The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहे जगाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात विश्वासघातकी माणसांची यादी

by Heramb
30 January 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


माणसाच्या स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी विश्वासघात आणि कृतघ्नता हे सर्वांत घातक पैलू. यांमुळे माणूस दुसऱ्यांचा घात तर करतोच, शिवाय अप्रत्यक्षपणे स्वतःचाही घात करून घेतो. जोपर्यंत अशा विश्वासघाती माणसाला आपली चूक कळते तोपर्यंत मात्र खूप उशीर झालेला असतो आणि वेळही निघून गेलेली असते. हे सगळं माणसाला समजत असूनही आपली लहान-सहान उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी किंवा आपल्या अहंकाराला तृप्त करण्यासाठी मानवी इतिहासातील अनेक लोकांनी विश्वासघाताचा मार्ग अवलंबला.

भारतावर एवढी आक्र*मणे झाली, इथले जवळजवळ सर्वच राजे महापराक्रमी आणि ‘शककर्ते’ असूनही कित्येकदा भारतीय बाजूचा ध्वज रणांगणात टिकू शकला नाही, याचे मुख्य कारण म्हणजे ‘फितुरी’ आणि देशद्रोह. भारताने अनादि कालापासून अनेक ‘जयचंद’ पाहिले. अशा ‘जयचंदां’मुळे हा समृद्ध देश कित्येक शतके परकीयांच्या टाचांखाली राहिला. असाच एक विश्वासघातकी मुघल दरबारी म्हणजे मीर जाफर. पण फक्त भारतातच नाही तर जगाच्या प्रत्येक भागात असे फितुर आहेत.

जगाच्या इतिहासातील अशा काही उल्लेखनीय जयचंदांचा किंवा विश्वासघातकी लोकांचा आढावा आपण या विशेष लेखातून घेणार आहोत..

१. जुडास इस्कॅरिओट आणि त्याचा कुप्रसिद्ध ‘किस ऑफ ट्राययल’

येशूच्या बारा प्रसिद्ध शिष्यांपैकी एक असलेल्या ‘जुडास इस्कॅरिओट’ने येशूचा केलेला विश्वासघात हा आजवरच्या सर्वात मोठ्या विश्वासघातांपैकी एक आहे. जुडासने केवळ ३० चांदीच्या तुकड्यांसाठी गर्दीतून रोमन धार्मिक अधिकाऱ्यांकडे येशूची ओळख करून देण्याचे मान्य केले.



न्यू टेस्टामेन्टमधील वर्णनाप्रमाणे, जुडासने रोमन सैनिकांना येशू प्रार्थना करत असलेल्या बागेत आणले. त्यांनतर रोमन सैन्याला गर्दीमधून येशू सहजपणे ओळखता यावा यासाठी त्याच्या गालावर किस घेतली. मग येशूवर खटला दाखल करण्यात आला आणि अखेरीस त्याचा वधस्तंभावर त्याची ह*त्या करण्यात आली.

याशिवाय जो येशूच्या बारा शिष्यांपैकी एक होता, त्याच्यासाठी तीस चांदीची नाणी काही फार मोठी रक्कम नव्हती.

२. डोना मरिना: मेक्सिकन इतिहासातील सर्वात तुच्छ महिला

डोना मरीनाचा जन्म तत्कालीन युरोपातील ‘पैनाला’ शहराचा सरदार आणि त्याच्या पत्नीच्या पोटी झाला. तिचे दुसरे नाव मालिनाली होते. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, तिच्या आईने दुसर्‍या गावातील एका सरदाराशी पुनर्विवाह केला. त्या विवाहातून तिच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. आपल्या दुसऱ्या पतीला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी आणि तिच्या नवीन मुलाला मिळणाऱ्या वारशाचे रक्षण करण्यासाठी तिने मालिनालीला काही व्यापार्‍यांना विकले. त्या व्यापाऱ्यांनी मालिनलिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. हे सगळं तिच्या नशिबी किशोरवयीन असतानाच आलं होतं.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

कालांतराने तिच्या विलक्षण सौंदर्यामुळे ती ‘हर्नन कोर्टेस’साठी गणिका म्हणून काम करू लागली. मग बाप्तिस्मा (एका विशिष्ट चर्चमध्ये सामील करून घेणे) झाला आणि तिचे नाव डोना मरीना असे ठेवण्यात आले. बलाढ्य ॲझ्टेक साम्राज्यावर विजय मिळवताना डोना मरिना अपली दुभाषी होऊ शकते हे लक्षात येण्यास कोर्टेसला वेळ लागला नाही. कारण तिच्याकडे ॲझ्टेक भाषेच्या ज्ञानाबरोबरच मायन आणि स्पॅनिश भाषेचेही प्रचंड ज्ञान होते.

पण तिने दुभाष्यापेक्षा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. तिने आपल्या स्वदेशी भाषा, संस्कृती आणि त्यातील विकृतीचे ज्ञान वापरून आदिवासी समुदायांना एकमेकांमध्ये लढाई करण्यास भाग पाडले. यामुळे स्पॅनिश लोकांना अतिशय सहजतेने मेक्सिकोवर नियंत्रण मिळवता आले. स्पॅनिश सैन्यासाठी हा लढा अजिबात रक्तरंजित नव्हता. 

३. बेनेडिक्ट अरनॉल्ड, अमेरिकेचा सर्वात मोठा फितूर

बेनेडिक्ट अरनॉल्डचे स्मरण करताना, बेंजामिन फ्रँकलिन म्हणाले होते, “जुडासने फक्त एक माणूस विकला, अरनॉल्डने आपला सूड उगवण्यासाठी आपल्यापैकी तीस लाख लोक विकले!”

एक काळ असा होता जेव्हा ‘बेनेडिक्ट अरनॉल्ड’ हा सर्वांत प्रसिद्ध अमेरिकन जनरल होता. त्याच्या नेतृत्वाखालील ‘कॉन्टिनेंटल आर्मी’ला अनेक विजय मिळाले होते. ‘कॉन्टिनेंटल आर्मी’ हे अमेरिकन खंडातील तेरा वसाहतींचे सैन्य होते. अमेरिकन क्रांतिकारी युद्धाच्या उद्रेकानंतर दुसऱ्या कॉन्टिनेंटल काँग्रेसने या सैन्याची स्थापना करण्याचे ठरवले आणि १४ जून १७७५ रोजी काँग्रेसच्या ठरावाद्वारे या सैन्याची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली.

अनेक विजयांशिवाय बेनेडिक्ट अरनॉल्डने अमेरिकेची पहिला युद्धनौका देखील तयार केली होती. पण, त्याच्या काही विचित्र आणि अनपेक्षित गैरसमजुतींमुळे त्याला “अमेरिकेचा सर्वात मोठा देशद्रोही” अशी पदवी मिळाली. १७७७ साली, जनरल बेनेडिक्ट अरनॉल्डने साराटोगाच्या मोहिमेत ब्रिटिश सैन्याविरूद्ध अमेरिकन सैन्याचे यशस्वी नेतृत्व केले. पण, मोहिमेत तो गंभीर जखमी झाला आणि त्याला सहा महिने बेड रेस्टचा सल्ला दिला गेला.

ब्रिटीश सैन्यावर कॉन्टिनेंटल सैन्याच्या चित्तथरारक विजयाचे वर्णन करणाऱ्या सैन्याने काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात, जनरल म्हणून अरनॉल्डच्या प्रयत्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शिवाय, अतुलनीय शौर्य प्रदर्शनासाठी अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली होती. पण या कौतुकात त्याचे नाव कुठेही नव्हते.

या घटनेने अरनॉल्ड अतिशय दु:खी झाला आणि आपल्याच लोकांनी आपला विश्वासघात केला आहे असे त्याला वाटू लागले. अरनॉल्डने लवकरच सूड घेण्याचा आणि ‘कॉन्टिनेन्टल आर्मी’च्या लष्करी कमांडर्सना पश्चात्ताप करायला लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. १७८० साली सैन्यात परतल्यानंतर, जॉर्ज वॉशिंग्टनने अरनॉल्डला न्यूयॉर्कमधील हडसन नदीवर वसलेल्या ‘वेस्ट पॉइंट’ या मोक्याच्या अमेरिकन किल्ल्याची कमान दिली.

२१ सप्टेंबर १७८० रोजी, अरनॉल्ड एका ब्रिटिश गुप्तहेरला भेटला आणि त्याच्याबरोबर मिळून अरनॉल्डने वेस्ट पॉइंट येथील किल्ला मोठ्या रकमेसाठी ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचा कट रचला. तरीही, सतर्क अमेरिकन सैन्याने त्याचे मनसुबे उधळून लावले. शिवाय, अरनॉल्डला मृत किंवा जिवंत पकडले जावे असा आदेश जॉर्ज वॉशिंग्टनने सैनिकांना दिला. पण तो अमेरिकेतून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि ब्रिगेडियर जनरल म्हणून आपली सेवा ब्रिटिशांना प्रदान करण्यासाठी ब्रिटीश सैन्यात सामील झाला.

मग त्याच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश सैन्याने रिचमंड व्हर्जिनिया आणि त्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागावर विजय मिळवला. ही अमेरिकेच्या अपमानातील मोठी भर होती. त्यांनतर तो लंडनमध्ये स्थायिक झाला आणि तिथेच त्याने अनेक व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले, पण तो सतत अपयशीच होत राहिला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘कोकेन किंग’ पाब्लो एस्कोबारने गरिबांचा रॉबिनहूड बनायचा भरपूर प्रयत्न केला होता..!

Next Post

या आहेत जगातील काही ‘शे’ वर्षे जुन्या कंपन्या ज्या आजही चालू आहेत…!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या आहेत जगातील काही 'शे' वर्षे जुन्या कंपन्या ज्या आजही चालू आहेत...!

इंग्रजांनी नेपोलियनला मद्रासमधील 'सेंट जॉर्ज फोर्ट'मध्ये बंदिवासात ठेवायचं ठरवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.