The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

७१च्या यु*द्धात या अधिकाऱ्याने एक जुगाड केला आणि आपला विजय सोपा झाला

by द पोस्टमन टीम
26 May 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


यु*द्ध, मग ते कुठलेही असो, त्याच्याशी खूप साऱ्या रोमांचक, साहसी, हजरजबाबी, धैर्य, कुशलता, नेतृत्व आणि बौद्धिक कसोटी पाहणाऱ्या कथांनी भरलेले असते.

अशा कथा नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतात. कोणत्याही काठीण प्रसंगातही थोड्याश्या धीराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने काही निर्णय कसे आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत करू शकतात, याची अनेक उदाहरणे अशा यु*द्ध कथांमध्ये आपल्याला सापडू शकतात.

उलट, आपल्या ताकदीचा फाजील आत्मविश्वास आणि आत्मप्रौढी कशी रसातळाला पोचोवू शकते, हेही या कथा आपल्याला सांगत असतात.

एकूण यु*द्ध कथा या आपल्याला मानवी अहंकारातून निर्माण होणाऱ्या क्रौ*र्यातून किती मोठा सं*हार उद्भवू शकतो आणि संपूर्ण मानवजातीवर आणि येणाऱ्या पिढ्यांवर त्याचे किती दूरगामी दूष्परिणाम होऊ शकतात, हे देखील सांगत असतात. पण, समोर ठाकलेल्या प्रसंगाशी दोन हात करण्याची वेळ तर प्रत्येकावरच येते त्यासाठी हातात शास्त्र घेऊन मैदानात उतरलेच पाहिजे, असं अजिबात नाही.



असेच एक ऐतिहासिक यु*द्ध १९१७ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झाले होते. पूर्व पाकिस्तानच्या या स्वातंत्र्यलढ्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आणि पाकिस्तानपासून बांग्लादेश स्वतंत्र झाला.

१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान सैन्याने शरणागती पत्करल्याचे जाहीर करताच, या यु*द्धाला पूर्णविराम मिळाला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

३ डिसेंबर १९७१ रोजी या यु*द्धाला तोंड फुटल्यानंतर, पश्चिम आणि पूर्व भागात दोन्हीकडे विमानह*ल्ले सुरु करण्यात आले. या लढाईत विजय मिळवून देण्यात या भारतीय हवाईदलाचे योगदान फारच मोलाचे होते.

हवाई दलाच्या ४४ स्क्वॉड्रन या तुकडीला नंतर एक महावीर चक्र आणि तीन वीरचक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला.

गुवाहाटीच्या विमानतळावर कॅरीबौ वाहतून विमानाची एक तुकडी होती. आता हे विमान लष्करी सेवेतून निकामी करण्यात आले आहे. या वाहतूक विमानच्या सहाय्याने प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर सैन्याला लागणारी इतर कुमक आणि तरतुदी पुरवण्याची तसेच संकट काळी सैन्याची सोडवणूक करण्याची जबाबदारी होती.

या विमानाची गती फक्त २१६ मी/तास. इतकीची होती. तरीही थोड्या थोड्या अंतरावर लँडींग करण्याची क्षमता या विमानात होती. ३ आणि ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने ह*ल्ले सुरु केल्यानंतर भारतीय नौदलाला देखील प्रत्यक्ष यु*द्धात उतरावे लागले.

६ डिसेंबर रोजी धाक्याच्या तेजगांव विमानतळावरुन पाकिस्तानी वैमानिकांना सेबर लढाऊ विमाने उडवता येऊ नयेत म्हणून त्या विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ मोठे खड्डे खोदण्यात आले. दुसऱ्या दिवशी रात्री पाकिस्तानी सैन्याने हे खड्डे भरून काढले आणि धावपट्टीची दुरुस्ती करून घेतली.

भारतीय सैनिकांनी पुन्हा तिथे काही खड्डे निर्माण केले. आता ती धावपट्टी अजिबात दुरुस्तच करता येऊ नये आणि विमानांचे उड्डाण रोखण्यासाठी या धावपट्टीवर सतत बॉ*म्ब ह*ल्ले सुरु ठेवणे आवश्यक होते.

तेव्हा ग्रुप कॅप्टन व्ही. सी. मान्कोटीया यांनी या कॅरीबौ वाहतूक विमानालाच बॉ*म्बर बनवण्याची कल्पना मांडली.

कॅप्टन मान्कोटीया यांची १९७० च्या सुमारास गुवाहाटीजवळील बोरझार येथील हवाई दलाच्या तळावर स्टेशन कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी, डकोता, पॅकेट, ऑट्टर, सुपर कान्स्टेलेशन, आयएल-१४, एचएस ७४८ आणि एएन-१२ आणि शेवटी कॅरीबौ अशी सर्व प्रकारच्या वाहतुकीची विमाने चालवली होती.

जेव्हा त्यांनी कॅरीबौ या वाहतूक विमानाचेच बॉ*म्बरमध्ये रुपांतर करण्याचे ठरवले तेव्हा सुरुवातीला तरी, ही कल्पना अशक्यप्राय वाटली होती. परंतु, एअर कमांडला या कल्पनेतील हुशारी लक्षात आली आणि त्यांनी या दिशेने प्रयत्न करण्यास अनुमुती दिली.

या कॅरीबौच्या मदतीने पाकिस्तानी वैमानिकांना त्रास देणे आणि त्यांना धावपट्टी दुरुस्त करण्याची संधी न देणे हेच एकमेव उद्दिष्ट होते.

अर्थात, कॅरीबौ चालवणाऱ्या वैमानिकांनी देखील या कल्पनेला पाठींबा दर्शवला आणि त्यांनी ही विमाने रात्रीच्या वेळी शत्रूच्या इलाख्यात उडवण्याची तयारी देखील दाखवली. अर्थात, त्यांना बॉ*म्बिंगसाठी आवश्यक तंत्र शिकून घेणे गरजेचे होते, मात्र त्यांनी त्यासाठी देखील तयारी दाखवली.

७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या गडद अंधारात चार कॅरीबौ विमाने बॉ*म्बिंग मिशनवर गेली. त्यांचे लक्ष्य होते, तेजगांव विमानतळ *ध्वस्त करणे. अर्थात रात्रीच्या वेळी कॅरीबौ विमाने चालवणे म्हणजे अत्यंत धोकादायक कामगिरी होती.

कारण ही काही विमाने नव्हती, त्यात बॉ*म्बिंगसाठी आवश्यक असणारी कोणतीही सुविधा देखील नव्हती.

विमाने उडवणाऱ्या वैमानिकांना फारच दक्ष राहून ही कारवाई पूर्ण करायची होती. महत्त्वाचे म्हणजे शत्रूच्या रडारपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे होते. अर्थात, या लढाऊ तुकडीला रात्रीच्या अंधारात, पॅराड्रॉप करण्याचा अनुभव होता, पण रात्रीच्या वेळी कोणत्याही खुणा स्पष्ट ओळखू येत नव्हत्या.

ढाक्यापासून जवळच्या अंतरावरूनच या विमानांनी आपल्या उद्देशाला आकार देण्यासाठी ६५०० फुटावर पोचण्याची कसरत सुरु केली. यामुळे विमाने पाडणाऱ्या शत्रूच्या ग*न्सपासून त्यांना सुरक्षा मिळणार होती.

अर्थात, संपूर्ण मिशन फत्ते होईपर्यंत विमान स्थिर ठेवण्याची गरज होती. कोणतीही गडबडीची हालचाल झाली असती, तर बॉ*म्ब खाली पडण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले असते.

सुदैवाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या अंधारातही तेजगांवची ती धावपट्टी रात्रीच्या अंधारातही स्पष्टपणे ओळखू येत होती. बॉ*म्ब पाडण्यासाठी त्या विमानांजवळ कोणतीच इलेक्ट्रॉनिक साधन नव्हते.

बॉ*म्ब पडण्यासाठी वैमानिकांनी आपल्या अंदाजानुसारच कामगिरी पार पडली.

प्रत्येक विमानाने गुवाहाटी विमानतळावर परत येण्यापूर्वी, दहा १००० एलबी इतके बॉ*म्ब त्या धावपट्टीवर पाडले होते. हे मिशन पूर्ण करण्यास कॅरीबौ विमानांना चार तासापेक्षाही जास्त काळाचा अवधी लागला. तरीही मिशन पूर्ण होताच, चारही विमाने सुरक्षितपणे परतली होती. कॅरीबौ विमानांद्वारे पाकिस्तानच्या हवाईदलाला त्रास देणे हाच या मिशन मागचा उद्देश होता.

अर्थात, हा उद्देश सफल करण्यात त्यांना यश आले होते. त्या रात्री पाकिस्तानी हवाईदलाची अक्षरश: झोप उडाली होती. पाकिस्तानी हवाई दलाला रात्रभर थोडी देखील उसंत मिळाली नव्हती.

या मिशनमध्ये विंग कमांडर सेन, व्हीपीएस गील, देलींदर कोहली आणि राजेश पायलट या बहाद्दूर वैमानिकांचा सहभाग होता.

अशाच पद्धतीने सलग तीन रात्री तेजगांव धावपट्टी आणि विमानतळाच्या परिसरात बॉ*म्ब ह*ल्ले करण्यात आले. ब्राह्मबांरीया येथील पाकिस्तानी ब्रिगेडच्या तळावर देखील दोन रात्री ह*ल्ले करण्यात आले.

धीम्या गतीने उडणाऱ्या आणि खास फक्त वाहतुकीसाठी बनवण्यात आलेल्या अशा विमानांच्या सहाय्याने शत्रूच्या प्रदेशात घुसून उंचावरून बॉ*म्ब हल्ला करण्याची ही कल्पनाच इतकी धोकादायक होती, की नुसत्या कल्पनेनेही एखाद्याची झोप उडाली होती.

पण, कॅरीबौच्या या यशस्वी ह*ल्ल्यांनी भारताच्या विजयाचा रस्ता सुकर केला, नव्हे तर या विमानाच्या या ह*ल्ल्यांनीच भारताकडे विजयश्री खेचून आणली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मोक्याच्या क्षणी आत्मविश्वास ढळू न देता, आपल्या कल्पनेवर दृढश्रद्धा ठेवत आणि त्यासाठी धैर्य दाखवत या वैमानिकांनी जीवाची बाजी लावून दाखवलेले हे अतुलनीय शौर्य पाहून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत.

भारतीय हवाई दलाने कॅप्टन मान्कोटीया यांच्या या शौर्याची दाखल घेत त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅरीबौसारख्या विमानांचा लढाऊ विमानाप्रमाणे यु*द्धात वापर करणे ही कल्पनाच मोठी सहसाची होती, ज्यात यश देखील आले.

१६ डिसेंबर १९७१ रोजी या यु*द्धाला पूर्ण विराम मिळाला असला, तरी, या यु*द्धातील भारतीय हवाईदलाची भूमिका आणि कार्य अत्यंत अतुलनीय होते. भारतीय हवाईदलाच्या साहसी प्रयत्नामुळेच भारताला हा विजय मिळवणे सहज शक्य झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

Tags: India Vs Pakistan
ShareTweet
Previous Post

इतिहास, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता आणि रोमिला थापर

Next Post

घटनेच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलेचा विस्मृतीत गेलेला इतिहास

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

घटनेच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलेचा विस्मृतीत गेलेला इतिहास

fake rape feature

खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात तो तब्बल १३ वर्ष जेलमध्ये होता!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.