The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने एका भारतीय संशोधकाचे संशोधन चोरले होते..!

by द पोस्टमन टीम
5 April 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेखक: पुष्कराज घाटगे


रेडिओचा जनक आणि प्रामुख्याने बिनतारी संदेश यंत्रणेसाठी ज्याला नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून जगभर ज्याचा गेली जवळपास दीडशे वर्षं उदो उदो होतो, तो महान वैज्ञानिक म्हणजे गुग्लिएल्मो मार्कोनी !

१७ मे १९०१ या दिवशी जगदीशचंद्र बसू  यांचं लंडनच्या रॉयल सोसायटी पुढे व्याख्यान झालं. त्यात त्यांनी त्यांचं वनस्पती आणि निर्जीव यांमध्ये असलेल्या संवेदनांबाबत त्यांनी केलेलं संशोधन प्रयोगासह सविस्तर मांडलं.

जे पाहून बड्या बड्या संशोधकांनी तोंडात बोटं घातली. त्यावेळी त्यांनी ‘कृत्रिम डोळा (artificial retina)’ तयार केला होता त्यावरचं प्रात्यक्षिक सादर केलं.

वेगवेगळ्या प्रकरच्या विद्युतचुंबकीय लहरी हा डोळा कसा ग्रहण करतो हे त्यांनी दाखवून दिलं. बिनतारी संदेशवहन क्षेत्रात पुढे जी मोठी क्रांती झाली त्याचा पाया याच ठिकाणी घातला गेला.



जगदीशचंद्रांना एक सवय होती की ते व्याख्यान देताना नेहमी आपल्या संशोधनासंबंधी मुद्दे असलेला कागद किंवा वही समोर ठेवत असत, तशीच त्यांनी एक वही रॉयल सोसायटीतल्या व्याख्यानावेळीही समोर ठेवली होती.

व्याख्यान झाल्यावर सामान्यतः वक्त्याभोवती समोरील व्यक्तींची गर्दी होते त्याचप्रकारे समोर बसलेले संशोधक आणि विद्यार्थी मंडळींचा बसूंभोवती गराडा पडला, प्रत्येकाशी बोलण्यात बराच वेळ गेला आणि शेवटी बसू मोकळे झाले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची वही, ज्यात त्यांच्या वनस्पतींबाबत, निर्जीवांच्या संवेदनांबाबतच्या अभ्यासाची सर्व माहिती होती तशीच त्या वहीत त्यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवर केलेल्या संशोधनाची महत्वाची टिपणंही होती, ती वही काही मिनिटांपूर्वी समोरच्या टेबलावर त्यांनी संदर्भासाठी ठेवली होती, ती आता तिथे नव्हती, अर्थातच त्या गर्दीत संधी साधून कोणीतरी ती लंपास केली होती.

त्यावेळी काही व्यावसायिक बसूंना भेटायला आले होते ज्यांना बिनतारी संदेश यंत्रणेत पैसा गुंतवण्यात रस होता आणि जगदीशचंद्रांनी संशोधन व्यवसाय म्हणून करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी त्या व्यावसायिकांना आपलं संशोधन विकण्यास (भलेही त्यावर त्यांचं पेटंट नव्हतं तरी) नकार दिला आणि ती वही चोरीला गेली.

 

royal society postman

जवळपास ३-४ वर्षे प्रचंड श्रमातून बसूंनी तो संदेश ग्राहक कृत्रिम डोळा शोधला होता. पहिला प्रयोग त्यांनी त्याचा १८९८ साली केला होता. त्याचप्रमाणे याचा मूळ प्रयोग १८९५ साली त्यांनी केला होता. त्याच काळात गुग्लिएल्मो मार्कोनी नावाचा इटालियन संशोधकही बिनतारी संदेश ग्राहकावर संशोधन करत होता.

परंतु दोघांच्याही संशोधनाची दिशा आणि दशा वेगळी होती. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या या दोन संशोधकांची भेट १८९७ साली प्रसिद्ध झाली होती, त्यावेळी या होतकरू तरुणाचं बसूंनी  कौतुक केलं होतं.

मार्कोनीला हवा तसाच संदेश ग्राहक बसूंनी बनवला होता. बसूंनी थोडी वाकलेली नळी या डोळ्यामध्ये म्हणजेच संदेश ग्राहकात वापरली होती, त्यात बदल करून मार्कोनी याने फक्त सरळ नळी वापरली आणि संदेध ग्राहकाच्या क्षमतेत वाढ केली.

लागलीच स्वतःचं संशोधन नोंदवून त्याचे व्यापारी मालकी हक्क स्वतःकडे घेतले आणि त्याचं जाहीर प्रात्यक्षिक करून यश मिळवलं. आणि पुढे त्याने रेडिओ लहरी प्रक्षेपित करून रेडिओचा जनक म्हणून नावही कमावलं.

guglimo marconi 1 postman
Radio Fidelity

मार्कोनी हा नक्कीच रेडिओचा आणि रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणावर केलेल्या संशोधनाचा संशोधक होता पण याचा अर्थ असा होत नाही की त्याने मूळ संशोधकांचं संशोधन त्याला न विचारता वापरून, त्याचं श्रेय लाटून, स्वतःच्या नावावर खपवावं. अर्थातच त्याने ते रूढार्थाने चोरलं नव्हतं कारण एखादी गोष्ट चोरी कोणाची होते जी त्या व्यक्तीच्या मालकीची असते त्याच्याकडून चोरी होते.

बिनतारीच्या संशोधनाची हक्क बसूंच्या नावावर नव्हतेच, त्यामुळे ते चोरलं असं न म्हणता न विचारता वापरलं असं आपण नक्कीच म्हणून शकतो. किमान आपण ज्या संशोधकाच्या संशोधनाचा वापर केला त्यांचा उल्लेख करण्याची कृतज्ञता दाखवण्याचीही गरज त्यांना  भासली नाही.

मार्कोनीने बिनतारीचा प्रयोग केला त्यावेळी बसू इंग्लंडमध्येच होते त्यामुळे त्याच्या त्या ऐतिहासिक प्रयोगाबद्दल त्यांना नक्कीच समजलं असणार पण आपलं संशोधन हे समाजासाठी आहे असं मानणाऱ्या बसूंनी आपलं संशोधन समाजाला अर्पण केलं होतं.

आपलं संशोधन हे अप्रत्यक्षपणे वापरलं गेलं हे, बसू जगाला ओरडून सांगू शकले असते परंतु सर्व दिसत असूनही ते शांत राहिले आणि भारताला या विषयासाठी मिळू शकणारी जागतिक ओळख कल्पनेतच राहिली.

 

jagdishchandra bose 2 postman
Swarajya

जगदीशचंद्रांची कामगिरी जगासाठी अज्ञातच राहिली. या बिनतारी संदेश वहनाच्या संशोधनाबद्दल गुग्लिएल्मो मार्कोनी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुग्लिएल्मो मार्कोनी याचा जन्म २५ एप्रिल १८७४ या दिवशी झाला. लहानपणापासूनच तो अबोल असल्यामुळे फारसा कुणाशी संबंधित राहत नसे. पण इतरांप्रमाणे विन्मुख असूनही तो अभ्यासात प्रगती करत होता, असंही नाही.

त्याने समुद्र प्रेमामुळे नेव्हीत जायच्या उद्देशाने नेव्हल अकॅडमीची परीक्षा दिली त्यात नापास झाला. बोलोना विद्यापीठात शिक्षण घेत असताना मॅट्रिकच्या परीक्षेतही नापास झाला आणि विद्यापीठाने ‘यु आर स्टुपिड’ असा शेरा देऊन त्याला काढून टाकलं होतं.

पण अवांतर वाचनातून मार्कोनीला रेडिओ लहरींच्या प्रक्षेपणाबाबत कुतूहल निर्माण झालं होतं त्यामुळे त्याने त्यावर प्रयोग करण्यात स्वतःला गुंतवून घेतलं.

आधी सांगितल्याप्रमाणे बरेच जुगाड करून मार्कोनीने रेडिओ संदेश ग्राहक बनवण्यात यश तर मिळवळच पण इंग्लंडमध्ये त्याबे केलेला बिनतारी (wireless) संदेश वहनाचा प्रयोग फार मोठ्या प्रमाणात गाजला.

रेडीओ ट्युनिंग करण्याची पद्धत त्याने शोधून काढली आणि सुस्पष्टपणे रेडिओ संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली.

यातला व्यावहारिक भाग ओळखून त्याने ‘मार्कोनीज वायरलेस टेलिग्राफ कंपनी’ची स्थापना केली आणि लहानपणापासून श्रीमंत घरात वाढलेला मार्कोनी रेडिओमुळे आणि त्याच्या कंपनीमुळे बराच नफा कमवू लागला.

१८६४ साली मॅक्सवेलने सर्वप्रथम रेडिओ लहरींचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यामुळे त्याला या क्षेत्राचा जनक म्हणता येईल. त्यानंतर हेन्रीक हर्ट्झने यात मोठं काम केलं आणि मग हळूहळू अनेक संशोधकांनी यात उडी घेतली. त्यापैकी महत्वाचा होता एडवर्ड ब्रॅनली ज्याने रेडिओ लहरी शोधणारा पहिला डिटेक्टर बनवला.

निकोला टेस्ला हा संशोधन असाच सर्व ठिकाणी ‘परिपूर्ण’ लुडबुड करणारा होता. त्याने भरपूर नव्या गोष्टी शोधल्या आणि अलिप्त राहिला. १८८५ साली हर्ट्झने जर्मनीमध्ये वायरलेस ट्रान्समिशनचा यशस्वी प्रयोग केला होता.

त्यानंतर काहीच वर्षांनी १८९२ साली टेस्लाने रेडिओ ची कल्पना मांडून त्यावर काम सुरू केलं (त्यावेळी मार्कोनी जेमतेम १८ वर्षांचा होता). त्यात टेस्लाने एवढी प्रगती केली की १९०० साली त्याने न्यूयॉर्क मधील लॉंग आयलँड येथे वार्डनक्लिफ टॉवर उभारला जो मोठ्या प्रमाणात रेडिओ लहरी प्रक्षेपित करू शकत होता.

हा टॉवर त्याने उभारला खरा पण मुळातच फारसा लोकांमध्ये न मिसळणारा टेस्ला या वेळी प्रसिद्धीपासून दूर राहिला. अर्थात नंतर या टॉवर ला प्रसिद्धी मिळाली आणि त्याला आता ‘टेस्ला टॉवर’ असंही म्हटलं जातं. यातून रेडिओ क्षेत्रामधलं टेस्लाचं भरीव योगदान दिसून येतं.

त्यानंतर पुढच्याच वर्षी मार्कोनीने आपल्या प्रयोगाची मोठी प्रसिद्धी करून, रेडिओ ट्रान्समिशन बाबतच सर्व हक्क स्वतःच्या नावे करून घेतले म्हणजे रेडिओचं पेटंट मिळवलं. यात टेस्लाचा कुठेही उल्लेख नव्हता.

खरंतर रेडिओमध्ये वापरला जाणारा ‘टेस्ला रॉड’ हा टेस्लानेच तयार केला होता. यावरचे सर्व अधिकृत पेटंट मार्कोनीच्या नावावर असल्यामुळे त्याने याचा लगोलग व्यापारी उपयोग सुरू केला. रेडिओ क्षेत्राबाबत म्हणायचं तर मार्कोनीचं योगदान हे केवळ तांत्रिक बाबींमधलंच आहे.

असं म्हणता येईल, कारण त्याने टेस्ला, हर्ट्झ, जगदीशचंद्र बसु इत्यादींच्या कल्पना परस्पर उचलून त्याचा उपयोग स्वतःच्या प्रयोगात करून, त्याची उपयोगिता वाढवून पेटंट मिळवलं. यातून त्याच्यातला पक्का उद्योजक दिसतो.

समांतरपणे मार्कोनी आणि टेस्ला यांनी रेडिओचा शोध लावला आणि श्रेय मिळालं मार्कोनीला, कारण टेस्लाला स्वतःचा शत्रू समजणाऱ्या एडिसनचा वरदहस्त मार्कोनीच्या डोक्यावर होता. टॉवरच्या बांधणीपूर्वी १९०० साली जे पी मॉर्गन यांनी भेटून टेस्लाने त्याची वायरलेस ब्रॉडकास्टिंग केंद्र स्थापण्याची इच्छा बोलून दाखवली.

पण त्याच वेळी दुसरीकडे मार्कोनीने वायरलेसच्या माध्यमातून सिग्नल प्रक्षेपित करून दाखवला. हे बघून, मार्कोनीने आपल्या १७ पेटंट्सचा उपयोग केला असल्याचं टेस्लाने जगाला ओरडून सांगितलं पण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही, कारण त्यावेळी ‘हवा’ फक्त मार्कोनीची होती.

हे बघून मॉर्गनने टेस्लाच्या प्रकल्पनात गुंतवणूक करायला नकार दिला आणि मॉर्गनने मार्कोनीकडे पैसे गुंतवले. मार्कोनी प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होता. १९०४ साली यूएस पेटंट ऑफिसने रेडिओ ट्रान्समिशन चे सर्व हक्क मार्कोनीला दिले.

टेस्लाने स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मिळवलेलं सर्व मार्कोनीच्या नावावर गेलं आणि मुख्य म्हणजे ती १७ पेटंट, जी टेस्लाच्या नावे होती, तीही मार्कोनीला मिळाली. हे सर्व बघून टेस्ला हताश झाला.

भावनेच्या भरात त्याने कोर्टात मार्कोनीविरुद्ध दावा केला पण तिथेही तो हरला, कारण पुरावे होते कुठे ? होतं ते सगळंच मार्कोनीच्या नावावर. टेस्ला शेवटी हरला होता.

सुरवातीला एडिसनने टेस्लाला त्रास दिला आणि शेवटी मार्कोनीने त्याला हरवलं. महत्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी मार्कोनी हा टेस्लाचा विद्यार्थी होता.

पण टेस्लाच्या नशिबी मृत्यूपश्चात एक खूप मोठी गोष्ट होती. मार्कोनीचा मृत्यू १९३४ साली झाला आणि टेस्लाचा १९४३ साली.

टेस्लाच्या मृत्यूनंतर ठीक ६ महिन्यांनी कोर्टाने मार्कोनीची रेडिओ संबंधी सर्व पेटंट्स अवैध ठरवून ती टेस्लाच्या नावे केली पण हे बघायला टेस्ला त्या वेळी या जगात नव्हता.


संदर्भ-

१) तंत्रज्ञ जिनियस भाग १-अच्युत गोडबोले/दीपा देशमुख
२)तंत्रज्ञ जिनियस भाग २-अच्युत गोडबोले/दीपा देशमुख
३)Tesla, Man out of time- Margaret Chaney
४) Nuts and Volts- Louis E. Frenzel
१)जगदीशचंद्र बसू- दिलीप कुलकर्णी
२) प्रकाशवेध- डॉ. माधवी ठाकुरदेसाई
३)तंत्रज्ञ जिनियस- अच्युत गोडबोले/दीपा देशमुख

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 
Tags: InnovationJagdishchandra BoseMarconiScience
ShareTweet
Previous Post

दिव्यांग सत्येंद्रने जगातील सर्वात धोकादायक खाडी ओलांडून विक्रम केलाय

Next Post

…आणि, महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

...आणि, महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले!

एका 'बादली'साठी दोन देशात भीषण यु*द्ध होऊन हजारो सैनिकांचा जीव गेला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.