The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिरील, हमाम, पिअर्स, संतूर की लाईफबॉय, भारतीयांचं ऑल टाईम फेवरेट साबण कोणतं?

by द पोस्टमन टीम
9 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


घरातील बाजार भरताना एक गोष्ट आवर्जून घेतली जाते ती म्हणजे साबण! साबणाशिवाय अंघोळ करण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आज अंघोळीसाठी बॉडीवॉश, हात धुण्यासाठी हँडवॉश, चेहरा धुण्यासाठी फेसवॉश असे अनेक पर्याय निघाले आहेत. पूर्वी चेहरा धुणे, अंघोळ करणे, हात धुणे या सगळ्यासाठी एकच साबण वापरला जात असे.

त्याही पूर्वी आपले पूर्वज बेसन, हळद, रिठा पावडर, चंदन पावडर, हळद, दुधाची साय, कमळाची पाने, गुलाबाची पाने, अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करून शरीराची आणि त्वचेची काळजी घेत असत.

परंतु बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्यांनी साबण लॉंच केल्यानंतर हे साबणच आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनून गेले.

विशेषत: ८०-९०च्या दशकात बाजारात साबणांची रेलचेल वाढली. त्याकाळी साबण आणणाऱ्या कंपन्यांची संख्या देखील कमी होती. प्रत्येक कंपनी आपला साबण किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, याची जाहिरात करत असे. ८०-९०च्या दशकातील या जाहिरातीही अनेकांच्या स्मृतीत कोरल्या गेल्या असतील.

या जाहिराती पाहून तर त्याकाळी आम्ही मुले पण कोणता साबण जास्त चांगला यावर वाद घालत असू. संपूर्ण कुटुंबासाठी तेव्हा साबणाची एकच वडी वापरली जायची. हातासाठी वेगळा, चेहऱ्यांसाठी वेगळा असलाही प्रकार तेव्हा नव्हता.



परंतु या सगळ्यात भारतीयांचा आवडता साबण नेमका कोणता होता? कोणत्या साबण कंपनीने बाजारपेठा काबीज केल्या होत्या?

इंग्लंडच्या लिव्हर ब्रदर्सनी पहिल्यांदा आधुनिक साबणाचा प्रकार म्हणजेच टॉयलेट सोप बाजारात आणले. त्यानंतर भारतीयांची या आधुनिक साबणाशी ओळख झाली. तर सुमारे शतकभरानंतर साबण हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

लिरील, हमाम, लक्स, मार्गो, मेडीमिक्स, लाइफबॉय, पिअर्स, सिंथॉल, मैसूर सँडल, रेक्सोना असे कितीतरी प्रकारचे ब्रॅण्ड्स होते तरीही या प्रत्येकाशी एक वेगळेच नाते जोडलेले असेल. हो, हे ऐकायला थोडस विचित्र वाटंत असले तरी खरं आहे.

हमाम, मार्गो, मेडिमिक्स सारखे साबण संपूर्ण नैसर्गिक असल्याचा दावा करत. विविध औषधी वनस्पतीपासून घेतलेले घटक यात असल्याचा दावा जाहिरातीतून केलेला असल्याने घरातील मोठ्या व्यक्तींची पसंती याच साबणाला असेल.

पिअर्स हा साबण त्याच्या निर्मात्याच्या म्हणजे अँड्र्यू पिअर्सच्या नावानेच ओळखला जात असे. जेव्हा हा साबण भारतीय बाजारपेठेत आला तेव्हा आम्हाला त्याचे किती अप्रूप वाटले होते हे शब्दात सांगणे कठीण आहे.

असा पारदर्शक साबण आम्ही पहिलाच नव्हता. त्याचा तो पारदर्शकपणा आमच्यासाठी कुतूहलाचा विषय होता. ग्लिसरीनयुक्त साबण म्हणजे आम्हाला एखाद्या प्रदर्शनातील दुर्मिळ वस्तू सारखा वाटत असे. हा साबण फार काळ हातात धरता येत नसे, लगेच हातातून निसटत असे. तरीही काही कुटुंबातून हा साबण वर्षानुवर्षे वापरला जातो आहे.

पिअर्सची निर्मिती १८०७ साली करण्यात आली. पारदर्शक रूप असलेला हा मार्केटमधील पहिला साबण होता.

मग आला लिरील. लिरील गर्लच्या त्या जाहिरातीने तर संपूर्ण देशालाच भुलवून टाकले होते. इथे कबुली द्यायला हरकत नाही, ती जाहिरात पाहून अशाच निर्जन धबधब्याखाली जाऊन मनसोक्त अंघोळ करण्याची इच्छा फारच बळावत असे.

त्यानंतर तितकाच लुभावणारा साबण म्हणजे विप्रोवाल्यांचा संतूर! ऑरेंज कलरचा साबण आणि त्याला असणारा चंदनाचा सुवास, वरून नितळत्वचेची आणि सौंदर्य बरकरार राखण्याची हमी.

एका मुलाची किंवा मुलीची आई असूनही तिला कॉलेज गर्ल समजण्याची चूक केली जाते अशी या साबणाची जाहिरात होती. खरेतर ही जाहीरातही काहीशी अवास्तव वाटत असली तरी, त्यातील आई देखील आत्मविश्वासाने स्वतःतील कलागुणांना वाव देते हे पाहण्यात एक वेगळे समाधान होते.

विशेष म्हणजे संतूरची ही सुपरमॉमची ॲड आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

सगळ्यात हास्यास्पद जाहिरात वाटावी अशी जाहिरात म्हणजे लाइफबॉयची. अनेक घरातून हा साबण वर्षानुवर्षे वापरला जातो. या साबणाला मोठा ग्राहक वर्ग मिळाला. मात्र हा अंघोळीपेक्षा टॉयलेट सोप म्हणूनच ओळखला जातो. लाल रंगाचा आयताकृती साबण हा, “लाइफबॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां” या टॅगलाईनमुळेच जस्तीत जास्त लोकप्रिय झाला.

विशेष म्हणजे या जाहिरातीत अगदी देशभरातील डॉक्टर्स देखील हाच साबण वापरण्याचा सल्ला देतात, असे दाखवण्यात आले होते. विशेष म्हणजे लाइफबॉय म्हणजे तंदुरुस्ती हे  समीकरण देशवासियांनी देखील स्वीकारले आहे.

अंघोळीच्या साबणातील सगळ्यात जास्त लोकप्रिय साबण म्हणजे, लक्स!

लक्स हा टॉयलेट सोप असूनही याच्या जाहिरातीत त्या-त्याकाळच्या गाजलेल्या अभिनेत्रींनी याला आपल्या सौंदर्याचे रहस्य असल्याचे सांगत याला एक ब्युटीसोपचा दर्जा दिला गेला. लक्सची जाहिरात केली नाही अशी एकही गाजलेली हिंदी अभिनेत्री नसेल. या अभिनेत्रींमुळे चाहते अपोआपच लक्सकडेही वळत असत.

एका जाहिरातीत तर लक्सने शाहरुख खानला देखील दाखवले आहे.

आज काळ बदलला आहे. यातील काही साबण आजही टिकून आहेत तर काही स्पर्धेत टिकू न शकल्याने अडगळीत जमा झाले आहेत. आजही यातील बऱ्याच साबणांच्या जाहिरातीची थीम आहे तशीच आहे.

संतूरच्या जाहिरातीत आजही यंग सुपर मॉमच दाखवली जाते, तर लक्स हेच आपल्या सौंदर्याचे रहस्य असल्याचे सांगण्यासाठी आजही आघाडीच्या अभिनेत्री लक्सच्या जाहिरातीत झळकत असतात.

आज अनेक उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात प्रत्येकाला आपापला साबण निवडण्याचा अधिकार आहे. पूर्वी लहानांपासून थोरापर्यंत एकच एक साबण वापरला जात असे. त्यामुळे मेडिमिक्स, हमामसारख्या कडवट वासाचे साबण आवडत नसतानाही वापरण्याची सक्ती होती.

अनेक घरात आज लिक्विड बॉडीवॉश वापरले जात असल्याने साबण वापरणे काहीसे मागे पडले आहे. तरीही ८० आणि ९०च्या दशकातील बालपण ज्यांनी अनुभवले त्यांच्यासाठी मात्र हे साबण, त्यांच्या जाहिराती या आठवणींचा खजाना आहेत, हे मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हिटलरच्या तावडीतून निसटून या माणसाने एक अवाढव्य साम्राज्य उभं केलंय

Next Post

मोदींनी अयोध्येत पारिजातकाचे झाड का लावले? काय आहे त्याचे हिंदुधर्मातील महत्व?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मोदींनी अयोध्येत पारिजातकाचे झाड का लावले? काय आहे त्याचे हिंदुधर्मातील महत्व?

८६ वर्षात पहिल्यांदाच लालबागचा राजा मंडपात बसणार नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.