The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रच्या छळाला कंटाळून ३०० फुट भुयार खोदून हे कैदी ना*झी जेलमधून फरार झाले होते

by द पोस्टमन टीम
20 March 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१३३९ ते १९४५ हा काळ संपूर्ण जगासाठी तणावपूर्ण होता. याच काळात जगाने पिढ्यानपिढ्या लक्षात राहील असा वि*ध्वंस पाहिला, हि*टल*रची हुकुमशाही पाहिली, माणुसकीचं हनन होताना पाहिलं.

या यु*द्धाच्या वेळी काही गोष्टी अशा घडल्या, ज्या वाचून, ऐकून आजही अंगावर सरसरून काटा उभा राहतो. अनेक लहान मोठे किस्से घडले होते, असाच एक किस्सा आहे जेव्हा काही कैद्यांनी जेलमधे भुयार खोदलं होतं.

स्तलाग लुफ्त हा जर्मनमधील कैद्यांचा कॅम्प होता. या कॅम्पमधील ७६ कैद्यांनी अशी काही योजना आखली, जी बहुदा जगभरातील सर्वाधिक यशस्वी पलायन योजना असावी.

या योजनेत अमेरिकन, कॅनडियन, फ्रेंच, ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन तसेच जगातील अन्य देशांतील सैनिक सामील होते. ना*झींच्या कडक जाचातून हे सैनिक कसे सुटले याची गोष्ट फारच रंजक आहे.

१९४३ साली जेव्हा हि*टल*रच्या ना*झी सैन्याने जागतिक महायु*द्धात संयुक्तपणे लढणाऱ्या हजारो सैनिकांना कैद केले होते. यातले बरेच जण एकतर संयुक्त सेनेच्या एअरफोर्स दलातील होते किंवा एकतर आपल्या तुकडीपासून विलग होऊन शत्रूच्या हाती सापडलेले सैनिक होते.



या सगळ्या कैद्यांना ना*झींनी एका विशेष हाय सिक्युरिटी कॅम्पमधे ठेवले होते. तो कॅम्प म्हणजेच स्टालग लुफ्त तिसरा. या कॅम्पमध्ये कैद्यांचा अमानवी छळ केला जात असे. कैद्यांना अक्षरश: जनावरांसारखी वागणूक दिली जात असे. याच जेलमधे ब्रिटीश रॉयल एअर फोर्सचा एक पायलट बंदी म्हणून होता, त्याचं नाव होतं रॉजर बुशल! जेव्हा इतर कैदी आपल्या सुटकेकडे डोळे लावून बसले होते तेव्हा बुशलच्या डोक्यात एक वेगळीच योजना शिजत होती.  ना*झी आधीच त्यांच्या क्रू*रपणासाठी तर प्रसिद्धच होते. त्यामुळे ना*झी कैदेतून सुटका करून घेणे वाटते तेवढे सोपे नव्हते.

पण, बुशलने हळूहळू तुरुंगातील इतर कैद्यांची मते वळवायला सुरुवात केली. बुशल एका एका कैद्याच्या जवळ जाऊन त्याला आपल्या प्लॅन समजावून सांगत असे. थोड्याच कालावधीत बुशलला बऱ्याच कैद्यांचा पाठिंबा मिळाला. आणि सगळ्यांनी मिळून हा प्लॅन पूर्ण करायचे असे ठरले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जेलमधून पळून जाण्याच्या या योजनेत जवळपास दोनशे कैदी सामील होते. त्यांनी कॅम्पातील एकशे चार नंबरची झोपडी या कामासाठी निवडली.

या योजनेनुसार हे कैदी, तीन वेगवेगळे भुयार खोदणार होते. त्या भुयारांना त्यांनी टॉम, डिक आणि हॅरी अशी सांकेतिक नावं दिली. 

हे भुयार कॅम्पपासून ३०० फुटांच्या अंतरापर्यंत खोदले जाणार होते. कमीत कमी वेळेत ना*झींपासून जास्तीत जास्त दूर जाण्यासाठी अशी योजना आखली होती.

कैदी सैनिकांच्या लहान लहान तुकड्या रोज खोदकामासाठी जाऊ लागल्या. पण खोदकाम सुरू झाल्यानंतर एक नवीनच डोकेदुखी सुरू झाली, ती म्हणजे भुयार खोदल्यामुळे तयार होणाऱ्या मारीच्या ढिगाऱ्याला लपवायचे कसे? यादरम्यान कोणत्याही ना*झी सैनिकाला भनक लागली असती तर हे सगळं जीवावर बेतणार होतं. त्यामुळे प्रत्येक सैनिक ना*झींची नजर चुकवून माती बाहेर आणत व कॅम्पातील बागेत फेकून देत. भुयाराची खोली जशी वाढत होती तसे तसे खोदकाम करणाऱ्यांची धास्ती देखील वाढत होती. काम चालू असताना जर वरचे मातीचे छत कोसळले असते तर ते कैदी कायमचे ढिगाऱ्याखाली दाबले गेले असते.

यादरम्यान रोज नवीन समस्या समोर येत होती व कैदी तिच्यावर मात करीत होते. त्यांनी छत कोसळण्याच्या भीतीवरही एक उपाय शोधला. प्रत्येकाने मिळून जवळपास चार हजार लाकडी बोर्ड चोरले व त्यांचा भुयाराच्या भिंती आणि छत यांमधील आधार म्हणून वापर केला.

जसेजसे भुयार खोल होत गेले, तशी तिथे उजेडाची गरज भासू लागली. कैद्यांनी यावर देखील उत्तर शोधले. त्यांनी पुठ्ठ्याचे खोके चोरून भुयारात द्यायला सुरु केले. तिथे ते जाळून त्याच्या उजेडात काम करू लागले.

काही दिवसांनंतर कैद्यांनी विजेच्या तारा चोरल्या व त्यापासून टीनच्या डब्यांच्या सहाय्याने लॅम्प बनवले.

अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर कैद्यांनी सरतेशेवटी आपल्या सुटकेचा मार्ग बनवलाच! बाहेर पडल्यानंतर मार्गदर्शनासाठी त्यांनी नकाशेसुद्धा तयार ठेवले होते. २४ मार्च १९४४ रोजी त्यांनी बाहेर पडायचे ठरवले. सगळ्यांचे चेहरे उत्सुकतेने चमकत होते.

सूर्योदयापूर्वी भुयाराकडे दाखल होण्याचे ठरले. त्यानुसार कैदी निघणार त्यापूर्वीच एका गार्डने त्यांनी खोदलेले भुयार बघितले. गार्डने अलार्म वाजवला आणि भुयाराकडे गेलेले सर्व कैदी पुन्हा आपापल्या जागी परतले. तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली तेव्हा लक्षात आले की ७६ कैदी कमी आहेत. त्यांना कळून चुकलं की हे कैदी पसार झाले आहेत.

हि*टल*रला या गोष्टीची खबर मिळताच त्याने आपले सैनिक त्या कैद्यांच्या मागावर पाठवले. ७३ कैद्यांना पुन्हा आणले गेले. त्यातल्या ५० कैद्यांना ठार मारले गेले. यांच्यात या योजनेचा मास्टरमाईंड असणारा बुशेलसुद्धा होता.

कैद्यांनी खोदलेली सर्व भुयारे बुजवण्यात आली. १९६३ साली यावर आधारित ‘द ग्रेट एस्केप’ नावाचा चित्रपट देखील बनविण्यात आला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ब्राऊन एग्ज पौष्टिक असतात म्हणून जास्त पैसे खर्च करताय, तर हे वाचाच..!

Next Post

या मराठी माणसाने संघर्ष करून आपल्याला आपली प्रिय रविवारची सुट्टी मिळवून दिली आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

या मराठी माणसाने संघर्ष करून आपल्याला आपली प्रिय रविवारची सुट्टी मिळवून दिली आहे

रक्ताचा एक थेंबही न सांडता हे युद्ध ३३५ वर्षे चाललं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.