The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कारणामुळेच पासपोर्टवर हसरा फोटो चालत नाही

by द पोस्टमन टीम
6 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लहानपणापासून स्वतःचा फोटो काढून घेताना, “स्माईल प्लीज” हे ऐकायची इतकी सवय झालेली असते की सेल्फी काढतानाही आपण स्वतःलाच स्माईल प्लीज म्हणतो. एका स्माईलने तुमचा फोटो सुंदर येत असेल तर हीच स्माईल तुमचे आयुष्यही सुंदर करू शकते. असले सुविचारही आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात जपलेले असतात.

थोडक्यात काय तर फोटो आणि स्माईल यांचे एक अतूट नाते आहे.

पण समजा जर फोटो काढताना कुणी तुम्हाला “नो स्माईल प्लीज” असे म्हटले तर काय वाटेल? किती विचित्र वाटते ना ही कल्पनाच! फोटो काढायचा आणि स्माईल नाही म्हणजे काय? पण, हो हे खरे आहे.

परदेशात फिरायला, राहायला किंवा शिकायला जायचं आहे तर तुम्हाला पासपोर्ट तर लागणारच. पण, या पासपोर्टवर तुमचा जो फोटो असणार आहे, त्यात तुम्ही स्माईल दिलेली बिलकुल चालणार नाही.

चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही पासपोर्ट बनवून घ्याल तेव्हा तुमचा फोटो काढणारी व्यक्ती तुम्हाला जरूर हे सांगेल की तुमचा चेहरा अगदी सरळ ठेवा. हसू नका.



यामागे नेमके काय कारण असेल? पासपोर्टच्या फोटोसाठी स्माईल देण्यावर का बरं बंदी असेल? जाणून घेऊया यामागची नेमकी कारणं या लेखातून.

आज जवळपास जगभरातील सर्वच देशात हा नियम लागू आहे. यामागचे कारण हेच की फोटोतील तुमचा चेहरा स्पष्ट आला पाहिजे. म्हणून हा फोटो काढताना केस डोळ्यावर किंवा कानावर येता कामा नयेत आणि स्माईलही द्यायची नाहीये. अगदी साधा फोटो काढायचा आहे.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

काही वर्षापूर्वी पासपोर्टवरील फोटोसाठी असले काही नियम नव्हते. पण, २६/११च्या ह*ल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आता सर्वच देशांनी हे नियम लागू केले आहेत.

शिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाचाही यात मोठा वाटा आहे. विमानतळावर बसवण्यात आलेल्या बायोमेट्रिक तंत्रज्ञानामुळे पासपोर्ट आणि त्यावरील फोटो कसे असले पाहिजेत याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. काही देशाच्या पासपोर्टमध्ये चीप बसवण्यात आलेली असते ज्यात त्या व्यक्तीचा सगळा डेटा असतो.

तुमच्या दोन्ही डोळ्यातील अंतर, चेहऱ्याची रुंदी, डोळे यांची फोटोमध्ये तुमच्या चेहऱ्याची सगळी माहिती असते.

जर तुम्ही स्माईल दिली तर तुमचा चेहरा सामान्य अवस्थेत राहणार नाही. चेहऱ्याची स्थिती बदलेल, त्यामुळे जेंव्हा बायोमेट्रिक यंत्राद्वारे तुमचा चेहरा आणि तुमचा पासपोर्टवरील फोटो एकमेकांशी जुळणार नाही. सध्या लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार फोटो काढताना डोळ्यावर चष्मा लावण्यासही मनाई आहे.

फ्रांसच्या एका व्यक्तीने या अजब नियमाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. पासपोर्टवर हसरा चेहरा का नाही लावायचा याचा जाब विचारत त्याने याचिका दाखल केली.

पासपोर्टवरील हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोमुळे आपल्या देशातील नागरिकांची समृद्धी, आनंद, उत्साह यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन होते, असे त्या व्यक्तीचे मत होते. २०१४ साली त्याने न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली. परंतु, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

कारण न्यायालयाच्या मते, जिथे प्रश्न सुरक्षेचा असेल तिथे अशा आनंदाचे प्रदर्शन करण्याची आवश्यकताच नाही.

तसेही चेहऱ्यावरील हास्य आणि त्याचे प्रदर्शन हे सुरक्षेच्या नियामांपेक्षा जास्त महत्वाचे नाहीत. जेव्हा तुम्ही विमानतळाच्या इ-गेट मधून आत प्रवेश कराल तेव्हा तिथे बसवण्यात आलेला कॅमेरा तुमच्या फोटोवरून तुमची ओळख पटवतो. तुमच्या पासपोर्टवरील फोटो आणि तुमचा चेहरा याचे बायोमेट्रिक रीडिंग जुळणे गरजेचे आहे.

हे बायोमेट्रिक जुळले तर तुम्हाला विमानतळावर सहज प्रवेश मिळू शकतो. परंतु हे बायोमेट्रिक जर जुळले नाही तर तुम्हाला चौकशीला सामोरे जावे लागेल.

म्हणून पासपोर्ट बनवून घेताना त्यावरील फोटो हा स्पष्ट आणि चांगल्या दर्जाचा असेल याची खात्री करून घ्या. पासपोर्टसाठी फोटो काढताना थोडी काळजी घेतली तर अशी वेळ येणार नाही. फोटो काढताना शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान करा. डोके आणि खांदे सरळ ताठ ठेवा. डोके जास्त वरही घेऊ नका आणि जास्त खाली वाकवू नका. एक तर केस कानाच्या वरती येतील असे कापा किंवा पोनी टेल बांधा.

पासपोर्टसाठी फोटो काढताना डोळे स्वच्छ असतील याची काळजी घ्या. यासाठी डोळ्यात आय ड्रॉप टाकला तरी चालेल. पासपोर्टसाठी फोटो काढण्याआधी मोबाईलवर याची प्रॅक्टिस करा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Passport LawsPassport PhotoPassport Size Photo
ShareTweet
Previous Post

मोनालीसाचं चित्र काढणाऱ्या लिओनार्डो दा विंचीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती

Next Post

पारसी व्यक्तीशी लग्न करूनही इंदिराजी आयुष्यभर हिंदूच राहिल्या

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

पारसी व्यक्तीशी लग्न करूनही इंदिराजी आयुष्यभर हिंदूच राहिल्या

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या जेएनयूच्या स्थापनेमागची गोष्ट

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.