The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या पहिल्या महिला सागरी अधिकारी सोनाली बॅनर्जी

by द पोस्टमन टीम
22 May 2025
in मनोरंजन, संपादकीय
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


एकविसाव्या शतकात देखील समुद्राच्या लाटांवर स्वार होणारा खलाशी होणे हे फक्त पुरुषांचेच क्षेत्र समजले जाते. मोठमोठे मालवाहतूक करणारे जहाज असो की साधारण प्रवासी बोटी, जहाजावरील कर्मचारी हे पुरुषच असतात आणि जहाजाचा चालक तर हमखास पुरुष असतो. जर चुकून तुम्हाला एखादी स्त्री या क्षेत्रात आढळून आली तर विश्वास ठेवा तिने यासाठी प्रचंड संघर्ष केलेला असणार आहे.

उदाहरण द्यायचं तर कॅप्टन राधिका मेनन यांचे घेऊया, भारतीय नौदलातील पहिल्या महिला कॅप्टन, ज्यांनी अनेक प्रकारच्या वादळांचा सामना केला आणि आपली स्वप्ने साकार केली. कॅप्टन मेनन या जगातील पहिल्या महिला होत्या, ज्यांनी समुद्रात केलेल्या अद्वितीय कामगिरीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्यांनी घालून दिलेल्या या जिवंत उदाहरणामुळे अनेक स्त्रिया आज समुद्रात उतरण्यासाठी सज्ज झाल्या असून दिवसेंदिवस महिलांचा समुद्राकडे ओढा वाढतच चालला आहे. आज आपण एका अशाच महिलेविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी १९९९ साली पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात राजकीय आणि सामाजिक बंधनं झुगारून लावत मरीन इंजिनिअर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्या महिलेचे नाव होते सोनाली बॅनर्जी. त्या भारतातील पहिल्या महिला मरीन इंजिनिअर होत्या. परंतु अनेक लोक त्यांच्या संघर्षाच्या कथेशी अनभिज्ञ आहेत.

लहानपणापासूनच सोनाली यांना सागरी किनाऱ्यावरील शहरांचे आणि समुद्रातील बेटांचे विशेष आकर्षण होते, त्यांच्या चित्रांमधून त्याची एक छाप पडायची. त्यांचे काका मर्चंट नेव्हीत कामाला होते, त्यांच्या सहवासातून सोनाली यांच्यात स्वतःची एक बोट चालवण्याचा विचार निर्माण झाला होता.



अनेक वर्षांनी, विश्व भ्रमंतीचे स्वप्न घेऊन तरुण वयातील सोनाली यांनी कोणालाही न विचारता चार वर्षांच्या मरीन इंजिनिअरिंगच्या आभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यासाठी त्यांनी कोलकाताच्या मरीन इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटची निवड केली.

पण मरीन इंजिनिअर म्हणून एका मुलीचा प्रवास इतका साधा सरळ नव्हता. त्यांना पदोपदी अपमान आणि स्त्रीत्वाच्या तिरस्काराचा सामना करावा लागत होता. नातेवाईकांच्या नाराजीपासून ते सोबतच्या समवयस्क मुलांच्या शेरेबाजीपर्यंत त्यांना सगळ्याच त्रासाला तोंड द्यावं लागत होतं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

टेलिग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत सोनली म्हणाल्या होत्या की त्यांच्या वडीलांना देखील त्यांचा निर्णय आवडता नव्हता. त्या जेव्हा घराबाहेर पडत तेव्हा तू पुरुषांच्या विश्वात कशी काम करणार असा सवाल त्यांना विचारला जात असे.

परंतु सोनाली यांचा संकल्प दृढ होता. त्यांनी आपलं तन मन समर्पित करून आभ्यास करायला सुरुवात केली. काही काळातच त्यांनी इतर समवयस्क साथीदरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कॉलेजात शिक्षण घेताना त्यांना विशेष अडचण आली नाही.

महत्त्वाचं म्हणजे सोनालीमुळे कॉलेजसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अभ्यासात अत्यंत कुशाग्र आणि बुद्धिमान असलेल्या कॉलेजच्या एकमेव महिला विद्यार्थी सोनाली यांची नेमणूक तरी कुठे करायची? मोठ्या वाद आणि विवादानंतर त्यांना ऑफिसर्स क्वार्टर्समध्ये नोकरी करण्याची संधी प्रदान करण्यात आली.

१९९९ साली सोनाली महाविद्यालयातून भारतातल्या पहिल्या मरीन इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाल्या. १५०० पुरुषांच्या सोबतीला असलेली एकमेव महिला असा त्यांचा उल्लेख केला जात होता. नेमणूक झाल्यानंतर लगेचच त्यांना मोबील शिपिंग कंपनीच्या सहा महिन्यांच्या समुद्र प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, हाँग काँग, फिजी आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील बंदरांना भेट दिली.

अनेक महिने समुद्रात घालवत, घरापासून शेकडो मैल अंतरावर, अनेक आठवडे कुठलाही संपर्क न करता जहाज घेऊन जाणे आणि जो काही संपर्क साधता येईल तो सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून साधणे, हे अनेक खलाशांना अवघड होतं, पण सोनाली यांनी ते सहज शक्य करून दाखवलं होतं.

सोनाली यांना माहिती होतं की, त्या ज्या क्षेत्रात आहेत तिथे त्यांना पदोपदी सिद्ध करत रहावं लागणार आहे. स्त्री असल्यामुळे त्यांच्या वाटेला हा संघर्ष अपरिहार्य होऊन बसल्यामुळे बऱ्याचदा त्या वैतागून जात असत. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

पुरुषाने एखादी लहान चूक जरी केली तरी त्या चुकीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते पण सोनाली यांच्याकडून होणाऱ्या अगदी लहानसहान चुकांवर त्यांना पुरुषी मानसिकतेचे टोमणे ऐकावे लागत पण त्यामुळे डगमगून गेल्या नाहीत. त्यांनी जिद्दीने संघर्ष चालू ठेवला.

अखेरीस २६ ऑगस्ट, २००१ रोजी त्यांनी तो अडचणींचा ‘सागर’ पार करत कोर्स पूर्ण केला आणि इतिहास घडवला. ज्यावेळी सोनाली बॅनर्जी मोबील शिपिंग कंपनीच्या जहाजावरील मशीन विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारत होत्या त्यावेळी समस्त स्त्री जातीचा पुन:श्च एक मोठा गौरव सोहळा पार पडला होता.

त्यांनी एक नवीन इतिहास घडवला होता आणि स्त्री जातीसाठी एका नव्या क्षेत्राचे आभाळ मोकळे करून दिले होते. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक स्त्रिया आपल्या पारंपरिक पिंजऱ्यातून बाहेर येत या नव्या आभाळात मुक्त विहार करत आहेत. हेच सोनाली यांच्या संघर्षाचे फलित म्हणावे लागेल.

आज सैन्य दलात वेगवेगळ्या पदांवर स्त्रियांची होणारी नेमणूक ही कौतुकास्पद आहे. नौदलात दिवसेंदिवस स्त्रियांचा वाढता प्रभाव हा फारच उत्साहवर्धक असून भारतीय द्वीपकल्पात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय लिहला जात आहे. महिलांच्या या संघर्षाला साथ देणे हे पुरुषांचे कर्तव्य आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आणि म्हणून आंध्रप्रदेश होणार तीन राजधान्या असणारे भारतातील पहिले राज्य.

Next Post

कशी आहे नेटफ्लिक्सची नवीन ‘बेताल’ वेबसिरीज?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कशी आहे नेटफ्लिक्सची नवीन 'बेताल' वेबसिरीज?

अँबेसेडर - 'किंग ऑफ इंडियन रोड्स' लवकरच परत येत आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.