The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन्ही हात नसूनही पायाने गाडी चालवून या माणसाने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंय

by द पोस्टमन टीम
23 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जर एखाद्या व्यक्तीचे हात बांधले आणि त्याला गाडी चालवण्यास सांगण्यात आले तर ती व्यक्ती गाडी सुरु देखील करू शकणार नाही. पण भारतात अशी एक व्यक्ती आहे, जी दोन हात नसून देखील उत्तम गाडी चालवू शकते. विशेष म्हणजे भारत सरकारकडून त्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स देखील देण्यात आले आहे. विक्रम अग्निहोत्री असे या व्यक्तीचे नाव आहे.

विक्रम बालपणापासून अपंग आहेत. त्यांचा जन्म देखील एखाद्या सामान्य मुलासारखा झाला होता. परंतु वयाच्या सातव्या वर्षी वीजेचा धक्का लागल्यामुळे त्यांना आपले हात गमवावे लागले होते. अशा अत्यंत दुर्धर परिस्थितीत देखील विक्रम यांनी धैर्य सोडले नाही. त्यांनी अपंग मुलांच्या शाळेत शिक्षण न घेता, सामान्य मुलांच्या शाळेतच शिक्षण घेतले. त्यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केले. त्यांच्या आईने त्यांना या काळात मोठी साथ दिली होती.

त्यांनी आपल्या पायांचा हात म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. जेवणापासून दाढी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ते पायांचा वापर करू लागले.

हळूहळू विक्रम यांचा आत्मविश्वास वाढत चालला होता, आपल्या पायांच्या मदतीने ते अनेक कामे पार पाडत होते. मग एकदा त्यांनी अजून धाडस करण्याचा निर्णय घेतला. विक्रम यांनी गाडी विकत घेतली, पण गाडी विकत घेतल्यावर ती चालवणार कशी हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. विक्रम यांना गाडी चालवणे कोण शिकवेल हा देखील एक प्रश्न होता.

विक्रम यांनीच त्यांच्या गाडीत काही बदल केले. गाडीत बदल केल्यावर ते आपल्या एका पायाने गाडीचे स्टेअरिंग सांभाळू शकत होते तर दुसऱ्या पायाने ब्रेक-ॲक्सिलेटरचा वापर करू शकत होते. बराच शोध घेतल्यावर देखील त्यांना ड्रायव्हिंग शिकवू शकेल अशी कुठलीही व्यक्ती भेटत नव्हती. असं असलं तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी इंटरनेटवर व्हिडीओ बघून ड्रायव्हिंग शिकण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यात ते उत्तम गाडी चालवायला शिकले. त्यांनी ड्रायव्हिंग शिकल्यावर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला. परंतु त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.



 विक्रम यांना हात नसल्यामुळे त्यांना गाडी चालवण्याची कायदेशीर परवानगी मिळत नव्हती. विक्रम यांनी हार मानली नाही, त्यांनी सरकारकडे हे नियम बदलण्यासाठी अर्ज केला.

विक्रम यांनी सरकारकडे फक्त एक ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची मागणी केली. त्यांना आपले कौशल्य जगाला दाखवून द्यायचे होते, ते उत्तम गाडी चालवू शकतात हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते. बरेच प्रयत्न केल्यावर त्यांना सरकारने ड्रायव्हिंग टेस्टसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

शेवटी, विक्रमने आपल्या पायांनी गाडी चालवून यशस्वीपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंच.

लायसन्स मिळाल्यावर विक्रमचे नाव सर्वदूर पसरले. या अगोदर कोणीच पायाने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला पाहिले नव्हते. विक्रमची ओळख काही फक्त गाडी चालावण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ते उत्तम फुटबॉलपटू बनले आणि अनेक मोटिव्हेशनल सेमिनार्समध्ये त्यांनी भाषण केले. कधीच न झुकता आणि न थकता यश कसे मिळवता येते हे विक्रम यांनी दाखवून दिले.

त्यांनी अनेक कार रैलींमध्ये सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. विक्रम हे सर्व मिळवू शकले कारण त्यांनी कधीच प्रयत्न करणे थांबवले नाही. कधी हार मानली नाही. त्यांनी सदैव स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्यांच्यासमोर हार न मानता स्वतला सावरणे हाच खरा पुरुषार्थ आहे, हे विक्रम यांनी दाखवून दिले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या शहरातल्या घरांची एक खोली अमेरिकेत आहे तर दुसरी कॅनडात

Next Post

एंपरर अशोक: भारताचं पहिलंच जम्बो जेट अरबी समुद्रात कोसळलं होतं

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

एंपरर अशोक: भारताचं पहिलंच जम्बो जेट अरबी समुद्रात कोसळलं होतं

जगातलं एकमेव घर ज्याला दूरदूरपर्यंत एकही शेजारी नाही..!

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.