The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या प्राण्याची प्रजाती पृथ्वीवरून दोनवेळा नामशेष झाली आहे…!

by द पोस्टमन टीम
24 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती अनेक सुंदर गोष्टींनी भरलेली आहे. या ग्रहावर आपल्यासाठी अगणित आणि अतिशय आकर्षक गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पृथ्वीवर सुमारे ८.७ अब्ज प्रजाती ज्ञात आहेत आणि अनेक प्रजाती अद्याप सापडणं बाकी आहे. त्यापैकी काही प्रजाती लुप्त झाल्यानं त्या कायमचं हे जग सोडून गेल्या आहेत. केवळ अवशेषांशिवाय त्यांचा कुठे मागमुसही दिसत नाही. अशीच एक प्रजाती म्हणजे पिरेनियन आयबेक्स (Capra pyrenaica pyrenaica).

या प्राण्याला बुकार्डो, पिरेनियन वाईल्ड गोट आणि स्पॅनिश आयबेक्स असंही म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पिरेनियन आयबेक्स ही एक शेळी आहे. इबेरियन आयबेक्सच्या चार उपप्रजातींमध्ये तिचा समावेश होत असे. आता ती शेळी नामशेष झाली आहे. या सुंदर प्राण्याचं नामशेष होणं हे अजूनही एक न सुटलेलं कोडं आहे. शास्त्रज्ञांनी या शेळीचा क्लोन तयार करून तिला पुन्हा जिवंत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांना काही प्रमाणात यशही आलं होतं. मात्र, काही दिवसातच शेळीचा क्लोनदेखील नष्ट झाला.

अशा प्रकारे या प्रजातीनं आपल्यासोबत अनेक प्रश्न घेऊन दोनदा हे जग सोडलं आहे. त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

युरोपमध्ये २००० च्या दशकात पिरेनियन आयबेक्स नामशेष होण्याची घटना, निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेप किती जास्त प्रमाणात वाढला आहे, याचं सर्वांत शक्तिशाली उदाहरण आहे. इबेरियन आयबेक्सच्या या उपप्रजातीचं वस्तीस्थान फ्रेंच आणि स्पेनपुरतंच मर्यादित होतं. तसं पाहिल्यास ही प्रजाती आधीपासूनच अत्यंत दुर्मिळ होतं.

१९६७ मध्ये अधिकृत लिखित दस्तऐवजात तिचा सर्वप्रथम उल्लेख केलेला आढळतो. इतर अनेक रानटी शेळ्यांप्रमाणं त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असे. १९१३ मध्ये त्यांची ह*त्या करण्यावर प्रतिबंध लावण्यात आला होता. मात्र, तोपर्यंत या शेळ्या जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या होत्या.



ओर्डेसा आणि मॉन्टे पेर्डिडोतील नॅशनल पार्कचे अधिकारी किंवा युरोपियन LIFE कार्यक्रम निधीसह काम करणारा संवर्धन प्रकल्प या शेळीचा पूर्णपणे नामशेष रोखू शकले नाहीत. ६ जानेवारी २००० रोजी ‘सिलिया’ नावाच्या शेवटच्या पिरेनियन आयबेक्सचा मृत्यू झाला. त्यानंतर पिरेनियन आयबेक्स पूर्णपणे नामशेष झाल्याचं अधिकृतपणे घोषीत करण्यात आलं.

पण, या दुर्मिळ प्राण्याची कथा तिथेच संपली नाही. कोणत्याही वैज्ञानिक कराराशिवाय किंवा प्रादेशिक पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थांच्या पाठिंब्याशिवाय काही शास्त्रज्ञांनी पिरेनियन आयबेक्सचं त्वरित क्लोनिंग करण्यात सुरुवात केली. साडेतीन वर्षांनंतर, स्पॅनिश प्रयोगशाळेत एका नवजात क्लोननं आपला श्वास घेतला. मात्र, तोच तिचा शेवटचा श्वास ठरला. याचाच अर्थ तेव्हा पिरेनियन आयबेक्स दुसऱ्यांदा नामशेष झाली. पिरेनियन आयबेक्स ही प्राण्याची क्लोन केलेली पहिली विलुप्त प्रजात ठरली आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

‘सिलिया’ या जगातील शेवटच्या वाईल्ड पिरेनियन आयबेक्सचा मृत्यू इतरांसाठी अतिशय सामान्य गोष्ट होती. स्पॅनिश नॅशनल पार्कमधील रेंजर्सला एका झाडाखाली ती मृतावस्थेत पडलेली आढळली होती. मात्र, इकोलॉजिस्टसाठी सिलियाचा मृत्यू नक्कीच सामान्य नव्हता. ज्या उत्तर स्पेन, पोर्तुगाल आणि दक्षिण फ्रान्सच्या पर्वतांमधील वातावरणामध्ये सिलियाची प्रजाती वाढली होती. त्याठिकाणी तिनं एकटीनंच कशा शेवटच्या घटका मोजल्या, हा महत्त्वाचा प्रश्न होता.

संपूर्ण युरोप, आशिया आणि आफ्रिकेमध्ये आयबेक्सच्या अनेक प्रजाती वास्तव्याला आहेत. ते बऱ्याच काळापासून त्या मानवांसोबत सहअस्तित्वात आहेत. साधारण तीस हजार वर्षांपूर्वी दक्षिण युरोपमधील गुहांच्या भिंतींवर आणि किमान दहा हजार वर्षांपूर्वी इस्रायलच्या नेगेव्ह वाळवंटातील साइटवर आयबेक्स शेळ्यांची चित्र रेखाटलेली आढळली आहेत.

पिरेनियन आयबेक्स म्हणून ओळखली जाणारी उपप्रजात उत्तर सैबेरिया आणि दक्षिण फ्रान्सच्या पर्वतांमध्ये स्थलांतरित झाली होती, असं इकोलॉजिस्टच ठाम मत आहे. ऐतिहासिक नोंदींचा आधार घेतल्यास, १८०० च्या दशकात पिरेनियन आयबेक्सची संख्या झपाट्याने कमी झाली. १९१० पर्यंत फक्त ४० शेळ्या उरल्या होत्या. उत्तर स्पेनमधील राष्ट्रीय उद्यानात त्यांना आश्रय देण्यात आला होता. त्यानंतर शतकापेक्षा कमी काळातच त्यांच्या शेवटच्या वंशजांचा मृत्यू झाला. नंतर तिचा क्लोन तयार करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र, तो क्लोनही मरण पावला.

कॉन्झर्वेशनसाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधकांना सिलियाच्या मृत्यूच्या खूप अगोदरच भविष्यातील स्थिती दिसली होती. त्यामुळं त्यांनी तिचा मृत्यू होण्याच्या एक वर्षापूर्वीच तिचा वंश वाचवण्यासाठी हालचाल सुरू केली होती. त्यांनी तिच्या कानातून त्वचेचे काही नमुने घेतले होते आणि त्यातील उती विलग करून त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्या होत्या.

सिलियाच्या मृत्यूनंतर लगेचच स्पॅनिश सरकारी एजन्सीनं ॲडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजी नावाच्या एका खासगी कंपनीसह कोल्ड स्टोरेजमधील सेल सॅम्पल्स वितळवले आणि नष्ट झालेला पिरेनियन आयबेक्स पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सिलियाचे सेल सॅम्पल्स वापरून क्लोन तयार करण्यात आला तेव्हा पहिल्या काही सेकंद तर पिरेनियन आयबेक्स पुनरागमन करणार असं चित्र होतं. कारण सिलियाच्या मुलीला जन्माला घालण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं. तिची शारिरीक स्थिती उत्तम दिसत होती. मात्र, तिला श्वास घेता येत नव्हता. तिच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी अडचण होती. जन्माला आल्यानंतर काही वेळातच पिरेनियन आयबेक्स दुसऱ्यांदा नामशेष झाली.

मृत झालेल्या क्लोनची अटॉप्सी केल्यानंतर, शास्त्रज्ञांना कळलं की क्लोन केलेल्या शेळीच्या डाव्या फुफ्फुसात एक्स्ट्रा लोबची निर्मिती झाली होती. त्यानं तिच्या छातीची खूप जागा व्यापली होती. परिणामी डाव्या फुफ्फुसाला योग्यरित्या पसरण्यासाठी जागा मिळाली नाही. हा एक डिफेक्ट वगळता तिचे इतर सर्व अवयव सामान्य होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा डीएनए सिलियासारखाच तयार झाला होता.

पिरेनियन आयबेक्सच्या क्लोनिंगची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या जरी उपप्रजाती नष्ट होण्यापूर्वी सुरू झाली होती. तरी नामशेष झालेल्या उपप्रजातीला पुनरुज्जीवित करण्याचा हा पहिला प्रयत्न होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer – दोन्ही मुस्लिम राष्ट्रे असूनही सौदी अरेबिया आणि इराणमध्ये एवढं वैर का आहे..?

Next Post

कॉल ऑफ ड्युटीने फेमस केलेली ‘थॉम्पसन सबमशीनग*न’ शिकागो टाइपरायटर म्हणून ओळखली जायची

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कॉल ऑफ ड्युटीने फेमस केलेली 'थॉम्पसन सबमशीनग*न' शिकागो टाइपरायटर म्हणून ओळखली जायची

अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी 'करमरकर अल्गोरिदम'ला आजही पर्याय नाही..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.