The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारंपरिक चिनी औषधांमुळे आफ्रिकेतील वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय..!

by Heramb
18 November 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात वसाहतवाद आणि विस्तारवादाच्या भुताने संपूर्ण युरोपला पछाडलं होतं. युरोपमधील जवळजवळ प्रत्येक मोठं आणि बलशाली राज्य पूर्वेकडील देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करून तेथील संसाधनांचा वापर करू इच्छित होतं. यामध्ये तत्कालीन दोन आशियाई महासत्ता, चीन आणि भारतही भरडले गेले.

१८३९ ते १८४२ दरम्यान लढल्या गेलेल्या चिनी युद्धांमध्ये ब्रिटिश नौदलाच्या विजयानंतर चीन परकीय टाचांखाली आले. पण अनेक चीनच्या भागांमध्ये क्विंग राजवंशाची सत्ता होती. १९११ साली झालेल्या क्रांतीमुळे १९१२ साली चिनी राजेशाही कोसळली आणि ‘रिपब्लिक ऑफ चायना’ने राजसत्तेची जागा घेतली.

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या साम्राज्याने चीनवर आक्रमण केले होते. गृहयुद्धामुळे १९४९ साली भूभागाचे विभाजन झाले आणि चायनीज कम्युनिस्ट पक्षाने चीनच्या मुख्य भूमीवर ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ स्थापन केले. या नवीन देशाची धोरणे विस्तारवादी आणि आक्रमक ठरवण्यात आली होती. याचे प्रमुख कारण म्हणजे शतकाहून अधिक काळ चीन परकीय सत्तेखाली होता आणि याच शतकाला ‘सेंच्युरी ऑफ ह्युमिलिएशन्स’ म्हणजेच ‘अपमानांचे शतक’ म्हटले जाऊ लागले.

चीनचा विस्तारवाद अनेक स्वरूपांत समोर येत आहे. यामध्ये सशस्त्र संघर्ष, आर्थिक विस्तारवाद (लहान आणि गरीब देशाला मोठ्या प्रमाणात, त्यांना फेडता येणार नाही असे कर्ज देऊन त्यांच्या संसाधनांवर चिनी हक्क सांगणे, उदाहरणार्थ, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ) आणि मुत्सद्दीपणा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या तिन्ही मार्गांव्यतिरिक्त चीन आता आरोग्य सेवांच्या आडूनही आपले विस्तारवादी धोरण यशस्वी करू पाहत आहे. याच नव्या विस्तारवादाच्या प्रकाराबद्दल आजचा हा विशेष लेख..



बीजिंग-समर्थित पारंपारिक चीनी औषधांच्या (ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन किंवा टीसीएम) विस्तारामुळे अनेक आफ्रिकन देशांमध्ये बेकायदेशीर वन्यजीव तस्करीला चालना मिळत आहे. जगातील सर्वांत दुर्मिळ प्रजातींचे भविष्य धोक्यात आले आहे, असा इशारा एका नवीन अहवालात देण्यात आला आहे. टीसीएम मार्केटची वाढ, टीसीएम मार्केटचा स्रोत म्हणून आफ्रिकेचा उपयोग आणि बिबट्या, पॅंगोलिन आणि गेंडे अशा लुप्त होत चाललेल्या प्रजातींसाठी धोक्याची घंटा आहे असे लंडनस्थित पर्यावरण तपास संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भारताच्या आयुर्वेद आणि पर्शियन-ग्रीक संस्कृतीमधील युनानी औषध पद्धतीप्रमाणे चीनचीसुद्धा सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची औषध-पद्धती आहे. चीन याच औषधी पद्धतीचा प्रचार प्रसार आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये करत आहे. या प्रसाराबरोबरच संपूर्ण आफ्रिकेत रस्ते, रेल्वे आणि इतर पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प विकसित करीत आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

टीसीएममधील बहुतेक उपचार वनस्पती-आधारित असले तरी, उद्योगातील वाढत्या मागणीमुळे पँगोलिन आणि गेंड्यासह अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. “अत्यल्पकालीन नफ्यासाठी टीसीएमच्या प्रचंड वाढीमुळे अनेक आफ्रिकन देशांमध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, टीसीएममुळे धोक्यात आलेल्या प्रजातींचा अतिवापर मोठ्या मागणीला उत्तेजन देऊन वन्यजीव गुन्हेगारीला प्रोत्साहित करू शकतो.” असे ईआयए वन्यजीव प्रचारक सेरेस काम यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

टीसीएम उत्पादने आफ्रिकेमध्ये सहजरित्या उपलब्ध होत नसत, पण चीनच्या मदतीने टीसीएम संबंधित कंपन्या आणि क्लिनिक्स आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये स्थापन करण्यात आल्या. बीजिंगने कोव्हीड-१९ महामारीची संधी साधून टीसीएमबद्दल प्रचारात्मक गोष्टींना गती दिली असे लिथल रेमेडी या अहवालात नमूद केले आहे.

आफ्रिकेतील टीसीएमच्या प्रचारामुळे वन्यजीवांना कशाप्रकारे धोका निर्माण झाला आहे याबद्दल लिथल रेमेडी हा विश्लेषणात्मक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. काही किरकोळ स्रोतांपासून ते विक्रेत्यांपर्यंत संपूर्ण नियंत्रित सप्लाय चेन स्थापन करण्याचा विचार सुरु आहे. टीसीएमच्या अतिवापरामुळे तसेच त्यांच्या उत्पादनांमध्ये धोक्यात असलेल्या वन्यजीवांचा वापर रोखण्यासाठी सरकारी कारवाईची विनंती केली गेली आहे.

अल जझीरा या वृत्तसंस्थेला दिलेल्या वक्तव्यात ईआयए वन्यजीव प्रचारक सेरेस काम म्हणतात, “पारंपारिक औषध अनेक संस्कृतींचा अविभाज्य घटक आहे आणि ते आफ्रिकेतील आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आफ्रिकेत टीसीएमचा एवढा मोठा विस्तार, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत होत आहे, यामुळे वन्यजीवांचे अंश असलेल्या उपचारांच्या मागणीत प्रचंड वाढ होईल आणि अधिक प्रजाती नामशेष होतील..”

चीनने पारंपारिक औषधांद्वारे दुर्मिळ प्रजातींचा विनाश करण्याचा प्रयत्न केला आहे. कामोत्तेजन किंवा कर्करोगाच्या उपचारांपासून ते त्वचेच्या रोगांपर्यंतच्या आजारांवर उपचार करण्यासाठी असे औषधी उपाय आहेत. गेंड्याच्या शिंगाच्या आणि वाघाच्या अवयवांच्या वापरावर १९९३ साली बंदी घालण्यात आली होती आणि सरकारने २०१८ साली अचानक बंदी उठवली.

कोविड-१९ साथ सुरू राहिल्याने, टीसीएम आणि पारंपारिक आफ्रिकन औषध यांच्यातील संबंध मजबूत करण्यासह आरोग्यसेवा, चायना-आफ्रिका को-ऑपरेशनच्या आगामी फोरममध्ये एक चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. चायना-आफ्रिका कोऑपरेशनचे आगामी फोरम याच महिन्यात सेनेगल येथे होईल. दक्षिण आफ्रिका, कॅमेरून, टांझानिया आणि टोगो या देशांनी टीसीएम विकसित करण्यासाठी चीनशी करार केले आहेत तर दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाने टीसीएमला त्यांच्या सार्वजनिक आरोग्य प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे.

आफ्रिका सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या मते, २००९ साली चीनने आफ्रिकेचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून स्थान निर्माण केले आहे. याआधी आफ्रिकेचा सर्वांत जास्त व्यापार युनायटेड स्टेट्सबरोबर होत असे. २०२० साली आफ्रिका आणि चीन दरम्यानचा एकूण व्यापार २०० अब्ज डॉलर्सचा होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एअर क्वालिटी इंडेक्स – जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये तीन भारतातील आहेत

Next Post

एक्सप्लेनेर : भारत-पाकिस्तान दरम्यानचा कर्तारपूर कॉरिडॉर शिखांसाठी इतका महत्वाचा का आहे..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एक्सप्लेनेर : भारत-पाकिस्तान दरम्यानचा कर्तारपूर कॉरिडॉर शिखांसाठी इतका महत्वाचा का आहे..?

या 'बिजनेस जेट'ने अमेरिकन यु*द्धनौकेवर ह*ल्ला केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.