आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आयुष्यात कोणावर आलेला वाईट काळ समोर काय संकट घेऊन येईल याची कोणालाच काहीच कल्पना नाही. आपली उपजीविका भागवण्यासाठी व्यक्तीला कुठल्या मार्गाचा अवलंब करावा लागेल याचीही काहीच शाश्वती नाही.
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध रेसर रेनी ग्रेसीवर अशीच वाईट परिस्थिती ओढवली आणि तिने रेसिंगच्या कामाचा त्याग करून आता पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती, आता तिचा एक व्हिडिओ ही प्रचंड व्हायरल होतो आहे. ही रेनी ग्रेसी कोण आहे आणि असं काय घडलं ज्यामुळे तिने आपला रेसिंग प्रोफेशन सोडून पॉर्न इंडस्ट्रीचा अवलंबला, हे जाणून घेऊया!
२०१५ साली रेनी ग्रेसीने रेसिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले होते.
रेनी ग्रेसीने आपल्या करियरची सुरुवात कार्ट रेसर म्हणून केली. २०१३ आणि २०१४ साली तिने ऑस्ट्रेलियाचा पोर्ष कॅरेरा कपच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग नोंदवला. २०१३ सालच्या स्पर्धेत भाग घेणारी ती पहिली महिला होती. ग्रेसीने त्या स्पर्धेत शंभर टक्के रेस फिनिशचा रेकॉर्ड रचला होता.
२०१५ साली रेनी ग्रेसीने सुपरकार डुनलोप सिरीजमध्ये पॉल मॉरिस मोटोस्पोर्टमध्ये आपलं नशीब आजमावलं, १४ वर्षात त्या स्पर्धेत भाग घेणारी ती पहिली महिला होती. तिने स्विस ड्रायव्हर सिमोन सिल्व्हेस्ट्रोसोबत पार्टनरशीप करत जगातील पहिली महिला रेसर जोडी तयार केली आणि त्यांनी बाथरस्ट १००० रेसमध्ये सहभाग नोंदवला. तिने तिच्या पहिल्याच रेसमध्ये १२ वे स्थान पटकावले. त्यांच्या जोडीने परत पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत सहभागी होत १४ वे स्थान पटकावले.
२०१७ साली ती ड्रॅगन मोटर क्लबमध्ये गेली, पण त्या ठिकाणी तिला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. तिने भाग घेतलेल्या १७ रेसमधील तब्बल १६ रेसमध्ये तिला पहिल्या १० मध्ये स्थान पटकवण्यात अपयश आलं. त्यामुळे तिची उचलबांगडी करण्यात आली.
रेसिंगमध्ये येणाऱ्या सततच्या अपयशामुळे तिने त्या इंडस्ट्रीला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय घेण्यामागे तिच्या समोर असणाऱ्या आर्थिक अडचणींचा महापूर हे देखील एक कारण होते. तिने पुढे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तिने आपल्या फोटोग्राफचा लिलाव करायला सुरुवात केली. तिच्या फोटोग्राफला चांगला प्रतिसाद मिळाला.
रेनी ग्रेसीने असा दावा केला आहे की तिला तिच्या फोटोंमधून दर आठवड्याला २५ हजार डॉलर्सची कमाई होते. तिचे अनेक फोटो सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहेत. तिने सांगितलं आहे की पॉर्न आणि ऍडल्ट इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून ती ६५ ते ९० हजार डॉलर्सची कमाई करते आहे.
तिने तिच्या चाहत्यांना विनंती केली आहे की तिचे मूल्यमापन तिच्या यशावरून करा, ती काय करतेय यावरून नाही. तिच्या मते पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणे तिची चॉइस होती, तिला त्यावेळी गरज होती, ती याकडे एक काम म्हणूनच बघते आहे.
रेनी ग्रेसीच्या वडींलानी देखील तिचे समर्थन केले असून, त्यांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पॉर्न इंडस्ट्रीमधल्या पदार्पणामुळे सध्या रेनी ग्रेसी सर्वत्र चर्चेत आली असून तिच्या सोशल मीडिया फॉलोवर्समध्ये देखील आता मोठी वाढ झाली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेला वाईट काळ त्याला काय करण्यास भाग पाडू शकतो याचे रेनी ग्रेसी उत्तम उदाहरण आहे. पण कुठलाही व्यवसाय हा व्यवसाय असतो. जर ती व्यक्ती स्वेच्छेने करत असेल तर तो व्यवसाय करण्याचे त्या व्यक्तीला स्वतंत्र आहे, असा संदेश रेनी ग्रेसीने दिला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.