The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेजरच्या एका “बीप”ने लँडलाईन आणि मोबाईल फोनमधील दरी भरून काढली होती

by द पोस्टमन टीम
27 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


संदेशवहन आणि संपर्क क्षेत्रातील क्रांतीने जग १८० अंशात बदलून गेले. लँडलाईनपासून आजच्या स्मार्टफोनपर्यंत या क्षेत्रातील तंत्रज्ञानात कित्येक बदल घडून आले. पहिल्यांदा लँडलाईन आले तेव्हा अगदी मोजक्या लोकांनाच हे कनेक्शन परवडत असल्याने लँडलाईन असणे म्हणजेच घरी टेलिफोन असणे हे देखील एक स्टेटस सिम्बॉल होते.

टेलिफोन वापरण्याची मजा काही औरच होती. इथून पुढच्या पिढीला टेलिफोन पाहायचे म्हंटले तरी म्युझियममध्ये जावे लागेल, अशी परिस्थिती आहे. आजच्या स्मार्ट फोनच्या आधी संवादासाठी, संपर्क राखण्यासाठी किंवा संदेश पोहोचवण्यासाठी पेजर फार उपयोगी ठरले. अर्थात हे पेजरचे युग अगदी कमी कालावधीचे होते पण, लोकांना तंत्रज्ञानाची सवय लावण्यासाठी एवढा काळ पुरेसा होता.

मोबाईलपेक्षा थोडे कमी ॲडव्हान्स डिव्हाइस म्हणजे पेजर असे म्हणता येईल. लँडलाईन आणि मोबाईल यांच्यामधील एक पायरी म्हणजे पेजर. लँडलाईनपासून मोबाईलच्या जमान्यात जी थोडी दरी निर्माण झाली होती, ती पेजरने भरून काढली.

१९९०च्या दशकात भारतात उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. १९९५पर्यंत तर हे धोरण बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते. १९९५पर्यंत परदेशी कंपन्यांनी भारतात चांगला जम बसवला होता. पेजर १९९५ सालीच भारतात आले.

एकीकडे पश्चिमेकडील लोकांना पेजर आतापर्यंत निरुपयोगी वाटत होता, पण भारतात मात्र पेजरची क्रेझ वाढत होती. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाने आणि परदेशी कंपन्यांच्या येण्याने एकूणच भारतीयांच्या जीवनशैलीवरही परिणाम होत होता. तत्काळ संदेश पोहोचवणे निकडीची गरज बनली होती. कामाच्या ठिकाणी तर सर्वच गोष्टींना वेग आला होता. अशात ज्यांना कुणाला जाताजाता एखाद्याला काही निरोप द्यायचा असेल तर अशा लोकांसाठी पेजर हे एक वरदान ठरले होते.



कामाच्या ठिकाणी तर पेजर अत्यंत महत्त्वाचे साधन बनले. कारण, कुठल्याही कर्मचाऱ्यापर्यंत ऑफिसचा मेसेज तात्काळ पोहोचवणे शक्य होते. यामुळे कार्यालयीन कामकाज वेगाने होत होते. खाजगी ऑफिसेसची ही नुकतीच सुरुवात होती. व्यवसायातील स्पर्धा तीव्र होत होत्या. अशात बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी पेजर वापरणे सक्तीचे केले होते.

पेजरचा शोध ही संदेशवहन क्षेत्रातील क्रांती होती. पेजरमुळे संदेशवहनाची किंबहुना संवादाचीच पद्धत बदलून गेली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

एका मोठ्या बदलाला तोंड देण्यापूर्वी त्याची छोटीशी झलक पेजर युगाने दाखवून दिली. पश्चिमेकडील देशात फक्त कुरिअर सर्विस देणारे याचा वापर करत. पण, भारतात पेजर वापरणे हे एक स्टेटस सिम्बॉल होते. भारतात पेजरला इतकी मोठी बाजारपेठ मिळाली की, त्यामुळे भारतातील टेलिकॉम मार्केट क्षेत्रातील प्रचंड क्षमता सिद्ध झाली.

सेलफोनचा अविष्कार होण्याआधी मोबाईल मेसेजिंगची एक झलक पेजरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संपर्क राखण्यासाठी पेजर आवश्यक होता. त्यातील मेसेजिंग करण्याची सोपी, सुटसुटीत पद्धत आणि तत्काळ पोचण्याची खात्री यामुळे पेजर ही एक नितांत गरजेची वस्तू बनली. शिवाय, पेजर ही त्याकाळची फॅशनदेखील होती.

पेजरवरून पाठवण्यात येणारे मेसेजेस हे अगदी थोडक्यात आणि टेलीग्राफिक रुपात पाठवले जात. एक-दोन वर्षातच पेजरने बाजारपेठेत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पेजर्समुळे कामात सहजता आली, कुठेही असलो तरी संपर्क ठेवणे सोपे झाले. तरुणांची पेजरला मोठी पसंती होती.

पेजरच्या छोट्या स्क्रीनवर मेसेज आला की एक बीप वाजून त्याचा अलर्ट दिले जात असे. हे मेसेजेस एका कॉलर बेस्ड सिस्टीमद्वारे पाठवले जात. ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याला सेन्ट्रल सिस्टीमला कॉल करून तिथे ज्याच्यासाठी मेसेज आहे त्याच्यासाठी निरोप ठेवावा लागे. मग हा मेसेज ज्याच्यासाठी आहे त्याच्या पेजरच्या स्क्रीनवर अवघ्या काही क्षणात झळकत असे.

शिवाय पेजर हाताळणे देखील सोपे होते. कमरेच्या बेल्टला लावलेल्या पॉकेटमध्येही तो सहज सामावून जाई.

मोटोरोला, मोबिलींक, बिपीएल आणि पेजलींकसारख्या कंपन्यांनी पेजर निर्मितीत आघाडी घेतली होती. भारतातील पेजरची बहुतांश बाजारपेठ याच कंपन्यांनी काबीज केली होती. त्यातही मोटोरोला सर्वांत पुढे होता. एकूण बाजारपेठेच्या ८०% बाजारपेठ एकट्या मोटोरोलाने काबीज केली होती.

सुरुवातीला पेजर खूपच महाग होते. एका पेजरची किंमत जवळपास १०,४०० किंवा त्याच्याही पुढे होती. १९९८ साली ज्या कंपन्या पेजर सर्विस देत होत्या त्यांच्या ग्राहकांची संख्या वीस लाख इतकी होती. याच काळात सेलफोननी देखील भारतीय बाजारपेठेत आगमन केले होते. पण, त्यांचा वापर अगदीचा मर्यादित होता. त्याच्या किंमती तर अगदीच गगनभेदी म्हणाव्या अशा होत्या.

कालांतराने सेलफोन हे स्टेटस सिम्बॉल मानले जाऊ लागले. सेलफोनमुळे संपर्क साधण्याचे काम अधिक जलद झाले. सेलफोनच्या आगमनानंतर हळूहळू पेजरचा वापर कमी झाला. पेजरची क्रेझ कमी झाली.

सेलफोन असणारा वर्ग आणि सेलफोन नसणारा एक वर्ग अशी समाजाची दोन भागात विभागणी झाली. अर्थात मोबाईल ऑपरेटिंग कंपन्यांनी आपले दर कमी केल्यानंतर मात्र हे चित्र वेगाने बदलत गेले.

२००२ मध्ये पेजरच्या सर्विस सेंटर सबस्क्रायबरची संख्या वेगाने घसरली. २० लाखावरून वरून ही संख्या ५ लाखावर आली.

आता पेजर सर्विस देणाऱ्या कंपन्यांना देखील हा व्यवसाय फायद्याचा वाटेना. बाजारपेठेवर वर्चस्व असलेल्या मोटोरोलासारख्या कंपनीला देखील पेजरची निर्मिती करण्यात फायदा दिसत नव्हता. हळूहळू त्यांनी पेजरची निर्मिती आणि सर्विस दोन्हीही बंद केले. आता मोटोरोलाने आपला मोर्चा सेलफोन निर्मितीकडे वळवला होता. २००२ मध्येच त्यांनी पेजरची निर्मिती कायमची बंद केली.

अर्थात पेजरचा हा काळ अगदी छोटा असला तरी, टेक्नोसॅव्ही युगाची एक छोटीशी झलक यातून पाहायला मिळाली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

लोकमान्यांच्या अग्रलेखात ब्रिटीश राजसत्तेला धडकी भरवण्याची ताकद होती

Next Post

ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी – चहा

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

ब्रिटिशांसोबत भारतात आलेल्या गोष्टी - चहा

आपल्या चिमुकल्याला छोटी जीप बनवून देणाऱ्यासाठी आनंद महिंद्रांनी मदतीचा हात पुढे केलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.