The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःची एअरलाईन्स सुरु करायची म्हणून जेआरडी स्वतः पायलट बनले होते

by द पोस्टमन टीम
28 November 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतात खाजगी विमान सेवा सुरु होऊन कित्येक दशके उलटली आहेत. आज विमानप्रवास ही एक सामान्य बाब झाली आहे. पण, भारतात खाजगी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय जेव्हा या उद्योगपतीने घेतला तेव्हा त्यांचा प्रवास सुखकर होणार नाही हे निश्चितच होते.

१९३२ साली जेआरडी टाटांनी भारतात पहिली खाजगी विमानसेवा सुरु केली. विशेषत: प्रवासी आणि तार यांची वाहतूक करणे इतकाच मर्यादित उद्देश या पहिल्या सेवे मागे होता. पहिल्यांदा विमानसेवा सुरु करताना भारतात पुरेश्या सुविधांचा अभाव होता. या कंपनीचे पहिले ऑफिस, मुंबईच्या जुहू परिसरात पत्र्याचे छत असलेल्या एका झोपडी सदृश्य ठिकाणी सुरु करण्यात आले. जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी, पॅरीसमध्ये झाला. जेआरडी हे रतन टाटा आणि त्यांची फ्रेंच पत्नी सुनी यांचे सुपुत्र होते.

लहानपणापासूनच जेआरडींना विमानाच्या उड्डाणाबद्दल भरपूर उत्सुकता होती. त्यांनी आकाशात उडण्याची स्वप्ने याच वयापासून पाहण्यास सुरुवात केली.

लहानपणापसूनच ते फ्रेंच पायलट लुईस ब्लेरीयट (इंग्लिश खाडी हवाईमार्गाने पार करणारा पहिला व्यक्ती) आणि ॲडोल्फ पीगॉड (लढवू विमाने चालवण्यात तरबेज असणारा पहिला पायलट) या दोघांच्याही अक्षरश: प्रेमात होते. आपल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी याची नोंद केलेली आहे की, लुईस ब्लेरीयट आणि ॲडोल्फ पीगॉड हे दोघेही त्यांच्यासाठी प्रेरणास्थानी होते.



“हर्डेलॉट किनाऱ्यावर जेव्हा मी पहिल्यांदा ॲडोल्फ पीगॉडचं विमान उड्डाण पाहिलं तेव्हा पासूनच मी त्यांचा चाहता झालो. ॲडोल्फ प्रमाणे लीलया हवाई कसरती करण्याची स्वप्ने मी देखील तेव्हापासूनच पाहण्यास सुरुवात केली,”

जेआरडींचे बालपण फ्रांसमध्येच गेले पण, १९२९ मध्ये आपले फ्रेंच नागरिकत्व रद्द करून ते भारतात आले. मुंबईत पहिल्यांदा एरो क्लब ऑफ इंडिया या फ्लाइंग क्लबची स्थापना झाल्यानंतर पायलट बनण्याचे जेआरडी यांचे स्वप्न पूर्ण झाले. १० फेब्रुवारी १९२९ रोजी साडेतीन तास हवेत घालवल्यावर त्यांना भारताच्या वतीने पहिल्यांदा विमान चालवण्याचा अधिकृत परवाना मिळाला.

तार आणि प्रवासी वाहतूक करण्याच्या उद्देशाने जेआरडींनी १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा देखील त्यावेळी त्यांना उपलब्ध झाल्या नाहीत.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१५ ओक्टोंबर १९३२ हा दिवस टाटा एअर सर्विस आणि भारताच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.

याच दिवशी जेआरडी यांनी, कराचीच्या ड्रीघ रोड एअरोड्रोम पासून मुंबईच्या जुहू एअरस्ट्रीपपर्यंत अहमदाबादमार्गे ऐतिहासिक विमान उड्डाण केले. यासाठी वापरण्यात आलेले विमान हे सिंगल इंजिनचे होते, ज्यातून ४ आणे किमतीची २५ किलो पोस्टकार्ड्सची वाहतूक केली होती.

हे पहिले विमान उड्डाण आमच्यासाठी फारच उत्सुकता निर्माण करणारे होते. हे उड्डाण यशस्वी व्हावे यासाठी मी प्रार्थना केली आणि जे जे कोणी या प्रवासात सहभागी होणार होते त्यांच्या सुरक्षेसाठी देखील. त्याकाळात या प्रोजेक्टवर काम करणारी आमची टीम फारच लहान होती. आम्ही सर्वांनी मिळून अनेक यश आणि अपयश पचवले, आनंद आणि होणारा मनस्तापदेखील वाटून घेतला.

आम्ही सर्वांनी मिळून या व्यवसायाचा पाया घातला, जी पुढे जाऊन एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल या नावाने उदयास आली.

आपल्या आठवणींना उजाळा देताना अनेकदा जेआरडी याबाबत उत्साहाने सांगत असत.

पहिल्या वर्षी टाटा एअर सर्विसने २,५७,४९५ किमीचे अंतर पूर्ण केले, यात १५५ प्रवासी आणि १० टन तारांची वाहतूक केली. याच वर्षी त्यांनी सर्वाधिक अंतराचा टप्पा देखील पूर्ण केला. सुरुवातीची ही विमाने अगदी लहान असत त्यामुळे कधी कधी प्रवाश्यांना तारेचा गठ्ठा असलेल्या बॅग्जवर बसून प्रवास करावा लागे.

१९३८ मध्ये कंपनीचे रुपांतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत करण्यात आले. कंपनीचे एअर इंडिया असे नामकरण केल्यानंतर मुंबईतील टाटा हेड ऑफिस येथे कंपनीचे हेडक्वार्टर सुरु करण्यात आले. यानंतर दोनच वर्षात एअर इंडियाने युरोपमध्ये आपली पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरु केली. ८ जून १९४८ रोजी मलाबार प्रिन्सेस या विमानाने ८,०४७ किमीवरून मुंबई ते लंडन असे उड्डाण कैरो आणि जिनिव्हा मार्गे केले. यात इतर ३५ प्रवासी आणि सोबत खुद्द जेआरडी देखील होते.

एअर इंडियाच्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे कॅप्टन होते के. आर. गुझदार आणि डी. के. जातर.

१९५३ साली एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर जेआरडींना कंपनीचे चेअरमन पद देण्यात आले. १९७८ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. ऑक्टोबर १९६२ मध्ये, कंपनीच्या तिसाव्या वर्धापनदिन, जेआरडी यांनी स्वतः कराची ते मुंबई पर्यंत लिओपार्ड मॉथ प्लेनने हा दिवस साजरा केला. १९८२ मधे ५० व्या वर्धापनदिनी देखील जेआरडी यांनी हा सोहळा साजरा करण्यासाठी पुन्हा मेलबॅगसहित पाकिस्तानचे राष्ट्रपतींनी भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला संदेश आणि कराचीच्या महापौरांनी मुंबई महापौरांना दिलेला संदेश देखील या मेलबॅगमध्ये होता.

एअर इंडियाने, इंडियन एअरलाइन्स आणि इंडियन एअर फोर्सच्या मदतीने, मध्य पूर्वेतील आखाती यु*द्धांची सुरुवात होण्यापूर्वी, १,११,००० लोकांची सुटका करवून त्यांना अमन (जॉर्डन) ते मुंबई पर्यंत सुखरूप आणले.

एका नागरी एअर लाईनने इतक्या मोठ्या प्रमाणात सुटका करून स्थलांतर करवण्यात सहभाग घेतल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. भारतीय नागरी हवाई वाहतुकीच्या दृष्टीने जेआरडीचे हे योगदान अभूतपूर्व आहे. “आपली सेवा जर आपले देश आणि देशांचे नागरिक यांच्या गरजांना लक्षात घेत नसेल, तर मिळवलेल्या कोणत्याही भौतिक यशाचे कसलेच मोल नाही,” असे ते नेहमी म्हणत.  

भारतीय हवाई वाहतुकीच्या स्थापनेसह, जेआरडींनी या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दाखल घेत, भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर एका वर्षाने २३ नोव्हेंबर १९९३ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी जिनिव्हा येथे त्यांचे निधन झाले.

जेआरडींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. हा सन्मान संसद सदस्यांव्यतिरिक्त कुणालाही देण्यात येत नाही. पण, फक्त जेआरडी हेच एक दुर्मिळ उदाहरण होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?

Next Post

राष्ट्रगीताचा आग्रह धरला म्हणून या मुस्लीम शिक्षकाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

राष्ट्रगीताचा आग्रह धरला म्हणून या मुस्लीम शिक्षकाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय

एका दरोडेखोराचं अर्धवट जळालेलं प्रेत कामाला आलं आणि शरीरशास्त्राचा पाय रचला गेला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.