एका मांजरीला मारल्याचा खोट्या आरोपाखाली या कुत्र्याला झाली होती जन्मठेपेची शिक्षा

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

आपल्या भावना, संवेदना, सगळं काही आपला मेंदू नियंत्रित करत असतो. मेंदूचे अनेक छोटे छोटे भाग एकमेकांशी समन्वय साधून परिस्थिती नुसार प्रतिक्रिया देतात. उदा. वाईट घटना घडली की अचानक डोळ्यात पाणी येतं, थरारक गोष्ट बघितली की शाहारे उभे राहतात, संताप येतो वगैरे पण या भावनांची सीमा सुध्दा मेंदूने ठरवली आहे. जेव्हा ही सीमा सांभाळण्यात मेंदू असमर्थ ठरतो तेव्हा काही मानसिक विकार समोर येतात.

 

pep the dog postman
BarkPost

असं म्हणतात की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमधे हा भाग राग आणि आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरतो. अर्थात अशा प्रकारची समस्या असणारा व्यक्ती गुन्हेगारच बनतो असं नाही. ज्या वातावरणात तो व्यक्ती वाढला, संगत या वर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. थोडक्यात सांगायच तर गुन्हेगारी प्रवृत्ती एक मानसिक विकारातून वर आलेली प्रवृत्ती आहे. जी पुन्हा बरी होऊ शकते.

पण यात सुद्धा समोरच्या व्यक्तीची प्रचंड इच्छाशक्ती हवी. याच दृष्टिकोनातून अमेरिका मधील तुरुंगाची बांधणी केली आहे व तशी व्यवस्था देखिल करण्यात आली आहे. कडक शिक्षेसोबत त्यांच्या मानसिक प्रवृत्ती सुधारण्यावर भर दिला जातो . प्रत्येक गुन्हेगाराल सुधारण्यासाठी संधी दिली जाते . त्यांची प्रवृत्ती पून्हा एकदा सामन्य व्यक्तींप्रमाणे संवेदनशील करण्यासाठी थेरेपी दिली जाते.

या थेरेपीचा एक भाग म्हणुन गोंडस प्राण्यांना कोठडीत सोडलं जातं , कैदी त्यांच्या सोबत खेळतात, वेळ घालवतात. त्यांच्या मधील संवेदना जागी करणं हा या मागील मूळ हेतु आहे. प्राणी मुख्यता कुत्रे खुप लळा लावतात. त्यांच्या याच कसबीचा असा उपयोग केला जातो. ही संकल्पना रूढ होण्यामागे देखील गमतीदार किस्सा आहे .

१९२० साली फिलाडेल्फिया येथील एक आलिशान, त्यावेळची सर्वांत सुंदर इमारत तुरुंग म्हणुन वापरली जायची. ईथे अनेक कैद्यांना शिक्षा म्हणुन एकट ठेवण्यात यायचं. फाशीपेक्षाही कडक हीं शिक्षा मानली जायची.

तत्कालिन सरकारने ही पद्धत बदलण्याच ठरवलं. त्यांना एकटं ठेऊन त्यांचं मानसिक संतुलन आणखी बिघडेल. या वर सखोल विचार करून अमेरिकेतील तुरुंग व त्यांच्या व्यवस्थेचा कायापालट करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यावेळेस कुत्र्यांना घेऊन तिथल्या कोठडीत प्रयोग सुरू होता. पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर गिफ्फोर्ड पिंचोट यांनी या कोठडींना भेट देताना ही कुत्री बघितली. त्यांच्या घरी पेप नावाचा लाब्रोडॉर कुत्रा होता. पेप कृष्णवर्णीय, देखणा कुत्रा होता. तो थोडा खोडकर होता . लहान असताना सर्वांचाच तो लाडका होता. पण मोठं होता होता त्याला उश्या फाडण्याची वाईट सवय लागली. घरातील सगळ्यांना त्यामुळे त्रास होऊ लागला.

कोठडीतील थेरपी साठी वापरण्यात येणाऱ्या कुत्र्यांकड़े बघून त्यांना एक कल्पना सुचली .’ प्रयोगासाठी त्याला कोठडीत पाठवण्याचं त्यांनी ठरवलं. पण माध्यमांनी या गोष्टीला वेगळच स्वरूप दिलं. गव्हर्नरच्या पत्नीच्या मांजरीला मारण्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली अशी बातमी वृतपात्रांमधे आली. ही अत्यंत खोटी व हास्यास्पद बातमी होती. पण गव्हर्नर आपला कुत्रा प्रयोगासाठी कोठडीत पाठवतो आहे, ही बातमी तेवढीशी मजेदार वाटली नाही. म्हणुन पत्रकारांनी ही बातमी तयार केली असावी. पण अंतत: तो कुत्रा एका विशिष्ठ प्रयोगासाठी गेला होत हे सिद्ध झालं.

‘पेप’ च्या गळ्यात C2559 या आकड्याचा बिल्ला अडकवलेला असायचा. तो सगळीकडे मोकळेपणाने फिरायचा , खेळायचा , बागडायचा . सगळ्यां कैद्यांना त्याने लळा लावला होता. तो येताच सगळं वातावरणातला ताण नाहीसा व्हायचा. त्याच्या खेळकर खोड्यत सारेच रमायचे .या थेरपीमुळे जे बदल कैद्यांमधे जाणवले त्यावर पुढे भरपूर अभ्यास करण्यात आला. या प्रयोगावर ‘ जर्नल ऑफ फेमिली सोशल वर्क ‘ मधे छापून आलं. या प्रयोगातून कायद्यांमधे भरपूर प्रमाणात सुधारणा बघायला मिळाली.

त्यांची सहनशक्ती वाढली, आक्रमकता कमी झाली व स्वभावात देखील बरेच बदल दिसायला लागले. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून तो बदल जाणवत होता.

एका सर्वेक्षणानुसार जवळपास ५० टक्के गुन्हेगार पून्हा एकदा गुन्हेगारी कडे वळतात. पण ही थेरपी देऊन हा आकडा १२-१३ टक्क्यांनी घसरला आहे, अशी माहिती हाती आली आहे. पुढे पेपचा काही नैसर्गीक कारणास्तव मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी त्याच जेल मधे केला गेला. पण या प्रयोगानंतर या थेरपीवर शिक्कामोर्तब झाला.

आज तो तुरुंग एक प्रेक्षणीय स्थळ आहे. एका गव्हर्नरच्या कुत्र्याने त्याच्या बायकोच्या मांजरीला मारलं म्हणुन अटक करून इथे ठेवण्यात आलं होतं असं तिथे सांगितलं जातं. ही थेरपी किती परिमाणकारक आहे, कशा प्रकारे काम करते,या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवुन ‘प्राणी’, विशेष करून पाळीव प्राण्यांच किति उपयोगी असतात याचा प्रत्येय आपल्याला वेळोवेळी येतो. प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात प्राणी पाळण्याचि हौस असते. काही कुटुंबात तर वाघ, अस्वल, अजगर असे विविध प्राणी देखिल पाळलें जातात. याच उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश आमटेंचं कुटुंब.

प्राण्यांवर जितकं प्रेम कराल त्यांच्या दुप्पट ते आपल्यावर प्रेम करतात. नकळतपणे ते आपल्या घरातले सदस्य बनून जातात . एक वेगळाच भावनिक संबंध त्यांच्यासोबत निर्माण होतो. प्राणी देखिल सदस्यांना तितक्याच आपुलकीने प्रेम करतात. कुत्र्यांनी आपल्या मालकाचे प्राण वाचल्याचे अनेक प्रसंग आपण वाचतो, प्रसंगी अनुभव हीं घेतला असेल. एका नवीन शोधानुसार मासोळी कडे एक तक बघितल की आपला ताण कमी होतो.

प्राणी आसपास असले की वातावरण देखील खेळकर असतं. प्राणी पाळणे हा सुद्धा एक छंद आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!