The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमचे सनग्लासेस कुठल्याही ब्रँडचे असुद्या, ते बनवण्याचा मक्ता याच कंपनीकडे आहे..!

by Heramb
7 February 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आज एका वर्षाखालील बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच स्क्रीन ॲडिक्शन आहे. प्रत्येक व्यक्तीला सतत कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या डोळ्यांसमोर स्क्रीन ठेवावीच लागते. मग ती कामानिमित्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची स्क्रीन असो, किंवा कामाव्यतिरिक्त वेब सिरीज आणि सिनेमे पाहण्यासाठी घरातील भल्यामोठ्या टीव्हीची स्क्रीन असो, किंवा यापैकी काहीच नसेल तर हातातील मोबाईलची स्क्रीन असो.

आता तर रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या कार्समध्ये देखील प्रत्येक सीटला स्क्रीन्स लावण्यात येतात, तीच गोष्ट रेल्वे, बस आणि विमानांची देखील. कुठेही गेलो तरी प्रचंड प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या या स्क्रीन्स आपल्या डोळ्यांचा वेध घेताच असतात. अशा परिस्थितीमध्ये हल्ली चष्मे लागण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे.

स्क्रीन ॲडिक्शनमुळे जगभरातील चष्मे आणि लेन्स तयार करणाऱ्या कंपन्याना मोठा प्रॉफिट होतोय. अगदी नगण्य किंमतीत चष्मा आणि त्याच्या लेन्स बनत असल्या तरी तुमच्या आमच्यापर्यंत येताना त्या चष्म्याची किंमत पार गगनाला भिडते. या किंमती नेमक्या का वाढतात आणि त्याचं अर्थचक्र नेमकं कसं चालतं, जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून.

चष्मा खरेदी करायचा म्हणजे खिशाला प्रचंड ताण पडणार हे निश्चित असतं. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात तर परिस्थिती याहूनही बिकट आहे. जास्तीत जास्त २० ते ३० डॉलर्समध्ये तयार होणारा चष्मा अमेरिकेत ‘लेन्सक्राफ्टर्स’सारख्या कंपन्या सुमारे ५०० ते ६०० डॉलर्समध्ये विकतात. जगातील बहुतेक फ्रेम्स लक्सोटिका नावाची एक कंपनी तयार करते. हा इटालियन ब्रँड प्रेडा, बर्बेरी, राल्फ लॉरेन, रे-बॅन, ओकले, आणि अशा बहुतेक कंपन्यांसाठी फ्रेम्स आणि सनग्लासेस तयार करण्याचे काम करतो.



जगभरातील किमान १०० कोटी लोक त्यांनी तयार केलेले चष्मे वापरत आहेत असा दावा केला जातो. लक्सोटिकाने जागतिक चष्मा उद्योगातील सुमारे ८०% ब्रॅंड्सवर नियंत्रण मिळवले आहे. अमेरिकेतील चष्मे आणि सनग्लासेसच्या स्टोअर्सपासून ते लेन्सेस तयार करण्यापर्यंत संपूर्ण बाजारपेठेवर लक्सोटिकाचीच मक्तेदारी आहे.

बाजारपेठेतून देखील या ब्रँड्सच्या चष्म्यांना आणि सनग्लासेसना प्रचंड मागणी आहे. बहुसंख्य ग्राहक वॉलमार्ट आणि कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशनसारख्या स्टोअर्समधून याच ब्रॅंड्सचे चष्मे खरेदी करतात. २०१७ साली लक्सोटिकाने एसिलर ही फ्रेंच लेन्स मॅन्युफॅक्चरर कंपनी खरेदी केली. या कंपनीने मक्तेदारी मिळवली कशी याची कथा देखील रंजक आहे.

लिओनार्डो डेल वेचियो यांनी इटलीमध्ये १९६१ साली लक्सोटिकाची स्थापना केली, हे नाव दोन इटालियन शब्दांनी तयार होते ल्युस म्हणजेच लाईट आणि ओटीका म्हणजेच ऑप्टिक्स. डेल वेचिओने अतिशय कमी कालावधीत या सप्लायर कंपनीचे रूपांतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत केले. १९७१ साली लक्सोटिकाने स्वतःचा पहिला चष्मा तयार केला आणि त्यांच्या यशस्वी घोडदौडीला सुरुवात झाली. १९८० च्या दशकात चष्मा केवळ एक वैद्यकीय गरज बनला नव्हता तर तो फॅशनमधील एक महत्त्वाचा भाग बनला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

लक्सोटिकाने हा ट्रेंड फक्त पुढे चालवण्यात हातभारच लावला नाही तर त्यातून प्रचंड उत्पन्न मिळवले. त्यांनी उत्तम डिझाइन्सचे चष्मे आणि सनग्लासेस तयार करणाऱ्या अन्य कंपन्यांबरोबर भागीदारी केली. त्यांनी अनेक फॅशन हाऊसेसना परवाने दिले, त्या परवान्याअंतर्गत, फॅशन हाऊसेस लक्सोटिकाला कपड्यांसोबत जुळणाऱ्या फ्रेम्सबद्दल सांगायचे आणि लक्सोटिका त्याप्रमाणे फ्रेम डिझाईन करून मॅन्युफॅक्चर देखील करत असत.

कंपनीने प्रथम १९८८ साली जियोर्जियो अरमानीसोबत पार्टनरशिप केली. अवघ्या तीन दशकांनंतर लक्सोटिकाने प्रेडा, चॅनल, वोग, मायकेल कॉर्स, यांसारख्या ब्रँड्ससोबत देखील मोठ्या प्रमाणात भागीदारी केली. लक्सोटिकाने व्होग आयवेअर, रे बॅन, ओकले यांसारखे अनेक ब्रँड्सही खरेदी केले. शिवाय त्यांनी लेन्सक्राफ्टर्स, सनग्लास हट असे किरकोळ परंतु प्रसिद्ध स्टोर्स देखील खरेदी केले.

आज, लक्सोटिकाची जगभरात सुमारे ९००० स्टोअर्स आहेत. इतकेच नाही तर लक्सोटिकाची विमा कंपनी, आयमेडकडे सुमारे २८ हजार डोळ्यांच्या डॉक्टर्सचे नेटवर्क आहे आणि सुमारे ३ करोड अमेरिकन्स या सुविधेचा फायदा घेत आहेत.

लक्सोटिका इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि इटलीमध्येही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. याशिवाय जपान आणि भारतातील २ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स असून अमेरिका, इटली, चीन, ब्राझीलमध्ये देखील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. २०१८ साली लक्सोटिकाची एकूण विक्री सुमारे १ हजार अमेरिकन डॉलर्स एवढी प्रचंड होती. २०१३च्या विक्रीच्या तुलनेत ही २२% वाढ आहे.

थोडक्यात जर कोणत्याही ब्रँडला चष्मा किंवा सनग्लासेस विकायचे असतील तर ते लक्सोटिकाच्या मोठ्या नेटवर्कमध्ये असणे आवश्यक आहे आणि जर त्यांना जगभरातील मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँडची विक्री करायची असेल, तर त्यांना त्यांच्या स्टोअरमध्ये लक्सोटिका उत्पादने ठेवावीच लागतील अशी परिस्थिती या मक्तेदारीमुळे निर्माण झाली आहे.

एकूणच कोणताही चांगल्या ब्रॅण्डचा चष्मा खरेदी करायचा असल्यास त्याची किंमत लक्सोटिकाच ठरवते, यामुळे तुम्हाला आम्हाला लहानशा परंतु गरज बनलेल्या चष्म्यासाठी प्रचंड किंमत मोजावी लागते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

Next Post

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

वाईन ऐकूनही माहित नसलेले हे लोक काही दशकांपासून जगातील सर्वोत्तम वाईन ग्लास बनवतायत..

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.