The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाण्यासाठी या देशात यु*द्ध झालंय..!

by द पोस्टमन टीम
26 May 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पाणी हा प्रकृतीकडून आपल्याला मिळालेला एक अत्यंत अमूल्य असा ठेवा आहे. पाण्यावर मानवासमवेत संपूर्ण प्रकृती अवलंबून आहे. पाण्याविना पृथ्वीवर आपण जीवनाची कल्पनासुद्धा करू शकत नाही. आज जगभरात पाण्याचा होत चाललेला तुटवडा आणि पाण्याची वाढती किंमत या दोन गोष्टी चिंतेचा विषय बनल्या आहेत. अनेकांच्या मते तिसरं महायु*द्ध पाण्यासाठी होणार आहे.

पाण्याच्या संरक्षणासाठी पोलिसांचा पहारा कसा असणार आहे? पाण्यासाठी यु*द्ध कसे होणार आहेत? या दोन प्रश्नांची उदाहरणादाखल उत्तरं आपल्याला दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या देशाने दिली आहेत. ही एक कथा आहे बोलिव्हियामध्ये झालेल्या जलयु*द्धाची.

Cochabamba Water Crisis.

तर झालं असं की,



१९९९ साली बोलिव्हियाच्या प्रशासनाने २०२९ हा कायदा पारित करून कोचाबांबाच्या जल प्रणालीचे खाजगीकरण केले. त्यांनी तो जल स्त्रोत ‘एगुअस देल तुनारी’ नावाच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीला विकला.

खाजगीकरणाच्या अगोदर कोचाबांबा जलस्रोताचा ताबा एका स्थानिक संस्थेकडे होता. कोचाबांबाच्या जवळ राहणाऱ्या ८०% लोकांना या जलस्त्रोताचा फायदा मिळत होता. वीज आणि काही लहान मोठे खर्च यांच्या बळावर ती स्थानिक संस्था काम करत होती. सरकारला मात्र या स्थानिक संस्था लुटेऱ्या वाटायच्या, अनेक एजन्सीची फूस त्याला कारणीभूत होती.

या प्रणालीचे खाजगीकरण झाल्यावर सगळ्या संस्था बंद पडल्या. आता कायदेशीररित्या या जलस्त्रोतावर ‘एउगस देल तुनारी’चा ताबा होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

खाजगीकरण झाल्यानंतर घरगुती वापराच्या पाण्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे दर एकाएकी वाढवण्यात आले. यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांना एवढे महाग पाणी विकत घेणे शक्य नव्हते. यामुळे सरकारच्या विरोधात असंतोषाने परिसीमा गाठली.

Cochabamba Water War
Cochabamba Water War

खाजगीकरणाचा विरोधात सगळ्यात आधी जी संघटना समोर आली तिचे नाव होते फॅबराईल्स, ही कोंचाबाबाच्या फॅक्टरी कर्मचाऱ्यांची संघटना होती. त्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आणि खाजगी कंपन्याच्या कारभारावर नियंत्रण आणण्याची मागणी केली. हळूहळू स्थानिकांनी संघटनेत सहभागी होण्यास सुरुवात केली. पाण्यासाठी चालू झालेल्या संघर्षाने कालांतराने विद्रोहाचे रूप धारण केले.

फॅबराईल्स या विद्रोही लढ्याचे केंद्रबिंदू बनले. आपल्या हक्कांसाठी हे लोक रस्त्यावर आले होते आणि सरकारच्या विरोधात नारेबाजी करत होते. परिस्थिती इतकी चिघळली की बोलिव्हियाच्या सरकारला पोलिस आणि सुरक्षा दलांना तैनात करावं लागलं. मग विद्रोहाचे रूपांतर यु*द्धात झाले.

लोकांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावण्यात आले, असे असून देखील गर्दी आवरण्यात सुरक्षा दल अपयशी ठरत होते. लष्कराला पाचारण करण्यात आले. अश्रू धूर आणि लाठीचार्ज करून देखील लोकांना प्रतिबंध करणे अवघड होऊन बसले. लोकांचा संतापाचा भडका शांत होण्याचे नाव घेत नव्हता.

संतप्त जमावाने पोलिसांशी यु*द्ध केले. पेट्रोल बॉ*म्ब, काठी आणि दगड घेऊन हा जमाव चालून आला. लष्कराने गोळी*बार केला. असंख्य निरपराध लोक आणि पोलीस मृत्यूमुखी पडले.

एप्रिल २००० मध्ये परिस्थिती चिघळून कोचाबांबा समवेत इतर शहरांची अवस्था फार बिकट झाली होती. सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची तक्रार देखील मागे घ्यावी लागली. बोलिव्हियातील परिस्थितीची अनेक देशांनी निंदा केली. सरकारला सर्वांनी धारेवर धरले.

 

Battle for Water Rights.

 

सरकारने निर्णय मागे घेतला तरी लोक आंदोलन करत होते. २००६ साली यासाठी जल मंत्रालय स्थापन करण्यात आले आणि तीन वर्षांनी २००९ साली एक ठराव पारित केला ज्यामुळे पाणी हे जीवनावश्यक असून सर्वांचा त्यावर समान अधिकार आहे असे प्रतिपादन करण्यात आले. २०१० साली संयुक्त राष्ट्रांची मान्यता बोलिव्हिया सरकारने प्राप्त केली. आज तिथे पाणी सार्वजनिक आहे.

बोलिव्हियातील हा पाण्यासाठीचा संघर्ष भविष्यात जर पाण्याचा असाच गैरवापर सुरू राहीला तर उद्भवणारे यु*द्ध किती विनाशकारी असेल याची प्रचिती करून देणारा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: water war
ShareTweet
Previous Post

या सैनिकाने पहिल्या महायु*द्धातल्या लाखो भारतीय सैनिकांची व्यथा जगासमोर मांडलीय

Next Post

या इतिहासकाराने छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोचवलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post
Yadunath Sarkar feature postman

या इतिहासकाराने छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोचवलाय

नगरमार्गे जाणारा कोणताही मटणप्रेमी इथे थांबल्याशिवाय पुढं जात नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.