आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
संपूर्ण जगाला गेल्या काही वर्षांपासून एक समस्या त्रास देतेय. ही समस्या म्हणजे सतत वाढत जाणारं प्रदूषण. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचे, प्रदूषणाचे परिणाम लोकांच्या रोजच्या आयुष्यावर होतायत. यातही भारताचा नंबर फार वरती लागतो.
भारताच्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची वाढती पातळी धोक्याची घंटा बनली आहे. दिल्लीत तर दर थोड्या महिन्यांनी प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचे दुष्परिणाम बघायला मिळतात.
दिल्लीतील वायू प्रदूषणाची वाढती पातळी, जवळच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून धुराच्या घातक मिश्रणामुळे आणि वाहनातील विषारी वायूच्या उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील एक संस्था, IQAirकडून, हवेची गुणवत्ता आणि शहरातील प्रदूषण यांचा अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले आहे की खराब हवेच्या दहा शहरांच्या यादीत भारतातील तब्बल तीन शहरांचा समावेश होतो.
IQAirने सूचीबद्ध केलेल्या या यादीत दिल्लीचा AQI 556, नंबर सगळ्यात पहिला लागतो. तर कोलकाता चौथ्या आणि मुंबई सहाव्या नंबरवर येतं. सर्वात वाईट AQI निर्देशांक असलेल्या शहरांमध्ये पाकिस्तानमधील लाहोर आणि चीनमधील चेंगडू यांचाही समावेश आहे.
IQAir नुसार, सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशक आणि प्रदूषण रँकिंग असलेली दहा शहरे हे आहेत-
1. दिल्ली, भारत (AQI: 556)
2. लाहोर, पाकिस्तान (AQI: 354)
3. सोफिया, बल्गेरिया (AQI: 178)
4. कोलकाता, भारत (AQI: 177)
5. झाग्रेब, क्रोएशिया (AQI: 173)
6. मुंबई, भारत (AQI: 169)
7. बेलग्रेड, सर्बिया (AQI: 165)
8. चेंगडू, चीन (AQI: 165)
9. स्कोप्जे, उत्तर मॅसेडोनिया (AQI: 164)
10. क्राको, पोलंड (AQI: 160)
दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा अंदाज देणारी आणि प्रदूषणाचे घटक ओळखणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या (IITM) निर्णय समर्थन प्रणाली(DSS)च्या अंदाजानुसार शुक्रवारी दिल्लीत झज्जर, गुरुग्राम, बागपत, गाझियाबाद आणि सोनीपत अशा शहरांतूनही प्रदूषक आले आणि प्रदूषणाची पातळी वाढली.
DSS विश्लेषणात असे दिसून आले की शुक्रवारी, भातशेतीच्या आगीमुळे दिल्लीच्या प्रदूषणात 15 टक्के वाटा होता, स्थानिक वाहनांच्या उत्सर्जनाचा वाटा 25 टक्के होता, घरांमधून उत्सर्जनाचा वाटा 7 टक्के होता.
SAFAR, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्राने सांगितले की, शुक्रवारी हवेतील किमान 35 टक्के प्रदूषक भुसभुशीत आगीमुळे होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.