The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय पुराणांत वर्णन केलेल्या चौसष्ठ कला कोणत्या आहेत..? जाणून घ्या..!

by द पोस्टमन टीम
7 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतीय नाट्यशास्त्रात सर्वप्रथम उल्लेख झालेली “कला” उशनसाच्या शुक्रनीती आणि वात्सायनाच्या कामसूत्रात वर्णन केलेली आहे. याशिवाय अनेक प्राचीन ग्रंथांत कलेचा उल्लेख असून, त्यांची संख्या ६४ असल्याचं बहुतेक सर्व ग्रंथांत मानलं गेलं आहे. मानवी भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून कलांकडे पाहाण्यात येतं

भारतीय कलेचा इतिहास खणत जाता पूर्व ऐतिहासिक कालखंडापर्यंत जाऊन यावं लागेल. प्राचीन भारतातील कलेचा इतिहास ऐतिहासिक खडक चित्रांपासून सुरु होतो. पूर्व-ऐतिहासिक युगाशी संबंधित अशा भिमबेटका चित्रांचा याला पुरावा मानता येईल. हडप्पा आणि मोहेंजादरो या प्राचीन शहरांच्या नियोजनातही याची झलक पहायला मिळते. वात्सायनांनी ६४ कलांना सूचीबध्द केले. भगवान श्रीकृष्ण सांदिपनी मुनींकडून या सर्व ६४ कला ६४ दिवसांत शिकले असं मानलं जातं.

श्री गजानन ६४ कला आणि १६ विद्यांत पारंगत मानला जातो आणि म्हणूनच त्याला बुध्दीची देवता म्हणतात. सत्ययुगात भगवान परशुराम आठ कलांत पारंगत होते, प्रभु श्रीराम बारा कलांत तसेच भगवान श्रीकृष्ण ६४ कलांत पारंगत होते आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार मानलं जातं. साक्षात भगवंताचं ‘पूर्ण’त्व सिद्ध करणाऱ्या आणि आजच्या काळातही शिकल्या जाणार्‍या अशा या ६४ कला आहेत तरी नेमक्या कोणत्या?

१. गायन
२. वादन (कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजवून त्यातून होणारी नादनिर्मिती)
३. चित्रकला
४. नाट्य
५. नृत्य
६. इंद्रजाल – अर्थात जादू. गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे
७. गंधयुक्ती – सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
८. आभूषण शृंगार
९. मदिरा व इतर पेय बनविणे
१०. धातुवद (कच्चा धातू आणि मिश्रधातू वेगळे करणे)
११. दुर्वाच योग ( कठीण शब्दांचा अर्थ लावणे)
१२. आकर ज्ञान – (खाणींविषयीचे सखोल ज्ञान)
१३. वृक्षायुर्वेद योग ( उपवन, कुंज, वाटिका, उद्यान इत्यादींची निर्मिती)
१४. पट्टिका वेत्रवाणकल्प (नवार, सुंभ, वेत आदीपासून खाट विणणे)
१५. वैनायिकी विज्ञान – शिष्टाचार व विनय या विषयाचे ज्ञान
१६. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामासंबंधीत ज्ञान
१७. वैजापिकी विद्याज्ञान – दुसर्‍यावर विजय मिळविण्याचे ज्ञान
१८. शुकसारिका प्रलापन – पक्षांची बोलणी जाणणे (अलिकडच्या काळात प्राणी, पक्षांशी संवाद साधणारे तज्ञ या गटात येतात तसेच बहुचर्चित असा प्राचीन अघोरी विद्येवरील निळावती ग्रंथही याचाच एक भाग)
१९. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द आणि छंद यांचे ज्ञान
२०. वास्तुविद्या – अर्थात आधुनिक युगातील स्थापत्यशास्त्र. यात महाल, सदन, राजवाडे यांच्या बांधणीचा समावेश आहे
२१. रत्नरौप्य परीक्षा – अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
२२. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे (अलिकडील काळातील रेसपी शोज, त्यांवर आधारीत युट्युब चॅनल्स यांचा समावेश आहे)
२३. पुस्तकवाचन- लिखाण ही जशी एक कला आहे तसेच उत्तम लिखाण रसग्रहण करत वाचता येणे हीदेखिल एक कलाच मानली गेली आहे .
२४. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे. वात्सायनाचा कामसूत्राचा गाभाच या कलेभोवती आहे.
२५. कौचुमार योग- कुरुपव्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे. आधुनिक काळातील ज्याला ’मेक ओव्हर” म्हणलं जातं अशी ही कला भारतात प्राचीन काळापासूनच मान्यता असणारी आहे.
२६. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे. हॅण्डीक्राफ़्ट, हॅण्डलूम या फ़ॅन्सी शब्दांचा जन्म होण्यापूर्वी प्राचीन भारतीय कलांमधे या कलांचाही समावेश हस्त लाघव अंतर्गत केलेला दिसून येईल.
२७. प्रहेलिका – कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२८. प्रतिमाला – अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२९. काव्यसमस्यापूर्ती – अर्धे काव्य पूर्ण करणे.
३०. भाषाज्ञान – देशी-विदेशी भाषांचे ज्ञान असणे.
३१. कायाकल्प – वृद्ध व्यक्तीला तरुण करणे. आपला प्राचीन कलाप्रांत किती समृध्द होता हेच यावरून दिसतं. आज आधुनिक म्हणून जितक्या गोष्टी आपण मिरवतो त्यांचा विचार प्राचीन कलांत आधीच केल गेलेला आहे.
३२. माल्यग्रंथ विकल्प – वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
३३. यंत्रमातृका – विविध यंत्रांची निर्मिती करणे.
३४. अत्तर विकल्प – फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे, सुगंधित वस्तू बनविणं (तेल, अत्तर इत्यादी)
३५. संपाठय़ – दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३६. धारण मातृका – स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३७. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे. खरंतर हा एक प्रकारचा दुर्गूणच आहे मात्र त्यालाही डोकं लढवावं लागत असल्यानं ती कला मानली गेली आहे.
३८. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३९. मणिभूमिका – भूमीवर मण्यांची रचना करणे.
४०. द्यूतक्रीडा – जुगार खेळणे.
४१ .पुष्पशकटिका निमित्त ज्ञान – प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
४२. माल्यग्रथन – वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
४३. मणिरागज्ञान – रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
४४. मेषकुक्कुटलावक – यु*द्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
४५. विशेषकच्छेद ज्ञान – कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४६. क्रिया विकल्प – वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४७. मानसी काव्यक्रिया – शीघ्र कवित्व करणे.
४८. आभूषण भोजन – सोन्या- चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४९. केशशेखर पीड ज्ञान – मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
५०. तंडुल कुसुमावली विकार – तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
५१. केशमार्जन कौशल्य – मस्तकाला तेलाने मालीश करणे.
५२. उत्सादन क्रिया – अंगाला तेलाने मर्दन करणे.
५३. कर्णपत्र भंग – पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५४. नेपथ्य योग – ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५५. उदकघात – जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५६. उदकवाद्य – जलतरंग वाजविणे.
५७. शयनरचना – मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५८. चित्रकला – नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५९. पुष्पास्तरण – फुलांची कलात्मक शय्या करणे.
६०. दशनवसनांगरात – दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
६१. तुर्ककर्म – चरखा व टकळीने सूत काढणे.
६२. तक्षणकर्म – लाकडावर कोरीव काम करणे.
६३. अक्षर मुष्टिका कथन – करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६४. सूत्र तथा सूचीकर्म – वस्त्राला रफू करणे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


ShareTweet
Previous Post

हिट*लरने जगातलं सगळ्यात मोठं सी व्ह्यू हॉटेल बांधलं होतं, जे तब्बल ७० वर्षांनी सुरु झालं

Next Post

2 टन सोनं घेऊन निघालेली जपानची पाणबुडी समुद्रात बुडाली, आजही शोध सुरूच आहे

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

2 टन सोनं घेऊन निघालेली जपानची पाणबुडी समुद्रात बुडाली, आजही शोध सुरूच आहे

हा नियम आडवा आला, नाहीतर महेंद्र सिंग धोनी मुंबईचा कप्तान म्हणून दिसला असता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.