपाडाला हसीनाचा आणि तिच्या पंटर लोकांचा अड्डा बनला.

नागपाड्याच्या प्रत्येक लहान मोठ्या कामात हसीनाचा सहभाग होता.  लोक आपल्या प्रॉपर्टीची वाटणी करायला तिच्याकडे यायचे. नागपाडाच्या लोकांना याचा काही त्रास नव्हता कारण मुंबईचा इतर गँग्सपासून त्यांना सुरक्षा मिळत होती.

पण “हर गुन्हेगार कानून के हाथ आता ही हैं”. आणि असेच काहीसे हसीनासोबत घडले. २३ मे २००७ साली तिला मुंबईच्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. आयुष्यात पहिल्यांदाच हसीना कोर्टासमोर उभी होती.

पोलिसांनी आरोप केला होता की काही इतर लोकांसोबत तिने वडाळ्याच्या एका भागात नवीन झोपडपट्टी निर्माण केली होती. खरेतर यासाठी बिल्डर जयेश शहाने एक कोटींची खंडणी दिली होती. पण त्याला परवानगी मिळाली नाही. त्याने पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा त्याला फक्त ७० लाख परत मिळाले. त्याने इतर ३० लाख मागितल्यावर हसीना पारकरने देण्यास मनाई केली. यानंतर त्याने मुंबई पोलिसात खंडणीची तक्रार दाखल केली. ही एफआयआर रद्द करण्यासाठी हसीनाने सर्व प्रयत्न करून बघितले पण तिला यश आले नाही.

पुढे ११ मे यादिवशी तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले, ज्यानंतर हसीनाला २३ मेला अटक करण्यात आली. २५ मे २००७ ला तिच्या विरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट सत्र न्यायालयाने रद्द केले. तिला जामीन मंजूर करण्यात आला.

यानंतर ती मरेपर्यंत या खटल्याने तिची पाठ सोडली नव्हती. तिच्यावर ८८ खटले दाखल करण्यात आले होते. जमिनीवर अनधिकृतपणे ताबा घेणे, हवाला रॅकेट, खंडणी वसुली, जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गुन्ह्यांसाठी तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते.

काळाबरोबर हसीनाचे वय वाढत होते, तिला अनेक व्याधींनी गाठले होते. यातच एक दिवस तिचा मृत्यू झाला. ती त्यावेळी ५१ वर्षाची होती.

६ जुलै २०१४ च्या दिवशी मुंबईच्या इतिहासातील सर्वात कुख्यात महिला गुन्हेगार हसीना परकरने जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यनंतर देखील तिच्या नावाची चर्चा होती. तिच्या मृत्यूनंतर रॉ देखील अलर्टवर होती, कारण शेवटी ती डॉन दाऊद इब्राहिमची बहीण होती.

असे म्हणतात की, हसीनाला गुन्हेगारी जगतात यायचे नव्हते, पण परिस्थितीने तिच्यासमोर दुसरा पर्याय ठेवला नव्हता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

..आणि रखमाबाई वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या

Next Post

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
Next Post

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

एका कवीने तयार केली होती जगातील सर्वात धोकादायक अेके-४७ बंदूक !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.