The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थॉमस एडिसनच्या या फोनने आपण आत्म्यांशी संवाद साधू शकलो असतो..!

by द पोस्टमन टीम
11 December 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कधीकाळी शाळेतून मंदबुध्दी विद्यार्थी असा शिक्का मारून थॉमस एडिसनला शाळेतून अक्षरशः काढून टाकण्यात आलं होतं. याच एडिसननं पुढे जाऊन अनेक असे शोध लावले की भल्या भल्यांना त्यानं चकीत करून टाकलं. विजेवर चालणारा बल्ब शोधून काढणार्‍या एडिसननं आणखीन एक चमत्कारीक शोध जवळपास लावला होता आणि हा शोध होता आत्म्यांशी संवाद साधू शकणारा टेलीफ़ोन.

मार्कांचे डोंगर आणि जीवघेणी स्पर्धा यात दोन तीन पिढ्यांचे पालक इतके अडकले आहेत की या पलिकडे जाऊनही आयुष्यात काही करता येणं शक्य आहे हे ना त्यांना कळतं ना त्यांच्या पाल्यांना. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांना शालेय जीवनात मंद, ढ म्हणून ओळखलं गेलं मात्र पुढे जाऊन त्यांनी जगापुढे रोल मॉडेल म्हणून आपलं अस्तित्व निर्माण केलं. त्यापैकीच एक नाव थॉमस एडिसन.

याच एडिसननं पुढे जाऊन जगाला वीजेवर चालणारा बल्ब शोधून दिला आणि ही एक प्रकारची क्रांती मानली गेली. आजही आपण त्याच्या या शोधाबद्दल त्याचे ऋणी आहोत. थॉमसकडे पुस्तकी अभ्यासातली बुध्दी नसली तरीही त्याचा मेंदू भल्या भल्यांना चकीत करणारा होता. चिकाटी आणि सातत्य हे दुर्मिळ गुण त्याच्या अंगी होते आणि म्हणूनच अनेक शोध लावणं त्याला शक्य झालं.

त्याच्या नावावर जो लोकप्रिय शोध आहे, विजेच्या बल्बचा, तो शोधही यशस्वी होण्यापूर्वी त्यानं जवळपास किमान हजारोवेळा अयशस्वी प्रयत्न केले होते. कोणी तरी त्याला विचारलं की, हजारो वेळा केलेले प्रयोग अयशस्वी झाल्याचं तुम्हाला दु:ख होत नाही का? यावर एडिसननं हसून उत्तर दिलं होतं,



छे! अजिबातच नाही. कारण तुम्हाला जे अयशस्वी प्रयोग वाटतात ते माझ्यासाठी एक हजार मार्ग होते ज्या मार्गानी बल्ब बनवला जाऊ शकतो. माझा प्रत्येक प्रयोग हा यशस्वी प्रयोगाकडे एक पुढचं पाऊल असतो त्यामुळेच मी त्यांच्याकडे उलट कृतज्ञतेनं बघतो.

एखादा असता तर तो इतक्यांदा अपयश मिळाल्यावार खचून गेला असता मात्र एडिसन चिकाटीनं प्रयत्न करतच राहिला आणि त्याला यश मिळालं.

हे यश कसं मिळालं? याचीही एक रोचक कथा सांगितली जाते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

झालं असं की, ते सतत कामात व्यस्त रहात हे पाहून एक दिवस त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की तुम्ही स्वत:कडे अजिबातच लक्ष देत नाही हे काही बरं नाही. आता तुम्ही खरंतर थोडे दिवस सुट्टी घ्यायला हवी आहे. यावर एडिसननी विचारलं की ठीक आहे पण सुट्टी घेऊन मी जाऊ कुठे? पत्नीनं हसून उत्तर दिलं, इतकं मोठं जग आहे, जिथे तुम्हाला मनापासून आनंद होईल अशा ठिकाणी जा. यावर थॉमस विचारात पडले. दुसर्‍या दिवशी सकाळी ते आवरून तयार झाले. पत्नीनं आश्चर्याने विचारलं की तुमचं जायचं ठिकाण ठरलंही? यावर थॉमस हसून हो म्हणाले आणि त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे ओल्ड लायब्ररीत गेले. या सुट्टीदरम्यान अनेक वर्षं रखडलेला त्यांचा बल्बचा प्रयोग यशस्वी झाला.

अशा या महान शास्त्रज्ञाचा जन्म ११ फ़ेब्रुवारी १८४७ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. एडिसनच्या नावावर १०९३ शोधांचे पेटंट आहेत. यापैकी विजेचा बल्बचा शोध सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. एडिसननं त्याची पहिली वहिली प्रयोगशाळा वयाच्या दहाव्या वर्षीच बनवली होती. त्यांच्या आईनं त्यांना रासायनिक प्रयोग असणारं एक पुस्तक दिलं होतं. यातले प्रयोग करत रहाणं हा त्याचा छंद होता.

पुस्तकातले प्रयोग करता करता थॉमस स्वत:च्या बुध्दीनं काही प्रयोग करू लागला आणि यासाठी लागणारे पैसे तो ट्रेनमध्ये भाजी आणि वर्तमान पत्रं विकून कमावत असे. एखादा प्रयोग अंतिम टप्प्यात आला की एडिसनला जेवण खाण्याची, झोपेचीही शुध्द रहात नसे. रात्रंदिवस खोलीत कोंडून घेऊन तो फ़क्त त्यावरच काम करत राही.

१८७९ ते १९०० पर्यंत एडिसन यांनी त्यांचे बहुतेक सगळे शोध लावून टाकले होतेच शिवाय तो एक श्रीमंत व्यापारीही बनले होते. आज दुकानात तीस चाळीस रुपयांना मिळणारा बल्ब एडिसननी पहिल्यांदा बनविला तेंव्हा त्याला तब्बल ४० हजार डॉलर्स इतका खर्च आला होता.

त्याने जास्त रेझिस्टंसची कार्बन थ्रेड फ़िलामेंट बनविली जी चाळीस तास चालू शकत होती. चाळीस एलेक्ट्रीक बल्ब उजळलेले पहायला तीन हजारच्या जवळपास लोकांची गर्दी जमली होती.

यानंतर न्यूयॉर्क सिटीत पर्ल स्ट्रीट पॉवर स्टेशनची सुरवात झाली आणि सामान्य ग्राहकांपर्यंत वीज पोहोचली.

थॉमस चौदा वर्षाचा असताना त्याने एका लहान मुलाला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं होतं. या मुलाच्या वडिलांनी याचं बक्षिस आणि कृतज्ञता म्हणून थॉमसला टेलिग्राम मशिन चालवायला शिकवलं. यानंतर एडिसनला या अनुभवावर आधारीत टेलिग्राम मशिन चालवण्याची नोकरीही मिळाली. ही नोकरी त्याने रात्रपाळीत केली जेणेकरून दिवसभर त्याला आपल्या प्रयोगशाळेत काम करता यावं.

एडिसन आणि फ़ोर्बज् यांची मैत्रीही सर्वश्रुतच होती. इतकंच नाही तर थॉमसच्या प्रतिमेचा वापर करून घेत फ़ोर्बज यांनी जाहिरातही केली होती. मात्र मध्यंतरी काही काळासाठी या मैत्रीत वितुष्टही आलं होतं. मात्र १६ ऑक्टोबर १९२० रोजी द अमेरिकन मॅगझिनच्या अंकात एडिसनचा नवा शोध प्रकाशित केला गेला. त्यावेळेस एडिसनचं वय होतं ७३ आणि त्याने जगाला चकीत करणार्‍या एका यंत्राचा शोध लावण्याच्या तयारीचा लेख लिहिला होता.

त्याने फ़ोर्बज्-ना सांगितलं की, मृतात्म्यांचा जिवंत व्यक्तींशी संवाद होऊ शकण्याच्या शक्यतेवर आणि तो संवाद करणं शक्य करुन देणार्‍या यंत्र निर्मितीचा तो विचार करत आहेत. याला स्पिरीट फ़ोन असं नाव दिलं गेलं होतं.

अनेकांना ही एडिसननं केलेली थट्टा वाटली. या यंत्राच्या निर्मितीसाठी ते फ़ोनोग्राम, ग्रामोफ़ोन आणि रेकॉर्ड प्लेयर यांची मदत घेणार होती अशी टिपणं नंतर वाचनात आली. यादृष्टीनं पाऊल म्हणून एडिसनच्या प्रयोगशाळेत काही नामांकीत संशोधकांची गुप्त बैठक झाल्याचंही बोललं जातं.

एडिसनसोबत या शोधावर काम करणार्‍या इंजिनियर विल्यम वॉल्टर डिनविडी यांच्यासोबत एडिसननी करार केला होता की दोघांपैकी जो आधी मरेल त्यानं मागे असलेल्याला संदेश पाठवायचा. एडिसनचा विश्वास होता की आत्मे असतात आणि ते जिवंत लोकांशी संवादही साधू शकतात.

दुर्दैवानं एडिसनच्या या शोधाचा कागदावरच मुत्यू झाला. त्याचा प्रोटोटाईप कधीच बनला नाही. फ़ोर्बज् यांचा एडिसनच्या विद्वत्तेवर प्रचंड विश्वास होता. म्हणूनच या मासिकात एडिसन यांच्या विचारांना महत्व होतं. फ़ोर्बज यांनी यावर लेख लिहिल्यानंतर अकरा वर्षांनंतर एडिसन यांचा मृत्यू झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

टाटा उद्योग समूह आणि अवकाश भरारी यांचं एक वेगळंच नातं आहे..!

Next Post

ही महिला प्लेन क्रॅश होऊन १०,००० फूट खाली पडून देखील सुखरूप होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

ही महिला प्लेन क्रॅश होऊन १०,००० फूट खाली पडून देखील सुखरूप होती

कितीही मोठ्या आणि अवघड साखळदंडात बांधा, हॅरी हुडिनी त्यातून सुटायचाच

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.