The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ दगडावरील मजकुरामुळे प्राचीन इजिप्तच्या इतिहासाचा उलगडा झाला होता

by द पोस्टमन टीम
19 April 2025
in इतिहास, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


रोसेटा स्टोन हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. ब्रिटीश म्युझियममध्ये ठेवण्यात आलेला हा दगड फारच प्रसिद्ध आहे. हा दगड एका मोठ्या दगडाचा तुटलेला तुकडा आहे, ज्यावर प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील काही माहिती कोरलेली आहे. दगडाच्या या तुकड्यामुळे इतिहास संशोधकांना इजिप्तची प्राचीन चित्रलिपी समजून घेण्यास आणि तिचा अभ्यास करण्यास खूपच मदत झाली.

या दगडावरील मजकूर हा तीन वेगवेगळ्या लिपीत कोरण्यात आला आहे. यातील एक लिपी ही चित्रलिपी आहे. मुख्यत: त्या काळात धर्मगुरू आपला आदेश कोरण्यासाठी ही लिपी वापरत. यातील दुसरी लिपी आहे डेमोटिक लिपी, जी लिपी इजिप्तचे सामान्य लोक वापरत असत. म्हणजेच, सामान्य नागरिकांची भाषा. यातील तिसरी लिपी आहे ती प्राचीन ग्रीक लिपी जी त्याकाळची प्रशासकीय भाषा होती.

ज्या काळात हा शिलालेख कोरण्यात आला त्याकाळी इजिप्तवर ग्रीको-मॅकडोनीयन वंशाचे राजे राज्य करत होते. अलेक्झांडर द-ग्रेटच्या पाडावानंतर या राजांनी इजिप्तची सत्ता बळकावली.

रोसेटा स्टोन तुटलेला असल्याने त्यातील मजकूर पूर्णपणे समजून घेता येऊ शकत नाही. दगडाच्या या तुकड्यावर कोरलेल्या १४ ओळीत इजिप्तची प्राचीन चित्रलिपी वापरण्यात आली आहे. हा दगड जेव्हा सापडला तेव्हा इतिहास संशोधकांना या चित्रलिपीचा अर्थ लागत नव्हता. इतिहासतज्ज्ञ प्राचीन ग्रीक लिपीचा अर्थ लावू शकत होते. त्यामुळे प्राचीन इजिप्शियन लिपीचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना या दगडाची खूपच मदत झाली.

नेपोलियन बोनापार्टने १७९८ ते १८०१ या काळात इजिप्तवर स्वारी केली. त्याला पूर्व भूमध्य आणि भारतातील ब्रिटिशांच्या वर्चस्वाला आव्हान द्यायचे होते. १७९९ साली नेपोलियनच्या सैन्याला या दगडाचा शोध लागला.



नाईल डेल्टाच्या परिसरात रशिदा (रोसेटा) गावाजवळ किल्ला बांधण्यासाठी हे सैनिक पाया खोदत होते. या किल्ल्यासाठी पाया खोदताना त्यांना हा दगड सापडला. हा दगड म्हणजे एका मोठ्या दगडाचा तुटलेला भाग होता. सैन्याचा अधिकारी पेरी-फ्रान्सिस्को बुचर्ड याने या दगडाचे महत्त्व ओळखले आणि तो बाजूला काढून संग्रही ठेवला.

पुढे ब्रिटीशांचा नेपोलियनकडून पराभव झाला. अलेक्झांड्रिया करारानुसार (१८०१) हा दगड देखील ब्रिटिशांच्या मालकीचा बनला. फेब्रुवारी १८०२ मध्ये हा दगड जहाजाने इंग्लंडला पाठवण्यात आला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या दगडावर कोरण्यात आलेली चित्रलिपी ही अत्यंत प्राचीन लिपी आहे. चौथ्या शतकापासून या लिपीचा वापर कुठेही पहायला मिळत नाही. तेव्हापासून ही लिपी अदृश्य झाली होती.

एकोणिसाव्या शतकात थॉमस युंग (१७७३ – १८२९) यांनी या चित्रलिपीतील काही चिन्हांचा उलगडा केला. त्यांनी हे दाखवून दिले की या चित्रलिपीतील काही चिन्हे ही टोलेमी राजघराण्यातील काही नावांचा उल्लेख करण्यासाठी वापरली आहेत.

त्यानंतर जीन- फ्रांकॉईस चँपोलीयन (१७९०-१८३२) यानी दाखवून दिले की, या चित्रलिपीतील काही चिन्हे ही इजिप्शियन भाषेतील ध्वनी दर्शवतात. या संशोधनामुळे इजिप्शियन भाषा आणि संस्कृती समजून घेण्यासाठीचे पायाभूत ज्ञान या संशोधनामुळे मिळू शकले.

इजिप्शियन भाषा समजून घेण्यासाठी चँपोलीयनने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. त्यानी गैर-इजिप्शियन राज्यकर्त्यांसाठी या चित्रलिपीत कोणती चिन्हे वापरण्यात आली आहेत हे शोधून काढले.

इजिप्शियन आणि गैर-इजिप्शियन राज्यकर्त्यांसाठी वापरण्यात आलेली चिन्हे एकत्र करून त्यानी ही चित्रलिपी अजून खोलवर उलगडण्याचा प्रयत्न केला. रोसेटा स्टोन आणि इतर शब्दांचे मूल्यमापन करून त्याने २७ सप्टेंबर, १८२२ रोजी पॅरीस येथे भरलेल्या परिषदेत आपले संशोधन सादर केले.

त्याच्या या शोधनिबंधासोबत वाचकांनी थॉमस युंगचा शोध देखील जोडला. चँपोलीयनने आपल्या या शोधनिबंधाची प्रत प्रसिद्ध केली. त्यानतंर १८२४ साली त्याने इजिप्शियन भाषा आणि त्यातील नावे तसेच परकीय नावांसाठी वापरण्यात आलेली चिन्हे यांचा खुलासा केला. प्राचीन इजिप्शियन भाषेपासून उत्क्रांत झालेल्या कॉप्टिक भाषेचे ज्ञान त्याला अवगत होते. त्याच्या या ज्ञानाचा या चित्रलिपीचा अर्थ उलगडण्यासाठी त्याला खूप फायदा झाला.

शेवटी एकदाचा या रोसेटा स्टोनवर लिहिलेल्या माहितीचा पूर्ण उलगडा झालाच.

टोलेमी राजा पाचवा याच्या राज्याभिषेकाचा मजकूर या रोसेटो स्टोनवर कोरण्यात आलेला आहे. त्याचा राज्याभिषेक पार पडला ही बातमी संपूर्ण राज्यभर पोहोचवण्यासाठी आणखीन अशा प्रतिकृती तयार करून राज्यातील प्रत्येक मंदिरात बसवण्याचे आदेशही यात देण्यात आले होते. जेणेकरून राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही बातमी पोहोचेल.

अर्थात, नंतर झालेल्या उत्खननात अशीच माहिती असणारे आणखीही दगड सापडले आहेत आणि इतर देशांतील म्युझियममध्ये तुम्हाला हे दगड पाहायला मिळतील. म्हणजेच रोसेटा स्टोन हा असा एकाच वेळी तयार करण्यात आलेल्या अनेक दगडांपैकी एक दगड आहे. यावरील संदेश धर्मगुरूच्या आदेशाने इसपू १९६ मध्ये जाहीर करण्यात आला.

१८०२ साली हा दगड जहाजाने इंग्लंडला आणण्यात आला. जॉर्ज तिसरा याने हा दगड ब्रिटीश म्युझियममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. काहीकाळ हा दगड तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या म्युझियममध्ये ठेवल्यानंतर या दगडाचे वजन पेलेल अशा प्रकारचा बेस बनवून नंतर हा दगड म्युझियममध्ये हलवण्यात आला. यासाठी संसदेने काही दानशूर व्यक्तींकडून निधी घेऊन हा दगड जतन करून ठेवता येईल अशा प्रकारची खास इमारत बांधून घेतली.

१८०२ पासून हा दगड ब्रिटीश म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. पहिल्या महायु*द्धाच्या वेळी १९१७ साली लंडनमधील या म्युझियमवर बॉ*म्ब वर्षाव करण्यात आला तेव्हा मात्र या म्युझियममधील बऱ्याच मौल्यवान वस्तू इतरत्र हलवण्यात आल्या. त्यामध्ये हा दगड देखील होता.

या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी हॉलबर्न येथे एक भूमिगत बोगदा तयार करण्यात आला होता. पहिले महायु*द्ध संपेपर्यंत या सर्व वस्तू पोस्टल ट्यूब रेल्वे नावाने बांधलेल्या या ५० फुट बोगद्यात ठेवण्यात आल्या होत्या.

आज ब्रिटीश म्युझियमच्या इजिप्शियन स्कल्पचर गॅलरीमध्ये रूम नं. ४ मध्ये हा रोसेटो स्टोन पहायला मिळेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चल मेरी लुना : आज धूळ खात पडलेली लुना एकेकाळी रस्त्यावर दिमाखात धावत होती

Next Post

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक कोल्हापूरच्या मातीनं मिळवून दिलंय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक कोल्हापूरच्या मातीनं मिळवून दिलंय

पारलेने देशाला फक्त स्वदेशी कोलाच नाही दिला तर 'रेखा'सारखी सदाबहार अभिनेत्रीही दिली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.