The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिंकन यांनी पॉप्युलर केलेल्या टॉपहॅटने एका प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवलं आहे

by द पोस्टमन टीम
21 May 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“टॉप-हॅट” म्हणलं की साहजिकच आपल्यासमोर उभी राहते ती अमेरिकेचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची छबी आणि त्यांचा तो रुबाब. टॉप-हॅटमुळे त्यांचा पेहराव खुलून दिसायचा.

असं म्हणतात की, पेशाने वकील असणारे लिंकनसाहेब त्यांच्या टॉपहॅटमध्ये अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे ठेवत असत.

आता ही गोष्ट किती खरी किती खोटी हे लिंकनसाहेबांनाच माहिती, पण नक्कीच टॉपहॅटचा वापर कागदपत्रे ठेवण्यासाठी करण्याइतके लिंकनसाहेब हुशार नक्कीच होते.

पण ही टॉपहॅट कोणी शोधून काढली, ती एवढी लोकप्रिय का झाली, तसेच फॅशन जगतात तिचा “ट्रेंड” कोणी केला?



गोष्ट अशी आहे की, १७९७ सालच्या एका सकाळी, सेंट जेम्समध्ये एक माणूस डोक्यावर काहीतरी मोठं घालून येत असतो. त्याला पाहून लोकं एवढे घाबरतात, सैरावैरा पळू लागतात, कुत्रे त्या माणसावर भुंकायला लागतात, काही स्त्रिया तर रस्त्यावरच बेशुद्ध पडतात. या सगळ्या पळापळीत बिचाऱ्या एका मुलाचा हात मोडतो. शेवटी लोकांना शांत करण्यासाठी स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात येतं.

त्या टोपी घालणाऱ्या माणसाचं नाव असतं “जॉन हेथरिंगटन”. आता पेशाने छोटे-छोटे कपडे शिवणाऱ्या जॉनला या घटनेसाठी धाडसी म्हणावं की मूर्ख? ही कथा खूप प्रचलित आहे. पण अजूनही ही कथा किती सत्य आहे याबद्दल संशयच आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ही कथा १८९९ च्या “Hatters Gazette” या अंकात प्रकाशित झाली होती आणि त्यानंतर बऱ्याचदा विविध मासिकांमधूनसुद्धा ही कथा प्रकाशित करण्यात आली. त्या कथेबद्दल काही समकालीन कागदपत्रांचा पुरावा नक्कीच आहे पण त्यांची सत्यतासुद्धा संशयास्पदच आहे. पण काहीही असेना सत्य कथा असो व नसो.

ज्याने कोणी ही हॅट पहिल्यांदा घातली असेल, त्याला पाहून लोकं नक्कीच अचंबित झाले असणार.

जसे आजकाल “फाटक्या जीन्स” फॅशन म्हणून घालणाऱ्या आपल्या पिढीला पाहून आपले घरचे होतात अगदी तसेच. गरीब बिचाऱ्या जॉनला मात्र या गोष्टीसाठी मोठा दंड झाला होता.

दंडाबद्दल जेव्हा ब्रिटनचा राजा जॉर्ज चौथा याला कळलं, तेव्हा त्याने तशी एक हॅट बनवून घेतली आणि स्वतः ऑपेराला परिधान करून गेला. ज्यामुळे त्या हॅटला एकप्रकारचं राजाश्रय मिळाला, शिवाय राजानीच हॅट घातल्यामुळे लोकांमध्येसुद्धा एक प्रतिष्ठेची ओळख म्हणून ही हॅट प्रसिद्ध झाली.

आता लोक ऑपेराला जाताना खास अशीच हॅट घालायला लागले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे हेथरिंगटनला दंड भरण्यास मदत झाली.

त्याकाळात या टोपीची मागणी एवढी वाढली की ऑपेराला बसल्यावर आपली टोपी सांभाळण्यासाठी लोकं एखाद्याला कामावर ठेवू लागले.

आजकाल जर कोणी अशी टोपी घालून नाटकाला गेलं तर त्याचा निम्मा वेळ मागच्या लोकांची बोलणी ऐकून घेण्यातच जाईल.

टॉपहॅटमुळे मात्र एक गोष्ट चांगली घडली “बीव्हर” नावाच्या प्राण्यांना जीवदान मिळालं. टॉपहॅट बाजारात यायच्या आधी ज्या टोप्या वापरल्या जायच्या त्यांना बनवण्यासाठी बीव्हरपासून मिळणाऱ्या लोकरीचा वापर केला जायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बीव्हरची शिकार केली जात होती.

ब्रिटनमध्ये तर या शिकारी एवढ्या वाढल्या होत्या की बीव्हर अक्षरशः नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होते. अमेरिकेतसुद्धा आता बीव्हरची शिकार या लोकरीसाठी व्हायला सुरुवात झाली होती. पण टॉपहॅट बाजारात आली आणि लोकांनी बीव्हरची शिकार करणं थांबवलं.

अठराव्या शतकात ब्रिटनचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांनी टॉपहॅटमध्ये काही बदल करून नव्याने स्थापन केलेल्या महानगर पोलिस दलाच्या गणवेशात सामील केले. त्या पोलिसांना तेव्हा “पिलर्स” किंवा “बॉबीज” असं म्हणत.

पिलर्स कारण पीलने गणवेशात समावेश केला आहे म्हणून. “बॉबीज” कारण या टोप्यांमुळे हे पोलीस गर्दीतसुद्धा लांबून ओळखू ह्यायचे.

पोलिसांच्या टोप्या या एवढ्या मजबूत होत्या की जर एखाद्याचा पाठलाग करताना त्यांना कशावर चढावं लागलं, तर ते टोपीवर उभे राहून चढत असत. लोकांना उद्देशून भाषण करताना, लांबून लोकांना दिसावं म्हणून पोलीस याच टोपीवर उभे राहून लोकांना संबोधत.

अब्राहम लिंकन आणि त्यांची टॉपहॅट याबद्दल तर आपल्याला माहिती आहेच, पण त्याचसोबत अजून अनेक प्रतिष्ठित लोकांच्या कथा या टॉपहॅटशी जोडलेल्या आहेत.

त्यापैकीच एक आहेत अमेरिकेचे सर्वात यशस्वी बँकर जे. पी. मॉर्गन.

आजही जे. पी. मॉर्गन यांची वित्त कंपनी जगातील अग्रगण्य कंपनी आहे. मॉर्गन यांनासुद्धा टॉपहॅटचा खूप लळा होता. त्यांचं या टॉपहॅटवर एवढं प्रेम होत की टॉपहॅटसाठी त्यांनी आपल्या लिमौझिन कारचं छत उंच करून घेतलं होतं.

आपण जादूचे प्रयोग पाहताना नेहमी पाहतो की जादूगार अशाच टॉपहॅटचा वापर करून त्यातून काही वस्तू किंवा प्राणी बाहेर काढत असतो.

जादूच्या प्रयोगात टॉपहॅटचा सर्वात प्रथम वापर केला तो, फ्रेंच जादूगार “लुई कॉम्ते”ने १८१४ साली.

तिथून पुढे तर जादूगार आणि टॉपहॅट हे समीकरणच बनलं. म्हणजे तुम्ही जादूगार आहात हे पटवून देण्यासाठी तुम्हाला टॉपहॅट घातलीच पाहिजे.

टॉपहॅटची लोकप्रियता एवढी होती की अमेरिकेची ओळख असलेला ‘अंकल सॅम’सुद्धा टॉपहॅट घालूनच असतो. सुप्रसिद्ध अमेरिकन विनोदवीर ‘हरपो मार्क्स’सुद्धा त्याच्या टॉपहॅटशिवाय कुठलाच कार्यक्रम करत नव्हता.

आजही पाश्चिमात्त्य देशात जर कोणी टॉपहॅट घालून आला, तर लोक त्याला अदबीने पाहतात. अजूनही इंग्लडमध्ये घोड्याच्या शर्यतीच्या वेळी बरेच लोक ही टॉपहॅट घालतात.

एकेकाळी प्रतिष्ठेची ओळख असलेली टॉपहॅट काळानुरूप पडद्याआड निघून गेली. प्रत्येक माणसाला वेड लावलेल्या या टोपीला आता फक्त जादूगार लोकं ससा बाहेर काढण्यासाठीच वापरतात.

तुम्ही जर कुठल्या जादूगाराला यानंतर टॉपहॅट घालून जादूचे प्रयोग करताना बघितले तर ती नेमकी कुठून जन्माला आली हे नक्की आठवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Abraham LincolnTop hat history
ShareTweet
Previous Post

समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत कबीरांनी मृत्यूसाठी मगहर हे ठिकाण निवडले

Next Post

भारतात आढळलेल्या डायनासॉरची नावं काय आहेत तुम्हाला माहिती आहे का..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

भारतात आढळलेल्या डायनासॉरची नावं काय आहेत तुम्हाला माहिती आहे का..?

भारतात हरवलेल्या 'या' आफ्रिकन जमातीला भारतासाठी ऑलम्पिक मेडल जिंकायचंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.