The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

राजा मानसिंग या एका नवरत्नाने बिरबलाच्या मृत्यूचा बदला घेतला होता

by द पोस्टमन टीम
25 August 2020
in इतिहास, मनोरंजन
Reading Time:1min read
0
Home इतिहास

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब

अकबराच्या नवरत्नांबद्दल ऐकलं नाही असे खुप कमी लोक आपल्याला बघायला मिळतील. समुद्रमंथनातुन जगाला मिळालेल्या ९ रत्नांपेक्षाही जास्त प्रसिद्धी अकबराच्या दरबारातील नवरत्नांना मिळाली. याचपैकी एक होते, ते म्हणजे राजा मानसिंग.

आपली बुद्धिमत्ता, सैन्य, युद्धकौशल्य यामुळे राजा मानसिंग अकबराच्या जवळचे होते. त्यांच्या कामावर खुश होऊन अकबर त्यांना फर्जंद, राजा मिर्झा म्हणुन बोलवत असे. बिरबलच्या मृत्युचा बदला घेणाऱ्या या राजा मानसिंग यांची कथा आज आपण बघुयात.

अंबरचे राजे असलेले राजा मानसिंग यांचा जन्म १५४० मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवानदास होते. भगवानदास यांनी गुजरात युद्धाच्या वेळी अकबराची साथ दिली होती. अशा अनेक युध्दात भगवानदास यांनी अकबराची मदत केली. यावरुन पराक्रमाची देणगी वांशिकरित्या त्यांच्याकडे पोहचली असं म्हणण्यात काही चूक नाही.

महाराणा प्रतापांसारख्या योध्दयासमोरही स्वत:चा स्वाभिमान जपणे राजा मानसिंग यांनी सोडले नाही. युद्धावरुन परतत असताना त्यांनी महाराणा प्रताप यांच्या बरोबर भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराणा प्रतापांनीही ही इच्छा मान्य केली आणि भोजनासाठी बोलावण्यात आले.

ऐनवेळी महाराणा प्रताप यांना डोकेदुखीचा त्रास झाला म्हणुन त्यांनी आपल्या मुलाला भोजनासाठी पाठवले. परंतु तरीही राजा मानसिंगांनी हा आपला अपमान समजला आणि ते निघुन गेले.

इतिहासकारांच्या मते याच कारणामुळे १५७६ मध्ये हळदी घाटीत महाराणा प्रताप आणि राजा मानसिंग यांच्यात युध्द झाले. या युध्दाचं नेतृत्व अकबरने आपला मुलगा सलीम याला दिले. राजा मानसिंग आणि महावत खान यांची मोठी सेना महाराणा प्रताप यांच्या विरोधात युध्दासाठी निघाली.

संख्येने कमी पडलेल्या सैन्यामुळे महाराणा प्रताप यांना या युद्धातून मागे फिरावे लागले. परंतु या भयानक युद्धात त्यांचा घोडा – चेतकला आपल्या प्राणाला मुकावे लागले. या युध्दानंतर मुघल सेनेला तो प्रदेश लुटण्यासाठी परवानगी देण्यात आली, परंतु राजा मानसिंग यांनी या गोष्टीस स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे मुघल सत्तेबरोबर असणाऱ्या त्यांच्या संबंधाना धोका निर्माण झाला.

हे देखील वाचा

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

राजा मानसिंग यांच्या वडिलांना पंजाबचा सुभेदार म्हणुन नियुक्त केले तेव्हा मानसिंगाना सीमेवरचा कार्यभार सोपवण्यात आला. याचवेळी अकबरचा भाऊ मिर्झा महम्मद हकीम याचा मृत्यू झाला. अशा वेळी राजा मानसिंग यांना काबुल येथे पाठवण्यात आले.

याच काळात अफगाणिस्तान मध्ये काही सरदारांनी लूट माजवली होती. लोकांच्या मनात या सरदारांविषयी भिती निर्माण झाली होती. अशा वेळी राजा मानसिंग यांनी या सरदारांना पळवुन लावले आणि जनतेची सुटका केली.

याच लुटेऱ्यांमध्ये एक युसूफजाई समुह होता, त्यांच्याशी झालेल्या युद्धात अकबराचा प्रिय राजा बिरबल याचा भीषण मृत्यू झाला. याच कारणामुळे जैन खान कोका, अब्दुल फतेह यांना परत बोलवून घेतलं. अशा वेळी राजा मानसिंग यांना पाठवण्यात आले. मानसिंग यांनी ही जबाबदारी अतिशय योग्य प्रकारे पार पाडली आणि बिरबलच्या मृत्यूचा बदला घेतला.

ADVERTISEMENT

पुढे जाऊन अकबराने त्यांची नियुक्ती काबुलचे शासक म्हणुन केली. आता त्यांना बिहार मधील कछवा येथील जहागिरी सोपवण्यात आली. याच जोरावर त्यांनी पुर्ण कंधोरियावर आक्रमण केले. त्याच बरोबर तेथील काही ठिकाणांवर आपला कब्जा मिळवला. याच वेळी त्यांना पाच हजारी मनसबदारी बहाल करण्यात आली आणि ‘राजा’ हे पद बहाल करण्यात आले.

पुढे जाऊन त्यांनी आपला मोर्चा पटनाकडे वळवला आणि तेथील सत्ता काबीज केली. त्यांच्या विजयाचा रथ काही केल्या थांबण्यास तयार नव्हता. झारखंडमार्गे त्यांनी ओडिसावरही हल्ला करुन कब्जा मिळवला.

याच दरम्यान राजा मानसिंग यांनी अनेक छोट्या-छोट्या राज्यांना मुघलसत्तेत सामावुन घेतले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना ७ हजारी मनसबदार बनवण्यात आले. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि साहसाचा हा गौरव होता.

अकबर होता तोपर्यंतच राजा मानसिंग होता असं म्हटले जाते. अकबरचा मुलगा जहांगीरचे आणि राजा मानसिंग यांचे संबंध वादग्रस्त होते असं समजलं जातं. खरं तर गादीवर बसण्यासाठी जहांगीरने अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फजल याची हत्या केली. अशा वेळी आजारी असलेल्या अकबराने खुसरो याची आपला उत्तराधिकारी म्हणुन निवड केली.

अकबराच्या या निर्णयाला राजा मानसिंग याने समर्थन दिले म्हणुन जहांगीर मानसिंगावर नाराज असणे स्वाभाविक होते. म्हणुनच त्याने राजा मानसिंग यांना बंगालला पाठवून दिले.

राजा मानसिंगांना असणाऱ्या बहादूर राजपूतांच्या पाठिंब्याची जाणीव जहांगीरला होतीच. परंतु, पुढच्या काही दिवसातच १६१४ मध्ये राजा मानसिंग यांनी या जगाचा निरोप घेतला.

बिरबलच्या मृत्यूचा बदला, महाराणा प्रताप सारख्या महान योद्धयाला टक्कर देण्यात न घाबरणाऱ्या या नर रत्नाची ही जीवनगाथा थक्क करुन सोडणारी आहे. एकाच आयुष्यात अनंत यशाची शिखरे गाठता येतात याचं उदाहरण असणारया या महान व्यक्तिमत्त्वास शत: शत: नमन.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

Tags: mansingh
ShareTweetShare
Previous Post

जेव्हा आपल्या क्रिकेटपटूंना एका मॅचसाठी मानधन म्हणून फक्त एक रुपया मिळायचा…

Next Post

या शूर कुत्र्याने रणांगणात मुघल सैन्याला धूळ चारली होती

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!
मनोरंजन

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021
इतिहास

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
इतिहास

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

3 January 2021
इतिहास

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

3 January 2021
मनोरंजन

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

3 January 2021
Next Post
या शूर कुत्र्याने रणांगणात मुघल सैन्याला धूळ चारली होती

या शूर कुत्र्याने रणांगणात मुघल सैन्याला धूळ चारली होती

भारताच्या अफुमुळे चीन आणि ब्रिटिशांचं युद्ध झालं होतं

भारताच्या अफुमुळे चीन आणि ब्रिटिशांचं युद्ध झालं होतं

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!