The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बलाढ्य अमेरिका व चीनी ड्रॅगनला या छोट्याशा देशाने यु*द्धाच्या मैदानात धूळ चारली होती!

by द पोस्टमन टीम
4 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


शीतयु*द्धाच्या काळात व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियाच्या भूमीवर तब्बल २० वर्ष एक यु*द्ध चालू होते. उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम यांच्यात झालेल्या या यु*द्धात चीन आणि सोव्हिएत संघाने उत्तर व्हिएतनामला पाठींबा दिला. तर अमेरिका, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनी दक्षिण व्हिएतनामला साथ दिली. २० वर्ष चाललेल्या या यु*द्धात लाखो सैनिकांचे प्राण गमावले. दोन्ही भागांमध्ये अक्षरशः रक्ताचे पाट वाहत होते.

नेमकं यु*द्ध कशावरून झालं? एवढी वर्षं चालण्यामागे कारण काय?

तर झालं असं की-

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान जापानने व्हिएतनामच्या अनेक भागांवर कब्जा मिळवला. हो ची मिन्ह यांनी चीनमध्ये एक पक्ष स्थापन केला होता. व्हिएत मिन्ह. हा पक्ष जापान आणि फ्रेंच राजवटीचा विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. जेव्हा जपानने व्हिएतनाममध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा या पक्षाने अमेरिका आणि चीनच्या मदतीने सडेतोड उत्तर दिलं. जपानचा पाडाव करून व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांना यश आलं. १९४५ साली हो ची मिन्हने पीपल्स काँग्रेससोबत मिळून एक अस्थायी सरकार स्थापन केलं.

स्वतंत्र सरकार स्थापन झाल्याचा आनंद सगळ्या व्हिएतनाममध्ये साजरा केला जात असतानाच एकीकडे चीनने व्हिएतनाममध्ये आपले सैन्य आणून हातपाय पसरायला सुरुवात केली. याचा अर्थ स्पष्ट होता. चीनने व्हिएतनामला “स्वातंत्र्य” मिळवून देण्यासाठी केलेली मदत हा एक डाव होता, व्हिएतनामला स्वतःच्या ताब्यात घेणे हा मूळ उद्देश होता. आणि अर्थातच चीनचा हा डाव रशियाला खूपत होता.



अशातच १९४६ साली फ्रांसने व्हिएतनामवर ह*ल्ला केला. व्हिएतनामला स्वतःच्या ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा होता. त्यांना वाटलं की व्हिएतनामला आपण सहज हरवू शकतो.

कैक महिने चाललेल्या या लढाईत ‘व्हिएत मिन्ह’ने फ्रान्सच्या नाकीनऊ आणले. आपण काही जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर फ्रान्सने हार मानली. याचाच परिणाम म्हणजे जगप्रसिद्ध ‘जिनेव्हा कन्वेन्शन’.

या कन्वेन्शननुसार व्हिएतनाम दोन भागात विभागला गेला. दक्षिण आणि उत्तर. या अंतर्गत फ्रेंच लोकांनी काही चीनी भागावरचा आपला हक्क सोडला. व्हिएतनामला फक्त स्वातंत्र्य हवं होतं. त्यांनी फ्रेंच सरकारच्या परतीसाठी मान्यता दिली. या सगळ्या गोंधळात अर्थातच चीनला देखील व्हिएतनाममधून काढता पाय घ्यावा लागला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

एवढं सगळं झाल्यावर आपल्याला असं वाटेल की व्हिएतनाममध्ये सगळं सुरळीत झालं असेल. पण असं काहीच झालं नाही. थोड्याच दिवसांत दोन्ही बाजूंना गोंधळ सुरु झाला. फाळणीनंतर मोठ्या संखेने लोक दक्षिणेतून उत्तरेकडे आणि उत्तरेतून दक्षिणेकडे येऊ लागले. हळूहळू ही संख्या वाढू लागली. दोन्ही सीमांवर या गोष्टीला विरोध होऊ लागला. सीमांतर्गत भागात अराजकता वाढू लागली.

या विरोधाचं रुपांतर यु*द्धात झालं. फ्रान्ससोबत तब्बल दहा वर्ष चाललेल्या या यु*द्धाला “पहिले इंडोचीन यु*द्ध” म्हटले गेले. फ्रेंच सैन्य संख्येने जास्ती होते पण व्हिएत मिन्हने त्यांना चोख उत्तर दिले. अथक प्रयत्न करूनही फ्रान्सला व्हिएत मिन्हला हरवता आलं नाही. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली.

१९४८ साली “हो ची मिन्ह”ला उत्तर व्हिएतनामचा तर व्हिएतनामचा राजा बाओ दाईने “न्गो दिन्ह दिएम” याला दक्षिण व्हिएतनामचा पंतप्रधान म्हणून नेमले.

पण, काही वर्षातच, १९५५ साली, “न्गो दिन्ह दिएम”ने अमेरिकेच्या मदतीने राजाला सत्तेवरून हटवून स्वतःला दक्षिण व्हिएतनामचा राष्ट्रपती घोषित केले. निवडणुका न घेता झालेल्या बदलाच्या विरोधात ‘व्हिएत मिन्ह’च्या समर्थकांनी सरकारविरोधात लोकांना भडकावण्याचे काम सुरु केले.

सरकारने आपल्या परीने हे सगळं थांबवण्याचे प्रयत्न चालू केले. आपलं आंदोलन मोडून पडण्यासाठी सरकार आपल्याला मारण्याचा डाव रचल्याचं लक्षात आल्याबरोबर व्हिएत मिन्हच्या कार्यकर्त्यांनी शहरापासून दूर जंगलाचा आसरा घेतला. जेणेकरून सरकारच्या लोकांना त्यांना शोधणं शक्य होणार नाही.

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे पण यात अमेरिकेचा काय संबंध?

सुरुवातीपासूनच व्हिएतनाममध्ये चीनच्या असणाऱ्या हस्तक्षेपामुळे अमेरिका घाबरली होती. कारण जर चीन व्हिएतनामवर आपला कब्जा मिळवण्यात यशस्वी झाला असता तर हळूहळू इतर कम्युनिस्ट देशांची ताकदसुद्धा वाढली असती. याच भीतीतून त्यांनी १९५५ मध्ये दक्षिण व्हिएतनाममध्ये आपले काही सल्लागार पाठवून तिथे आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. साधारण १९६४ दरम्यान त्यांनी उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये काड्या टाकून भांडणं लावायचा प्रयत्न केला. त्यांनी रशिया आणि चीनचा प्रभाव असलेल्या भागांना आपलं लक्ष्य बनवलं. त्यांच्या या भांडण लावण्याचा परिणाम असा झाला की आता दोन्ही भागांचे सैन्य एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले.

१९६५ साली अमेरिकेने उघडपणे या यु*द्धात भाग घेतला. आपल्या सैन्यासह फायटर विमानांना त्यांनी यु*द्धभूमीवर पाठवले. त्यांना व्हिएतनामला कम्युनिस्टांच्या हातात जाण्यापासून वाचवायचे होते, तर इकडे उत्तर व्हिएतनामला देशाला एक कम्युनिस्ट राष्ट्र बनवायचे होते.

पण दक्षिण व्हिएतनाममधील एक सशस्त्र कम्युनिस्ट संघटना, व्हिएत कॉंगने सरकारला जंगजंग पछाडलं होतं. कितीही प्रयत्न केले तरी सरकारला व्हिएत काँगला मात देणे शक्य होईना, शेवटी अमेरिकेने स्वतःच याचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं. आता अमेरिकेकडे कितीही आधुनिक शस्त्रं असले तरीही जंगलात लपून लढा देणाऱ्या व्हिएत काँगपुढे ते फिकेच ठरले.

व्हिएत काँगच्या लोकांनी जमिनीच्या खाली एक सुरंग खणलं होतं. अमेरिकेच्या सैन्यावर ते गाफील असताना ह*ल्ला करून ते या सुरंगात लपून बसत. त्याला त्यांनी तारेने झाकून ठेवलं होतं, म्हणजे जरी अमेरिकी सैन्य तिथे आले तरी ते सुरंगात घुसू शकणार नाही.

अमेरिकेच्या सैनिकांनी  व्हिएत काँगच्या लोकांच्या मागे जात या सुरंगात घुसण्यात यश मिळवलेच. आत गेलेले सैनिक जिवंत परतले नाही ही गोष्ट वेगळी.

याने तर अमेरिका अजून अस्वस्थ झाली. काहीही केलं तरी व्हिएत काँगला जमिनीवर हरवणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी हवाई ह*ल्ला करण्याचं ठरवलं. आपले फायटर विमानं वापरून त्यांनी बॉ*म्बह*ल्ले करण्यास सुरुवात केली. पण यासाठी देखील व्हिएत कॉंगचे लोक तयार होते. बॉ*म्बह*ल्ले चुकवण्यासाठी ते सुरंगात जाऊन लपत.

कितीही बॉ*म्ब टाकले तरी ते सुरंग काही फुटेना. व्हिएत काँगच्या सैनिकांनी तब्बल एक वर्ष अशाच प्रकारे अमेरिकेला छळले. शेवटी अमेरिकेने पूर्ण ताकदीनिशी एकच ह*ल्ला चढवला. आता मात्र व्हिएत काँगचे सैनिक वाचू शकले नाही.

व्हिएत काँगला हरवण्यासाठी अमेरिकेने आपले तब्बल ५ लाख सैनिक या यु*द्धात पाठवले. अमेरिकेच्या या आक्र*मणामुळे तिथले स्थानिक लोक नाराज झाले. जगभरातून अमेरिकेवर टीका होऊ लागली. नागरिक अमेरिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले. शेवटी १९७३ साली अमेरिकेने आपले सैन्य परत बोलावून घेतले.

या यु*द्धात ३० लाखाहून अधिक सैनिक मारले गेले. तब्बल २० वर्ष चाललेल्या या यु*द्धात कुणीच जिंकलं नाही. अमेरिकेचे सैन्य परतल्यावर कम्युनिस्टांनी व्हिएतनामवर आपला ताबा मिळवला. आणि १९७५ साली तिथे व्हिएतनामला सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम म्हणून घोषित करण्यात आलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

खिशातला वितळणारा चॉकलेट बार बघून त्याला मायक्रोव्हेव तयार करण्याची कल्पना सुचली

Next Post

पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचे संबंध नेमके कसे होते ?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचे संबंध नेमके कसे होते ?

१९७१ च्या यु*द्धात भारताने पाकिस्तानला हरवले म्हणून कंपनीने स्कुटरचे 'विजय सुपर' नाव ठेवले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.