The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजब कॅलेंडर! अजूनही या देशात २०१७ सालच चालू आहे!

by द पोस्टमन टीम
7 July 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात अनेक विचित्र गोष्टी अस्तित्वात असतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जगाच्या पाठीवर असाच एक देश आहे इथिओपिया, जो संपूर्ण जगाच्या तुलनेत सात वर्षे मागे आहे. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट! आजच्या युगात जिथे कुणाला मिनिटभरच नव्हे तर सेकंदभरही इतरांच्या मागे राहायला आवडत नाही. जिथे सतत दुसऱ्याला मागे टाकून पुढे धावण्याची चढाओढ सुरु असते तिथे हा संपूर्ण देशच इतर देशाच्या तुलनेत सात वर्षे मागे का आणि कसा बरं राहिला असेल? जाणून घेऊया इथिओपियाच्या या कालगणनेविषयीची गोष्ट.

इथिओपिया हा जगाच्या पाठीवरील एक सुंदर देश आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या अनेक ठिकाणांत या देशातील ठिकाणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये या देशाविषयी खास आकर्षण आहे. परंतु जेव्हा तुम्ही इथिओपियामध्ये पाऊल ठेवता तेव्हा तुम्हाला अचानक जाणीव होते की तुम्ही जगाच्या तुलनेत सात वर्षे मागे आला आहात. जणू एखाद्या सायन्स फिक्शनमधल्या टाइममशीनमधून उलटा प्रवास करूनच तुम्ही या धरतीवर अवतरला आहात.

आपण सर्वजण जानेवारी महिन्यात नव्या वर्षाची सुरुवात करतो पण, या देशात नव्या वर्षाची सुरुवात ११ सप्टेंबर रोजी होते. इथले कॅलेंडर जगाच्या तुलनेत ७ वर्षे तीन महिने मागे आहे. इथे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या उर्वरित जगापेक्षा खूपच वेगळ्या आहेत. आपण बारा महिन्यांचे एक वर्ष मानतो तर इथे एका वर्षात तेरा महिने असतात. परंतु, कालगणनेबाबत हा देश असा वेगळा का आहे? यामागचे नेमके कारण काय?

तर, या देशात इतरत्र प्रमाण मानले जाणारे ग्रिगोरीयन कॅलेंडर वापरले जात नाही. तर इथे त्यांचे स्वतःचे कॅलेंडर वापरले जाते. यांच्या कॅलेंडरला इथिओपियन कॅलेंडर म्हटले जाते. खरे तर ग्रिगोरीयान आणि इथिओपियन या दोन्ही कॅलेंडरची सुरुवात ख्रिस्ताच्या जन्मापासूनच होते. पण, ग्रिगोरीयान कॅलेंडरनुसार ख्रिस्ताचा जन्म पहिल्या शतकात झाला असे मानले जाते तर इथिओपियन कॅलेंडरनुसार ख्रिस्ताचा जन्म इ.स.पू. सातव्या शतकात झाला असे मानले जाते. इथल्या समाजजीवनावर रोमन चर्चचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच इथली कालगणना इ.स.पू. सातव्या शतकापासून झाली.



या कॅलेंडरनुसार वर्षाचे तेरा महिने असतात आणि यातील १२ महिन्यांत तीस दिवस असतात. शेवटच्या महिन्यात फक्त पाच किंवा सहा दिवस असतात. आठवड्याचे वार असो की महिन्यांची नावे इथिओपियन कॅलेंडरवर बायबलचा प्रभाव जास्त दिसतो.

सध्या जगात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ग्रिगोरीयान कॅलेंडरची सुरुवात १५८२ मध्ये पोप ग्रिगोरी याने केली. म्हणून त्याच्याच नावाने हे कॅलेंडर ग्रिगोरीयन कॅलेंडर म्हणून वापरले जाते. त्याआधी ज्युलियन कॅलेंडर प्रचलित होते.

ग्रिगोरीयन कॅलेंडरमध्ये पूर्वीच्या ज्युलियन कॅलेंडरमधील ११ दिवस वगळण्यात आले होते. हे कॅलेंडर सर्वत्र स्वीकारण्यापूर्वी अनेक देशातून याला प्रचंड विरोध झाला होता. परंतु हळूहळू हा विरोध मावळत गेला आणि सर्वत्र सर्रासपणे हेच कॅलेंडर रूढ झाले. इथिओपिया हा देश मात्र कोणत्याही वसाहतवादी आणि साम्राज्यवादी शक्तींच्या प्रभावापासून मुक्त होता त्यामुळे त्याला स्वतःचे इथिओपियन कॅलेंडर वापरणे जास्त सोयीचे गेले. अशा प्रकारे कॅलेंडरच्या कालगणनेतच तफावत निर्माण झाल्याने इथिओपिया हा देश इतर देशाच्या तुलनेत सात वर्षे मागे आहे.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

या कॅलेंडरनुसार त्यांचे सणही वेगवेगळ्या दिवशीच साजरे केले जातात. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्याची तारीखही वेगळी असते. इथिओपियन नागरिकांसाठी ही कालगणना अजिबात चुकीची किंवा विचित्र वाटत नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी मात्र हे थोडे गैरसोयीचे ठरते. कालगणनेतील या तफावतीमुळे पर्यटकांचा गोंधळ होतो, जसे की हॉटेलचे प्री-बुकिंग करणे, किंवा हॉटेलमधून चेक-आउट करणे. याव्यतिरिक्त इतरही काही बाबतीत असाच गोंधळ उडतो.

इथिओपियन कॅलेंडरमधील १३ व्या महिन्याला पागुमे म्हटले जाते. पागुमेचा अर्थ होतो, ‘वर्षभराच्या एकूण दिवसातील मोजायचे राहून गेलेले दिवस.’

इथिओपियन कॅलेंडरनुसार एका वर्षात ३६५ दिवस, सहा तास, दोन मिनिट आणि २४ सेकंद असतात. दर चार वर्षांनी त्यांचेही लीप वर्ष असते. तिथल्या कॅलेंडरनुसार दर ६०० वर्षांच्या गॅपनंतर २ मिनिट, २४ सेकंद वाढवले जातात त्यामुळे दर सहाशे वर्षांनी तिथे एक जास्तीचा सातवा दिवस येतो. या घटनेला ते रेना मिल्ट आणि रेना लेलीट म्हणतात. दर सहाशे वर्षांनी ॲक्वेड नावाचा तारा सूर्याला झाकोळून टाकतो आणि त्यामुळे एक संपूर्ण सूर्यग्रहण होते, असे या कॅलेंडरमध्ये नमूद करण्यात आले आहे. इथिओपियाच्या अनेक प्राचीन ग्रंथांत या ग्राहणाविषयीची माहिती मिळते. आधुनिक काळातही शास्त्रज्ञांना सुर्यग्रहणाचा हा शोध अगदी अलीकडे लागला आहे, तिथे इथिओपियाच्या पूर्वजांना मात्र सूर्यग्रहणाची आधीच माहिती होती असे दिसते.

सध्या इथिओपियन लोक ग्रिगोरीयान आणि इथिओपियन असे दोन्ही कॅलेंडर वापरतात. ज्यामुळे पर्यटकांची गैरसोय टाळली जाते.

संपूर्ण जगाच्या तुलनेत सात वर्षे मागे असणाऱ्या या देशाची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वांत जास्त ठिकाणे याच देशातील आहेत. जगातील सर्वांत मोठी आणि लांब गुफा, जगातील सर्वांत उष्ण ठिकाण, यासारखी ठिकाणे इथेच पाहायला मिळतात. शिवाय, निसर्गाने इथे आपल्या खजिन्याची मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. म्हणूनच दरवर्षी इथे लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. दरवर्षी ११ सप्टेंबरला इथे जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले जाते. इथिओपियातील हा नववर्षाचा जल्लोषही पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

Next Post

खांडवप्रस्थ ते ‘न्यु दिल्ली’ : भारताच्या राजधानीचा वैभवशाली इतिहास

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

खांडवप्रस्थ ते 'न्यु दिल्ली' : भारताच्या राजधानीचा वैभवशाली इतिहास

चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.