The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या तंत्रज्ञानाचा पाया रचणाऱ्या ‘निकोला टेस्ला’च्या माहित नसलेल्या गोष्टी

by द पोस्टमन टीम
5 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘टेस्ला मोटर्स’ नसती तर जगाला त्या माणसाबद्दल समजलंही नसतं ज्याने आपल्या दैनंदिन वापरातल्या वाहणाऱ्या विजेचा (प्रत्यवर्ती प्रवाहाचा) शोध लावला.

टेस्लाने असे काही शोध लावले जे त्याच्या काळाच्या बरेच पुढचे होते, अशा शोधांनी जनसामान्यांनाही चक्रावून सोडलं होतं. आपण वायरलेस (बिनतारी) तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत, ज्यात वायरलेस ट्रान्समिशन, सुरुवातीच्या काळातले सेलफोन, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स (स्वयंचलित वाहने) आणि उड्डाण करणारी वाहने, तसेच मृत्यू किरण यांचा समावेश आहे.

निकोला टेस्लाच्या नावे आजवर ७०० पेक्षही अधिक पेटंट्स आणि संशोधने आहेत.

  1. टेस्ला कॉईल– हा एक असा ट्रान्सफॉर्मर आहे, ज्याद्वारे उच्च विद्युत दाबाचा प्रत्यवर्ती विद्युतप्रवाह निर्माण करू शकतो.
  2. जगातील सर्वात पहिले जलविद्युत संयंत्र (Hydroelectric power plant)
  3. प्रतिदीप्त किंवा फ्लूरोसंट बल्ब
  4. वर्धनक्षम विद्युतवहन (magnifying transmission)- जमिनीतूनच विद्युतप्रवाह मिळवून त्याद्वारे कोणत्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असलेला बल्ब प्रकाशमान करणे सहज शक्य होते
  5. दुरनियंत्रक (रिमोट कंट्रोल)
  6. पहिली क्ष-किरण प्रतिमा बनवणे (यातून निष्पन्न काही झालं नाही पण प्रयोगाचं पर्यवसान आग लागण्यामध्ये झालं).
  7. पहिला रेडिओ (त्यासंबंधी कागदपत्रे आगीत भस्म झाली/केली)
  8. टेस्ला टर्बाईन– ९८% कार्यक्षमता दाखवणारं खुद्द टेस्लाचं आवडतं संशोधन- जे अपारंपरिक किंवा नूतनक्षम ऊर्जेसाठी वापरता येतं. जे अजूनही दैनंदिन वापरात/विक्रीसाठी आलेलं नाही.
  9. रेडिओ-चलित नौका– जी रेडिओ सिग्नलद्वारे तो चालवू शके.

टेस्ला स्वतः सर्बो-क्रोएशियन, झेक, जर्मन, हंगेरीयन, फ्रेंच, इंग्रजी, इटालियन आणि लॅटिन या ८ भाषा बोलण्यामध्ये प्रविण होता.



त्याला एक भविष्यवेत्ताच म्हणायला हवं कारण त्याने अशा काही उपकरणांची कल्पना केली होती जी त्यानंतर शतकभराने तयार झाली.

१) त्याने १९२६ मध्ये स्मार्टफोनचं भाकीत केलं होतं.

बिनतारी उर्जा आपल्याला दूरसंप्रेषण करण्यात कशी मदत करू शकते, याबद्दल टेस्लाने जॉन बी. केनेडीला दिलेल्या मुलाखतीत टेस्ला यांनी सांगितलं होतं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

“जेव्हा बिनतारी तंत्रज्ञान पूर्णपणे उपयोगात येईल तेव्हा पूर्ण पृथ्वी एका विशाल मेंदूमध्ये रूपांतरित होईल. म्हणजेच सर्व गोष्टींची रचना अतिशय वास्तविक आणि तालबद्ध अशी असेल. आपल्याला कितीही अंतरावरून एकमेकांशी संवाद साधता येईल. एवढंच नाही तर टेलिव्हिजन, टेलिफोन यांचाही वापर याद्वारे होईल.

भले आपल्यात कितीही अंतर असो, आपण समोरासमोर असल्याप्रमाणे एकमेकांना पाहू, ऐकू शकू आणि यासाठी उपयोगात येणारी उपकरणे आजच्या टेलिफोनच्या तुलनेत वापरण्यासाठी अगदी सोपी असतील जी घेऊन आपल्याला खिशात घेऊनही फिरता येईल.”

मी ज्यावेळी हे वाचले तेव्हा मी विचार केला ‘काय? त्या वेळी साध्या घरगुती संगणकाची स्क्रीनसुद्धा बरीच मोठी असे, टेलिफोन घरीच वापरावा लागे, मला तरी वाटत नाही की त्यावेळी कुणाकडे मोबाईल फोन असू शकेल, मग टेस्लाने नक्की कशाची कल्पना केली असेल की जी गोष्ट आपण अगदी आपल्या खिशात घेऊन फिरू शकू ज्यातून आपल्याला जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला पाहू शकू, हे काय असेल, खरंच मला हा विचार पचायलाच वेळ लागला.

अगदी आजच्या काळातील WiFi, बिनतारी ऊर्जेवर चालणारी विमाने, MRI कॅमेरे आणि महिलांच्या हाती सत्ता असेल असा काळही टेस्लाने कल्पिला होता.

भविष्यात सर्व युद्ध रोखू शकेल अशा मृत्यू किरणांची कल्पना मांडणारी काही चित्रेही त्याने काढली होती. पण, अमेरिकी गुप्तचर संघटनेने त्याची सर्व कागदपत्रे त्याच्या मृत्यूपश्चात जप्त करून त्याचं सर्व संशोधन चुकीचं आहे असं सांगितलं.

२) त्याचा जन्मच प्रकाशाचं प्रतीक ठरला होता

त्याचा जन्म क्रोएशियामध्ये १० जुलै, १८५७ रोजी गडगडत्या, विजांच्या कडकडाती वादळात झाला होता. त्यावेळी सुईण त्याचवेळी म्हणाली, ‘हे चांगलं लक्षण नाही, वादळी वातावरण हा अपशकुनच. हे मूल नक्कीच अंधःकार घेऊन येईल’ यावर टेस्लाची आई उत्तरली- ‘नाही, हा खरंतर प्रकाश घेऊन येईल!’

नंतरच्या काळात तो सतत प्रखर प्रकाशाकडे बघत राही. त्यातूनच त्याची नजर अंधुक होत गेली. त्यामुळे खरं-खोटं ओळखणं त्याला अवघड जात असे. जसजसा तो मोठा होत गेला तसं त्याने त्याची ही दृष्टी संशोधनात वापरली.

कदाचित जन्मवेळी झालेल्या प्रकाशमान वादळानेच त्या वेळी भविष्यवाणी केली असेल की हा पुढे जाऊन AC प्रवाहाद्वारे प्रकाश निर्माण करेल.

परंतु त्याच्या वडिलांच्या मनी त्याने वेगळंच एक काम करावं असं होतं.

३) कॉलऱ्याचे आभार की टेस्ला धर्मगुरू नाही बनला !

टेस्लाच्या वयाच्या ५व्या वर्षी त्याचा मोठा भाऊ डेन हा घोड्यावरून पडून मृत्यू पावला. मुलाचा मृत्यू हा त्याच्या कुटुंबासाठी फार मोठा धक्का होता. घरच्यांच्या मते डेन हाच अशक्त निकोलापेक्षा जास्त हुशार होता, कदाचित म्हणूनच त्यांच्या निकोलाकडून काही फारशा अपेक्षा नव्हत्याच. डेनच्या मृत्यूने वडील अस्वस्थ झाले होते. त्यांना त्यांच्या मुलाला त्यांच्यासारखाच एक सनातनी धर्मगुरू बनवायचे होते की ज्यायोगे तो गावाजवळच असलेल्या शाळेतही जाऊ शकला असता. तंत्रशिक्षण देणाऱ्या शाळा हा प्रश्न खरंतर विचाराधीन होता पण तरीही टेस्लाला फिजिक्स आणि गणितात हे विषय जास्तच आवडत असत.

१७ व्या वर्षी तो गावानजीकच्याच एका महाविद्यालयातून पदवीधर होऊन गावी परतला आणि तो कॉलराने आजारी पडला आणि पुढचे ९ महिने आजारपणातच गेली. काही वेळा तर अगदी मृत्यूला स्पर्श करून तो आला होता. याच आजारपणात त्याने त्याच्या वडिलांना आपण धर्मगुरू होणार नसल्याचं पटवून दिलं आणि त्यापुढे हताश झालेल्या त्यांनीही निकोला बरा झाला तर त्याला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पाठवण्याचं वचन दिलं.

४) टेस्लाला अविश्वसनीय अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता लाभली होती

त्याचे सेन्सेस फार संवेदनशील होते. त्याच्या म्हणण्यानुसार ५५० मैलांवर होणारी वादळाची चाहुलही त्याला लागत असे.

त्याला अगदी काही खोल्या पलीकडे बसलेल्या माणसाच्या खिशातल्या घड्याळाची टिकटिकही ऐकू येत असे.

कॉलेजमध्ये असताना त्याने ३० किमी लांब होणार आगगाडीचा आवाज कर्कश्श असल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांच्या मते तो मानसिक आजाराला बळी पडल्यामुळे असं काहीतरी बोलत होता.

५) त्याच्याकडे भन्नाट कल्पनाशक्ती होती

बालपणी, झोपेत जेव्हा त्याला वाईट स्वप्न पडत असत तेव्हा तो मनःशांतीसाठी विविध कल्पना करून त्यात हरवून जात असे. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा तो त्रिमितीय विश्व कल्पू शकत होता.

अगदी काही मिनिटांच्या वाचनानंतर किंवा अगदी एका दृष्टिक्षेपात तो वाचलेलं आणि पाहिलेलं सर्व सुस्पष्टपणे आठवू शकत असे. स्वतःचं संपूर्ण संशोधन तो कल्पनेच्या जोरावर मनात उभं करू शकत असे आणि त्याची प्रात्यक्षिके कोणत्याही कागदी लिखाणाशिवाय करत असे.

त्याने तयार केलेली विद्युत मोटरची त्याने रस्त्यावरुन चालता चालता कल्पना केली होती.

बुडापेस्टमध्ये एका बागेत बसलेला असताना त्याला अचानक फिरत्या चुंबकीय क्षेत्राची कल्पना सुचली आणि बसल्या बसल्याच त्याने वाळूवर त्याचं चित्रही काढलं.

६) त्याची झालेली गुढतेकडे वाटचाल

काहींच्या मते निकोलाचं गूढ, अगम्य वागणं हा छोट्या निकोलाच्या मनावर त्याच्या भावाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे झालेला परिणाम असू शकतो. डेनच्या मृत्यूनंतर निकोलाला बऱ्याचदा आसपासच्या हवेत आगीचा भास होत असे, जसजसा तो मोठा झाला तसं त्याने त्यावर नियंत्रण मिळवलं. त्याच्या मते न्यूयॉर्कमधे तो ज्या कबुतरांना दाणे टाकत असे त्यांच्याशी संवाद साधणे त्याला जमत असे.

७) एडिसनकडची नोकरी गेल्यानंतर खड्डे खणले

१८८४ मधे टेस्ला युरोपातून अमेरिकेत आला. सोबत त्याच्याकडे एडिसनकडे काम करण्यासाठीचं शिफारस पत्रही होतं. त्याच्या कंपनीत शेकडो कामगार कामाला होते त्यात निकोलाही होता. अगदी एखाददुसऱ्या वेळाच टेस्ला आणि एडिसन यांची भेट झाली होती.

एका रात्री टेस्लाला रात्री उशिरापर्यंत जनरेटर दुसरुस्तीसाठी कामावर थांबावं लागलं तेव्हा एडिसनला तरुण टेस्लाची हुशारी लक्षात आली. पण इंजिनिअर टेस्लाने एडिसनच्या कंपनीत ६ महिनेच काम केलं. असं म्हणतात की, एडिसनने त्याला काही यंत्र बनवण्यासाठी ५० हजार डॉलर देण्याचं कबुल केलं होतं, त्यासाठी टेस्लाने दिवसरात्र अपार मेहनत घेतली होती.

त्याने ते काम पूर्णही केलं पण यावर एडिसन म्हणाला की ‘५० हजार डॉलर हा एक विनोद होता’, असं म्हणून त्याने टेस्लाला ही बोनस रक्कम दिली नाही.

कदाचित यामुळेच लवकरच टेस्लाने ती कंपनी सोडली आणि त्याच्या स्वतःच्या AC Currentच्या संशोधनासाठी कोणी पाठीराखा मिळतोय का ते शोधत होता. त्याने पोट भरण्यासाठी ताशी २ डॉलर मिळावेत म्हणून रस्त्यावर खड्डे खणण्याचंही काम केलं.

८) १२० वर्षांपूर्वीच तो अपारंपरिक उर्जेसाठी काम करणारा कार्यकर्ता होता

१९०० साली त्याने ‘द सेंच्युरी’ या नियतकालिकात एक लेख लिहिला ज्यात सौरऊर्जा आणि पवनऊर्जा मिळविण्यासाठी चर्चा केली होती. माणूस पृथ्वीवरचे ऊर्जास्रोत फार मोठ्या प्रमाणात आणि तेवढ्याच वेगाने वापरत आहे आणि कोळशापासून मात्र अगदी २% उर्जाच मिळवत आहे.

मार्क ट्वेन म्हणायचा की, ‘टेस्ला फारच तळमळीने विज्ञानावर बोलत होता’. ट्वेन आणि टेस्ला एकमेकांना आवडत होते. ट्वेनला स्वतः तंत्रज्ञानाबाबत फार कुतूहल होतं. तो टेस्लाच्या प्रयोगशाळेत बऱ्यापैकी वेळ घालवत असे.

टेस्लाने एक यंत्र तयार केलं ज्यातून त्याने भूकंपाची नक्कल केली. हे यंत्र फार थरथरणारं होतं. यामुळे बऱ्याचदा त्याच्या इमारतीला आणि आसपासच्या इमारतींनाही हादरे बसत असे.

एक दिवस टेस्लाने ट्वेनला त्याच्या ऑफिसमधे बोलावलं. ट्वेनला पचनाचे विकार होते. टेस्लाने त्याला त्या मशीनच्या मध्यभागी उभं रहायला सांगितलं आणि ते सुरू केलं. जसजसं त्याचे हादरे वाढले, कंपनं वाढली तसा ट्वेनला त्रास होऊ लागला आणि तो फारतर दीडेक मिनिटं तिथे थांबू शकला आणि त्याला लगोलग संडासाकडे धावत जावं लागलं.

१०) त्यांना वाटलं हा वेडाच आहे

टेस्लाला ऑटिजम असण्याचीही शक्यता होती ज्या मानसिक आजारामध्ये माणूस स्वतःमध्येच गुंतून राहतो. Obsessive-Compulsive Syndrome या मानसिक आजाराची बाधाही त्याला असू शकत होती. त्याला गोलाकार वस्तू, दागिने किंवा अगदी कुणाच्या केसांनाही स्पर्श करणंही त्याला आवडत नसे.

टेस्ला त्याच्या कामावर प्रचंड फोकस्ड होता. तो म्हणायचा की त्याच्यासाठी २ तासाची झोपच पुरेशी होती. त्याला निद्रानाश तरी होता किंवा कदाचित त्याच्या शरीरालाच त्याहून जास्त झोपेची आवश्यकता नव्हती.

तो सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत काम करत असेल, त्यानंतर ८:३० वाजता जेवून पुन्हा काम सुरू ठेवत असे ते थेट रात्री ३ वाजेपर्यंत. एवढी कमी झोप घेऊनही त्याचा त्याच्या कामावर काहीच परिणाम झाला नाहीआणि तो वयाच्या ८७व्या वर्षापर्यंत जगला !

तो ३ या अंकामागे किंवा ३ ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या वेडा झाला होता. तो सलग ३ वेळा आपले हात धुवत असे, घरी जायच्या आधी आपल्या इमारतीला ३ प्रदक्षिणा घालत असे, तो जेवणापूर्वी टेबल आणि जेवणाची भांडी साफ करण्यासाठी १८ रुमाल वापर करत असे. लहानपणी कॉलरा झाल्यामुळेही असेल पण तो रोगजंतूंना घाबरत असे म्हणून एवढी स्वच्छता करत असेल.

११) त्याच्या खाण्याच्या विचित्र सवयीही होत्या

संध्याकाळी जेवताना तो पांढरे हातमोजे घालत असे. तोंडात घास घेण्यापूर्वीही तो हातातल्या चमच्यातल्या पदार्थाचं प्रमाण मोजत असे, जर ते योग्य नसेल खाताना त्याचं त्यात मन लागत नसे. तो कप आणि ताटलीतले पदार्थही मोजून घेत असे. याच सवयींमुळे त्याला एकटं जेवणच आवडत असे. पुढे पुढे तर तो पूर्ण शाकाहारी झाला. रोजच्या खाण्यात तो फक्त ब्रेड, दूध, मध आणि भाज्यांचे रस एवढंच घेत असे.

बाकी थंडपेये, तंबाखू आणि स्त्री या गोष्टी त्याने पूर्णपणे सोडून दिल्या होत्या.

१२) तो स्त्रियांपासून लांबच रहात असे

टेस्ला हा काळ्याभोर केसांचा, निळ्या डोळ्यांचा एक देखणा पुरुष होता. जवळपास ६ फूट २ इंच उंची. मुली त्याच्यावर प्रेम करत असत पण तो कायमच ब्रह्मचारी राहिला. त्याच्या मते लैंगिक संबंध माणसाच्या कामातून लक्ष विचलित करतात. “मला नाही वाटत की कोणताही मोठा शोध लावणारे संशोधक विवाहित होते !”

१३) त्याला मोती आणि दागदागिनेही आवडत नसत

अशी एक कथा आहे की एकदा एका मित्राकडे पार्टीसाठी गेलेला असताना मित्राने त्याची एका सुंदर मुलीशी ओळख करून दिली तर तिने मोत्यांचे कानातले घातले होते,ते पाहुन तर त्याला तिच्याशी बोलणं फारच अवघड गेलं,त्याला तिच्या चेहऱ्याकडेही बघवतही नव्हतं.

एकदा त्याच्या सहकारी मुलीने मोत्यांचे दागिने घातले,तर त्याने तिला त्या दिवसापूरतं घरी पाठवलं.

१४) त्याला कधी नोबेल पुरस्कार नाही मिळाला

१९३७ साली टेस्लाला नोबेलसाठी नामांकन मिळालं, पण एकूण ३८ पैकी फक्त एकच मत त्याच्या बाजूने पडलं.
१९०९ मध्ये मार्कोनी आणि ब्रॉन यांना रेडिओसाठी नोबेल पुरस्कार मिळाला, परंतु १९४३ मध्ये, टेस्लाच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर, सर्वोच्च न्यायालयाने टेस्लाच्या रेडिओ पेटंटची प्राथमिकता तपासून ते त्याचं पेटंट मार्कोनीऐवजी टेस्लाच्या नवे केलं.

त्याने केलेल्या शोधांचे श्रेय दुसऱ्यांनाच देण्यात आले, परंतु त्यामुळे त्याला काहीच फरक पडला नाही. पण इतरांकडे त्यांच्या स्वत:च्या कल्पना नसल्याबद्दल त्याने खेद व्यक्त केला.

१५) तो नफ्यापेक्षा सर्जनशीलतेची मोठी देणगी मिळाली होती

विज्ञानावर त्याचं सर्वात जास्त प्रेम होतं. “मला नाही वाटत की एका संशोधकाच्या मनात उलगडत जाणाऱ्या भन्नाट कल्पनेच्या वेळी जशी भावना असते, त्यापलीकडे जाणारी अशी कोणती मोठी भावना एखाद्याच्या मनी असू शकते, अश्याच भावना माणसाला तहान, भूक, झोप, मित्र, प्रेम, असं सगळंच विसरायला भाग पाडतात !”

१६) त्याला कबुतरे आवडत असत 

टेस्ला बर्‍याचदा त्यांना खायला देण्यासाठी सेंट्रल पार्कमध्ये जात असत. त्याने जखमी झालेल्यांना आपल्या अपार्टमेंटमध्ये घेऊन येत असे. तेव्हा काही काळानंतर हॉटेलच्या रहिवाशांनी गोंधळ आणि वास याबद्दल त्याची तक्रार केली.

मृत्यूपूर्वी तो ३३ व्या मजल्यावर न्यूयॉर्कर हॉटेलमध्ये, अपार्टमेंट क्रमांक ३३२७ मध्ये राहत होता. त्याने आपला मोकळा वेळ लोकांऐवजी कबुतराबरोबर घालवला. त्यापैकी एक पांढरं कबुतर त्याला आवडलं होतं.

एक दिवस, तो पलंगावर पडून विचार करीत असताना ते खोलीत उडून गेली. त्याच्या डोळ्यांत चमकदार अंधुक प्रकाश त्याला दिसत होता. ते आजारी पडल्यावरसुद्धा तिची काळजी घेत होता.

त्याने कबुतरासाठी 2 हजार डॉलर खर्च केले. त्याने तिचे पंख व पाय बरे होत व्हावेत म्हणून तिला आधार देण्यासाठी एक यंत्रही तयार केले होते.

‘मी अनेक वर्षांपासून हजारो कबूतरांना खायला देत आहे. पण तेथे एक सुंदर पक्षी (कबुतर) होते, त्याच्या पंखांवर हलका राखाडी ठिपके होते, ते वेगळं होतं. ती मादी होती. मी हवे तेव्हा तिला साद घालत असे आणि ती माझ्याकडे उडत यायची. माणसाचे एखाद्या स्त्रीवर प्रेम असते तशीच मला त्या कबुतराची आवड होती आणि तिनेही माझ्यावर प्रेम केले. जोपर्यंत ती माझ्यासोबत होती, तोपर्यंत माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ होता”.

टेस्ला एकाकी होता, पण त्याला नक्कीच चांगला मृत्यू यायला हवा होता. तो कफल्लक असताना त्याचा मृत्यू झाला, कसा झाला हे मात्र अज्ञात आहे. जस जसा तो म्हातारा होत गेला, तसं त्याचं उत्पन्न घटत गेलं. सततच्या वाढत्या हॉटेलच्या बिलांमुळे तो बिलं थकवून सतत हॉटेल बदलत असे. त्याला मदत करणारा साथीदार वेस्टिंगहाऊस याने नंतरच्या काळात त्याचं खोलीचं भाडं भरणं सुरू केलं. पुढे त्याला मृत्यूपर्यंत सर्बियन सरकारकडून संशोधक म्हणून पेन्शन मिळत होतं.

हॉटेल न्यूयॉर्कमधे वयाच्या ८६ व्या वर्षी ख्रिसमसला त्याला एकाकी मृत्यू आला. घरकाम करणाऱ्या बाईला दोन दिवसांनी तो मृतावस्थेत आढळला जेव्हा ती त्याच्या खोलीची ‘डु नॉट डिस्टर्ब’ची पाटी बाजूला सारून आत गेली. डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे निदान केले.

टेस्लाचे अंतिम संस्कार १० जानेवारी १९४३ रोजी न्यूयॉर्क शहरात झाले. त्याच्या भाच्याने त्याची सगळी संपत्ती, अर्थातच संशोधनाचे कागद वगैरे अशा १८ ट्रंक त्याच्या अस्थींसोबत सर्बियाला पाठवल्या. त्या अस्थी आता निकोला टेस्ला म्युझियममधे जतन केल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सायमन गो बॅक, छोडो भारत हे नारे या क्रांतिकारकाने दिले होते

Next Post

दूरदर्शन – त्यावेळी एकच चॅनेल होतं आणि दुसऱ्याची गरजसुद्धा नव्हती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

दूरदर्शन - त्यावेळी एकच चॅनेल होतं आणि दुसऱ्याची गरजसुद्धा नव्हती

आसामचं हे गाव भारतातल्या भुताटकीची राजधानी म्हणून ओळखलं जातं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.