The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारला अंधारात ठेवून बांधली गेलेली धावपट्टी तत्कालीन भारत-चीन संघर्षात ‘गेम चेंजर’ ठरलीये

by अनुप देवधर
8 March 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारत आणि चीन यांच्यात ३ हजार ४८८ किमी लांबीची सीमा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतून जाते. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अशा तीन विभागांत ही सीमा आहे.

यातल्या खूप भागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद असल्यानं अजून बऱ्याच ठिकाणी सीमेची निश्चितीच झाली नाहीये. पश्चिम सेक्टरमधल्या अक्साई चीन, पूर्व सेक्टरमधल्या अरुणाचल प्रदेशवर चीन आपला दावा करतो.

अशा वादांमुळेच दोन्ही देशांमध्ये अजूनही प्रत्यक्ष सीमा आखण्यात आलेल्या नाही. पण किमान, आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे प्रत्यक्ष सीमारेषा ही संज्ञा वापरली गेली. पण ही सीमारेषा काही निश्चित नसते.

दोन्ही देश वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दाखवत असतात. या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये डोंगर, दऱ्या, हिमनदी, बर्फाळ प्रदेश अशा भौगोलिक परिस्थितीचा अडथळा पण असतो.



अक्साई चीन या अशाच एका वादग्रस्त भागात भारत-चीन सीमेच्या अगदी जवळच गलवान व्हॅली आहे. चीनच्या शिंजियांग आणि भारताच्या लडाखपर्यंत पसरललेली ही गलवान व्हॅली जवळची LAC अक्साई चीन भारतापासून वेगळा करते. १९६२ च्या यु*द्धात हा गलवान नदीचा प्रदेश यु*द्धाचं मुख्य केंद्र होतं.

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या एका करारात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करण्याचं आणि त्या भागात कुठलंही बांधकाम न करण्याचं मान्य केलं आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या या भागात सतत काहीतरी हालचाली दिसून येत होत्या.

गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने टेंट उभारले असल्याचं दिसून आल्यावर आपणही आपली बाजू बळकट करण्यासाठी लष्कराची कुमक आणि सामग्रीची जुळवाजुळव तिथं केली होती.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

हे सगळं कशामुळं झालं हे बघायला गेलं, तर अचानक एक नाव पुढं येत, दौलत बेग ओल्डी (DBO).

भारतानं दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी (DSDBO) ज्याला लष्करी भाषेत सब सेक्टर नॉर्थ असं म्हणतात, या ठिकाणी रस्ता करण्याचा निर्णय घेतला. एकूण २५५ किमी चा दारबुक ते श्योक (भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव) हा रस्ता LAC ला जवळजवळ समांतर असणारा होता.

१३००० फूट ते १६००० फूट उंची असणारा हा अत्यंत अवघड रस्ता करण्याचा निर्णय २००० साली घेण्यात आला (आता ओरडणाऱ्यांचं सरकार तेव्हाही नव्हतं) त्यासाठी ३२० कोटी रुपये तातडीनं मंजूर केले गेले. या कामाच्या निगराणीचं काम थेट PMO कडून करण्यात येत होतं. 2012 पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यात येणार होता, पण श्योक नदीला वारंवार येणाऱ्या पुरांमुळं हा रस्ता वाहून जायचा. थंडीत बर्फामुळं काम बंद ठेवावं लागायचं. त्यामुळे या कामाला उशीर होत गेला.

शेवटी ऑक्टोबर २०१९ मध्ये इथं ४३० मीटर लांब कर्नल चेवांग रिनचेन पूल बांधला, आणि हा रस्ता पूर्ण करण्यात आला.

यादरम्यान म्हणजे श्योक ते काराकोरम पास दरम्यान १६७०० फूट उंचीवर एक पठार आहे, तेच हे दौलत बेग ओल्डी. LAC पासून फक्त ९ किमीच्या अंतरावर. याचं भौगोलिक स्थान असं, की इथून एकाच वेळी अक्साई चीन, पाकव्याप्त काश्मीर आणि काराकोरम हायवे यावर लक्ष किंवा नियंत्रण ठेवता येतं, तेही उंचावरून.

इथं भारताची १६७०० फूट उंचीवर, म्हणजे जगातली सर्वात उंचीवर असणारी हवाई पट्टी आहे. २०१३ मध्ये इथं भारतीय हवाई दलाचं हर्क्युलीस विमान उतरलं, आणि चीनला धक्का बसला होता. तेव्हापासून चीन या भागात वारंवार कुरापती करत आहे.

दौलत बेग ओल्डीवर १९६२ च्या युद्धात भारतानं एक तात्पुरती हवाई पट्टी तयार केली होती. पण त्यानंतर, म्हणजे १९६५ पासून २००८ पर्यंत ती पडीक होती. एअर मार्शल प्रणब कुमार बारबोरा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणं २००८ मध्ये ते वेस्टर्न कमांडचे प्रमुख झाल्यावर पाहणी करत असताना या धावपट्टीचं महत्व त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी इथं कायमस्वरूपी धावपट्टी होण्यासाठी प्रस्ताव पाठवले, जे मनमोहन सिंग सरकारने ५ वेळा फेटाळले.

मग हवाई दल आणि मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात चक्क सरकारला अंधारात ठेऊन २०१३ मध्ये याचं काम पूर्ण करून घेतलं होतं. जी हवाई पट्टी भारताच्या बाजूनं आज गेम चेंजर ठरलीये.

चीन मागे सरकलाय. त्याला सरकावं लागणारच होतं. राजकारणात मतभेद असतात. देशाच्या सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणात ही फरक असू शकतो. पण तोपर्यंत आपल्या देशात त्यावरून जे राजकारण झालं, मा. पंतप्रधान आणि संरक्षण खात्यावर टीका झाली, हा सगळा प्रकार म्हणजे आपल्या देशप्रेमाचा आणि सामाजिक ऐक्याचा वर्तमान लसावि आहे, हे नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या मराठी माणसामुळे भारतीय शेअर बाजाराचं चित्रच बदललं होतं

Next Post

या शास्त्रज्ञाला भारताचा थॉमस एडिसन म्हणून ओळखलं जायचं

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

या शास्त्रज्ञाला भारताचा थॉमस एडिसन म्हणून ओळखलं जायचं

लोकसभेत हिरवे आणि राज्यसभेत लाल गालिचे का अंथरलेले असतात..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.