The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्कॉटलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची जर्सी या १२ वर्षाच्या मुलीने डिझाईन केली

by Heramb
20 October 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


खेळ म्हटलं की संघ आलेच, त्याचबरोबर त्यांची एकमेवाद्वितीय आणि  विशिष्ट ओळखसुद्धा आलीच. अशी ओळख ठळकपणे स्पष्ट करू शकतील अशा साधनांपैकी एक आणि अतिशय महत्वाचे साधन म्हणजे संघाचा गणवेश किंवा आधुनिक परिभाषेत सांगायचं झालं तर संघाची ‘जर्सी’.

हे विशिष्ट प्रकारचे गणवेश प्रत्येक खेळाडूला वेगळी ओळख तर देतातच, पण त्याचबरोबर खेळाडूंच्या संपूर्ण गटाला ‘दिसण्याच्या’ बाबतीत एकत्र करतात. त्यामुळे मैदानावर आपला खेळाडू कोण आहे हे जाणून घेणे अतिशय सोपे होते. याशिवाय सर्व खेळ हे वेगाने चालत असतात.

मैदानावर किंवा कोणत्याही क्रीडामंचावर बर्‍याच गणवेशाशिवाय खेळणाऱ्या खेळाडूंमुळे एखादा व्यक्ती कोण आहे आणि तो कोणत्या संघात आहेत याबद्दल अतिशय वेगवान शारीरिक हालचालींमुळे गोंधळ होऊ शकतो. खेळाडूंच्या संघाला गणवेश असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे ‘संघाबद्दलचा अभिमान’. प्रत्येक खेळाडूने त्यांच्या संघात आणि त्या खेळात घालवलेल्या समर्पणाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि संघाच्या गणवेशामुळे अगदी ऑफ-सीझनमध्येही हे प्रतिबिंबित होण्यास मदत होते.

संपूर्ण जगात क्रेझ असलेले खेळ म्हणजे ‘क्रिकेट’ आणि ‘फ़ुटबॉल’. या खेळांचे अनेक सामने वर्षाच्या कोणत्याही वेळी जगाच्या कोणत्या न कोणत्या भागात सतत होतच असतात. जगभरात आयसीसीचे (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) एकूण १०६ सदस्य देश आहेत. या सर्व देशांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धांना उधाण आलेले असते. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचं नाव आपसूकच येतं. तर जगभरात फुटबॉलचे तब्बल २११ संघ आहेत.

या खेळांच्या स्पर्धांमधील प्रत्येक संघाला आपली वेगळी ओळख टिकवावी लागते. मग ती कर्तृत्वाने असो किंवा गणवेशांद्वारे किंवा आपल्या खेळाडूंच्या लोकप्रियतेद्वारे असो. पण ओळख टिकवण्यात आणि वर सांगितलेल्या सर्वच बाबतींत ‘गणवेश’ किंवा जर्सी हे महत्वाची भूमिका बजावतं. प्रत्येक गणवेशाचे डिजाईन, रंग, आणि कलात्मकता या गोष्टी ‘युनिक’ दिसायला हव्यात तरच त्या संघाला दृश्यमानतेद्वारे एक नवी ओळख मिळू शकते.



अशा जर्सी किंवा गणवेशांचे डिजाईन करण्यासाठी लाखो-करोडो डॉलर्सचा खर्च केला जातो. टीमला एखाद्या स्पॉन्सरचीसुद्धा आवश्यकता भासते. मग संबंधित देशातील कोणी बडा उद्योगपती समोर येऊन स्पॉन्सरशिप देतो आणि त्यानंतर टीमच्या जर्सीवर त्याच्या ब्रँडची जाहिरात होते. अशा जर्सीज डिजाईन करण्यासाठी प्रसिद्ध आणि एक्स्पर्ट फॅशन डिझायनर्स आणि ग्राफिक डिजायनर्सचा सल्ला घेतला जातो.

आपण १२ वर्षांचे असताना काय करत होतो? खरोखरच अजून सभोवतालचे जग जाणून घेणे आणि बरेच काही शिकायचे बाकी होते. पण रेबेका डाउनी नावाच्या मुलीने या वयात टी-२० विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय संघाची जर्सी डिझाईन केली आहे. हा काही विनोद नाही, टी-२० विश्वचषक कार्यक्रमासाठी स्कॉटलंडचे नवीन किट १२ वर्षांच्या मुलीने डिझाइन केले आहे.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

आयसीसीच्या टी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपमधील स्कॉटलंड क्रिकेट टीमची जर्सी तयार करण्यासाठी कोणत्याही ग्राफिक डिझायनर अथवा फॅशन डिझायनरची मदत घेण्यात आलेली नसून ही जर्सी एका अवघ्या बारा वर्षीय स्कॉटिश मुलीने तयार केली आहे. लहान मुलांमध्ये असलेल्या नवनिर्मितीच्या संकल्पना कशा प्रकारे ठासून भरलेल्या असू शकतात याचे जिवंत आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्कॉटलँडच्या क्रिकेट टीमचा हा गणवेश.

स्कॉटलँड संघाने देशभरातील शाळकरी मुलांच्या सुमारे दोनशेहून अधिक डिझाइन्सपैकी हे डिझाईन निवडले. जर्सीच्या रंगछटा स्कॉटलंडच्या राष्ट्रीय चिन्हाच्या रंगावर आधारित आहेत – काटेरी पाने असलेले एक रानटी रोप. ओमानला जाण्यापूर्वी रेबेकाने त्यांना ही नवीन किट सादर केली. ती तिच्या कुटुंबासह एडिनबर्गमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात उपस्थित असताना ती खेळाडूंना भेटली.

स्कॉटिश जर्सी, ज्यात जांभळ्या आणि काळ्या छटा आहेत तसेच ज्यात अमूर्त डिझाइन असून त्यासमोर देशाचे नाव समोर छापलेले आहे. अशी अद्भुत जर्सी एका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीने डिझाइन केली आहे. क्रिकेट स्कॉटलंडने आज (१९ ऑक्टोबर) काही वेळापूर्वी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर रेबेका डाउनी या किशोरवयीन मुलीचे आभार मानले.

“स्कॉटलंडची किट डिझायनर. हॅडिंग्टन येथील १२ वर्षीय रेबेका डाउनी. ती टीव्हीवर आमचा पहिला गेम फॉलो करत होती, तिने स्वतः डिझाईन केलेला शर्ट (आम्ही) अभिमानाने खेळात (वापरत आहोत). पुन्हा धन्यवाद, रेबेका! #FollowScotland | #PurpleLids ”हे ट्विट आज कदाचित संपूर्ण इंटरनेट विश्वात प्रसिद्ध होत असेल. हे ट्विट एका लहानशा शाळकरी मुलीने स्वतःच डिझाईन केलेली जर्सी परिधान करून आणि चेहऱ्यावर स्मितहास्य केलेल्या फोटोसह प्रसिद्ध होत आहे.

रेबेका डाउनी

स्कॉटिश जर्सीमध्ये जांभळ्या आणि काळ्या छटा आहेत ज्यात अमूर्त रचना आहे आणि देशाचे नाव समोरच्या बाजूला छापलेले आहे. दरम्यान, कायल कोएत्झरच्या नेतृत्वाखालील स्कॉटिश क्रिकेट संघाने त्यांच्या मोहिमेची विजयी नोंद करून बांगलादेश – त्यांच्या गटातील चांगल्या फॉर्मात असलेल्या संघाचा सहा धावांनी पराभव करत मल्टी-टीम इव्हेंटच्या सुरुवातीच्या दिवशीच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

क्रिस ग्रीव्ह्सने त्याच्या २८ चेंडूत ४५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४५ धावा केल्याने एका टप्प्यावर खेळात पुन्हा गर्जना करण्याची प्रशंसनीय भावना दाखवली. ग्रीव्ह्स एवढ्यावरच थांबले नाहीत आणि १४१ धावांचा पाठलाग करण्याच्या बांगलादेशच्या प्रयत्नाला पायबंद घालण्यासाठी शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीमच्या महत्त्वपूर्ण विकेट्सचा घेतल्या होत्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्या हव्यासापोटी आपण एका समुद्राचं मागच्या चाळीस वर्षात वाळवंट करून टाकलंय

Next Post

भटकंती – गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

भटकंती - गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

ब्रिटिश आणि ना*झींची बोलणी घडवून आणणारी 'ना*झी स्पाय प्रिन्सेस' स्टेफनी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.