The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी मोबाईल जगताचा राजा असलेली मोटोरोला आज नामशेष का झाली?

by द पोस्टमन टीम
1 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“जगामध्ये फक्त बदल हाच स्थिर आहे.”

– सर हेन्री फोर्ड

काळानुरूप तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवत गेलं पाहिजे किंवा आजूबाजूला होणाऱ्या बदलांना तुम्ही आत्मसात केलं पाहिजे, तुम्ही असे केले तरच तुम्ही स्पर्धेत टिकून राहता नाहीतर तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाता. “परिवर्तन हीच काळाची गरज आहे.”

आज पण आपण पाहतो उन्हाळा येतो, मग पावसाळा आणि मग हिवाळा हे असंच चालू राहतं. ऋतू सारखे बदलत राहिले तरच जीवनचक्र चालू राहतं. कंपन्यांच्या बाबतीतही तसंच असतं जर तुम्ही योग्य तो बदल योग्य त्यावेळी नाही केला तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाता आणि फक्त इतिहासातला संदर्भ बनून जाता. काहीसं असंच घडलं एका मोठ्या कंपनीच्या बाबतीत. एकेकाळी मोबाईल जगताचा राजा असलेला ब्रँड आज फक्त case study पुरताच मर्यादित आहे.



ही तीच कंपनी आहे जिने जगाला “6 sigma” नावाचं परिमाण दिलं. जे परिमाण उत्पादनतेमधील सर्वोच्च गुणवत्ता दर्शवातं. “6 sigma” म्हणजे अगदी कमीत कमी त्रुटी असणारं उत्पादन.

तुम्हाला विश्वासही बसणार नाही असं उत्पादनतेचं परिमाण देणारी कंपनी आज स्वतःचं उत्पादन घ्यायलासुद्धा महाग आहे. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय. होय, आपण बोलत आहोत “MOTOROLA”बद्दल. एकेकाळी मोबाईल म्हणलं की मोटोरोला असं समीकरण होतं. पण आज तीच कंपनी मार्केटमधून नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे. असं काय झालं असेल मोटोरोला सोबत? का त्यांना त्यांची Market Value टिकवता नाही आली?

thepostman

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

मोटोरोलाची सुरुवात झाली होती १९२८ साली शिकागो मध्ये. सुरुवातीला गाड्यांमध्ये असणारे रेडिओ तयार करणारी कंपनी, दुसऱ्या महायुद्धनंतर झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीमधील महत्वाचा भाग होती. GSM (GLOBAL SYSTEM FOR MOBILES) तयार करण्यात सर्वांत मोठा वाटा मोटोरोलाचा होता. WIRELESS तंत्रज्ञानामध्ये मोटोरोलाचा हात कोणीच धरू शकत नव्हते.

पूर्वी कुठल्याही उपकरणासाठी लागणारे WIRELESS तंत्रज्ञान हे फक्त आणि फक्त मोटोरोलाचेच असायचे. ९० च्या दशकात जेव्हा फ्लिप फोनची चलती होती तेव्हा मोटोरोलाचा i530 हा एक वैभवतेचं प्रतीक मानलं जायचं. मॅनेजर, इंजिनीअर, कंत्राटदार प्रत्येकाकडे तोच फोन दिसायचा. मोटोरोलाची बाजारात एवढी चलती होती की सलग ५ वर्षं दुसरा कुठलाही फोन मोटोरोलासमोर टिकला नाही. दिवसेंदिवस लोकांचं मोटोरोलाबद्दलच प्रेम वाढतच चाललं होतं. पण मोटोरोला एवढ्यातच थांबणारी नव्हती हळूहळू जशी स्पर्धा वाढायला लागली मोटोरोलाने त्यांच्या स्पर्धकांवर “Moto Razr” नावाचं ब्रम्हास्त्र डागलं.

thepostman

आजही “moto razr” ला मोबाईल दुनियेत मान आहे. मोबाईलच्या Build Quality चं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे “moto razr.”

आयफोन पूर्वीच्या काळात मोटोरोलाची मोबाईल मार्केटमध्ये खूप चलती होती. “Verizon” जी वायरलेस आणि टेलीकम्युनिकेशनमध्ये अमेरिकेतील एक अग्रगण्य कंपनी आहे तिच्यासोबत मोटोरोलाचा करार होता. मोटोरोलाचे अमेरिकेतील exclusive sales rights हे verizon कडे होते. जेव्हा आयफोन मार्केटमध्ये आला तेव्हा त्यांनी त्यांचे exclusive sales rights “verizon” ची स्पर्धक AT&Tला दिले. ज्यामुळे verizon चे बहुतांश ग्राहक हे AT&T कडे वळले . याच कारणामुळे verizon ला खूप नुकसान सहन करावं लागलं.

याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मोटोरोलासोबत येऊन “motorola droid” ही नवीन शृंखला काढली, जी आयफोनच्या अगदी विरुद्ध होती आणि आश्चर्याची बाब म्हणजे ही संकल्पना यशस्वी पण ठरली. या droid ने ग्राहकांचा एक नवीन वर्ग तयार केला आणि थोड्याच कालावधीत तो या motodroid चा चाहता होऊन गेला. काळानुरूप बदल केल्याने मोटोरोलाने आयफोनची स्पर्धा मोडीत काढली होती. मोटोरोलासाठी सगळं व्यवस्थित चालू होतं, मग नेमकी माशी कुठे शिंकली?

thepostman

मोटोरोला तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल नक्कीच करत होती पण Exclusivity contract देण्याची त्यांची जुनी पद्धत मात्र त्यांनी बदलली नव्हती. ते अजून त्याच पद्धतीशी चिटकून होते. त्यांच्या याच आडमुठेपणामुळे त्यांच्यामागून येऊन सॅमसंगच्या android galaxy शृंखलेने त्यांना थोड्याच वेळात मागे सुद्धा टाकले. AMOLED स्क्रिन असलेले आणि कुठेही सहज उपलब्ध होत असल्याने बघता बघता सॅमसंगने सगळं मोबाईल मार्केट खाऊन टाकलं.

हळूहळू बाकी कंपन्यांनीसुद्धा सॅमसंगच्या पावलावर पाऊल ठेवत नवीन नवीन मोबाईल बाजारात आणून, ग्राहकांना अगदी सहज उपलब्ध करून दिले HTC, LG यांनीसुद्धा मार्केटमध्ये स्वतःची जागा बनवली. पण याच काळात नवीन आणि चांगले मोबाईल्स आणूनसुद्धा मोटोरोला मागे पडत होती . त्याचं कारण एकच होतं verizon ला दिलेले Exclusivity contract.

या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काहीच पर्याय न राहिल्याने मोटोरोलाने त्यांची मोबाईलची शाखा गुगलला विकली, तीसुद्धा ३ बिलियन डॉलर्स एवढ्या मोठ्या रकमेला. हे सगळं झालं होतं जेव्हा google pixel ची कल्पना सुद्धा गूगलच्या इंजिनिअर्सच्या डोक्यात नव्हती. पण google pixel आल्यावर हा पण भ्रमनिरास झाला. गूगलने मोटोरोला फक्त आणि फक्त पेटंटसाठीच घेतलं होत.

पण या सगळ्यातून एक गोष्ट खूप चांगली झाली होती मोटोरोलासाठी, ती म्हणजे गूगल आणि मोटोरोला यांनी काढलेला motox हा मोबाईल. खूप कमी कालावधीत हा मोबाईल खूप मोठा “हिट”ठरला. या मोबाईलच सर्वच स्तरांवर कौतुक करण्यात आलं. मोटोरोला आणि गूगलने काढलेले सर्व फोन खूप लोकप्रिय ठरले. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ते त्या मोबाईल्सला इतरांपासून वेगळं करत होतं, ते म्हणजे”अँड्रॉइड अपडेट्स”. गूगल nexus सोबत सर्वांत आधी अपडेट्स येणारे मोबाईल्स म्हणजे मोटोरोला आणि गुगलचे फोन.

पुन्हा तीच जुनी दुसऱ्यावर पूर्ण अवलंबून राहायची सवय, इथेसुद्धा मोटोरोलाला घातक ठरली. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे मोटोरोलाच्या hardware तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा करून घेऊन गूगलने स्वतःचा google pixel हा फोन लाँच केला. गरज संपली आणि दुसरीकडे २०१४ साली गूगलने मोटोरोला ही कंपनी “lenovo” ला विकून टाकली.

Lenovo ही अशी कंपनी होती, जिला मोबाईल मार्केटमध्ये कोणीच ओळखत नव्हतं. आणि इथूनच सुरू झाला मोटोरोलाचा ऱ्हास.

Lenovo सोबत गेल्यानंतर त्यांनी moto Z हा मोबाईल बाजारात आणला. ज्याला मागच्या बाजूने extra camera lens, boom speaker आणि projector जोडता येण्याची सोय होती. दिसायला अतिशय रंजक असलेला फोन किमतीच्या बाबतीत तोंडावर पडला.

Lenovo या कंपनीला smartphoneच्या मार्केटबद्दल अजिबातच कल्पना नव्हती, त्याचाच फटका मोटोरोलाला बसला. सर्व उपकरणासोबत फोन ची किंमत होती १५०० डॉलर्स. ४-५ वर्षांपूर्वी एवढे पैसे फोनवर खर्च करण्याची कोणाचीच मानसिकता नव्हती, कारण त्यावेळी बाकीचे स्मार्टफोन १५० ते ५०० डॉलर्स मध्ये मिळत होते. Lenovo सोबत गेल्याचा फटका आता मोटोरोलाला बसायला लागला होता.

“दुष्काळात तेरावा महिना” म्हणावा तसं आता मोटोरोलाच झालं होतं. गूगलसोबत असताना जे अँड्रॉइड अपडेट्स मोटोरोलाला मिळत होते आता ते मिळणं पण बंद झालं होतं. एकेकाळी अँड्रॉइड अपडेट्स जे motoxची ओळख होते, तेच आता मोटोरोलाकडे राहिले नव्हते. याचं पण कारण नवखी lenovo च होती कारण त्यांनी गूगलकडून priority अपडेट्स घ्यायला नकार दिला होता. Priority अपडेट्स मिळत नसल्याने आता motoX सुद्धा साधारण मोबाईल झाला होता, त्यामुळे त्याचा चाहता वर्ग पण कमी झाला होता. किंमत जास्त असल्यामुळे motoZ तर आधीच ग्राहकांनी नाकारला होता.

त्यात भर म्हणून की काय चिनी कंपन्यानी स्मार्टफोन मार्केट गिळंकृत करायला सुरुवात केली होती. Redmi, realme, one plus आणि oppo ह्यांना ग्राहकांची खूप पसंदी भेटत होती. Motorola flagship आता फक्त नावापुरतीच उरली होती.

thepostman

यातूनच छोटा आशेचा किरण म्हणजे motoE आणि motoG ह्या बजेट स्मार्टफोन कडे थोड्या प्रमाणात का होईना लोक आकर्षित होत आहेत. एकेकाळी मोबाईल दुनियेचा बादशाह असलेला मोटोरोला,सारख्या सारख्या बदलल्या गेलेल्या मालकीमुळे, व्यवस्थापनेचा अभाव ह्या सगळ्यामुळे आज ओळख नसलेला ब्रँड झाला आहे.

Lenovo त्याला पुनरुज्जीवित करेल याच्या आशा खूप कमी आहेत. मोटोरोलाला पुन्हा एकदा moto razr (जुना) च्या दुनियेत जाऊन विचार केला पाहिजे आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. मोटोरोला स्पर्धेतून बाहेर जाण्यामागे मोटोरोला कंपनीची व्यवस्थापन ही मुख्य पार्श्वभूमी आहे कारण व्यवस्थापनात सातत्याने बदल झाल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

ग्राहकांना जे हवंय ते देण्याची तयारी आता मोटोरोलाने दाखवली पाहिजे. त्यासाठी हवे तेवढे परिश्रम घेतले पाहिजे आणि प्रभावी व्यवस्थापन तयार केले पाहिजे. जगाला six sigma देणाऱ्या कंपनीला आज त्यांच्या विचारात six sigma लागू करण्याची गरज आहे .


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: motorola
ShareTweet
Previous Post

भारतीय संस्कृतीत पवित्र असणारी स्वस्तिक हि*टल*रने ना*झी बोधचिन्ह म्हणून का वापरली.?

Next Post

जाणून घ्या, भारताच्या खऱ्याखुऱ्या ‘टायगर मॅन’बद्दल

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

जाणून घ्या, भारताच्या खऱ्याखुऱ्या 'टायगर मॅन'बद्दल

कादंबिनी गांगुली : रूढी-परंपरांचा पगडा मोडून सामाजिक क्रांती करणारी पहिली महिला डॉक्टर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.