The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माओच्या हुकमशाही तत्त्वांनीच त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीचा घात केला

by द पोस्टमन टीम
20 March 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगाच्या राजकारणात काही महिला अशा होऊन गेल्या ज्यांनी जगाचे राजकारण आपल्या मुठित ठेवलेले होते. तसं बघायला गेलं तर महिलांना राजकारणामध्ये फारशी संधी मिळत नाही. असे म्हणतात राजकारण हा बऱ्यापैकी पुरुषांनी काबीज केलेला प्रांत आहे. या प्रांतात शक्यतो कुठली स्त्री फार मोठे अधिकार पद किंवा सत्ता मिळवू शकत नाही. त्यासाठी तिला एक तर राजकीय घराण्यामध्ये जन्म तरी घ्यावा लागतो किंवा राजकीय घराण्यात तिची सोयरीक तरी व्हावी लागते.

सामान्य कुटुंबात जन्माला येऊन राजकारणात उच्चपदापर्यंत पोचणे तर स्त्रीसाठी अवघड मानले जाते. तरीही जागतिक इतिहासामध्ये काही स्त्रिया अशा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा ठसा जगाच्या राजकीय पटलावर उमटवला.

अशा स्त्रियांपैकी एक स्त्री म्हणजे चीनचा माजी राष्ट्राध्यक्ष माओ झेडोंगची पत्नी जियान किंग. जियान ही माओची चौथी पत्नी होती. जियान किंग ही मॅडम माओ या टोपणनावाने प्रसिद्ध होती.

जियान किंगचा जन्म १९१४ साली झाला. दिसायला सुंदर असल्यामुळे तिला पहिल्यांदा नाटक आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये कामे मिळायला सुरुवात झाली. वयाच्या चोविसाव्या वर्षी तिचे माओबरोबर लग्न झाले. जियानच्या लहानपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे जियान किंगचे बालपण तिच्या आईच्या प्रियकरांच्या घरात गेले.



वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत जियानची दोन लग्ने मोडली होती. त्यानंतर तिने अभिनयामध्ये रस घ्यायला सुरुवात केली. तिचे काही चित्रपट देखील  प्रदर्शित झाले होते.

त्याच्यानंतर एका पार्टीमध्ये तिची आणि माओ त्सेतुंग या उभरत्या नेत्याची ओळख झाली आणि तिथे तिला स्वतःचा तिसरा जोडीदार सापडला. माओचे देखील हे चौथे लग्न होते. मात्र यानंतर माओच्या मृत्यूपर्यंत जिआन किंग त्याच्याबरोबर सक्रीय राजकारणामध्ये सहभागी राहिली.

चीनमध्ये झालेली सांस्कृतिक क्रांती आणि चीनमधल्या साम्यवादी राजवटीत ओळखली जाणाऱ्या ‘गॅंग ऑफ फोर’साठी जियान किंगचे नाव घेतले जाते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

यापैकी पहिली गोष्ट म्हणजे अर्थात चीनमध्ये झालेली सांस्कृतिक क्रांती. १६ मे १९६६ रोजी या सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात चीनमध्ये झाली. चीनमध्ये ज्या ज्या ठिकाणी भांडवलशाही होती किंवा भांडवलशाहीच्या वाढीस पोषक वातावरण होते ते संपवून टाकण्यासाठी या क्रांतीचा उगम झालेला होता.

या क्रांतीद्वारे माओला चीनवर साम्यवादाची पकड मजबूत करायची होती. त्यामुळे संपूर्ण चीनला भांडवलवादापासून शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला सांस्कृतिक क्रांती असे म्हटले गेले. ही अतिशय रक्तरंजित अशा प्रकारची क्रांती होती. अत्यंत हिंसक पद्धतीने लाखो लोकांना या क्रांतीमध्ये मारण्यात आले.

हजारो लोकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आले. १९७६ साली माओचा मृत्यू झाला अगदी तेव्हापर्यंत दहा वर्षे ही रक्तरंजित क्रांती सुरू होती.

१९६९ साली माओने औपचारिकरित्या सांस्कृतिक क्रांती संपल्याचे जाहीर केले होते तरीही त्याच्या सैनिकांनी लोकांची क*त्तल सुरू ठेवली होती. या सांस्कृतिक क्रांतीमध्ये जियान किंगचा महत्त्वाचा सहभाग होता.

माओची पत्नी म्हणून तिच्याकडे सर्वाधिकार होते आणि त्या अधिकारांचा तिने अनिर्बंध वापर केला.

स्वतःच्या जवळच्या, स्वतःच्या पार्टीमधल्या, आणि स्वतःला भविष्यात स्पर्धक म्हणून समोर येतील अशा व्यक्तींनासुद्धा मारण्यामध्ये जिआन किंगचा हात होता.

जियान किंग ही कम्युनिस्ट पार्टीच्या इतर तीन सदस्यासह स्थापन झालेल्या ‘गॅंग ऑफ फोर’ची सगळ्यात प्रभावी सदस्य होती. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात या चांडाळ चौकडीकडे संपूर्ण सूत्रे हलवण्याचे अधिकार होते. या चौघांनी चीनमधला सगळा मीडिया आपल्या ताब्यात घेतला होता.

संपूर्ण सरकारी संस्था देखील त्यांच्या अधिकाराखाली आलेल्या होत्या. याच लोकांच्या आदेशावरून लाखो लोकांची क*त्तल करण्यात आली असे नंतर त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपपत्र मध्ये नमूद करण्यात आलेले होते. इतकेच काय परंतु या सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखालील पूर्वी सिनेमामध्ये काम करत असताना ज्या लोकांनी काम नाकारले होते त्या लोकांचीसुद्धा क*त्तल जियान किंगने घडवून आणली होती.

१९६९ साली जियान किंग हिने अंतर्गत मंत्रिमंडळात प्रवेश केला. केवळ माओची बायको म्हणून तिला पॉलिट ब्युरोमध्ये एक सीटसुद्धा ऑफर करण्यात आली.

जियान किंगवर अनेक लोक चिडून होते परंतु ती माओची बायको असल्यामुळे तिला उघड बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. जोपर्यंत माओ सत्तेमध्ये होता तोपर्यंत जिआन किंग हिने आपले “अधिकार” वापरून अनिर्बंध सत्ता उपभोगली.

१९७६ साली माओचा मृत्यू झाला आणि जियान किंगच्या कारकिर्दीला ग्रहण लागले.

माओच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार म्हणून गोफेंग सत्तेवर आला. गोफेंग जिआन किंग यांच्यात फारसे सख्य नव्हते. तिला असे वाटले की माओची विधवा म्हणून तिला अजूनही सर्वाधिकार आहेत. तिच्या अधिकारांना कोणी धक्का पोहोचवू शकत नाही. तिची ही अटकळ खोटी ठरली.

याच गोफेंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जियान किंग आणि गॅंग ऑफ फोरच्या बाकी सदस्यांना अटक केली. त्यांच्यावर खटला देखील चालवण्यात आला. जियान किंग जवळपास पाच वर्षे अटकेत राहिली. त्यानंतर १९८० साली तिच्यावर चालवण्यात आलेल्या खटला संपूर्ण चीनमधील दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात येत असे.

सरकारविरुद्ध कट रचणे, सशस्त्र क्रांतीचा डाव करणे, अनेक निरपराध लोकांची सांस्कृतिक क्रांतीच्या काळामध्ये ह*त्या करणे असे अनेक आरोप जियान किंगवर होते. या खटल्यामध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती मात्र तिचे पक्षासाठीचे योगदान लक्षात घेऊन जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

१९८० ते १९९० दहा वर्षे जियान किंगने कारागृहामध्ये काढले. १९९० मध्ये तिला घशाचा कॅन्सर डिटेक्ट झाला त्यामुळे मेडिकल ग्राउंडवर तिला बाहेर सोडण्यात आले. मात्र बाहेर आल्यानंतर तिच्या लक्षात आले तिची काहीही किंमत राहिलेली नाही. तिचे स्थान आता सगळीकडे शून्यात जमा आहे.

७० च्या दशकात चीनमधल्या सगळ्यात बलवान महिलेने १९९१ साली स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्मह*त्या केली.

“Power corrupts, absolute power corrupts absolutely” याचे हे उत्तम उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने हि*टल*रच्या नावाने खोटी डायरी लिहून लोकांना ठगवलं होतं

Next Post

हे आहेत जगातील एकमेव हिंदू शेख जे गरज पडल्यावर सुलतानालासुद्धा उधारीवर पैसे देतात

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

हे आहेत जगातील एकमेव हिंदू शेख जे गरज पडल्यावर सुलतानालासुद्धा उधारीवर पैसे देतात

बाळासाठी 'जॉन्सन अँड जॉन्सन' घ्यायच्या आधी त्या कंपनीचा काळा इतिहास वाचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.