The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याने अमेरिकेचे सिक्रेट डॉक्युमेंट्स जगासमोर आणून बलाढ्य अमेरिकेला अंगावर घेतलंय

by अनुप देवधर
2 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


गेल्या दोन दशकांत, तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं सगळं जग झपाटलं होतं. विशेषतः २००९ नंतर, म्हणजेच जगातला पहिला स्मार्टफोन आल्यावर एक मोठा ‘ब्रेक-थ्रू’ मिळाला. सुरुवातीची काही वर्षं गेल्यावर सर्वसामान्य माणसाच्या खिशात तो सहजपणे खणखणू लागला, आणि हाच स्मार्टफोन हळूहळू अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबरीनं माणसाची प्राथमिक गरज बनला.

स्मार्टफोनच्या बरोबरीनं स्मार्टफोनचा आत्मा असलेलं इंटरनेटही यथावकाश स्वस्त होत गेलं आणि प्रत्येकाच्या महिन्याच्या बजेटमध्ये मीठ-मिरचीबरोबर रिचार्जनं जागा मिळवली. जिओ आल्यावर तर ह्या सगळ्यावर चार चांदच लागले आणि टेलिकॉम कंपन्यांची दिशाच बदलली.

एकीकडं हे सगळं होत असताना, अर्थातच नाण्याची दुसरी बाजू म्हणून काही गोष्टी होत होत्या. आपल्यापर्यंत त्या कधीच येत नाहीत, येणारही नाहीत. पण आपण जितक्या सहजतेनं मोबाईल वापरतो, त्याच्या मागे कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवण्यात येत होती.

आपली ब्राऊझिंग हिस्ट्री, सर्च हिस्ट्री, आपण काय बघतो, आपण कुठं जातो, मॅपवरून ट्रॅव्हलिंग हिस्ट्री, कॉल्स, मेसेजेस, आपण काय ऑर्डर करतो, आपण खायला काय मागवतो, आपल्याला काय आवडतं, आपण कशाला लाईक करतो, ह्या सगळ्यांवर कोणाचीतरी नजर असते. वेगवेगळी ऍप, गेम्स ह्यांच्या माध्यमातून आपलं जेंडर, वय ह्या सगळ्यांची माहिती आधीपासूनच त्यांना मिळालेली असते.



या हॅकिंगमधून कोणीच वाचलेलं नाहीये. आपल्या फोनला भले सिक्युरिटी असेल, पण ही पाळत ठेवलीच जात असते. यावरून एक डेटा जमा करण्यात येत असतो. अर्थात याचे उद्देश वेगवेगळे असतात.

२०१८ चा जून महिना होता. एका खूप मोठ्या कंपनीच्या मुंबईतल्या तरुण महिलेची तक्रार पोलिसांकडे आली. तिची प्रत्येक हालचाल टिपली जात होती. तिने पेपर नॅपकिन घेतले, तर सर्दी झालीये का असा मेसेज आला. मैत्रिणचा भेटायला फोन आला, तर जायलाच हवंय का असा मेसेज. वरवर मजा वाटली, तरी गंभीर म्हणायला हवी ही परिस्थिती. कारण आपल्या हातातला मोबाइल फोन हा आपल्यावरच हेरगिरी करणारं यंत्र बनलाय आणि आपल्याला माहितीच नाहीये.

धक्का बसावं असं इतकंच नाही, तर यातला पुढचा मुद्दा असा की अनेक देशांची सरकारंच विविध कंपन्यांना मोबाइलमध्ये घुसखोरी करण्याचं तंत्र विकसित करायला उत्तेजन देतायत. किंवा या काही देशांत फोन हेरगिरीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर उघडकीस येतायत.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

असा सगळा हेरगिरी करून मिळवलेला डेटा एकत्रित करून लोकांमध्ये काय चाललंय, त्यांना काय वाटतंय, आणि त्यांचं मत परिवर्तन कसं होऊ शकतं याचंही उदाहरण अमेरिकेच्या शेवटच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बघायला मिळालं.

सगळ्या अंदाजांवर पाणी पडलं होतं. राजकीय विश्लेषक, अभ्यासक, एक्झिट पोल, सर्व्हे ह्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून दाखवला होता. फेसबुकच्या माध्यमातून आपण कशाला लाईक करतो, आपल्याला काय हवं नको, यावरून आपलं काय आहे ह्याचा अंदाज लावला जातो. ब्रेक्झिट च्या वेळीही तेच घडलं. ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ असो, किंवा ‘स्ट्रेटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज्’ ह्या कंपन्यांवरून ये सिद्धही झालेलं आहे.

या सगळ्या गोष्टींपासून आपण अनभिज्ञ होतो. आपला ह्यावर विश्वास बसणं कठीण होतं, किंबहुना अजूनही आहे. आणि कोणी सांगितलंच, तर आपण ते खोडूनही काढतो. पण ह्या गोष्टींवर विश्वास बसण्याची वात पेटवली, ती एडवर्ड स्नोडेननं. तेही जगभरात धुमधडाका करून.

२०१३ चा जून महिना होता. एडवर्ड जोसेफ स्नोडेन या नावानं जगात अचानक खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NSA) मध्ये अमेरिकन सरकार जगभरातल्या इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची हेरगिरी करत होतं. मेल्स, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स या सगळ्यांचा डेटा अमेरिका २००७ पासून गोळा करत होतं. या हेरगिरीचं म्हणजेच ‘प्रिझम’ चं भांडं त्यानं फोडलं होतं.

एडवर्ड स्नोडेन NSA पूर्वी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) आणि Dell मध्येही काम करत होता. २०१३ मध्ये तो एका कॉन्ट्रॅक्टर मार्फत NSA शी जोडला गेला. तिथं काम करताना त्यानं हेरगिरी बघितली, आणि व्हीसल ब्लोअर झाला.

पण जेव्हा त्याला ह्या पाळतीचा हेतूच समजला, तेव्हा मात्र तो मनातून हादरला. मोठ्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं. आणि चक्क ही सगळी माहिती ‘द गार्डीयन’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ला लीक केली, आता तंत्रज्ञान, स्मार्टफोन आणि इंटरनेट यांची वेगळी बाजू जगासमोर आली.

एडवर्ड जन्माने अमेरिकनच. आजोबा, वडील अमेरिकेच्या कोस्ट गार्ड मध्ये होते. एडवर्ड एकदा लहानपणी आजारी पडला, आणि शाळेत न जाता परीक्षा बाहेरूनच पास झाला. ग्रॅज्युएशनची डिग्री नाहीच. पण इंग्लंडच्या लिव्हरपुल विद्यापीठातून बाहेरून कोर्स केला. पुढं एका विद्यापीठाच्या नेटवर्क साठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केल्यावर तो CIA च्या नजरेत आला.

एवढी कॉन्फिडेन्शीअल माहिती उघड केल्यावर स्नोडेनला अमेरिकेत राहणं शक्यच नव्हतं. बराक ओमाबांनी तो देशभक्त नाही असं सांगितलं. अमेरिका त्याच्या मागं लागली. पण त्यानं हाँगकाँगला पळ काढला. पुढं रशियानं त्याला आसरा दिला. आणि आता अमेरिकेच्या नजरेआड असाच राहून दिवस काढत आहे.

त्याच्यावर राशियासाठी तो काम करत होता, असेही आरोप झाले. आता तो काय करतो, कुठं आहे माहिती नाही. पण जगाला त्यानं वेगळीच इनसाईड स्टोरी सांगून खळबळ उडवून दिली, हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: edward snowden
ShareTweet
Previous Post

देशव्यापी लॉकडाऊन भारतातील कृषी क्षेत्रावर नेमका काय परिणाम करेल..?

Next Post

हि*टल*रच्या प्रत्येक कृत्यात त्याच्या पाठीशी ठाम राहिलेली त्याची पत्नी इवा ब्राऊन

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

हि*टल*रच्या प्रत्येक कृत्यात त्याच्या पाठीशी ठाम राहिलेली त्याची पत्नी इवा ब्राऊन

हे कुटुंब गेली कित्येक दशके आयसोलेशनमध्ये राहत आहे!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.