The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन देशांच्या बॉर्डरवर असलेल्या या हॉटेलमुळे फ्रेंच सैनिकांचा जीव वाचला होता

by द पोस्टमन टीम
5 February 2025
in भटकंती, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात अनेक हॉटेल्स ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. सध्या अशाच एका सोन्याने मढवलेल्या हॉटेलची सगळीकडे चर्चा सुरू आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई येथे हे हॉटेल असून इथे प्रत्येक गोष्टीवर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये एका रात्रीचा निवास एखाद्या कोट्याधीशालासुद्धा परवडणारा नाही आहे.

फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन देशांच्या सीमेवर देखील असंच एक अनोखं हॉटेल आहे. या हॉटेलचं भाडे परवडणारे असले तरी याची रचना फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे हॉटेल दोन देशात विभागल्या गेल्यामुळे याचा अर्धा भाग हा फ्रेंच पद्धतीने बनवण्यात आला आहे तर अर्धा भाग स्विस पद्धतीने बनवण्यात आला आहे.

हॉटेल अरबेज फ्रँको सुझे असं या हॉटेलचं नाव असून फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरील ला क्युरे या गावात हे हॉटेल आहे. हे गाव देखील दोन्ही देशांच्या सीमेत वाटले गेले आहे.

१८६२ मध्ये बनवण्यात आलेल्या या इमारतीचा फ्रेंच बाजूचा भाग रेशन दुकान म्हणून वापरण्यात येत होता तर स्विस बाजूचा भाग हा पब म्हणून वापरण्यात येत होता. एकाच इमारतीच्या दोन बाजूला दोन वेगवेगळ्या देशात दोन वेगवेगळे व्यवसाय चालायचे.

पोंथस नावाचा एक फ्रेंच व्यक्ती या इमारतीचा मालक होता. दोन्ही देशातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने ही नामी शक्कल लढवली होती.



१९२१ मध्ये जुल्स जीन अरबेज नावाच्या व्यक्तीने ही इमारत विकत घेतली व इथे आपले हॉटेल थाटले. दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी जर्मन ना*झी सैनिकांपासून आपले प्राण वाचवण्यासाठी पळत निघालेले फ्रेंच सैनिक फ्रान्समध्ये लपू शकत नव्हते, त्यामुळे ते या हॉटेलमध्ये थांबत, या हॉटेलचा अर्धा भाग स्वित्झर्लंडमध्ये असल्याने जर्मन सैनिक तिथे येत नसत, यामुळे फ्रेंच सैनिक मोठ्या प्रमाणावर आपला जीव वाचावा म्हणून या हॉटेलात निवास करत होते.

या हॉटेलला दोन्ही देशांनी आपापल्या सीमेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही व ते हॉटेल असेच दोन्ही देशात विभागलेल्या अवस्थेत राहिले.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

अरबेज हॉटेलला दोन भागात विभागले गेले होते. एक स्विस ट्रॅडिशनल पद्धतीचा होता तर दुसरा फ्रेंच पद्धतीचा होता. या ठिकाणी एका रुममध्ये बेडचा एक भाग फ्रेंच चिन्हांनी तर दुसरा भाग स्वीस चिन्हांनी सजवण्यात आला आहे. इथे रहायला येणाऱ्या पर्यटकांना दोन्ही देशात राहिल्याचा आनंद मिळतो. या हॉटेलचा बार फ्रेंच भागात आहे तर दुसरा बाथरूमचा भाग स्वित्झर्लंडमध्ये आहे.

दीडशे वर्ष जुने असलेले हे हॉटेल 2 स्टारच्या श्रेणीत गणले जाते. जगभरातून पर्यटक या हॉटेलला भेट देत असतात. इथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या आवडीच्या देशाप्रमाणे सर्व्हिस प्रदान करण्यात येते. जर कोणाला फ्रेंच पाहुणचार हवा असेल तर त्याचा त्या पद्धतीने पाहुणचार केला जातो, जर कोणाला स्विस पद्धतीचा पाहुणचार हवा असेल तर त्याला तशी सेवा पुरवली जाते.

सध्या एक फ्रेंच कंपनी हे हॉटेल चालवत असून ही कंपनी दोन्ही देशांना कर देते. २००८ मध्ये फ्रेंच सरकारने धूम्रपानावर बंदी घातली त्यावेळी या हॉटेलमध्ये मोठा वादंग उभा राहिला होता, कारण स्वित्झर्लंडमधील भागातून धुरच धूर फ्रेंच भागात येत होता. पुढे स्विस भागातील धूम्रपानावर देखील बंदी आली.

फ्रान्समध्ये अट्टरप रेव्हेस नावाचे अजून एक हॉटेल आहे जे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या आकारामुळे बबल हॉटेल म्हणून देखील ओळखले जाते. बबलच्या आकाराच्या पारदर्शी खोल्या या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे.

कॅरेबियनमधील जेंट माऊंटन रिसॉर्ट आणि सेंट लुसिया मधील रिसॉर्टसला तर चौथी भिंतच बांधण्यात आलेली नाही. इथे ग्लासचे प्रोटेक्शन असून इथे वास्तव्यास असल्यावर एका बंद खोलीत असून देखील तुम्हाला आसपासच्या घनदाट जंगलाचा व निसर्गाचा संपूर्ण अनुभव घेता येतो. इतकंच नाही तुम्हाला याठिकाणी समुद्रावरची मंद वाऱ्याची झुळूक देखील अनुभवायला मिळते.

टांझानिया देशातील मनाना हॉटेल हे देखील अशाच प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण हॉटेल असून त्या हॉटेलमध्ये रूम मिळवायला कमीत कमी सहा ते सात महिने अगोदर बुकिंग करावे लागते. या हॉटेलचा एक भाग पाण्याखाली असून इथे राहायला गेल्यावर एकाच वेळी जल, जमीन आणि आकाशात राहण्याची अनुभूती पर्यटकांना मिळते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: famous resortshotel arbezspecial hotels
ShareTweet
Previous Post

कसोटी क्रिकेटचे हे नियम तुम्हाला माहित आहेत काय..?

Next Post

जवाहरलाल नेहरूंनी का दडवून ठेवले होते सुभाषबाबूंच्या मृत्यूचे रहस्य ?

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

जवाहरलाल नेहरूंनी का दडवून ठेवले होते सुभाषबाबूंच्या मृत्यूचे रहस्य ?

कोरोनाच्या ११० वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या एका रोगाने शेकडो लोकांचा जीव घेतला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.