The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजा मानसिंग या एका नवरत्नाने बिरबलाच्या मृत्यूचा बदला घेतला होता

by द पोस्टमन टीम
31 December 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


अकबराच्या नवरत्नांबद्दल ऐकलं नाही असे खूप कमी लोक आपल्याला बघायला मिळतील. समुद्र मंथनातून जगाला मिळालेल्या ९ रत्नांपेक्षाही जास्त प्रसिद्धी अकबराच्या दरबारातील नवरत्नांना मिळाली. याचपैकी एक होते, ते म्हणजे राजा मानसिंग.

आपली बुद्धिमत्ता, सैन्य, यु*द्धकौशल्य यांमुळे राजा मानसिंग अकबराच्या जवळचे होते. त्यांच्या कामावर खुश होऊन अकबर त्यांना फर्जंद, राजा मिर्झा म्हणून संबोधत असे. बिरबलच्या मृत्युचा बदला घेणाऱ्या राजा मानसिंग यांची कथा आज आपण बघुयात.

अंबरचे राजे असलेले राजा मानसिंग यांचा जन्म १५४० साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवानदास होते. भगवानदास यांनी गुजरात यु*द्धाच्या वेळी अकबराची साथ दिली होती. अशा अनेक यु*द्धांत भगवानदास यांनी अकबराची मदत केली. यावरुन पराक्रमाची देणगी वांशिकरित्या त्यांच्याकडे पोहचली असं म्हणण्यात काही चूक नाही.

महाराणा प्रतापांसारख्या यो*द्ध्यासमोरही स्वत:चा स्वाभिमान जपणे राजा मानसिंग यांनी सोडले नाही. यु*द्धावरुन परतत असताना त्यांनी महाराणा प्रताप यांच्याबरोबर भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराणा प्रतापांनीही ही इच्छा मान्य केली आणि भोजनासाठी बोलावण्यात आले.



ऐनवेळी महाराणा प्रताप यांना डोकेदुखीचा त्रास झाला म्हणून त्यांनी आपल्या मुलाला भोजनासाठी पाठवले. परंतु तरीही राजा मानसिंगांनी हा आपला अपमान समजला आणि ते निघुन गेले.

इतिहासकारांच्या मते याच कारणामुळे १५७६ साली हळदी घाटीत महाराणा प्रताप आणि राजा मानसिंग यांच्यात यु*ध्द झाले. या यु*ध्दाचं नेतृत्व अकबरने आपला मुलगा सलीम याला दिले. राजा मानसिंग आणि महावत खान यांची मोठी सेना महाराणा प्रताप यांच्या विरोधात यु*ध्दासाठी निघाली.

संख्येने कमी पडलेल्या सैन्यामुळे महाराणा प्रताप यांना या यु*द्धातून मागे फिरावे लागले. परंतु या भयानक यु*द्धात त्यांचा घोडा – चेतकला आपल्या प्राणाला मुकावे लागले. या यु*ध्दानंतर मुघल सेनेला तो प्रदेश लुटण्यासाठी परवानगी देण्यात आली, परंतु राजा मानसिंग यांनी या गोष्टीस स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे मुघल सत्तेबरोबर असणाऱ्या त्यांच्या संबंधाना धोका निर्माण झाला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

राजा मानसिंग यांच्या वडिलांना पंजाबचा सुभेदार म्हणुन नियुक्त केले तेव्हा मानसिंगाना सीमेवरचा कार्यभार सोपवण्यात आला. याचवेळी अकबरचा भाऊ मिर्झा महम्मद हकीम याचा मृत्यू झाला. अशा वेळी राजा मानसिंग यांना काबुल येथे पाठवण्यात आले.

याच काळात अफगाणिस्तानमध्ये काही सरदारांनी लूट माजवली होती. लोकांच्या मनात या सरदारांविषयी भिती निर्माण झाली होती. अशा वेळी राजा मानसिंग यांनी या सरदारांना पळवुन लावले आणि जनतेची सुटका केली.

याच लुटेऱ्यांमध्ये एक युसूफजाई समुह होता, त्यांच्याशी झालेल्या युद्धात अकबराचा प्रिय राजा बिरबल याचा भीषण मृत्यू झाला. याच कारणामुळे जैन खान कोका, अब्दुल फतेह यांना परत बोलवून घेतलं. अशा वेळी राजा मानसिंग यांना पाठवण्यात आले. मानसिंग यांनी ही जबाबदारी अतिशय योग्य प्रकारे पार पाडली आणि बिरबलच्या मृत्यूचा बदला घेतला.

पुढे जाऊन अकबराने त्यांची नियुक्ती काबुलचे शासक म्हणुन केली. आता त्यांना बिहार मधील कछवा येथील जहागिरी सोपवण्यात आली. याच जोरावर त्यांनी पुर्ण कंधोरियावर आक्र*मण केले. त्याच बरोबर तेथील काही ठिकाणांवर आपला कब्जा मिळवला. याच वेळी त्यांना पाच हजारी मनसबदारी बहाल करण्यात आली आणि ‘राजा’ हे पद बहाल करण्यात आले.

पुढे जाऊन त्यांनी आपला मोर्चा पटनाकडे वळवला आणि तेथील सत्ता काबीज केली. त्यांच्या विजयाचा रथ काही केल्या थांबण्यास तयार नव्हता. झारखंडमार्गे त्यांनी ओडिसावरही ह*ल्ला करुन कब्जा मिळवला.

याच दरम्यान राजा मानसिंग यांनी अनेक छोट्या-छोट्या राज्यांना मुघलसत्तेत सामावुन घेतले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना ७ हजारी मनसबदार बनवण्यात आले. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि साहसाचा हा गौरव होता.

अकबर होता तोपर्यंतच राजा मानसिंग होता असं म्हटले जाते. अकबरचा मुलगा जहांगीरचे आणि राजा मानसिंग यांचे संबंध वादग्रस्त होते असं समजलं जातं. खरं तर गादीवर बसण्यासाठी जहांगीरने अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या अबुल फजल याची हत्या केली. अशा वेळी आजारी असलेल्या अकबराने खुसरो याची आपला उत्तराधिकारी म्हणुन निवड केली.

अकबराच्या या निर्णयाला राजा मानसिंग याने समर्थन दिले म्हणुन जहांगीर मानसिंगावर नाराज असणे स्वाभाविक होते. म्हणुनच त्याने राजा मानसिंग यांना बंगालला पाठवून दिले.

राजा मानसिंगांना असणाऱ्या बहादूर राजपूतांच्या पाठिंब्याची जाणीव जहांगीरला होतीच. परंतु, पुढच्या काही दिवसातच १६१४ मध्ये राजा मानसिंग यांनी जगाचा निरोप घेतला.

बिरबलच्या मृत्यूचा बदला, महाराणा प्रतापसारख्या महान यो*द्ध्याला टक्कर देण्यात न घाबरणाऱ्या या नर रत्नाची ही जीवनगाथा थक्क करुन सोडणारी आहे. एकाच आयुष्यात अनंत यशाची शिखरे गाठता येतात याचं उदाहरण असणारया या महान व्यक्तिमत्त्वास शत: शत: नमन.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: mansingh
ShareTweet
Previous Post

विश्वास बसणार नाही पण आपल्या क्रिकेटर्सना मानधन म्हणून फक्त एक रुपया मिळायचा

Next Post

या शूर कुत्र्याने रणांगणात मुघल सैन्याला धूळ चारली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

या शूर कुत्र्याने रणांगणात मुघल सैन्याला धूळ चारली होती

भारताच्या अफूमुळे चीन आणि ब्रिटिशांचं यु*द्ध झालं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.