The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयपुरचा राजकुमार बनलाय इटलीचा फॅशन आयकॉन !

by द पोस्टमन टीम
16 December 2024
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात अनेक राजघराणे होऊन गेले, जे आपल्या संपत्ती व ऐश्वर्यासाठी ओळखले जातात. आज जरी राजेशाही जाऊन लोकशाही आली असली तरी भारतात अजूनही राजघराणी अस्तित्वात आहेत. ते नेहमी आपल्या आलिशान व्यव्यहारातून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत असतात.

जयपूरच्या राजगादीचे वारसदार पद्मनाभ सिंह हे देखील याच आधुनिक संस्थानिक राजांपैकी एक आहेत. १९ वर्षाच्या वयात जयपूरच्या या राजपुत्राने इटलीच्या प्रसिद्ध डॉल्चे अँड गबाना या फॅशन ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला होता. पद्मनाभ सिंह हे अतिशय लहान वयातील मॉडेल असून त्यांच्या स्टाईल व लुक्सची चर्चा सर्वत्र असते. जगभरात पद्मनाभ सिंह यांचे चाहते असून एवढ्या कमी वयात त्यांच्याकडे अब्जो रुपयांची संपत्ती आहे, पद्मनाभ सिंह यांच्या आलिशान लाईफस्टाईलचे अनेक लोक दिवाने आहेत.

पद्मनाभ सिंह हे जयपूरचे क्राऊन प्रिन्स नरेंद्र सिंह आणि प्रिन्सेस दिया कुमारी यांचे चिरंजीव आहेत. पद्मनाभ सिंह यांचे बालपण फार ऐशआरामात गेले. पुढे अजमेरच्या मेयो कॉलेज बोर्डिंग स्कुलमधे त्यांची रवानगी करण्यात आली. पुढे इथले शिक्षण पूर्ण करत असताना इंग्लंडच्या मिडफिल्ड शाळेत पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले.

वयाच्या १३व्या वर्षी पद्मनाभ सिंह यांनी पोलो खेळण्यास सुरवात केली आणि त्यांनी काही काळातच या खेळात प्राविण्य मिळवले. त्यांच्या पोलोमधील प्रावीण्यामुळे भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलो स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

त्यांनी देशविदेशतील इतर मोठ्या राजघराण्यातील तरुणांशी मैत्री केली, त्यांच्यासोबत पोलोच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांच्यासोबत सुद्धा पद्मनाभ सिंह पोलो खेळले आहेत.



पोलो वर्ल्ड कपच्या वेळी त्यांना जगातील सर्वांत तरुण पोलो खेळाडू हा किताब बहाल करण्यात आला होता.

पद्मनाभ सिंह यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून लिबरल आर्ट्स या विषयाची पदवी मिळवली आहे. त्यांनी रोमच्या युनिव्हर्सिटी ऑफ म्युजिओलॉजीमध्ये हिस्ट्री ऑफ आर्ट्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

पद्मनाभ सिंह यांचे अजून एक वैशिट्य म्हणजे ते जगभरात त्यांच्या अत्यंत युनिक अशा फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. लांबसडक नाक आणि गव्हाळ वर्ण असलेल्या पद्मनाभ यांचा बांधा मध्यम आहे. त्यांनी आपला फिटनेस अगदी व्यवस्थित सांभाळला असून आपल्या शरीररचनेला शोभतील असेच कपडे ते परिधान करतात. त्यांच्या ड्रेसींग सेन्सची चर्चा जगभरात होते. अरमानी आणि डॉल्चे अँड गबानासारख्या मोठ्या इटालियन फॅशन ब्रँड्सने त्यांना रॅम्प वॉकसाठी आमंत्रित केले यावरून आपल्याला त्यांच्या मॉडेलिंग करियरचा अंदाज लावता येऊ शकतो.

पद्मनाभ सिंह आज जगातील काही प्रसिद्ध मॉडेल्सपैकी आहेत. मारियो टेस्टीनो या सुप्रसिद्ध इटालियन फॅशन फोटोग्राफरने पद्मनाभ सिंह यांना फोटोशूटसाठी पायघड्या घातल्या होत्या!

पिंक सिटी जयपूरच्या या राजकुमाराला भटकंतीचे फार वेड आहे. विश्वभ्रमंती करून जगातील प्रत्येक संस्कृतीला आणि तिथल्या मानवी आकांक्षांना समजून घेण्याची पद्मनाभ सिंह यांची इच्छा आहे.

त्यांना अशा देशात भटकंती करायला आवडते ज्या देशात पर्यटक जास्त फिरकत नाही.

ते कायमच इराणला जात येत असतात. असं मानलं जातं की इराण देशाशी त्यांच्या काही व्यक्तिगत आठवणी आणि ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत म्हणून ते कायम तिथे भेट देत असतात.

पद्मनाभ सिंह फक्त ऐशोआरामातच आपला वेळ घालवतात असं नाही. त्यांना आपल्यावरील जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. ते मुलींच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते असून त्यासाठी ते नेहमी आर्थिक मदत देत असतात. पद्मनाभ सिंह यांच्या आजी राजमाता पद्मिनी देवी देखील स्त्री शिक्षणाच्या मोठ्या पुरस्कर्त्या होत्या, त्यांच्यानंतर पद्मनाभ सिंह आपल्या आईचा हा वारसा पुढे घेऊन जात स्त्री शिक्षणासाठी सतत प्रयत्नशील असतात.

पद्मनाभ सिंह हे जयपूरच्या राजसिंहासनाचे ३०३ वे वारसदार असून त्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा फार अभिमान आहे. त्यांच्या पूर्वजांमध्ये मिर्झा राजे जयसिंह, सवाई जय सिंह अशा राजांचा समावेश होतो. आपल्या राजवाड्यावर त्यांचे खूप प्रेम असून. त्यांच्या इतर राजवाड्यात जरी त्यांनी हॉटेल उभारले असले तरी या राजवाड्याला त्यांनी जपून ठेवले आहे. गेल्या दोन तीन वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्या राजवाड्याला रूपांतरित करण्यासाठी रिनोव्हेशन प्रोजेक्टवर काम केले.

एका गर्भ श्रीमंत घरात जन्म घेऊन देखील जयपूरच्या या पद्मनाभ महाराजांना ना गर्व आहे ना कसला दुराभिमान ते बाळगतात. ते आपले आलिशान आयुष्य जगत असताना आपला पिढीजात वारसा पुढे नेत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी नेहरूंनी बिस्मिल्ला खाँ यांना आमंत्रित केले होते !

Next Post

पाकिस्तानला वाटलं सचिन आउट म्हणजे सामना खिशात, पण सिद्धू आणि जडेजाने आस्मान दाखवलं

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

पाकिस्तानला वाटलं सचिन आउट म्हणजे सामना खिशात, पण सिद्धू आणि जडेजाने आस्मान दाखवलं

मायक्रोसॉफ्टला उभं करण्यात बिल गेट्सपेक्षा या माणसाचं योगदान जास्त होतं !

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.