The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृत्तपत्र विक्रेता ते माध्यमसम्राट- रुपर्ट मर्डोकची कहाणी

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in राजकीय, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मास कम्युनिकेशन शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रुपर्ट मर्डोक हे नाव तोंडपाठ असते. पत्रकारिता किंवा प्रसार माध्यमांचा अभ्यास करताना हे नाव वारंवार येते कारण रुपर्ट मर्डोक यांना जग प्रसारमाध्यमसम्राट म्हणून ओळखते. न्यूज कॉर्पोरेशन या प्रसारमाध्यम कंपनीचे ते अध्यक्ष आहेत.

जगभरातील अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रे न्यूज कॉर्पोरेशनच्या मालकीची आहेत. एक सामान्य वृत्तपत्रविक्रेता म्हणून सुरुवात केलेले रुपर्ट मर्डोक आज जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक गणले जातात.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत त्यांचा १३२वा क्रमांक आहे. मूळचे ऑस्ट्रेलियन असलेले रुपर्ट मर्डोक हे सध्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत.

आज द वॉल स्ट्रीट जर्नल प्रकाशित करणारी डॉ जोन्स अँड कंपनी, स्काय टेलिव्हिजन या मोठ्या कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मर्डोक आज ७.३५ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ऑस्ट्रेलियातूनच केली.

रुपर्ट मर्डोकचा जन्म ११ मार्च १९३१ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात झाला. त्यांचे वडील सर कीथ मर्डोक हे एक वार्ताहर आणि संपादक होते. ते नंतर द हेराल्ड अँड विकली टाइम्स पब्लिशिंग कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी झाले. त्यांच्या अखत्यारीत न्यू साऊथ वेल्स हा प्रदेश सोडल्यास संपूर्ण ऑस्ट्रेलिया येत होते.



१९५२ साली त्यांचे निधन झाल्यानंतर रुपर्ट मर्डोक ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या ऍडिलेड न्यूज मीडिया कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. ती त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात होती. मीडियाच्या क्षेत्रात येण्याआधी मर्डोक ह्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी लेबर पार्टीला पाठिंबा दिला.

वयाच्या बाविसाव्या वर्षी रुपर्ट मर्डोक ऑस्ट्रेलियाला परत गेले आणि त्यांनी ऍडिलेड न्यूजमध्ये काम करणे सुरु केले. वृत्तपत्र निर्मितीच्या प्रत्येक कामात त्यांनी लक्ष घालणे सुरु केले.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात विविध घोटाळ्यांबद्दल बातम्या प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या वृत्तपत्राचा खप वाढण्यास सुरुवात झाली.

इथे यश मिळाल्यावर त्यांनी हळूहळू त्यांचे माध्यमांचे जाळे विणण्यास आणिमीडिया मार्केटमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियामधील अनेक वृत्तपत्रे विकत घेतली. हळूहळू ऑस्ट्रेलियन मीडिया मार्केटमधील दोन तृतीयांश भाग त्यांच्याच ताब्यात आला होता.

१९६४ साली त्यांनी द ऑस्ट्रेलियन हे ऑस्ट्रेलियातील पहिले राष्ट्रीय वृत्तपत्र सुरु केले. मर्डोक ह्यांनी त्यांचे साम्राज्य आणखी वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी ह्याची सुरुवात युनायटेड किंग्डमपासून केली.

१९६८ साली द न्यूज ऑफ द वर्ल्ड हे वृत्तपत्र विकत घेतले. हे एक साप्ताहिक आहे. त्यानंतर त्यांनी १९६९ साली द सन नावाचे एक टॅब्लॉइड सुद्धा विकत घेतले. तेव्हा इंग्लंडमध्ये निवडणुकांचे वारे वाहत होते आणि रुपर्ट मर्डोक यांच्या मालकीच्या वृत्तपत्राने मार्गारेट थॅचरला पाठिंबा देण्यास सुरुवात केली.

याआधी द सन हे वृत्तपत्र लेबर पार्टीला पाठिंबा देत असे. मार्गारेट थॅचरने रुपर्ट मर्डोकचा पाठिंबा लक्षात ठेवून त्यांना युकेमध्ये स्थान निर्माण करण्यास मदत केली. मर्डोक यांनी द टाइम्स ऑफ लंडन विकत घेतले तेव्हा मार्गारेट थॅचरनी अँटीमोनोपॉली रेग्युलेटर्सना अंधारात ठेवले.

तसेच त्यांनी फेब्रुवारी १९८९ पासून लक्सेम्बर्गमधून युकेमध्ये स्काय टेलिव्हिजनचे प्रक्षेपण करणे सुरु केले. या काळात मर्डोकनी त्यांचा साम्राज्यविस्तार अमेरिकेपर्यंत केला होता. त्यांनी १९७३ साली सॅन अँटोनियो एक्स्प्रेस न्यूज नावाचे अमेरिकन वृत्तपत्र विकत घेतले.

जसा पाठिंबा त्यांनी युकेमधील निवडणुकांदरम्यान मार्गारेट थॅचरला दिला तसाच पाठिंबा त्यांनी अमेरिकेतील १९८० सालच्या निवडणुकांच्या वेळेला रोनाल्ड रेगनना दिला. मर्डोकनी रेगनना भरपूर मते मिळवून दिली. त्याबदल्यात रिगनच्या सरकारने FEC सिलेक्टचे नियम शिथिल केले.

त्यामुळे मर्डोकना अमेरिकन शहरांत दूरचित्रवाणी वाहिन्या विकत घेणे शक्य झाले. त्यांनी याआधी त्याच शहरांत वृत्तपत्रे देखील विकत घेतली होती. त्यावेळी त्यांना तिथे दुरचित्रवाणी वाहिन्या विकत घेण्याची परवानगी नव्हती ती नंतर रेगनच्या शासनकाळात त्यांना मिळाली.

आपले साम्राज्य हळू हळू वाढवताना मर्डोकनी १९८० साली ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्स नावाचा चित्रपट स्टुडिओ विकत घेतला. त्यानंतर त्यांनी फॉक्स ही कंपनी खूप मोठी केली. अनेक स्थानिक वाहिन्या सुरु केल्या आणि प्रक्षेपण नेटवर्क सुरु केले. त्यावेळी मर्डोकना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.

त्यामुळे त्यांना अमेरिकन टीव्ही वाहिन्यांची पूर्ण मालकी मिळवता आली. १९९६ साली मर्डोक आणि रॉजर एइल्स ह्यांनी मिळून फॉक्स न्यूज ही वृत्तवाहिनी सुरु केली. द टाइम्सच्या मते ही वाहिनी सुरु करण्याची प्रेरणा मर्डोक यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी टेड टर्नरकडून घेतली. सीएनएन ही टेड टर्नरच्या मालकीची वृत्तवाहिनी होती.

मर्डोक हे त्यांच्या निओ काँझर्व्हेटिव्ह विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या तसेच इतर प्रसारमाध्यमांचा पद्धतशीर उपयोग करून इराकवर युद्ध लादले. २०१० साली मर्डोक वादात सापडले.

मर्डोकच्या मालकीच्या एका वृत्तवाहिनीने ब्रिटिश राजकारणी, राजघराण्यातील लोक आणि प्रसिद्ध लोकांचे व्हॉइसमेल्स हॅक केले असल्याची वादग्रस्त माहिती द गार्डियन या वृत्तपत्राने प्रकाशित करून एकच गदारोळ उडवून दिला.

या आधी सुद्धा या न्यूज कंपनीवर हॅकिंगचे आरोप झाले होते. २०११ साली न्यूज ऑफ द वर्ल्ड मीडिया कंपनीने हॅकिंग केल्याचे आरोप मान्य केले आणि लेखी माफी मागण्याची तयारी दाखवली. त्याच वर्षी मर्डोकना संसदेपुढे साक्ष देण्यास हजर राहावे लागले होते. मर्डोकनी जाहीरपणे ब्रिक्सिटला पाठिंबा दिला होता.

२०१५ साली ट्रम्पने मर्डोकची भेट घेऊन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत उभे राहत असल्याची माहिती दिली असे द टाइम्सने नमूद केले आहे. ट्रम्प आणि मर्डोकचे कौटुंबिक संबंध आहेत हे तर साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही मर्डोकनी सुरुवातीला ट्रम्पना पाठिंबा दिला नव्हता. पण निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी ट्रम्पच्या विरोधात साहित्य प्रकाशित करणे कमी केले.

फॉक्स न्यूजचा कारभार स्वतःच्या हातात घेतल्यावर मर्डोकनी ट्रम्पना जाहीर पाठिंबा देणे सुरु केले. ट्रम्प निवडून आल्यानंतर तर मर्डोक आणि ट्रम्पची वारंवार भेट होऊ लागली.

१९५२ साली रुपर्ट मर्डोकच्या मालकीचे एकच वृत्तपत्र होते. आज मीडिया मार्केटमध्ये रुपर्ट मर्डोक हे अत्यंत शक्तिशाली नाव आहे. आता या उद्योगपतीच्या हातात इतकी सत्ता आहे की ते चक्क निवडणुकांचे निकाल बदलून टाकू शकतात.

याच वर्षात त्यांनी त्यांच्या मालकीची ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स ही कंपनी डिस्नेला विकली. तरीही त्यांच्या हातात आजही अशी शक्ती आहे जिचा वापर करून ते जागतिक राजकारणाची गणिते बदलून टाकू शकतात.

प्रसारमाध्यम असे त्या शक्तीचे नाव आहे. न्यूज कॉर्प, द टाइम्स ऑफ लंडन, द वॉल स्ट्रीट जर्नल पब्लिशर डॉ जोन्स अँड कंपनी अशा मोठमोठया कंपन्या त्यांच्या खिशात आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणात त्यांचे वजन असणारच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Media
ShareTweet
Previous Post

ख्रिसमसच्या दिवशीच तमिळनाडूत ४४ दलितांना जिवंत जाळलं होतं

Next Post

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
Next Post

"रावण - राजा राक्षसांचा" : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

या स्त्रीने गोऱ्या व्यक्तीसाठी सीट रिकामी करायला नकार दिला आणि एक आंदोलन पेटलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.