The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धाराच्या जाहिरातीतील जिलब्या खाणारा चिमुरडा तुम्हाला आठवतो का?

by द पोस्टमन टीम
7 July 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ज्याप्रमाणे चित्रपट, मालिका, शॉर्ट फिल्म यांचे स्थान लोकांच्या मनात अजरामर आहे त्याचप्रमाणे आठवणीच्या कप्प्यातील जाहिराती नावाचा एक हळवा कोपरा प्रत्येक माणसाच्या मनात असतो. ज्याप्रमाणे चित्रपट त्या त्या समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात, समाजात घडणाऱ्या घटनांवर पुस्तके अथवा डॉक्यूमेंटरीज निघत असतात त्याप्रमाणे त्या त्या काळातील ग्राहक वर्ग दाखवणारा आरसा म्हणजे सुद्धा जाहिरात असते.

आजही तुम्ही यु ट्यूबला गेलात आणि जुन्या जाहिराती जर शोधल्या तर या जाहिरातींचे सुंदर कम्पायलेशन आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळी फक्त दूरदर्शन आणि मेट्रो या दोनच वाहिन्या देशात सुरु होत्या त्या काळातील जाहिराती बघण्यासारख्या असत. नवनवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येण्याचा तो काळ होता त्यामुळे आपली वस्तू लोकांच्या मनात कशी घर करेल यासाठी तिची जाहिरात कशी करायची या विषयी उत्पादक कंपन्या सतर्क असत.

त्यासाठी मोठमोठ्या ऍड एजन्सीजची मदत घेतली जाई. फक्त जाहिरातीला वाहून घेतलेले आणि फक्त जाहिरात क्षेत्रात काम करणारे लोकांची टीम यासाठी निवडली जाई. प्रत्येक प्रोडक्टची एक टॅगलाईन असे. ही टॅगलाईन इनक्लुड करून जाहिरातीचे जिंगल्स गाणारे स्वतंत्र गायक आणि गायिका असत.

थोडक्यात म्युझिक, सेट, बॅकग्राउंड, मनाला भिडणारी कन्सेप्ट, सुंदर फ्रेश चेहरे, चकचकीत वातावरण, खास तयार करण्यात आलेली गाणी असा सगळा सरंजाम घेऊन अगदी शाही जाहिरात तयार होत असे.

नाविन्यपूर्ण कल्पना आणि कलाकारांचे उत्तम अभिनय तसेच दीर्घकाळ स्मरणात राहणारे संगीत यामुळे अशा जाहिरात ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या होत्या. उदाहरण द्यायचेच झाले तर अमूल कंपनीची जाहिरात. यात अमूल कंपनीमध्ये तयार होणारे आईसक्रीमचे एकूण ३०० हून जास्त प्रकार एकाच जाहिरातीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला.



त्यासाठी अगदी दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत निरनिराळ्या भागात अमूलचे आईसक्रीम लहान मुले, शाळेत जाणारे विद्यार्थी, कॉलेजमधला क्राउड, नोकरी करणारे मध्यमवयीन लोक आणि आजी आजोबा या सगळ्या वर्गामध्ये कसे लोकप्रिय आहेत हे दर्शविण्यासाठी संपूर्ण भारताचे आणि त्याच्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्या त्या भागातले कलाकार घेऊन त्यांना त्यांच्या वेशभूषा देवून आणि हातात अमूल आईसक्रिम देऊन जाहिरात करण्यात आली. या जाहिरातीची टॅगलाईन होती अमूल- द टेस्ट ऑफ इंडिया!

अजून एक उदाहरण सांगायचे झाले तर लहान मुलांमध्ये दुध पिण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून दुधाची जाहिरात बनवली गेली होती त्यात काचेच्या सुबक पेल्यात, नक्षीदार बरण्यामध्ये, निरनिराळ्या आकाराच्या काचेच्या भांड्यात दुध घालताना, काढताना, सर्व्ह करताना दाखवले गेले होते. हे करत असताना जाहिरातीमधले कलाकार “पियो ग्लासभर दुध” ही टॅगलाईन बोलताना दाखवले गेले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

प्रत्यक्षात दुधाचा एक उग्र वास असतो त्यामुळे बरीच लहान मुले दुध पीत नाहीत पण जाहिरातीमध्ये अत्यंत आकर्षक रीतीने दुध दाखविले गेल्यामुळे लहानपणी ही जाहिरात पाहून अनेक मुळे आवडीने दुध पीत असत.

या शृंखले मधली एक अविस्मरणीय जाहिरात म्हणजे अर्थातच धारा रिफाइंड तेलाची जाहिरात. आपल्या प्रत्येकाला धारा तेलाच्या जाहिराती मधील गोड गोंडस मुलगा आठवत असेल.

पिवळा टी शर्ट आणि त्यावर निळी जीन्सची डंग्री घातलेला अंदाजे वय वर्षे ४ वर्षाचा मुलगा एकटाच रेल्वे स्टेशनवर बसलेला आहे. कुणाशी बोलत नाही. एकटा विचारात हरवलेला आहे. अचानक त्याला तिथून आपल्या ओळखीचे एक वयस्कर पोस्टमनकाका जाताना दिसतात. तो त्यांना आनंदाने हरकून रामूकाका! अशी हाक मारतो.

त्याची हाक ऐकून एकदम ते वयस्कर रामुकाका वळून मागे पाहतात आणि त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. “अरे बबलू! यहा क्या कर रहे हो?” असे म्हणत ते त्या छोट्या मुलाजवळ बसतात. तो त्यांना एकदम तक्रारीच्या स्वरात बोलतो “सब गुस्सा करते है. मैं घर छोड के जा रहा हूँ!” असं म्हटल्यानंतर रामुकाका त्याला म्हणतात “अच्छा लेकीन घर में तो मां ने गरमागरम जलेबी बनाई है”

ते ऐकून त्या छोट्या गोंडस मुलाचा चेहरा खुलतो आणि तो बोलतो “जलेबी!” हा शब्द उच्चारताना त्याचा आवाज, आनंदाने फुलून आलेला चेहरा एकदम भावूक होवून गेलेला दिसतो. मग हा छोटा मुलगा रामुकाकांबरोबर घरी येतो. घरी डायनिंग टेबलवर जेवायला बसल्यावर आईने धारा तेलात तळलेल्या जिलेब्या ठेवलेल्या ताटातल्या २ जिलेब्या उचलून घेतो तेंव्हा आई त्याला बोलते “तो क्या तय किया आपने?” त्यावर तो उत्तर देतो “जाना तो है मगर…” तोवर त्याचं अर्धवट वाक्य त्याचे वडील मागून येऊन पूर्ण करतात “हां मगर २० -२५ साल बाद!”

तो घरातला माहोल, मुलाचे आई-वडील, रामुकाका आणि जिलबीच्या ढीगाकडे गालावर हात ठेऊन आनंदाने हसत बघणारा गोंडस मुलगा आणि पार्श्वभूमीवर अनोखी शुद्धता अनोखा असर! अशी धारा रिफाइंड शेंगदाणा तेलाची टॅगलाईन.

ही जाहिरात त्या काळात अनेक घरातल्या लहान मुलांची आणि मोठ्या माणसांची सुद्धा जीव की प्राण होती, आजही आहे.

अहमदाबाद येथून उत्पादित होणारा धारा हा खाद्यतेलाचा एक मोठा ब्रांड होता मात्र त्याची लोकप्रियता ९०च्या दशकात थोडी उतरणीला लागलेली होती. कंपनीला आपले उत्पादन लोकांच्या भावनांबरोबर जोडायचे होते. आपले तेल एका कुटुंबाचा भाग व्हायला हवे त्यासाठी आपणास याची कशी जाहिरात करता येईल याचा विचार करून ही जाहिरात तेंव्हा बनवली गेली.

मुंबईत राहणारा ४ वर्षांचा परझान दस्तूर नावाचा गोंडस मुलगा यासाठी कास्ट केला गेला. (हा तोच परझान दस्तूर जो नंतर कुछ कुछ होता है चित्रपटामध्ये काजोलबरोबर तिच्या समर कँपमध्ये झळकला होता.)

परझानला घेऊन ही जाहिरात बनवली गेली आणि अल्पावधीत ती अत्यंत लोकप्रिय देखील झाली. कंपनीला या जाहिरातीद्वारे लोकांना आपल्या बरोबर भावनिकरीत्या जोडायचे होते आणि जाहिरातीमध्ये दाखवल्या गेलेल्या ४ वर्षाच्या मुलाकडून ते काम चोख झाले.

धारा पुन्हा एकदा अगदी मिडल क्लास घरापासून पासून हाय क्लास सोफिस्टीकेटेड घरात वापरला जाऊ लागला.

या जाहिरातीमुळे जसा धाराला जसा फायदा झाला तसा परझान दस्तूरलासुद्धा झाला. बाल कलाकार म्हणून त्याला अनेक जाहिराती आणि नंतर कुछ कुछ होता है सारखा सिनेमा देखील मिळाला.

याच जाहिरातीचा दुसरा भाग देखील २००० साली आला होता ज्यामध्ये परझान दस्तूरचा एक छोटा भाऊ आणला गेला जो घर सोडून जात असतो आणि यावेळी रामुकाकाच्या ऐवजी परझान त्याला अडवून आईने घरी तुझ्या साठी जिलेबी केली आहे असे सांगून त्याला घरी घेऊन येतो असे दाखवले होते. ही जाहिरात देखील चांगली चालली.

२०१८ साली याच थीमवर परझानला घेऊन उबेर इट्सची जाहिरात आली होती त्यात आता परझान पंचविशीचा युवक दाखवलेला होता पण ९० च्या दशकात पहिल्यांदा आलेल्या जाहिरातीची जादू त्यानंतर कुठल्याच त्याच्या सिक्वेलला आली नाही हे निश्चित!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

पुण्याची शान असलेल्या चितळेंच्या दुकानाची सुरुवात मुंबईत झालीये

Next Post

दूरदर्शनच्या या सीरिअलने सामान्यांचं दुःख पडद्यावर आणलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

दूरदर्शनच्या या सीरिअलने सामान्यांचं दुःख पडद्यावर आणलं होतं

या भारतीय राजाने एका विदेशी मुलीसाठी राज्यच काय आपला देशही सोडला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.