The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी ह*त्येनंतर जिन्नांची प्रतिक्रिया काय होती ?

by द पोस्टमन टीम
29 January 2026
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या आणि आयुष्यभर अहिं*सेचे व्रत पाळणाऱ्या महात्म्याचा हिं*सेनेच दुर्दैवी अंत झाला. यावर आपण आजवर बरेच ज्वलंत वादविवाद ऐकले असतील.

महात्माजींचे वैचारिक आणि राजकीय शत्रू असलेले मोहम्मद अली जिन्ना यांची गांधी ह*त्येवर प्रतिक्रिया  काय होती याबद्दल बऱ्याच मनांमध्ये कुतूहल असते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीस आजन्म विरोध केलेल्या बापूंना पाकिस्तानच्या संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली होती.

पाकिस्तानचे संस्थापक असलेले जिन्ना यावेळी म्हणाले,

“गांधीजींवर जीवघेणा ह*ल्ला झाला याचा मला प्रचंड धक्का बसला आहे. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी ते हिंदू समाजातील एक महान व्यक्ती होते. संपूर्ण जगातच एक सन्मानित नेता म्हणजे महात्मा गांधी. भारतातील समाज व गांधी परिवार यांच्या दुःखात मी सहभागी आहे. गांधीजींसारख्या महान व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अतिशय कठीण काम आहे . “

जिन्ना यांनी पूर्वग्रह बाजूला ठेऊन श्रद्धांजली वाहिली असली तरीही त्यांनी व्यक्त केलेल्या उद्गारातील वाक्यरचना, जाणीवपूर्वक व हुशारीने मांडली गेली असल्याची टीका त्यांच्यावर होते. गांधीजींचे संपूर्ण जीवन सांप्रदायिक सद्भावनेला वाहिलेले असताना देखील जिन्नांनी श्रद्धांजली वाहताना ‘हिंदू’ समाजाचा केलेला उल्लेख बोचणारा ठरतो .

एकीकडे पाकिस्तानचा संस्थापक गांधीजींचा उल्लेख ‘हिंदू समाजाचा नेता’ असा करीत असताना हिंदुबहुल असलेल्या भारतात मात्र गांधीजींवर मुस्लिमप्रिय नेता असे आरोप होत होते. केवढा हा विरोधाभास!

गांधीजींनी त्यांची ह*त्या होण्यापूर्वी काही दिवस आधीच पाकिस्तानचा दौरा करण्याची योजना आखली होती, त्यास  जिन्नांचा देखील पाठिंबा होता. गांधीजींचा तो दौरा झाला असता तर कुणास ठाऊक भारत-पाकिस्तान संबंध आज  वेगळे राहिले असते. पण इतिहासात ‘जर-तर’ला कुठे किंमत असते.

पाकिस्तान संसदेत ४ फेब्रुवारी १९४८ रोजी भरलेल्या अधिवेशनात गांधीजींना श्रद्धांजली देण्यात आली तेव्हा, लिकायात अली खान यांनी पुढील उद्गार काढले,

“महात्मा गांधींच्या ह*त्येबद्दल बोलण्यासाठी मला आज  उभे राहावे लागते आहे याचे मला प्रचंड दुःख आहे. गांधीजी आजवरच्या सर्वांत महान नेत्यांपैकी एक होते. त्यांनी गेली २० वर्षे भारतीय राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. काँग्रेस पक्ष आज गांधीजींच्या प्रयत्नांच्या जोरावर उभा आहे यात काहीही शंका नाही. मी अशी प्रार्थना करतो की महात्माजींच्या जीवनकाळात भारतीय उपखंडातील विविध संप्रदायात जी एकी आणणे शक्य झाले नाही ती निदान त्यांच्या निधनानंतर तरी आणता यावी.”

ज्या महात्म्याने आयुष्यभर अहिं*सेचा मार्ग स्वीकारला त्याला अशा पद्धतीने मृत्यू आला याहून मोठे दुर्दैव ते काय! त्या महात्म्याच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 


ShareTweet
Previous Post

चार्ल्स शोभराज तिहार जेलच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता

Next Post

राजस्थानमधील एकेकाळी हसतं खेळतं असलेलं हे गाव, एका रात्रीतून ओसाड झालं होतं

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

राजस्थानमधील एकेकाळी हसतं खेळतं असलेलं हे गाव, एका रात्रीतून ओसाड झालं होतं

अखंड भारताचे स्वप्न सर्वात अगोदर चंद्रगुप्त मौर्याने पाहिले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.