The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून इम्रान खानने पाकिस्तानची लाज काढलीये!

by द पोस्टमन टीम
18 May 2022
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पाकिस्तानचे सत्ताधीश, मग ते लष्करशहा असोत वा हुकूमशहा किंवा लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते, त्यांच्या स्वार्थी, बेजबाबदार आणि बेबंद वागण्यासाठी नेहेमीच चर्चेत राहिले आहेत. देशाचं आणि जनतेचं हित पाहण्यापेक्षा स्वहितावर डोळा ठेऊन प्रत्येक कृती करण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. स्वतःच्या तुंबड्या तुडुंब भरणं हेच त्यांचं उद्दीष्ट राहिलं आहे.

क्रिकेटच्या क्षेत्रात एक यशस्वी कर्णधार म्हणून आणि फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणारे वेगवान गोलंदाज म्हणून जगभरात मशहूर असलेले इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला मोठी स्वप्न दाखवत पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली. मात्र, राजकारणाचा खेळ काही त्यांच्या पुरेसा पचनी पडलेला नाही. त्यांना आपल्या कार्यकाळात जनतेचं काही भलं करता आलेलंच नाही; पण स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा प्रयत्नही त्यांच्या अंगलट आला आहे.

पाकिस्तानच्या बहुतेक सगळ्या सत्ताधीशांनी ‘तटस्थ’ भूमिका घेणाऱ्या भारताचा बागुलबुवा उभा करून अमेरीका आणि सौदी अरेबिया यांच्यासारख्या देशांच्या वळचणीला जाऊन बसणं पसंत केलं. त्यांच्याकडून आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत घेतली.

त्या निधीपैकी बहुतेक निधी देशाच्या तिजोरीत जाण्याऐवजी सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी यांच्या तुंबड्या भरण्यात खर्च झाला शस्त्रास्त्रांच्या मदतीपैकी बहुतेक शस्त्रास्त्र जगभरातल्या; विशेषतः भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांना देण्यात आली. त्याच्यातून आलेला पैसाही याच मुखंडांनी घशात घातला.



पाकिस्तान अक्षरश: भिकेला लागलेला असताना इम्रान खान यांना लाजिरवाण्या पद्धतीने पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं. नव्यानं सत्तेवर आलेल्या पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारने सत्तेवर येताच इमरान खान यांचा पहिला घोटाळा उघड केला आहे.

रकमेच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास तो परकीय निधीचा अपहार किंवा शस्त्रास्त्रांची विक्री यापेक्षा अगदीच किरकोळ म्हणावा लागेल. तरीही तो त्यापेक्षाही अधिक लाजीरवाणा ठरला आहे. म्हणूनच त्याची चर्चाही अधिक होत आहे.

इम्रान खान यांचा हा घोटाळा ‘तोशखाना घोटाळा’ म्हणून ओळखला जात आहे. तोशखाना याचा शब्दशः अर्थ बादशहा, अमीर-उमराव, सत्ताधारी यांना मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू किंवा किंमती कपडे ठेवण्याचं दालन! सध्याच्या काळातही विविध देशांचे नेते, सत्ताधीश दुसऱ्या देशांचे दौरे करतात त्यावेळी तिथल्या सत्ताधीशांना अनेक मौल्यवान वस्तू भेट म्हणून देतात. त्याचप्रमाणे आपल्या देशात आलेल्या राजकीय पाहुण्यांकडून त्या त्या देशाच्या प्रमुखांना मौल्यवान भेटी दिल्या जातात.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

अशाच प्रकारे इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून केलेल्या विदेश दौऱ्यांमध्ये त्यांना मिळालेल्या आणि इतर देशातून आलेल्या पाहुण्यांनी त्यांना दिलेल्या भेटवस्तूंचा चक्क लिलाव केला आणि त्यापासून लक्षावधी पाकिस्तानी रुपये कमावले, असा खान यांच्यावर आरोप आहे.

या लिलावातून इम्रान खान यांना तब्बल १४२ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांची कमाई झाली आणि नियमानुसार या वस्तूंच्या किंमतींपैकी ५० टक्के रकमेऐवजी २० टक्के रक्कम त्यांनी सरकारी खजिन्यात जमा केली; असा दावाही केला जात आहे.

विशेष म्हणजे इम्रान खान यांनी या आरोपाचे खंडन करण्याचा जराही प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी आपण भेटवस्तूंचा लिलाव केल्याचं केवळ मान्यच केलं नाही तर त्याचं निर्लज्जपणे समर्थनही केलं आहे. आपल्या या कृत्याचं समर्थन करताना त्यांनी, ‘या भेटवस्तू मला मिळालेल्या होत्या. त्या विकायच्या की त्याचं काय करायचं ही माझी मर्जी;’ (मेरा तोहफा, मेरी मर्जी) अशी उद्दाम मुक्ताफळंही उधळली आहेत.

मी मला मिळालेल्या भेटवस्तू तोशखान्यात जमा केल्या आहेत. मी जे काही घेतलं त्याच्या नोंदी तोशखान्यात आहेत. मी नियमानुसार मूळ किंमतीच्या ५० टक्के रक्कम भरून या भेटवस्तू खरेदी केल्या आहेत, अशा शब्दात स्वतःचे समर्थन करतानाच इम्रान खान यांनी त्यांचं एकेकाळचं ‘पोशिंदा’ असलेल्या पाक लष्कराचीही कळ काढली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना संरक्षण गृहनिर्माण प्राधिकरणाच्या माध्यमातून (DHA) भूखंड मिळतात, परंतु, त्यांची कधीही चौकशी केली जात नाही, असंही ते म्हणाले आहेत.

मात्र, इस्लामाबाद उच्च न्यायालयालाने इम्रान खान यांच्या या निर्लज्ज उद्दामपणाला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी सरकारांकडून अथवा राजनैतिक अधिकारी, पदाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान अथवा अन्य सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तू या त्यांना व्यक्तीश: दिलेल्या नसतात तर पाकिस्तान देशाच्या; सरकारी मालमत्ता असतात; असं न्यायालयाने इम्रान खान यांना सुनावलं आहे.

इम्रान खान यांना त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या भेटवस्तूंचा तपशील सार्वजनिक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. अत्यल्प रक्कम भरून सरकारी भेटवस्तू विकण्याचे कोणतेही धोरण समर्थनीय असूच शकत नाही. भेटवस्तूची विक्री करण्याचं धोरण देशाची लाज काढणार आहे, अशी टिपण्णीही न्यायालयाने केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. देश कर्जात बुडालेला असताना माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अशा प्रकारे भेटवस्तूंचा लिलाव करून सरकारी तोशाखान्यावर डल्ला मारण्याचं काम केलं आहे. मात्र, त्यांनी या भेटवस्तूंचं नेमकं काय केलं; याचा लेखाजोखा त्यांना मांडावाच लागेल, असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.

इम्रान खान यांना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत विविध देशांच्या नेत्यांकडून १४० दशलक्ष पाकिस्तानी रुपये किमतीच्या ५८ भेटवस्तू मिळाल्या. पाकिस्तानी पत्रकार असद अली तूर यांनी इम्रान खान यांना त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या भेटवस्तूंच्या अधिकृत नोंदींचे विशेष तपशील जाहीर केले आहेत.

सध्याच्या काळात राजकारणाची नाळ समाजकारणाशी तुटलेली आहे. राजकारण हे समाजाच्या सेवेसाठी देशाच्या विकासासाठीचं साधन न राहता ते स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं एक प्रभावी साधन बनलं आहे. विशेषतः पाकिस्तानसारख्या कायम दुसऱ्या देशांच्या कुबड्या घेऊन जगणाऱ्या देशांतल्या नेत्यांची ही मानसिकता पूर्वापार दिसून येत आहे. मात्र, खोट्याच्या बुरख्याआड दीर्घकाळ लपून राहता येत नाही, हे पाकिस्तानाच्याच उदाहरणावरून दिसून येत आहे.

पाकिस्तानचं काळं अंतरंग माहिती असूनही दीर्घकाळ त्याला पोसणारी अमेरिकाही आता पाकिस्तानवर खार खाऊन आहे. त्यामुळे संधिसाधू पाकिस्तान आता चीनच्या पदराआड लपू पहात आहे. मात्र, चीनच्या आश्रयाला जाणं म्हणजे अजगराच्या तोंडात मान सरकवण्यासारखं आहे, हे ही लवकरच दिसून आल्याशिवाय राहणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जगातील शेवटचा ना*झी आयुष्यभर लपून राहिला, पण सत्य समोर आलंच..!

Next Post

रशिया दुसऱ्या महायु*द्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

20 January 2024
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

रशिया दुसऱ्या महायु*द्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.